खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळे पदार्थ एकसे बढकर एक ...!
मृणाली, अमुपरी, लावण्या तुमच्याकडे जेवायला यायलाच लागेल!

लावण्या आणि मृणाली,
मी धन्य झालो. आपल्या दोघींच्या पोस्टचा स्क्रीनशॉट घेऊन बायकोला पाठवतो Happy

माझ्या https://www.maayboli.com/node/33570 या लेखातील मजकूर तोडून ८-१० नवीन धागे केलेे दिसताहेत। तेही माझे नाव न लिहिता? प्रत्याधिकार अधिकार मायबोली ॲडमिन टिमच तोडणार का?

छान, घरातील सर्व जण एकत्र काम करत मस्त एन्जॉय करत आहात.
>>>>

हो अगदी हेच म्हणतो मी दरवेळी, पाणीपुरी पार्टीला ती आधी एकत्र पण आपापली बनवायची जास्त धमाल असते. छोटा पोरगा तर त्याचाच जास्त आनंद लुटतो. एकेक बनवतो आणि टर्न बाय टर्न प्रत्येकाला जाऊन भरवतो Happy

चाट पार्टी मस्त अभि!
सांबारवडी पाहूनच कळलं कोणाकडची असेल ते ! मस्त मसाला!

पाणीपूरी मस्त. आणी सांभारवडी पण मस्त. आम्ही पण काल पुडाची वडी करणार होतो पण cancel झाले.
ढोकळा
20201206_184036.jpg

मस्त पालक पराठे.
म्हाळसा मला नीट कृती नाही लिहता येत. पण तरी try करते.
1 वाटी बेसन पिठ अर्धा वाटी ताक घालुन भिजवायचे त्यात चवीनुसार आले मिर्ची पेस्ट हिन्ग चिमुट्भर हळद मिठ साखर अणि 1.5 चमचा रवा 2 चमचे तेल घालुन अर्धा एक तास भिजत ठेवायचे. जर मिश्रण घट झाले असेल तर थोडे पाणी घालू शकतो. नंतर 1 तासाने कुकर मध्ये थोडे पानी घालायचे आणी कुकर ची शिटी काढायची कुकर मध्ये खाली एक छोटी जाळी किंवा प्लेट ठेवायची अणि कुकर गरम करत ठेवायचा. दुसरी कडे मिश्रणात एक छोटा चमचा सोडा घालुन चांगले फेटायाचे आणी परत अर्धा लिंबू चा रस घालुन फेटायचे आणी एक थाळी किंवा भांडे तेलाने ग्रीस करुन फसफसलेले मिश्रण त्यात टाकायचे एकदा tap करायचे आणी पटकन कुकर मध्ये ठेवायचे. आणी म मीडियम फ्लेम वर 10 मीन आणी लो फ्लेम वर 15 मीन स्टीम करायचा. लिंबू चा रस टाकल्या नंतर बाकी सगळे फास्ट करावे लागते. जर वेळ केला तर म ढोकळा फुगत नाही.
सोड्या एवजी इनो वापरतात मी नाही ट्राई केलाय कधी.
ढोकळा गार झाला की त्यावर मोहरी कडीपत्ता मिरची ची फोडणी ओतायची आणी वरुन कोथिम्बीर खोबरे घालायचे.

चायनीज चॉप सूई मस्त दिसतेय..वरून टाकलेले फ्राईड नूडल्स आहेत का??

अमुपरी ढोकळा यमी..

लावण्या पालक पराठे छान दिसताएत..

Pages