चौकशी: डेस्कटॉप कसा असेंबल करावा?

Submitted by नानाकळा on 24 May, 2017 - 16:39

नवीन डेस्कटॉप पीसी घ्यायचा आहे. जीएसटीमुळे दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जरा घाई करतो आहे.

माझा जाणकारांना प्रश्न आहे की डेस्कटॉप असेम्बल करतांना काय काळजी घ्यावी, कसा करावा, कोणते कॉम्पोनंट्स कोणासोबत कसे मॅच होतात, ओवरक्लॉक काय असते, करणे योग्य असते का, असेल तर कसे करायचे वगैरे डिटेल नर्ड जीक प्रश्न आहेत.

तारुण्यात (म्हणजे अगदी कालपरवा हो) ह्या गोष्टी बर्‍याच केल्या आहेत, पण आताशा इतर अनेक उपद्व्यापामुळे (संसार हो, संसारच) टेक्नॉलॉजीची नाळ तुटली आहे. बाजारात आता नवीन काय व इतरांच्या तुलनेत कोणते कसे चांगले, कसे वाईट हे मला माहित नाही.

तर माझी गरज सांगतो आधी:

मी आहे एक कमर्शियल आर्टीस्ट. ग्राफिक सॉफ्टवेअर्स जसे फोटोशॉप, कोरल ड्रॉ वगैरे वापरतो. कधी कधी असे चार प्रोग्राम एकत्र एकाच वेळेस वापरतो. फाइल साइझ १०० एम बी ते २ जीबी पर्यंत असू शकते. २ जीबी ही रेअर केस आहे. फास्ट रेन्डरिन्ग, फाइल सेव्ह होणे, उघडणे, ऑपरेशन्स स्पीडने होणे फार महत्त्वाचे आहे. आणि बजेट कन्स्ट्रेन्ट सुद्धा आहेच.

माझी निवड व संबंधित प्रश्नः
१. प्रोसेसरः
आय ५ घ्यावा अशी गरज आहे पण बजेट आय३ कडे घेऊन जात आहे. तरी आय५ आणि आय३ मध्ये कोणती जनरेशन घ्यावी? आय५ ६जेन व आय३ ६ जेन ह्यात परफॉर्मन्सवाइज काय फरक असेल? तुमच्या मते स्वस्त आणि फास्ट, चांगले मॉडेल कोणता आहे? आय३ अजून वर्षभर रिलेवंट असेल की आउटडेटेड होइल?

२. बोर्डः मदरबोर्ड कोणता घ्यावा? वरील प्रोसेसरच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आहे हा प्रश्न. प्रोसेसर आणि मदरबोर्ड अशी "रबने बनायी जोडी" टाइप काही असते का? म्हणजे आय ५ सिक्स जनरेशन ६५०० हा प्रोसेसर घेतला तर गिगाबाईट चा अमुक एक मॉडेलचा बोर्डच त्याच्याशी फिट बसतो, चांगला परफॉर्मन्स देतो असे काही?असे असेल तर आय५ आणि आय ३ दोन्हीसाठी स्थळ सुचवा.

३. रॅमः माझा गोंधळ इथे बर्‍यापैकी आहे. चार जीबी पुरेशी होते आत्ता. पण वर्षभरात ती इर्रिलिवंट होइल का? किंवा माझ्या कामाच्या ओझ्याखाली टिकेल काय? किंवा प्रोसेसर ला ८ जीबी असेल तरच अजून छान फास्ट धावता येईल? चार जीबी मध्ये डीडीआर ४ आहे का, मी बघितली नाही म्हणून विचारतोय. ८ जीबी विरुद्ध ४ जीबी असा जाणवण्याइतपत फरक केव्हा दिसतो, म्हणजे ती आयडीयल सिच्युएशन कोणती?

४. ग्राफिक कार्डः २ जीबी ग्राफिक कार्ड माझ्या कामासाठी पुरेसे आहे. पण ते कोणत्या कंपनीचे, कोणते मॉडेल घ्यावे याबद्दल माहिती नाही. एका खास एन्विडिया च्या मॉडेल बद्दल ऐकले होते पण आता त्याचा नंबर आठवत नाही काहीतरी जीटी ९*** असा होता. फास्ट व चांगले ग्राफिक असे दोन्ही फायदे त्यात आहेत असे ऐकले होते, ते कोणते माहीत आहे का?

