खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

25 एक पोस्ट्स आहेत. कशाकशाला मस्त म्हणू? सगळंच भारी आहे. सांभार वडी कधी खालली नाहीये. पण सुंदर दिसतेय ,अगदी उचलाविशी वाटतेय. पालक पराठे मऊसूत दिसतायत. ढोकळा मला छान जमत नाही. आता अमुपरी तुमच्या पद्धतीने करून बघेन.
ऋ, एकेक बनवतो आणि टर्न बाय टर्न प्रत्येकाला जाऊन भरवतो Happy >>> मला पण माझ्या मुलाचं लहानपण आठवलं. एन्जॉय करा हे दिवस. नन्तर तुम्हालाच पापुवाला बनायचंय.

हो लावण्या या पध्दतिने झटपट बनतो. आम्ही अचानक पाहुणे आले की नेहमी करतो Happy
Submitted by Amupari on 6 December, 2020 - 10:18>> रेसिपिसाठी खूप खूप धन्यावाद.

@ mrunali.samad Thank you ... हो फ्राईड नूडल्स आहेत !

चिमु भाकरी मस्त दिसतेय ... टम्म फुगलीये अगदी

मसालेभात आणि बर्गर yummy

झणझणीत पिठलं, कृष्णाकाठची हिरवी वांगी, मुगाची खिचडी
>>>>
मस्त मेनू आहे.
ते काकडी टमाटर वन बाय वन लावल्याने फोटोला मस्त गेट अप आलाय Happy

वरच्या बर्गर किंगला मागच्यावेळी केलेल्या गरीबांच्या बर्गरचा झब्बू देतो. साधासुधाच आहे. आतली बर्गर टिक्की विकतची आणून बायकोने तळलेली आहे. तरी पावाला सॉस बटर मायोनीज वगैरे लावत बाकीचे घासफूस सलाड रचण्यात आपला हातभार लागला की धन्यता वाटते Happy

IMG_20201207_231308.jpg

.

IMG_20201207_231221.jpg

Buns रेडीमेड का घरी केले?
Submitted by Amupari on 7 December, 2020 - 10:58>> बन्स विकतचेच आहेत.. आतली पॅटी आणि ड्रेसिंग होममेड

IMG-20201208-WA0010.jpg
आज परत सांभार वडी पण सोबत ताकाची कढी. ह्या कढी मध्ये भरपूर अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि मुळा असल्या मुळे थंडी चा मस्त वाटतो आणि सर्दी होत नाही.

Pages