खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कुझुमी मस्त ताट..

अमुपरी आलुपराठा यम् तोंपासु...
हो पनीर शैलो फ्राय..

सन्मित गोड काय आहे? छान आहे.

ओह छान आहेत ?असे पण करता येतात? गुलाबजाम रेडी मिक्स चे करता येतील का?मुलांना जाम आवडेल डोनट शेप..

थँक्स शोधक
इडली रवा तीन वाटी , व्होल उडिद एक वाटी वेगवेगळे चार तास भिजवने...फक्त उडिद मिक्सरमध्ये वाटणे..दोन्ही व्यवस्थित एकत्र करून चार- पाच तास फरमेन्टेशन..ओव्हरनाईट नको...
इडली पात्रात दहा मिनिटे वाफवणे....गरमागरम वाफाळलेली इडली तयार... आवडीनुसार खोबरे/कोथिंबीर/पुदिना/टोमॅटो/शेंगदाणे/ चटणी, सांबार बनवा आणि डुबवुन खा Happy

सुमित्रा, मी इडली/डोश्यासाठी नेहमी व्होल उडिद वापरते पण उडिद डाळ पण चालते....मी कधी वापरली नाहीये, इतका फरक नसावा... (महाराष्ट्रात आईकडे उडिद डाळच वापरतात.. चांगले होतात इडली/डोसे)

लावण्या थँक्स.

कुछ तीखा, कुछ खट्टा, कुछ मिठा हो जाए
दाबेलीचे पाव तेवढे मिळाले नाहीत म्हणून वडापावच्या पावांमधे दाबेलीची भाजी भरावी लागली.. पण चव एक नंबर 59011C21-338F-4D1E-A3F0-15378BC237D9.jpeg4642F88B-5BFB-4080-8D38-05F16C510A72.jpeg

खिचडी मस्त ! सोपा समजला जाणारा पदार्थ आहे पण माझे प्रमाण नेहमी बिघडते किंवा चव बिघडते Happy

माझे प्रमाण नेहमी बिघडते किंवा चव बिघडते>>>wow, खिचडी बिघडणारी मी एकटीच नै वाचून बरं वाटलं,पूर्वी खूप विचित्र चवीची व्हायची,पण हल्ली खूप छान जमायला लागलेय

सगळ्यांचे पदार्थ तों पा सु आहेतच

IMG_20201129_103400.jpg

Amupuri बिटाचे सार कस बनवतात?

काही विशेष नाही kazumi फक्त बीट उकडायचे आणी थोडे पाणी घालुन मिक्सर ला लावायचे. आणी म तुप जिरे फोडणी ला टाकुन मिठ साखर घालुन एक उकळी काढायची. मी तिखट पणा साठी मिरी पूड घालते. पाहिजे असल्यास बिटा बरोबर एक टोमेटो उकडू शकतो.
इडली चटणी मस्त दिसत आहे.

धन्यवाद amupari

मृणाली ताई कधीतरी खाऊगल्लीवाल्यांना घरी यायच निमंत्रण दे ना (जेवणाचा चांगलासा बेत आखून) Wink

Pages