५. एसएमपीएसः बोले तो पावर सप्लायः मागच्या महिन्यात एकाला ब्रॅण्डेड पीसी घ्यायचा होत म्हणून शोरुम मध्ये गेलो होतो, तेव्हा लेनोवो च्या एका रेडी सेटअप मध्ये जास्त वॅट असणारा पॉवर सप्लाय आहे असे सेल्समन सांगत होता. अनब्रॅण्डेड पीसीत १५०-२०० पर्यंत वॅटेज चा लावतात, लेनोवो ने ५०० चा लावला आहे असे काहीतरी (नक्की आठवत नाही) तो सांगत होता. पीसी परफॉर्मन्सवर फरक पडतो म्हणाला. हे खरे आहे काय, असे असेल तर कोणता पॉ.स. घ्यावा?

६. हार्डडिस्कः ५०० जीबी आणि १ टीबीत जास्त फरक नाही किंमतीत असे कळते, पण परफॉर्मन्स ला डिस्क मोठी असेल तर फरक पडतो का?

तर माझ्या संगणक-जाणकार मित्रांनो, कमी चारा खाणारी, आखुडशिंगी, बहुदूधी अशी गाय मला हवी आहे, शोधण्यास मदत कराल काय?

२५ हजार च्या आसपास बेस्ट पीसी बसेल काय? काही बाबतीत कॉम्प्रमाइज करायला तयार होइल मी, जसे की मॉनिटर २२ किंवा २४ नको १८.५ असला तरी पुरे... रॅम, प्रोसेसर, हार्डडिस्क मध्ये थोडाफार उन्नीसबीस चालेल. बजेट जास्तीत जास्त ३० झाला तर ओके, पण जास्त नाही.
,
तो गुरु, हो जाओ शुरु....

धन्यवाद!

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्हाला अधिकृत विंडोज ओएस कशी /कितीला मिळणार? ते धरून बाजारात तयार मिळणाय्रा एचपी वगैरेच्या तुलनेत किती रुपये वाचतील? माझ्याकडे कोणढाच पिसी नाही म्हणून विचारतो.

कुठलाही पीसी फास्ट करण्यासाठी तुमच्याकडे क्ष पैसे असतील (आणि मेमरी स्लॉट शिल्लक असतील ) तर मेमरी वाढवल्याने ( सीपीयू वाढवण्यापेक्षा) कधीही जास्त फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल ती जास्तीत जास्त मेमरी घ्या असे सुचवेन. ग्राफीक्स ला खूप मेमरी लागते. अतीशय पॉवरफूल सिपीयू असला तरी त्याचा बराचसा वेळ डीस्कवरून डाटा मेमरीमधे येण्याची वाट पाहण्यात वाया जातो. जास्त मेमरी असेल तर सारखी वाट पाहणे थोडे कमी होते.

+१ अजय. तुम्ही जर कोअर ग्राफिक्स चे कामं अगदी नेहेमी करत असाल तर रॅम कमीतकमी ८ ते १६ जिबी हवी. ३२ वुड बी द बेस्ट. सेम गोज हार्ड ड्राईव करता. एक टीबी पुरायला हवी.
पीसी च जग फार फास्ट बदलतं. थोडा पुढला विचार करून मग पीसी असेंबल केलात तर जास्त चांगलं. कारण आपण या गोष्टी पुन्हापुन्हा घेत नाही, त्याचे काँपोनन्ट्स बदलत नाही. डेटा जमा होत राहातो मात्र. तुम्ही बेस्ट शॉट केलेले, एडिट केलेले फोटो - विडिओ केवळ जागा नाही लोकल पीसीमध्ये म्हणून डिलीट नक्कीच नाही करणार, बरोबर?

यात तुम्ही ओएस चं बजेट नाही धरलेलं बहुतेक. आताशा नॉन जेन्युईन ओएस फार तग धरत नाहीत. व्हायरस चा प्रॉब्लेम कधीही येऊ शकतो. तोही विचार करून पाहा.

ग्राफिक्स चे कामं असल्यानी मॉनिटर ही नीट पाहून मग घ्यावा. काही ब्रँड्स मध्ये कलर रिप्रोडक्शन ठीक नसतं. डिस्प्ले नीट कॅलिब्रेट केलेले नसतात...

फास्ट रेन्डरिन्ग, फाइल सेव्ह होणे, उघडणे, ऑपरेशन्स स्पीडने होणे फार महत्त्वाचे आहे >>> याकरता कॅश मेमरी ही पाहा प्रोसेसर घेतांना.