खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दलिया खिचडी मस्त !
आवडते पण मी केली तर थोडी कचकच लागत होती , ती नेहमी लागतेच का ?

गार्लिक ब्रेड,पनीर पिज्जा मस्तच..

वर्णिता बाजरीची भाकरी आणि मिक्स वेज मस्त दिसतेय.
अशी भाकरी वगैरे बघितली कि बनवलेले सांबर भात अजिबात खावेसे वाटत नाही Happy

गार्लिक ब्रेड काय सुंदर झालाय. यिस्ट घालुन केला का?
वर्णिता भाकरी आणि भाजी मस्त.
Mrunali मला पुलाव ची रेसिपी सांग ना तुझ्या.

गार्लिक ब्रेड काय सुंदर झालाय. यिस्ट घालुन केला का?>> हो. यीस्ट न घालता फार फुगत नाही. पिझ्झामध्ये मात्र यीस्ट नाहीये.

बाजरीची भाकरी सुंदर दिसतीये.

पिझ्झा, गार्लिक ब्रेड मस्तच.. गार्लिक ब्रेडच्या रेसिपिचा धागा हवा.
वर्णिता, भाकरी मस्त. ते पांढरं दही आहे का लोणी?

अमुपरी, व्हेज पुलाव रेसिपी
साहित्य
​कोलम/बासमती तांदूळ एक ग्लास
​आवडीच्या भाज्या-वाटाणा, बटाटा, गाजर,बीन्स
​एक कांदा
​दोन टोमॅटो
​चार हिरव्या मिरच्या
​खडे गरम मसाले- शाही जीरे,लवंगा,दालचिनी, इलायची,एक मोठी इलायची,तेज पत्ता, जावित्री,स्टार अनाइस,स्टोन फ्लॉवर.
​एक चमचा आले लसूण पेस्ट
​कोथिंबीर
​पुदिना
​लिंबू
​तेल/तूप
पाककृती
​तांदूळ धुवून अर्धा तास भिजत ठेवावे.
​पातेल्यात दोन पळ्या तेल/तूप गरम करून खडे गरम मसाले, हिरव्या मिरच्या मधे चिरलेल्या, आणि आलं-लसूण पेस्ट मस्त परतून घ्यावी.(इथेच मस्त घमघमाट पसरतो घरभर)
​मग उभा चिरलेला कांदा परतावा.
​पुदिना आणि चिरलेला टोमॅटो टाकून परतून घ्यावे.
​सगळ्या भाज्या टाकाव्यात.
​कोथिंबीर टाकावी आणि झाकून पाच मिनटं वाफ काढावी.
​मग तांदळाच्या दिडपट पाणी टाकून, मीठ टाकून उकळी काढावी.
​भिजवलेला तांदूळ टाकून पाच मिनटं शिजू द्यावे.
​पाणी अर्धे आटले असेल तर, स्टोव्हवर लोखंडाचा तवा ठेवून त्यावर भाताचे पातेले ठेवावे. वरून झाकण ठेवून झाकणावर वजन ठेवावे.(वरवंटा,नसेल तर भांड्यात पाणी भरून झाकणावर ठेवावे)
​वाफ बाहेर जाऊ न देण्यासाठी हे करावे.
​मधून एक दोनदा भात खालून वर हलवावा..
​छान फुलला कि गैस बंद करून वरून लिंबू पिळावा
​पुन्हा दहा मिनटं झाकून ठेवावे.
पुलाव तयार.
आवडीचे रायते, ग्रेव्ही, पुदिना चटणीबरोबर गरमागरम खाऊन घ्यावे Happy

आज जेवूनच या धाग्यावर आलो.
बरं झाले.
अन्यथा बिर्याणी बघून बटाट्याची भाजी खायची मजा गेली असती Happy
.

मी केलेला पनीर पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड
नवीन Submitted by कुसुमावती on 30 November, 2020 - 12:39
>>>
कातिल जमलेत दोन्ही पदार्थ ! गार्लिक ब्रेड घरचा वाटतच नाही...

Mast मस्त.
दोन हिरव्या तील एक कोथिंबीर आहे,दुसरे काय आहे?मेथी आहे का?

उदयगिरी मस्त भरीत, वांग्याच्या भरतात बटाटा आणि फ्लॉवर पण घातलाय का , पण मग ते मिक्स व्हेज भरीत असं काहीतरी होईल ना
आणि बटाटा, फ्लॉवर उकडून/ भाजून घेतलाय का?

एकदम सोपी आणि पौस्टिक रेसिपी आहे, कारण हयात कोणतीही भाजी शिजवायची किंवा भाजायची नाही.

वांग्याच्या भरता मध्ये मी भाज्या 4 कांदे, 4 टोमॅटो, 4 भारताचे वांगे, फुलगोबीचं तुरा, थोडा मुळा, 2 हिरव्या मिरच्या, ताजी मेथी आणि कोथिंबीर घेतली आहे ( जर भेटले तर पातीचा कांदा सुद्धा टाकावा ).

सर्व प्रथम मी वांग्याला तेलाचा हात फिरवून गॅस वर जाळी लावून मस्त भाजून घेतले आणि जळालेली त्वचा काढली.

कांदे टमाटे मेथी कोथिंबीर चिरून घेतली. मिरच्या, फुलगोबी आणि मुळा एकदम बारीक चिरला.

ह्या सर्व भाज्या आणि भाजलेले वांगे मी एका टोपल्यात मिक्स केल्या, त्यात धने, जिरा आणि हळदी पावडर टाकले.

तडक्या साठी गरम तेलात मोहरी, कुटलेला लसूण आहे आणि लाल मिर्ची पावडर टाकली.

शेवटी कच्ची मिक्स भाजी, तडका आणि चवी प्रमाणे मीठ टाकून परत एकदा चांगले मिक्स केले .

भाकर किंवा चपाती बरोबर फार मस्त लागतो पण माझी आवड एका प्लेट मध्ये घेऊन खाण्यास फार आवडते.

Pages