Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
@Shraddha मटर पुलाव मला द्या
@Shraddha
मटर पुलाव मला द्या 😋
ही आजची वीकांत स्पेशल न्याहरी
ही आजची वीकांत स्पेशल न्याहरी - होम मेड white / खाटा aka रवा ढोकला.
घाई नसल्याने थोडे प्लेटिंग वगैरेचे नखरे
भाजी चपाती पुलाव रायता सलाड
भाजी चपाती पुलाव रायता सलाड गुलाबजाम... हे इतके पद्धतशीर ताट घरचे आहे की बाहेरचे? आयटम छान आहेत.
पांढरा रवा ढोकळा प्लेटिंग बघून शेजारी काटे चमचे शोभले असते आणि त्यानेच खायला आवडले असते.
भाजी चपाती पुलाव रायता सलाड
भाजी चपाती पुलाव रायता सलाड गुलाबजाम... हे इतके पद्धतशीर ताट घरचे आहे की बाहेरचे? आयटम छान आहेत.>>
घरुन बनवून नेले होते.आमच्या शाळेत आम्ही नेत असतो सर्वाँसाठी बनवून अधे मधे.. फक्त गुलाब जामुन आणि दही बाहेरून आणले होते
मटर पुलाव मला द्या >>
मटर पुलाव मला द्या >>
नेक्स्ट time बनवल्यावर या
ढोकला मस्त दिसतोय... प्लेटिंग
ढोकला मस्त दिसतोय... प्लेटिंग सुंदर..
थँक्यू
थँक्यू
… आम्ही नेत असतो सर्वाँसाठी बनवून अधे मधे…
हे पॉट लंच कल्चर आता संपल्यात जमा आहे. पण त्यात मजा आहे अजून. आम्ही करतो कधी कधी. फरमाइशी प्रोग्राम सारखे 😀
… काटे चमचे फॉर ढोकला ? नो नाय नेव्हर. (दोन्ही) हातानेच खाल्ले मी फोटो काढून झाल्यावर 😀
Ho kharch majja yete..
बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा स्वतः करुन नेले की जास्त छान वाटते.. अर्थात नेहमी शक्य नाही होत पण कधीतरी मज्जा येते.
बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा
बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा स्वतः करुन..
+ १
Actually बाहेरचे प्रोफेशनल लोकांनी केलेलेही फार एकसुरी होते फूड. सेम ग्रेवी, सेम सॉसेस, सेम प्रोसेस. काही सरप्राइज़ रहात नाही. म्हणून तुमची आयडिया बेस्ट अधूनमधून करायला.
आमच्याकडे वळवट म्हणजे हाताने
आमच्याकडे वळवट म्हणजे हाताने वळलेले नाजुक बासमती तान्दळासारखे दिसणारा जिन्नस ...>>>>> गव्हले ?>> हो हो गव्हले पण म्हणतात, गव्हले-नखुल्या-मालत्या-बोटवे.
चर्चा छान झालिये, सगळिकडे थोड्याफार फरकाने ससारख्याच प्रथा आहेत.
साखराबा, शेवगा भाजि, भ़जी सगळे आयटेम मस्त दिसतायत
सामो अन्जिर मिल्कशेक सुकवलेल्या अन्जिराचा का?
श्रद्धाच ताट एकदम प्रो दिसतय,
श्रद्धाच ताट एकदम प्रो दिसतय, बाहेरुन मागवतो तस.
अनिद्द्य व्हाइट ढोकळा मस्त दिसतोय क्रुती द्या
अरे! मधले मसालेभात आणी थालिपिठ मस्त मिस झाले होते..टेम्टिग एकदम.
वामनराव सुक्या अंजीरांचा.
वामनराव सुक्या अंजीरांचा. दुधात भिजवुन.
श्रद्धा, अनिंद्य सुंदर ताट
श्रद्धा, अनिंद्य सुंदर ताट
Midnight snacks अंडा प्याटीस
Midnight snacks
अंडा प्याटीस
Thank you..
Thank you..
Anda pattice bhari distay
अरे हो, आपला एक धागा एक
अरे हो, आपला एक धागा एक ईस्टोरी आहे यावर..
आठवणी जागवणारे खाद्यपदार्थ - १ - अंड्या प्याटीस ! ए लव्ह ई स्टोरी
https://www.maayboli.com/node/62355
Quince नावाचे फळ खाल्ले.
Quince नावाचे फळ खाल्ले. अननस्+ मोसंबे + बोर अशी चव आहे. पोत कडक आहे म्हणजे कच्च्या पेरुसारखा. आवडले. म्हणजे ठीकच आवडले. ठोठरा वगैरे बसतो का ते पहाण्याकरता एकच फोड खाल्ली आहे. मग संपवेन.



.
.
.
Quince is a moderate source of vitamin C and copper, and a good source of several B vitamins, iron, potassium, and magnesium, with no cholesterol
.
Rich in fiber, quince aids digestion and lowers elevated blood sugar and cholesterol. Vitamin C helps protect cells (including blood vessel and immune cells) from oxidative damage by free radicals.
