खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भरीत रेसीपी –
1) भरतासाठी लांब हिरवी वांगी अत्यंत चांगली.विशेषत: जळगावची.हिवाळयात भरपूर येतात.
2) वांग्यांना काट्या चमच्याने छिद्रे पाडा तेल लावून गॅसवर खरपूस भाजून घ्या.
3) भाजलेली सालं काढून पातेल्यात वांगे काढून ठेवा.मी लाकडी वापरलेले आहे. ते खास भरतासाठी वापरतात.
4) भाजलेले वांगी हलके मॅश करा. (चेचून घ्या)
5) कढईत थोडेसे तेल घेऊन हिरवी मिरची आले लसूण पेस्ट, शेंगदाणे, पातीसह कांदा, ओल्या खोबर्याचे काप थोडेसेच परतून घ्या. पातीचा कांदा मस्ट.
6) सर्व वेगवेगळे परतून घ्या
7) मॅश केलेल्या वांग्यांवर टाकून मिक्स करा
8) मीठ टाका...शक्यतो जाडे मीठ वापरा. चव छान लागते.
9) मॅशर ने सर्व नीट मॅश करा
10) आवडत असल्यास कच्ची हिरवी मेथी वरून टाका (ही माझी ॲडीशन.मला कच्ची मेथी खायला खूप आवडते. अगदी पोहयावर सुध्दा....हिवाळयात ती भरपूर मिळते.
11) भाकरी....हिरवी मिरची ठेचा बरोबर खा......

रसगुल्ले मला अजिबातच आवडत नाहीत . पण हे गुलाबी प्रकरण भारीच दिसतय
काय सुन्दर रंग आलाय आणि आतून पांढरे कसे राहिलेत ?

बापरे केव्हढे वेगवेगळे पदार्थ. नान, इडली, भरीत सगळंच छान.
केक तर उचलून लगेच तोंडात टाकावा असा.
गुलाबी रसगुल्ले पहिल्यांदाच बघितले सुंदर दिसताहेत.

कैलास: भरीत मस्त. या कृतीने करून पाहीन.
चिमु : गुलाब रसगुल्ले अप्रतिम. गुलाबी कलर कसा आणला प्लीज सांगा.

आजचा मेनू - भोगीची भाजी आणि भाकरी.

9681FE4E-61B5-451C-B146-1941C0F63A54.jpegCB0F80A2-851D-40D6-98CB-BDC76493DE51.jpeg

कालच हा फोटो टाकणार होतो पण असे एकसो एक पदार्थ येत आहेत की गरीबाचा मसालेभात कसा टाकावा असे झाले...
पण याची खासियत अशी आहे की हा जवळपास मी बनवला आहे..

1607013792486.jpg

म्हणजे झाले असे की आईने मसालेभात करायला भाज्या चिरल्या आणि तिच्या हाताला चमक भरली. बायको तिच्या केक बनवण्यात बिजी होती. मग मी पुढाकार घेतला.

कूकरमध्ये तेल कांदा टाकून आईने सांगितल्या प्रमाणानुसार फोडणी देत मग त्यात भाज्या तांदूळ पाणी वगैरे सारेच आईच्या मार्गदर्शनाखाली टाकून कूकर लावला, काढला, थंड केला आणि स्वत:च्या हाताने सर्वांना भात सर्व्ह केला.

या आधी कधी मसाल्याच्या रंग बघितल्यावर त्या पदार्थाची चवही न घेणारया मुलीने भात मी केला आहे हे ऐकल्यावर तो खाऊन बघितला आणि तिला तो चक्क आवडला. पुन्हा पुन्हा खाल्ला. थोड्यावेळाने तिखट लागला तेव्हा पाणी पिऊन थांबली. पोरगा मात्र तिखटाची पर्वा न करता हावरटासारखा तुटून पडला होता. त्याने पुर्ण पोटभर खाल्ले.

आपण केले आणि पोरांनी खाल्ले हे समाधान मॅगी, पास्ता, सूप वगैरे पदार्थांनी बरेचदा दिलेय. पण भातात ते जरा जास्त मिळाले Happy

ते वांग ंं भरीत व गुलाबी रसगुल्ले यासाठी वेगळा पाकक्रुती मध्ये धागा काढावा
मस्त वाटतात

मसाले भात चांगला वाटत आहे. आणी जरा presentation नीट केले असते तर मस्त दिसला असता.
सामो साबुदण्याची खिचडी तुमचा खुप आवडता पदार्थ आहे वाटत.

धन्यवाद Amupari, मी चिन्मयी, mrunali.samad, Kazumi , म्हाळसा, स्वस्ति, ऋन्मेष, कुसुमावती, MazeMan, MeghaSK, सामो... सर्वांचे खुप आभार ..छान वाटले ऐकून ...
@amupari दूध फाडून रसगुल्ले बनवले.
@ स्वस्ति, ऋन्मेष, MazeMan तसा रंग यायला संपूर्ण पाकृ तयार झाल्यावर पाकात रोझ सिरप टाकून एक अख्खा दिवस मुरत ठेवलं.. दोन तीन दिवस ठेवल्यास अजून थोडं मुरतो पाक ...तसा रंग देखील छान दिसतो ... कोणाला गुलाबाची चव आवडत नसल्यास फूड कलर वापरू शकता ....किंवा पनीर तयार झाल्यावर त्यातच सिरप/कलर टाकून रसगुल्ले तयार करू शकता...

>>हिला विचारून सांगतो>>

ज्जे बाsत !

हा 'तकिया कलाम' असतो सगळ्या अहोंचा !
विचारा विचारा आणि मग इथे सांगा !!!

हा आजचा ब्रेफा.

स्क्रॅंबल्ड एग्ज ऑन टोस्ट / हाफ फ्राईड एग्ज विथ टोस्ट.
.
.

अळूवड्या

20201205_132913.jpg

लावण्या छोले आणि मसाले भात भारी दिसतोय..

मी परवा ऋन्मेष यांचा मसालेभात बघून बनवायचा ट्राय केला पण नाही जमला..मग फोटु पण नाही टाकला.

तुझा पण मस्त आहे.. माझा असा स्टिकी होतच नाही तो पुलाव मोडमधेच जातो. Happy

Pages