Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
डीन जोन्स!
डीन जोन्स!
ऑसी माजी क्रिकेटर आयपीएल समलोचक! हृदय विकाराने मुंबईत निधन!!
सॅमसन माझा खूप आवडता खेळाडू .
सॅमसन माझा खूप आवडता खेळाडू . कदाचित, भारतीय संघात कायम जागा मिळण्याच्या दीर्घकालीन अनिश्चिततेमुळेच त्यांच्य खेळात , विशेषत: फलंदाजीत, परिपक्वता येत नसावी. अंडं आधी कीं कोंबडी, असाच काहीसा हा प्रकार असावा. >> हे अजिबात पटले नाही भाऊ. मलाही आवडतो पण अंडर नाईंटीन, आय पी एल, रणजी एव्हढ्या सगळ्या प्रकारांमधे पाच -सहा वर्षांमधे त्याला परीपक्वता येत नसेल तर त्याचा दोष त्याच्याकडेच जातो. फक्त टॅलेंट आहे ह्या निकषावर भारतीय संघात जागा मिळणे इतरांवर अन्यायकारक ठरेल ना. यंदा आयपील मधे एव्हधा खणखणीत खेळ व्हावा कि त्याच्या नावावर सर्कल केले जावे अशा शुभेच्छा !
पड्डीकाल वर लक्ष ठेवायला हवे.
*....त्याला परीपक्वता येत
*....त्याला परीपक्वता येत नसेल तर त्याचा दोष त्याच्याकडेच जातो. * - मान्य !
आज राहूलचा खेळ बहरला. छान, नेमकी फटकेबाजी ! स्टेन आजून 'स्टेल' झाला नसला तरी 'टेरर' नक्कीच राहिला नाहीं !
स्टेन आजून 'स्टेल' झाला नसला
स्टेन आजून 'स्टेल' झाला नसला तरी 'टेरर' नक्कीच राहिला नाहीं ! >> हो
खूपच रस्टी असेल असे धरूया का ? कोहली ला मानले पाहिजे, स्टेन, यादव नि सैनी असे तीन फास्ट बॉलर्स घेऊन खेळतो जे पेस मुळे भसाभसा रन्स जाऊ देणार हे उघड आहे. सुंदर ला फुकट घालवतोय. आज राहुल विरुद्ध अजिबात होम वर्क करून आल्यासारखे वाटले नाही. राहुल ला पूर्ण श्रेय. पुरेपूर किम्मत वसूल केली. शमी द्रुष्ट लागावी तसा पहिला स्पेल टाकतो.
आजचा सामना म्हणजे बंगळुरू वि.
आजचा सामना म्हणजे बंगळुरू वि. स्यूडो बंगळूरू होता (कोचः कुंबळे, कॅप्टन: राहूल, खेळाडू: मयंक, करूण) . राहूल जबरदस्त खेळला. कोहलीकडून सुटलेले कॅचेस आणी त्याची विकेट म्हणजे ‘सॉक्रेटीस मर्त्य आहे‘ ची प्रचिती होती. उमेश यादव नक्की कशासाठी टीममधे आहे? स्टेन पण खूप रस्टी वाटतोय.
संजूविषयी असामीशी सहमत आहे. होपफुली ह्या आयपीएल मधे कन्सिस्टंटली खेळेल.
राहूल आयपीएल मधे जसा फ्रीली
राहूल आयपीएल मधे जसा फ्रीली खेळतो तसा नेहमी खेलला तर आपला चौथ्या नंबरचा प्रश्न तरी नेहमीसाठी सुटेल. सैनी नक्की चमकणार पुढे जाउन. नेहमीप्रमाणे लेग स्पिनर बाजी मारत आहेत. बिना टेक्नीक खेळाडू लेग स्पिनर पुढे अगदीच उघडे पडतात. परदेशी खेळाडूंचे तर ढुंडो ढुंडो रे साजना पाहून खूप मजा येते.
), मावी, नागरकोट. पडिक्कल मात्र भारी दिसतो.
.
कोहली आणि एबीच आयपीएल मधे काय होत नेहमी. तरी यावेळेस गेल नाहीये. नाहीतर तिघांच तू खेळ, तू खेळ अस चालायच. मग तळ गाठणे आलेच. कागदावर येवढी चांगली टीम असून नेहमी हरणे आश्चर्यकारक आहे. कालचा पराभव तर दारूण होता. स्टेन संपल्यासारखा वाटतो, तर उमेश यादव मेंदू गुढग्यात असल्यासारखी बोलिंग करतो.
यंग गन्स अजून थंड आहेत. पृथ्वी, यशस्वी, प्रियांक गर्ग, ऋतुराज, शुभनम (साराचा बॉय फ्रेंड अस आल होतं, चांगली करीअर मूव
३ डी प्लेयरचे पितळ उघडे पडले .