--------------
हे फळ जॅम मध्ये वापरले जाते. शिजवल्यावर अॅरोमॅटिक लागते वगैरे ऐकून मेथांबा सारखे मेथा-क्विन्स करायचा प्रयत्न केला. जरी फळ आंबट नसलं तरी. बघू कसे लागते ते.
.
शिजून नीट मॅश झाले व चांगले लागले. वेगळेच लागले. पण छान.
मी कधी खाल्ले नाही पण त्याचा
मी कधी खाल्ले नाही पण त्याचा पाय बनवतात हे ऐकले आहे.
श्रद्धा, मटार पुलाव मस्त आहे.
श्रद्धा, मटार पुलाव मस्त आहे.
अनिंद्य, असा ढोकळा मी अख्खी थाळी उकडतात तेवढा खाऊ शकतो. प्लेटिंग उच्च.
अंडा पॅटीस मस्त आहे.
Quince याबद्दल नवीन ऐकले. इकडे कधी पाहिले नाही
भरल्या पोटी सुद्धा या
भरल्या पोटी सुद्धा या धाग्यावर येऊ नये......
भरल्या पोटी सुद्धा या
भरल्या पोटी सुद्धा या धाग्यावर येऊ नये >>> +१
@श्रद्धा, ते ताट एकदम चविष्ट दिसतय, पण मसालेभात जास्त लाळगाळू आहे.
@अनिंद्य, प्लेटींग भारीच आहे इदड्याचे. रच्याकने ग्लेझ्ड सिरॅमिक म्हणजेच स्टोनवेअर का? (खरं तर हा प्रश्न दुसर्या धाग्यावर विचारायला हवा होता पण आळस
)
aka रवा ढोकला >>> ही रेसिपी द्या. मला तांदूळ आणि उडीद डाळ असलेली रेसिपीच माहित आहे. रवा घालून सोपी होत असेल.
सर्व मेन्यू मस्त..
सर्व मेन्यू मस्त..
@shraddha कृपया मसालेभात आणि मटार पुलावची रेसिपी द्या
On demand Short recipe for
On demand Short recipe for khata/ rava dhokla for प्राजक्ता, माधव :
खाटा ढोकला सुपर सिंपल आहे. १ पोर्शन रवा + १/२ पोर्शन आंबट दही, एक मोठा चमचा बेसन + पाणी यांची युती. अर्धा तास रेस्ट. किसलेले आले, मीठ आणि ENO एक चमचा टाकून, थोडसेच फेटून तेलाचा हात लावलेल्या ताटलीत १५ मिनिटे वाफवायचे की झाले.
वाफवतांना ढोकल्याचा लेयरचा थिकनेस कमी हवा, दही आंबटच हवे आणि यात आलं पाहिजेच. नाहीतर फसणार.
नीट वाफवले की वरून तीळ + मोहरीची फोडणी, यात हिरव्या मिरच्या किंवा कढीपत्ता टाका, टाकू नका तुमची मर्जी.
हवे ते हवे तितके व्हेरियेशन्स करा. दुल्हन वही जो पिया मन भाए 😀
ऋतुराजसारखा मलासुद्धा फोडणी वगैरे होईपर्यंत पेशंस नसतो. जस्ट लाल मिरची पावडर भुरभुरली की फडशा. चटका लागला, चीभ पोळली तरी बेहत्तर 😀
रच्याकने ENO हे acidity वरचे औषध केक-ढोकला फुलवण्यासाठी पहिल्यांदा वापरणाऱ्या व्यक्तीचे मला अमाप कौतुक आहे, कसं सुचतं ?
^^ENO हे acidity वरचे औषध केक
^^ENO हे acidity वरचे औषध केक-ढोकला फुलवण्यासाठी पहिल्यांदा वापरणाऱ्या व्यक्तीचे मला अमाप कौतुक आहे,^^
मला असेच कौतुक राजमा शिजवण्यासाठी त्यात करवंटी चा तुकडा टाकण्याचे आहे...
खरंच, कसं सुचते ??!?
@अनिंद्य, खाटा ढोकलाच्या
@अनिंद्य, खाटा ढोकलाच्या सोप्या रेसिपीबद्दल धन्यवाद. नक्की ट्राय करून बघणार.
जरूर करा आणि फोटो डकवा !
जरूर करा आणि फोटो डकवा !
कमी तेल, वाफावणे आणि नो पूर्वतयारी - सर्व फेवर मधे आहे
क्विंन्स जॅम मस्त लागतो.
क्विंन्स जॅम मस्त लागतो. कच्चे खात नाहीत कधी.
होय झंपी कच्ची एक फोड खल्ली
>>>>>क्विंन्स जॅम मस्त लागतो. कच्चे खात नाहीत कधी.
होय झंपी कच्ची एक फोड खल्ली आणि मग वाचले की शिजवुनच खा.
@अनिंद्य, खाटा ढोकलाच्या
@अनिंद्य, खाटा ढोकलाच्या सोप्या रेसिपीबद्दल धन्यवाद.
मी आताच करून पाहिला. माझे बेसन जास्त झाले असेल त्यामुळे रंग पिवळट आला. आणि दही जास्त आंबट नव्हते त्यामुळे मी लिंबू पिळला त्यात. छान चव आली. सोपी आहे रेसिपी.
Pages