खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मटार पनीर मस्त दिसत आहे.
अरे वा shreya oats डोसे छान झालेत.
भेळ बघुन भुक लागली मस्त दिसत आहे एकदम.

@ मानवमामा
कल्याण भेळ म्हणून एक रेडीमेड सुखी भेळ मिळते. खूप छान असते. ती वापरली. त्यात फरसाण आयटम मिक्स होते.

अर्थात घरी दोन प्रकारचे फरसाण (साधी आणि लसूण), दोन प्रकारची पिवळी बारीक शेव, खारी बुंदी, आणि पिवळी पापडी होती. पण मग हे मोजकेच वापरले.
बाकी कांदा, टमाटर, बटाटा हे आपले नेहमीचे फंटर वापरले. तिखट हिरवी चटणी, चिंचेचे पाणी, गोड खजूर चटणी हे पाणीपुरी पार्टीचे होतेच. शेवपुरी पार्टीसाठी म्हणून सुक्या पुरया आणलेल्या विकत त्या देखील होत्याच शिल्लक. त्यामुळे मी एका रात्रीच्या डिनरची जबाबदारी माझ्यावर घेतली. कल्याणची सुखी भेळ आणली आणि मस्त भेल पार्टी झाली.
अरे हो पाणीपुरीच्या शिल्लक पुरयांचा चुरा होता. तो सुद्धा नंतरच्या प्लेटला वर भुरभुरला... सगळं चाटून पुसून साफ Happy

वो पिक्चर मे नही क्या लोग बंगला दिखाते है और बोलते है ये अपना गरीबखाना... ये भी बस्स ऐसे ही गरीबोंका खाना है Happy

आमची हि शेतकरी पाटलाची पोरगी आहे, त्यामुळे दररोज जेवणात भाजी आणि भाजीपाला पाहिजेच. नाईलाज आहे माझा खावेत लागते.

घरचेच असले की नेहमीचे होणे स्वाभाविक आहे.

यावरच तो एक विनोद आहे ना.. जिथे जावईबापूंना सासुरवाडीला गेल्यावर दिवसरात्र मेथी की पालक या एकाच भाजीचे, भाजी, भजी, पुरया, पराठे असे विविध प्रकार जेवणात मिळतात..
आणि तिसरया दिवशी ते म्हणतात, तुमच्या शेताचा पत्ताच द्या, मी स्वत:च जाऊन चरून येतो Happy

बाकी आमच्याकडेही भाजी एकावेळी एकच. दुसरी आधीच्या वेळची शिल्लक असलेली उरलीसुरली. त्यामुळे तीन भाज्या ताटभर (प्लस मसालेभात) बघून ते जेवण साधे न वाटणे स्वाभाविक आहेच Happy

इतक सगळ छान छान बनवलेल्या पदार्थांनी सजवलेलं ताट साधं असूच शकत नाही.
ये किसी दावत से कम नही है....
लकी आहात..
पालेभाज्या मलाही फार आवडतात... हिवाळ्यातल्या ताज्या लुसलुशीत भाज्या तर अधिकच प्रिय..

मेथीचा घोळणा म्हणजे काय?

रोज पालेभाज्या नकोश्या वाटतात. एक दिवस फळभाजी अन एक दिवस पलेभाजीठीक

रोज पालेभाजी खाणे किती बोअर आहे शब्दात सांगणे कठीण

सकाळी साधे भरलेले जेवणाचे ताट...
दुपारी कझुमी यांचे मस्त कोथिंबीर वडीसोबत वरण भात भाजी चे ताट..
चला इवनींग स्नैक्स पण आले Happy

उदयगिरी,
घोळाणा ताट फारच छान , परिपूर्ण जेवण आहे. टमाट्याचे बेसन कसे करतात?

मेथी चा घोळणा म्हणजेच, मेथीची पाने साफ करून पाण्याने स्वच्छ धुहून चिरायची आणि त्यात थोडा कांदा, जिरा पावडर, धने पावडर, मिर्ची पूड, मीठ, लिंबू थोडी साखर, मिक्स करायचे आणि कच्ची खायची.

टमाट्याचे बेसन साठी मोहरी जिरा लसूण अद्रक फोडणी दिल्यावर टमाटे आणि हिरवी मिर्ची मध्यम चिरून टाकावे, टमाट्याला पाणी सुटल्यावर त्यात अड्जस्ट होईल इतके बेसन टाकावे, शिजताना मीठ, हळद आणि कोथींबीर टाकावी आणि एक वाफ येऊ द्यावे.
आवडत असल्यास खाताना वरून वाळलेल्या लाल मिरचीचा तडका द्यावा

उदयगिरी
मेथीचा घोळणा आणि टमाट्याचे बेसण रेसिपी सोप्या आणि छान वाटताएत..करून बघेन..
ते पुदिना तिखट कसं करायचं विचारून सांगाल का?

मॅगी मला आवडत नाही. पण जे खातात म्हणजे नवरा, मुले, बहीण,भाऊ सगळे मला चिडवतात गाढवाला गुळाची चव काय.

बाकी चहा शंकरपाळी मात्र खूप आवडते नाश्त्याला.

Pages