आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

असामी, गापुवागी.
कशाला उगाच त्रास घेताय. ज्याला अस वाटत मॅचेस फिक्स करता येतात आणि शेवटच्या ओव्हरीत सांगून ४ सिक्स मारता येतात अशी ज्यांची खात्री आहे अशा तज्ञांशी चर्चा करून शेवटी कालचा गोंधळ बरा होता असेच म्हणावे लागते.
रोहीत अफाट बॅटींग करतो. काल रोहित, पोलार्ड, पांड्या हे तिघेही एकाच वेळेस चालले. मग रन रॉयट होणारच. Happy

जडेजावरुन आठवले.... मला आवडायचा राव जडेजा!
त्याचा मैदानावरचा वावर एकदम दिलखुलास असायचा..... त्याची आणि रॉबिनसिंगची जोडी मस्त जमायची स्लॉग ओव्हरमध्ये Happy
फिक्सिंगमध्ये अडकला नसता तर he would have gone long way!

*मजा आली त्याची बॅटींग पहायला. * रोहितच्या फटकेबाजीतलं त्याचं टायमिंग, पोझिशनिंग, सहजता व नजाकत आतां क्रिकेटमध्ये दुर्मिळ होत चाललंय. त्याची फलंदाजी पहाणं केवळ निखळ आनंद !!

त्याचा मैदानावरचा वावर एकदम दिलखुलास असायचा.
+786
हसणेही फार गोड होते.
तसेच अझरपेक्षा नेत्रसुखद भारतीय फलंदाज मला तेव्हाही दुसरा कुठला वाटायचा नाही. काय नजाकत असायची फटक्यात..
पण आता त्यांचे चेहरेही बघून चीड येते.

आणि शेवटच्या ओव्हरीत सांगून ४ सिक्स मारता येतात अशी ज्यांची खात्री आहे अशा तज्ञांशी चर्चा करून
>>>>>
गोलंदाजाची साथ असेल तर पाच किंचा सहाही मारता येतात.
असो, तसेही मला कालच्या मुंबई सामन्याबद्दल काही बोलायचे नाहीये. शर्माची फलंदाजी बघितली आनंद आहे.
सध्या मी शर्मा, राहुल, पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत या चौघांच्या फलंदाजीचा आनंद लुटायलाच आयपीएल बघतो Happy

असो
आज मात्र धोनी आणि चेन्नईला कमबॅक करत जिंकताना बघायचेय आणि कॅप्टन कूल सोबत गांधी जयंती साजरी करायचीय Happy

@ गर्विष्ट येस्स.. तसे वाटू शकते
चेन्नई आयपीएलमधील ऑस्ट्रेलिया आहे
चॅम्पियन टीम हरताना बघून आनंद होणे हा मनुष्यस्वभाव आहे
आणि एकदा असे विरोधक तयार झाले की चाहते आणखी कट्टर होतात.
आमच्याकडेही एकेकाळी ऑस्ट्रेलियाची कोणाशीही मॅच असेना ती हरावी असेच लोकं ईच्छा बाळगायचे

चेन्नई आयपीएलमधील ऑस्ट्रेलिया आहे>>> ही ही ही.... आयपीएल मधली ऑस्ट्रेलिया. सगळ्यात जास्त वेळा मुंबई आयपीएल जिंकले. चारही कप तुमच्या आयपीएल मधल्या पॉंटिंगच्या नाकाखालून काढले. आयपीएलमधला पॉंटिंग स्टंपच्या पाठीमागून फक्त बघत होता.

*सध्या मी शर्मा, राहुल, पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत या चौघांच्या फलंदाजीचा आनंद लुटायलाच आयपीएल बघतो * - सहमत. मीं त्यात संजू सॅमसनलाही घेतों, वैयक्तीक आवड म्हणून व केरळचा एकमेव प्राॅमिसींग खेळाडू म्हणूनही असेल.

दोन लागोपाठ आउटस्विंग करुन तिसरा अचूक इनस्विंग.... मस्त चकवले बेस्टरोला!
चहर नक्कीच एक हुश्यार बोलर आहे.
चौथा बॉल पण क्लास आउटस्विंग होता!

चहर ने तूफान सुरूवात केलीये. ऋतुराज गायकवाड ला बाहेर बसायला लागलेलं पाहून जरा वाईट वाटलं. पण सीएसके ला एक एक्स्ट्रॉ बॉलिंग ऑप्शन मिळाला.

पांडेनी चहर ला मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह ‘वरचा दर्जा‘ टायमिंग होता.

एकदम सिम्पल झेल होता.बॉल उडवून मैदानाबाहेर जाऊन परत मैदानात येऊन कॅच घेण्याची गरज न्हवती. सगळे प्लेयर स्वतःला ओव्हरस्मार्ट समजतात. ब्रावो ची चालायची स्टाईल बघा. मुन्नाभाई mbbs मधल्या संजय दत्त सारखी. म्हणून पण ही टीम मला आवडत नाही.

