रोज रोज जेवायला काय करू ?

Submitted by अवल on 19 March, 2012 - 03:13

रोज रोज जेवायला काय करायचं ? हा स्वयंपाक घरात वावरणार्‍या समस्त लोकांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न !
चला तर वेगवेगळ्या भाज्या, उसळी, रस्से, आमट्या, इ. इ. माहिती करून घेऊयात ?
या बीबीवर तपशीलवार कृती अपेक्षित नाही. मूळ कृतीचे नाव अन अगदी थोडक्यात त्याचे विवेचन करूयात.
अन जमवूयात वेगवेगळ्या पदार्थांची सूची Happy

ही माझी यादी :
बटाटा:
१. उकडलेल्या बटाट्याची भाजी _ १ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, हिंग, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
२. उकडलेल्या बटाट्याची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, जिरे, हळद, तिखट, चाट मसाला,मीठ, कोथिंबीर.
३. उकडलेल्या बटाटा-मटारची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, उकडलेले मटार, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
४. उकडलेल्या बटाट्याची उपासाची भाजी : उकडलेले बटाटे, तूप, जिरे, हिरवी मिरची वाटून, मीठ, साखर, दाण्याचे कूट.
५. उकडलेल्या बटाट्याची उपासाची रस्साभाजी : तूप, जिरे, हिरवी मिरची व ओले खोबरे वाटून, मीठ.
६. बटाटा काचरा भाजी _१ : सालं न काढता बटाट्याच्या काचर्‍या, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिमुटभर बेसन.
७. बटाटा काचरा भाजी _ २ : सालं काढून बटाटयाच्या काचरा, उभा चिरलेला कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ.
८. बटाटा काचरा भाजी _ ३ : सालं काढून बटाटयाच्या काचरा, उभा चिरलेला कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, मीठ.
९. बटाटा-कांदा-टॉमेटोचा रस्सा : तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिमुटभर गूळ, कोथिंबीर.
१०. बटाट्याचा तळल्या मसाल्याचा रस्सा : तेल, हिंग, हळद, तिखट, कांदा, सुके खोबरे, लवंग, दालचिनी, मिरे, धणे, बडिशेप, मीठ, कोथिंबीर.
११. बटाट्याचे भुजणे : बटाट्याच्या गोल चकत्या, कांद्याच्या गोल चकत्या, तेल, हिंग, हळद, तिखट, चिंचेचा कोळ, मीठ, कोथिंबीर.
१२. चिनी बटाटा : उकडलेला बटाटा, तेल, कांदा, मिरपूड, सोया सॉस, बारीक चिरलेला लसूण, मीठ.
( बापरे कित्ती बटाटा खातो आपण Wink )

कोबी
१. कोबी-बटाटा : कोबी, बटाटा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, कोथिंबीर.
२. कोबी-मटार : कोबी, मटार, तेल, हिंग, मोहरी, हळद, आलं-मिरची वाटून, मीठ, कोथिंबीर.
३. कोबी-शेंगदाणे : कोबी, शेंगदाणे, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर.
४. फोडणीची कोबी : कोबी, तेल, मिहरी, हिंग, कळद, हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर, लिंबू.
५. चायनिज कोबी : कोबी, टॉमेटो, तेल, मिरपूड, सोयासॉस, तिखट, मीठ, साखर.
६. पीठ पेरून कोबी : कोबी, तेल, हिंग, हळद, तिखट, बेसन, धणे-जिरे पूड, मीठ, कोथिंबीर.

फ्लॉवर
१. फ्लॉवर-बटाटा-मटार : फ्लॉवर,बटाटा, मटार, तेल, हिंग, मोहरी, हळद, आलं-मिरची वाटून, मीठ, कोथिंबीर.
२. फ्लॉवर-कांदा-टॉमेटो : फ्लॉवर, कांदा, टॉमेटो, तेल, हिंग, हळद, तिखट, आलं, मीठ, कोथिंबीर.
३. फ्लॉवर-कांदा-टॉमेटो रस्सा : फ्लॉवर, कांदा, टॉमेटो, तेल, हिंग, हळद, तिखट, ओलं खोबरं-आलं वाटून, मीठ, कोथिंबीर.
४. फ्लॉवर-सिमला मिरची : फ्लॉवर,सिमला मिरची, टॉमेटो, तेल, हिंग, मोहरी, हळद, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर.

