खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळे मला चिडवतात गाढवाला गुळाची चव काय. >>> त्यांच्या मॅगीत गूळ घाला. आणि नाही आवडली त्यांना तर तुम्ही म्हणा....

मानव , Lol
आता मी पण ही आयडिया वापरीन. दहिपोहे, ताकपोहे सगळे मिटक्या मारत खातात मला एक घास पण जात नाही तेव्हा असाच आहेर मिळतो तेव्हा बोलेन .

त्यांच्या मॅगीत गूळ घाला. आणि नाही आवडली त्यांना तर तुम्ही म्हणा Lol

जोक्स द अपार्ट - मॅगी पाण्याऐवजी दूधात शिजवून आवडीनुसार साखर वा गूळ टाकून खरेच चांगली लागते.

@ चहा शंकरपाळी - खारया शंकरपाळ्या मला चहात आवडतात पण गोड नाही. मला तर बिस्कीटही गोडूस असल्या कारणाने चहात बुडवून खायला आवडत नाहीत. आताच मी चहात लसूण फरसाण आणि भाजणीची चकली तुकडे करून टाकले आणि खाल्ले. तिखट काही टाकले की त्यानंतर शिल्लक चहा प्यायलाही मजा येते.

बरेच लोकांकडून एकलय चहा-शंकरपाळी आवडते म्हणून...

चहाबरोबर मला मात्र बेसन लाडू नाहितर चकली नाहितर तिखट शेव. एक घोट चहाचा, मग एक घोट बेसनाचा लाडू.
चहात आलं जरा ज्यास्तच घालायचं मग.

तसेच चकलीचा व जाडी तिखट शेव खायची. एक चकलीचा तुकडा, मग चहाचा घोट. अहाहा.... दिवाळीच्या थंडीत मज्जा असायची मग.

गेले ते दिवस.....

Lol
अगं मुलांना आवडतं..पनीर असेल तर लेक कमी त्रास देते भरवताना म्हणून आठवड्यात एकदा करते मटर पनीर , पनीर ग्रेव्ही, पनीर पुलाव, पनीर पराठा किंवा नुसते पनीर टिक्का.

रगडा पॅटीस, शेव पुरी , पाणीपुरी, साखी

इकडे यायलाच नको आता, नाहीतर सध्या कसेबसे जे बेचव अन्न ढकलतीये पोटात तेही जायचे नाही Sad

ऋन्मेऽऽषजी चाट पदार्थ सगळे एक से बढकर एक !!
बाकी सगळे पदार्थ हि मस्त ..
@मृणाली .. आमच्याकडेही सेम .. आठवड्यातून एकदा तरी पनीर भाजी हवीच ...

दिवाळी संपली तरी फराळाची demand काही संपत नाहीये ...

नायलॉन पोहा चिवडा

WhatsApp Image 2020-12-11 at 1.57.52 PM.jpeg

मुगडाळ आणि गव्हाच्या पिठाची चकली

WhatsApp Image 2020-12-11 at 1.57.52 PM (1).jpeg

पोहे चिवडा आणि चकली डेडली कॉम्बिनेशन... चहा किंवा कॉफी सोबत
हे सगळं घरात उपलब्ध आहे.. रात्रीचे साडेतीन वाजलेत.. गाणी ऐकत ऐकत वर्क फ्रॉम होम चालू आहे.. कबीरा गाणे लागलेय सध्या.. सुर्याचे पहिले किरण नवी मुंबईवर पडेपर्यंत काम करायचे आहे. त्यामुळे एक कॉफी ब्रेक घ्यायची वेळ झालीय. तर याच तीन पदार्थांचा समाचार घ्यायची वेळ झाली आहे Happy

मृ, आठवड्यात एकदा करते मटर पनीर , पनीर ग्रेव्ही, पनीर पुलाव, पनीर पराठा किंवा नुसते पनीर टिक्का >> मी आधी वाचलं की आठवड्यातून एकदा मटार पनीर, दुसऱ्या दिवशी पनीर ग्रेव्ही, मग पनीर पुलाव आणि .... .. . पनीर सप्ताह की काय Wink
श्रेया, चकली मस्त. मी एकदा फक्त कणकेची केलेली पण चवीला विशेष आवडली नव्हती. आता एकदा मूग डाळ ऍड करून बघेन.
ऋ, चाट सप्ताह यम्मी आहे.

वर्णिता Lol

श्रेया, चिवडा आणि चकली खमंग आणि कुरकुरीत दिसतेय..
रामबंधु चिवडा आणि चकली मसाला का Wink

समोसा चाट मस्तच.. समोसे पण घरीच केले का?

वाह सामोसा रगडा, नायलॉन चिवडा काय सुरेख दिसत आहेत.
आज नाश्त्याला उपमा सोबत कोथिंबीर लसूण चटणी आणि लाल मिरचीचा लिंबू ठेचा.
IMG-20201212-WA0006.jpg

Pages