मजा आली त्याची बॅटींग पहायला. >> कधी येत नाही असे विचारायला हवे. फारच रेअरली असे होते. त्याने म्हणजे कानफटात मारली तरी ज्याला मारली वा वा म्हणत राहील. Wink भाऊ म्हणतात तसा निखळ आनंद. बर ते पोट सुटल्यामूळे तर अजूनच छान वाटते Wink

चहर नक्कीच एक हुश्यार बोलर आहे. >> दुर्दैवी आहे बिचारा. एनमक्या वेळी इंजर्ड झाला नाही तर आतापर्यंत बुमरा नंतर त्याचे नाव फिक्स झाले असते. फूटबॉल सारखे सुब करता आले तर पहिल्या दोन ओव्हर शमी नि नंतरच्या चहर असे करेन मी तर.

शेवटी कालचा गोंधळ बरा होता असेच म्हणावे लागते. >> खरय तुमचे. अशा माणसांशी बोलून काहीच उपयोग नाही.

प्रियम गर्ग -शाब्बास!!! त्याचे शॉट्स, टायमिंग, रनिंग बिइटवीन द विकेट्स सगळंच देखणं होतं. सीएसके च्या सगळ्या फास्ट बॉलर्स चा (ब्राव्हो, ठाकूर, वगैरे आजी, मोहित शर्मा वगैरे माजी) 'स्लोअर वन' हा एकच 'गो टू' बॉल असावा असं वाटतं. Happy

भुवी वॉटसन आणि फिंचला कसे एवढ्या कन्सिस्टंटली गिर्‍हाईक बनवू शकतो?
ह्या जमान्यात ओपनिंग बॉलरचा ओपनिंग बॅट्समन वर असा डॉमिनन्स खरच वाखाणण्यासारखा आहे.

दुखापतीमुळे खेळ थांबलेला भरपूर वेळा बघितलंय, दमल्यामुळे खेळ थांबलेला प्रथमच बघितला. चिटिंग आहे ही.

धोनीला धांपा टाकताना पाहून वाईट वाटलं. पण, ' दमल्यामुळे खेळ थांबलेला प्रथमच बघितला. चिटिंग आहे ही ' शी बवहंशी सहमत.
भुवनेश्वर हा अत्यंत गुणी पण दुखापत- पीडीतच गोलंदाज आहे. आजही मोक्याच्या वेळी बिचारयाला आंत जांवं लागलंच !

वेल डन यंग ब्रिगेड. प्रियांक गर्ग, अभिषेक मस्त खेळले. एकंदर सर्वच टीम मधील यंग जनरेशन चमकतीय. परवा मावी आणि नागर्कोट पण चमकले. पृथ्वी, शुभनम, पडिक्कल तर आहेतच.

सीएसके म्हातार्‍यांची (>३०) टीम आहे. धोनी, केदार, रायडू, वोटसन, ब्रावो. अगदी उताराला लागलेल्या शारूकची आठवण येते. Happy

२०१०मध्ये चेन्नई वि. मुंबईमध्ये चेन्नईसाठी मस्ट विन असलेल्या गेममध्ये सचिन डीहायड्रेट झाला होता. तेव्हा तो रिटायर्ड हर्ट होऊन गेला होता आणि नंतर मुंबईचा डाव कोसळल्यावर पुन्हा आला होता. पण तो गेम चेन्नईने जिंकला. आणि नंतर फायनलमध्ये हेच दोघे संघ समोर येऊन चेन्नई जिंकली होती. त्यामुळे 'दमल्यामुळे खेळ थांबलेला प्रथमच बघितला. चिटिंग आहे ही' शी सहमत.

वेल प्लेड आरसीबी, वेल प्लेड पडिक्कल, विको बॅक इन फॉर्म!! आरसीबी चे सगळे बॉक्सेस चेक्ड!!

राजस्थान ने फार उशीर व्हायच्या आधी उनाडकटच्या ऐवजी कार्तिक त्यागी ला संधी द्यावी आणी जैस्वाल ला ओपनिंग ला आणून, स्मिथ, संजू ला एक एक पोझिशन खाली खेळवावं (उथप्पा बाहेर). कदाचित जैस्वाल आणी त्यागी यशस्वी (no pun intended) होणार नाहीत पण उनाडकट आणी उथप्पा कडून फार अपेक्षा नाहीयेत.

आज दिल्लीला मोठे धावसंख्या उभारण्याची संधी आहे.

बाय्दवे, ब्रिजेश पटेल बघित्ला ओझरता. मस्त स्टाइलिश बॅट्स्मन होता. एक टेस्ट मॅच सुरु असताना मैदानात उतरुन एका तरुणीने त्याला किस केल्याचा प्रसंग त्याची त्यावेळेची लोकप्रियता दर्शवतो...

मॉर्गन सहावा येतो बॅटींगला
नक्की काय रोल आहे संघात
दिनेश कार्तिक फ्लॉप आहे तो त्याच्या आधी येतो
नारायणचा प्रयोग थांबवायचे हे अजून यांना समजत नाहीये.
राहुल त्रिपाठी बहुधा मागे एका सीजनला ओपनिंगला येऊन मारायचा तो कमिन्सनंतर आठवा येतो.
गंडलेय सारे कॉम्बिमेशन

चेन्नई नेहमीच सिनिअर सिटीझन टीम राहिली आहे.
सिनिअर लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो की त्यांना सतत स्वताला सिद्ध करत राहावे लागते. परफॉर्म करायला जरा चुकले तर लगेच त्यांच्या वयाला टारगेट केले जाते

Pages