मेथी
१. मेथी पाने : मेथी कोवळी पाने, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
२. मेथी-कांदा : मेथी, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
३. मेथी पीठ पेरून : मेथी, बेसन, तेल, लसूण, हिंग, तिखट, मीठ.
४. पांतळ मेथी : मेथी, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
५. मेथी-बटाटा : मेथी, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
६. मलई-मेथी-मटर : मेथी, मटार, मलई, तूप, काजू, हिरव्या मिरच्या, मीठ, गरम मसाला.

पालक
१. पालक-कांदा : पालक, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ.
२. पांतळ पालक : पालक, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
३. पालक-बटाटा : पालक, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
४. पालक-पनीर : पालक, पनीर, तूप, बारीक चिरलेला लसूण, कांदा, टॉमेटो, हळद, तिखट, मीठ, साखर, गरम मसाला.

मसूर
१. मसूरची उसळ : मोड आलेले मसूर, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, दालचिनी, मीठ, कोथिंबीर.
२. मसूरची आमटी : मोड आलेले मसूर, कांदा, सुके खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, दालचिनी, लसूण, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. मसूरचे खाटे : भाजलेले मसूर, तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ, कोथिंबीर.
४. मसूरच्या डाळीची आमटी : मसूरची डाळ, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.

मूग
१. मूगाची उसळ : मोड आलेले मूग, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
२. मूगाचे बिरडे : मोड आलेले सोललेले मूग, कांदा, सुके खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, लवंग, दालचिनी, लसूण, आलं, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. मूगाचे खाटे : भाजलेले मूग, तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ, कोथिंबीर.

वाल
१. वालाची उसळ : मोड आलेले सोललेले वाल, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
२. वालाचे बिरडे : मोड आलेले सोललेले वाल, कांदा, ओले खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, लसूण, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. वालाच्या डाळीची उसळ : वालाची डाळ, तेल, ओवा, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.

कोशिंबीरी
१. काकडीची : काकडी, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
२. टॉमेटोची : टॉमेटो, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
३. गाजराची : गाजर, लिंबू, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
४. बीटाची : बीट, लिंबू, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
५. तोंडल्याची : वाफवलेला तोंडल्याचा किस, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
६. मूळ्याची : मूळा, दही/लिंबू, मीरपूड, साखर, मीठ, कोथिंबीर.
७. केळ्याची : केळी, दही, हिरव्या मिरच्या, दही, साखर, मीठ. कोथिंबीर.
८. कांद्याची : कांदा, दही, हिरव्या मिरच्या, दही, साखर, मीठ. कोथिंबीर.
( टिप : कोणत्याही दही घातलेल्या कोशिंबीरीच सफरचंद सोलून त्याचे अगदी बारीक तुकडे चिरून टाकले तर फार छान लागते कोशिंबीर )
(वेळ मिळाला की अजून टाकते. तो पर्यंत तुमच्या येऊ द्यात Happy )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनि भरित...वन्ग्यचे, भोपल्याचे, भोपलि मिर्चा चे, दहि घलुन...या दिवसात थन्द वातते.

चांगला धागा.
---------------------------------------------------------------------
(थोडी हळद घालून) उकडलेल्या फ्लॉवरची भजी
१) नेहमीसारखं भज्यांचं पीठ वापरून
किंवा
२) भजी-पिठाऐवजी कच्च्या फेटलेल्या अंड्यात बुडवून
भज्यांप्रमाणे तळणे.

