खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आज हिच्या हाताखाली बैंगन भरता बनविला. अगदी भाजी चिरण्या पासून वांगे भाजण्या पर्यंत मी स्वतः केले आहे.
>>>>

भारी आहे.
वांगे आवडत नाही. तरी रंग छान आलाय तो बघून भूक चाळवली

बिर्याणी व भरीत लाळगाळू ! गाजर, मटर व पा.कांदा टाकते मी पण भरत्यात.
उगि, तुम्ही विदर्भातले कावं?

IMG-20201202-WA0007.jpg
आज भज्जी ( मराठवाडयात, कर्नाटक सीमा जवळ असलेल्या भागात, येळ अमावश्या ला करण्यात येणारी भाजी ) अम्बाड्याच्या लाल बोण्डयाची चटणी आणि मेथी चा घोळणा.
भज्जी एक दिवसाची शिळी फार मस्त लागते.

मस्त ताट..वेगळ्या पद्धतीच्या भाज्या...

टोमॅटो सागु म्हणजे रस्सम नाहीये.. कांदा टोमॅटो सुकी लाल मिरची.. परतून मिक्सरमध्ये फिरवून... फोडणी.. सार टाईप...इडली सोबतच फक्त खातात.

एकसेएकमेन्यु!
मुलींनो, थोडक्यात तरी रेसिपी टाकावी ना
उगि, घोळाण्यात कच्ची मेथी असते ना ..
भज्जीत कोणत्या भाज्या टाकतात

चिन्मयी बटर चिकन नान, ओली भेळ भारी दिसतेय..

अमुपरी साधेसे भरीत चपाती तोंपासु आहे..आमटी कशाची ?

मेथी घोळाणा आणि भज्जी काय असते?पहिल्यांदा ऐकतेय/पाहतेय.

ती चटकदार ओली भेळ मला चटकन सुका ज्वळा वाटली Happy
सोबतचा नानही मस्त जमलाय...

भारी भारी पदर्थांची लाईनच लागलीय..
आणि मी गरीबासारखा स्वत: पहिल्यांदा केलेला मसाले भात टाकायला म्हणून आलेलो... आता नंतर येतो Proud

भारी भारी पदर्थांची लाईनच लागलीय.. +1

मी काल आज फोटो पाहुन हा कुणी दिला असेल असे गेस केले, काही गेस बरोबर निघाले.
आता खाद्यपदार्थांच्या फोटोवरून ते कुणाच्या घरचे ओळखा असा धागा काढायक हरकत नाही.

मेथी घोळाणा आणि भज्जी काय असते?पहिल्यांदा ऐकतेय/पाहतेय.>>>>> +१.

कैलास बिलोणीकर, भरीत मस्त दिसतेय.पाकृ टाका बरं

मेथी घोळाणा आणि भज्जी काय असते?पहिल्यांदा ऐकतेय/पाहतेय.>>>>> +१.

कैलास बिलोणीकर, भरीत मस्त दिसतेय.पाकृ टाका बरं.

Pages