macOS आणि iOS-1 (Change Folder Icon)

Submitted by शाली on 14 June, 2018 - 03:08

बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS (iPad आणि iPhone) विषयी मला माहित असलेली माहिती देण्यासाठी एक सदर सुरु करावे म्हणत होतो. यात काही टिप्स असतील, ट्रबलशुटींग असेल किंवा मला आवडलेली काही ॲप असतील. किंवा ॲप्पलविषयीच्या नव्या बातम्याही असतील. सगळ्याच गोष्टी या कामासाठी ऊपयोगी असतिलच असे नाही. काही काही गोष्टी 'जरा गम्मत' म्हणूनही असतील. पण प्रश्न होता भाषेचा. ईंग्रजीत तर लिहायचे नाही आणि मराठीत लिहायचे तर ईंग्रजी शब्दांना पर्याय सापडत नाही. म्हणजे निदान मला माहित नाहीत. मग ठरवले जमेल तसे लिहावे, सुचतील ते शब्द वापरावे. हळूहळू सफाई येत जाईल लिखाणात. तोवर ॲडजस्ट करा.

तर आज अगदी साध्या गोष्टीने सुरवात करु. (ही टिप कामासाठी ऊपयोगी नसली फारसी तरी हिचा ऊपयोग करावा लागेल काही पुढे.) माझ्या डेस्कटॉपवर अनेक फोल्डर असतात. ज्यात माझ्या वेगवेगळ्या कामाच्या फाईल्स असतात. पण सगळे फोल्डर आयकॉन हे 'डिफॉल्ट आयकॉन’ असतात. ते पहायला फार कंटाळवाणे तर होतेच पण जास्त फोल्डर्स असतील तर पटकन शोधायला जरा अवघड जाते. प्रत्येकवेळेस स्पॉटलाईट सर्च ऊघडत नाही कोणी. (खरं तर फारसे त्रासदायक नाही पण आपल्या विशिष्ट फोल्डरला ‘विशिष्ट’ आयकॉन असला की छान वाटते.) माझ्या 'मायबोली’वरील लेखांचे एक फोल्डर आहे ज्याचा आयकॉन हा 'सिस्टीम डिफॉल्ट आयकॉन' आहे. तर पाहूयात, तो आयकॉन 'कस्टम आयकॉन’मध्ये कसा बदलता येईल.

प्रथम तुम्हाला जो आयकॉन वापरायचा असेल तो डाऊनलोड करुन घ्या. या साठी अनेक वेबसाईट्स आहेत ज्या ऊत्तम आणि वैविध्यपुर्ण आयकॉन फ्रीमध्ये देतात. शक्यतो ही इमेज png format (transparent background) असेल तर छान दिसेल. मी 'मायबोली’चा लोगो आयकॉन म्हणून वापरला आहे. आता ही इमेज कॉपी करा. त्या साठी ही इमेज प्रिव्ह्यू मध्ये ऊघडा. (डबल क्लिक करा) आता preview menu वर एडीटवर क्लिक करुन ‘सिलेक्ट ऑल’वर क्लिक करा. नंतर कॉपी करा.
1icon.jpg

2icon.jpg

आता ज्या फोल्डरचा आयकॉन बदलायचा आहे त्या फोल्डरची info window ऊघडा. त्यासाठी फोल्डरवर राइट क्लिक करुन Get Info वर क्लिक करा किंवा ⌘+I हा किबोर्ड शॉर्टकट वापरा. Info Window ऊघडल्यानंतर त्यातील असलेल्या आयकॉनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या आयकॉनला blue outline दिसेल.

3icon.jpg
आणि
4icon.jpg
नंतर menu bar वर एडिट मध्ये जावून Paste वर क्लिक करा.

तुमच्या फोल्डरचा आयकॉन बदललेला असेल.

8icon.jpg
हा पुर्ण स्क्रिन-शॉट.
5icon.jpg

अर्थात ही माहिती कामासाठी फारशी ऊपयोगी नसली तरी जरा बदल म्हणून वेगवेगळे आयकॉन वापरुन पहायला काही हरकत नाही. पुढील सदरात ऊपयोगी टिप्स आणि ॲप्लिकेशन याबद्दल पाहू.


Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users