मेन कोर्स बरोबर टिपी म्हणून तोंड चाळवणारे काही पदार्थः
१) बटाट्याचे/ सुरणाचे / अरबीचे/ वांग्याचे काप
२) पोह्याचे डांगर
३) दही -खोबरं- मिरची (हिरवी मिरची गॅस वर डायरेक्ट भाजून, चुरून त्यात ओला नारळ + मीठ घातलेली जहाल तिखट चटणी)
४) बटाटा / गिलके / कच्ची केळी / कांदा इ. ची भजी

अजून आठवेल तसे लिहिन Happy

मस्त

कारले, सिमला मिर्ची, दुधी ह्यांच्या कुणीतरी भन्नाट पाककृती सांगा राव!!

म्हणजे सगळ्या घरच्यांना आवडतील अशा... आमच्या कडे मला ह्या तिन्ही भाज्या आवडतात पण बाकीच्यांची बोंब आहे.

कारले
कारल्याच्या काचर्‍या : कारल्याच्या काचर्‍या, कांदा उभा चिरलेला, लसूण उभा चिरलेला, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, तीळ, मीठ, साखर. म्ड गॅसवर खरपूस करणे.

दुधी
१. दुधी-बटाटा : दुधी, बटाटा, आलं-लसूण्-हिरव्या मिअरच्या वाटून, तेल, हिंग, हळद, मीठ, कोथिंबीर.
२. मेथीचा दुधी : दुधी, तेल, मोहरी, मेथ्या, हिंग, हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर.
३. दुधी पीठ पेरून : किसलेला दुधी, तेल, हिंग, हळद, तिखट, बेसन, मीठ.

सिमला मिरची
भरली सिमला मिरची : सिमला मिरची, उकडलेला बटाटा ( नॉनव्हेज चालणार्‍यांनी या ऐवजी जवळा/ कोळंबी/ खिमा वापरला तर बाहार येते ), आलं-लसूण्-मिरच्या वाटून, मीठ, दाण्याचे कूट ( नॉनव्हेज मध्ये नको), साखर ( नॉ. न. )

सिमला मिर्ची >>>>> बेसनाचं (कोरडं) पीठ पेरून मस्त भाजी करता येते.
पाणी अजिबात घालायचं नाही. फोडणीला तेल जरा जास्तच घातल्यास मजा येते.

मस्त आयडिया अवल Happy

इथे मागे एक धागा होता त्यात रोजचे मेन्यु लिहीले होते.. त्याची लिण्क इथे देता येइल का? तिथे पण काही चांगली मेन्यु कॉम्बोज होती....

अवल भाज्यांची मस्त लिस्ट दिली आहेस.

त्यात पडवळ, दोडक / शिराळ, भेंडी, शेवग्याच्या शेंगा, वेगवेगळ्या इतर शेंगा, उसळी, आमट्या च्या शॉर्ट रेसेपी पण टका.

रिमा, मीच सगळ्या नाही बाई लिहिणार :रुसलेली बाहुली : मग तुम्हाला काही काम नको का ? Wink
जमेल तसे लिहिते गं Happy
गवार
१. गवारीची गुजराथी पद्धतीची भाजी : गवार, तेल, ओवा, हिंग, हलद, तिखट, मीठ, गूळ, ओलं खोबरं, कोथिंबीर.
२. गवार-कांदा : गवार, कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, लसूण-आलं बारी चिरून, कोथिंबीर.

रिमा, मीच सगळ्या नाही बाई लिहिणार :रुसलेली बाहुली : मग तुम्हाला काही काम नको का ? >>
अस तुमच्यासारख सॉर्ट आउट करुन लिहायला नाही जमत ना Sad
तरी ट्राय करीन.

बाकी धागा मझ्या निवडक १० मध्ये.

मिश्र भाज्या:
१. गाजर, फ्लॉवर, बटाटा, मटार, हिंग, जिर, मोहरी, हिरवी मिरची, खोबर सुकी भाजी
२. गाजर, फ्लॉवर, बटाटा, मटार, हिंग, जिर, मोहरी, लाल मिरची पावडर, गरम मसाला, लसुण सुजी भाजी
३. फ्लॉवर, बटाटा, मटार रस्सा, वाटप - खोबर, कोथंबीर, कच्चा कांदा, गरम मसाला, १ त्रिफळ, लसुण पाकळी, हिंग - जीर, मोहरी फोडणी
४. शेवग्याच्या शेंगा, बटाटा, टॉम्याटो, कांदा रस्सा भाजी , वाटप - खोबर, कोथंबीर, गरम मसाला हिंग - जीर, लाल मिरची पावडर, मोहरी फोडणी
५. नुसता हिंग, मोहरी, जिर, लाल मिरची पावडर, कांदा, टॉम्याटो (डोश्यावरोबर हि चटणीवजा भाजी मस्त लागते)

आणखी काही
बटाट्याची भाजी : पहाडी आलू (मायबोलीवर शोधा)
उकडलेल्या बटाट्याची भाजी : लोणच्याचा मसाला लावून
कोबीची बंगाली पद्धतीची भाजी पंचफोरन वापरून
टमाटोच्या भाज्या : बारीक चिरलेला टमाटो कांदा+आल लसूण मिरची अगदी मऊ चटणीसमान होईतो शिजवून
टमाटोच्या उभ्या फोडी करून मसाले लावून जरा झणझणीत
पनीर वापरून : पनीर भूर्जी (कांदा, टमाटो),
पनीर जालफ्रेझी : कांदा, टमाटो, सिमला मिरची सगळे उभे चिरून
भेंडीच्या भाज्या : भरल्या भेंड्यांचे प्रकार
कढाई भेंडी : भेंडी, कांदा, टमाटो उभे चिरून
कुरकुरी भेंडी : भेंडीचे पातळ काप तळून
चवळीच्या शेंगांची भाजी : जोडीला कांदा, हवा असल्यास बटाटा
फरसबीची भाजी : यात ताजे खोबरे हवेच.

गवार + बटाटा = गुळ जास्त घालणे
गवार + तां. भोपळा
घेवडा = गुळ + नारळ + दा.च कुट
कांद्द्याची पीठ पेरुन
दुधीची पीठ पेरुन
पावट्याचे दाणे + वांगे
पावट्याचे दाणे + बटाटा
भेंडी दो प्याजा = फोडणीवर कादा परतणे, मग भेंडी परतणे, तेल जास्त लागते. मसाला घालणे
फरसबी + चणा डाळ
भरली वांगी
भरला टॉमॅटो
भरली सीमला मिर्ची

उसळ : काळ्या वाटाण्याची उसळ : याला कांदा-खोबर्‍याचे वाटण हवे
तशीच चण्याची उसळ
चवळीची उसळ

मुगाची उसळ : उपासाची : फक्त आलं, मिरची घालून
तसंच आलं मिरची ऐवजी गूळ घालून तोंडी लावायला गोड पदार्थही तयार.

भरली वांगी>
आरे हो वांग्याचे पण कितीतरी प्रकार
१. हिरवी मिरची, वांग, बटाटा, हिंग, जीर मोहरी
२. मालवणी गरम मसाला, वांग, बटाटा, हिंग, जीर, मोहरी (ह्यात सुकी ओली कोलंबी पण घालतात)
३. भरलेल वांग - उभा चिरुन बटाटा, चीर पाडलेली वांगी, चीर पाडलेले छोटे कांदे, खोबर - कांदा वाटप, दाण्याच कुट, चिंचेचा कोळ, मालवणी गरम मसाला
४. भरीत - वांगी भजुन, कच्चा कांदा, खोबर, कोथंबीर, मिरची वरुन लसणाची झणझणीत फोडणी, हव तर दही पण घालता येत

मुळ्याची/ गाजराची कोशिंबीर---मुळ्याचा/गाजराचा कीस, मुगाची/चण्याची डाळ वाटून [चार तास भिजवून] लिंबाचा रस, मीठ, साखर, मिरची बारीक चिरून, मोहरी,जिरे, हिंग फोडणी.
भोपळी मिरची भरीत---भोपळी मिरची गॅसवर भाजायची आणि वरील काळी साल काढायची, बारीक चिरायची, मग त्यात दही, मीठ, कोथिंबीर, आवडत असल्यास दाण्याचं कूट, फोडणी.

Pages