धोनी हे एकटाही प्लान करू शकतो
धोनी हे एकटाही प्लान करू शकतो Happy.... धोनी नाही पण विराट ने एकट्यानेच मॅच घालवली जवळपास.
1. त्याच्या मानाने अंत्यत सोपे झेल सोडले 2 वेळा.
2. 200 रन्स हवे आहेत आणि नवीन खेळाडू 3 वर ... म्हणजे स्वतः काय 150-160 करताना 3 नंबर ला यायचं. जे पुढील मॅच मध्ये होईल.
3. सुंदर चा वापरच करत नाही. असं पण डेल आणि उमेश महागडे ठरले होतेच की.
*राहूल आयपीएल मधे जसा फ्रीली
*राहूल आयपीएल मधे जसा फ्रीली खेळतो तसा नेहमी खेलला तर आपला चौथ्या नंबरचा प्रश्न तरी नेहमीसाठी सुटेल*-
क्षेत्ररक्षण भेदून अचूक मारलेले त्याचे ऑफ-साईड फटके त्याला सध्या लय सांपडलयाचं दर्शवतात. चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं तो खरंच उत्तर ठरू शकतो.
आजची मॅच बघायला मजा येईल.
आजची मॅच बघायला मजा येईल. श्रेयस वयाच्या मानाने खूपच मॅच्युअर आहे. पृथ्वी लवकर सेटल होवो. त्याचा कांबळी न होवो.
काल कोहलीने हातातले दोन
काल कोहलीने हातातले दोन लाडू सोडले त्याचा भुर्दंड मोठा बसला. राहूलने मग हात धुऊन घेतले!
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/trending-news/sunil-gavaskars-controversial-com...
गावस्करांनी हिंदीत समालोचन
गावस्करांनी हिंदीत समालोचन करू नये
*काल कोहलीने हातातले दोन लाडू
*काल कोहलीने हातातले दोन लाडू सोडले त्याचा* - काल एकंदरीतच कोहली ' ऑफ-मूड'च वाटत होता. जाणवलं का आणखी कोणाला ?
*पृथ्वी लवकर सेटल होवो. त्याचा कांबळी न होवो.* - दोघांत थोडा फरक असावा. कांबळी सेटल होवून मग अवेळी मावळला ( कारणं अनेक असूं शकतात !). पृथ्वी टेकनिकली खूप आश्वासक व ' प्रॉमिसिंग' वाटतोय , शिवाय, शैलीदारही आहे. शुभेच्छा.
गावस्करांची कॉमेंट धक्कादायक
गावस्करांची कॉमेंट धक्कादायक होती. अर्थात त्याला कोहलीच्या अनुश्का बरोबर क्रिकेट खेळतानाच्या विडिओची बॅक ग्राउंड होती. पण हे सगळ्यांना माहित नसते. आणि दादा कोंडकेंच्या काळात मोठे झालेल्या आणि द्वयर्थी शब्दार्थ माहित असलेल्या गावस्करांनी काळजी घ्यायला पाहिजे होती. त्यांच्या रेसिस्ट कॉमेंट्रीवर पण असे आक्षेप येउ शकतात याचे त्यांच्या सारख्या अत्युच्च स्थानी पोचलेल्या व्यक्तिंनी भान ठेवायला हवेच.
डिन जोन्सला श्रद्धांजली. माझा
डिन जोन्सला श्रद्धांजली. माझा तो एक आवडता खेळाडू होता. (ऑस्ट्रेलियन असून)
*डिन जोन्सला श्रद्धांजली* -
*डिन जोन्सला श्रद्धांजली* - +1 !
14 षटकांनंतर सीएसकेला 15 च्या
14 षटकांनंतर सीएसकेला 15 च्या सरासरीने धांवा आवश्यक ! जाधव व डु प्लेसीची जोडी तर जमलीय ( भागीदारी- 50 ) कठीण दिसतंय सीएसकेसाठी !
गावस्करचा कमेंट चुकीचा
गावस्करचा कमेंट चुकीचा रिपोर्ट केला गेला होता आधी. त्यात द्वर्थी काहीच नव्हते. बरोबर बॉलिंग शब्द होता. नंतर कोणी तरी खोडसाळपणे बदलला असे वाचले. असो.
आपला चौथ्या नंबरचा प्रश्न तरी नेहमीसाठी सुटेल >> चौथा श्रेयस साठी पक्का आहे नि राहुल पाचवा असे वाटलेले आधीच्या काही सिरीज वरून. अर्थात फिरवफिरव करू शकतात. दोघेही फ्लेक्षिबल आहेत. फक्त राहुल ला फार तर ती २० मधे किपिंग करू दे. वन डे मधे नको. बच्चे की जान लोगे क्या !
धोनी चे काही खरे दिसत नाही आजही.
दिल्लीच्या टीममध्ये बर्याच
दिल्लीच्या टीममध्ये बर्याच मुंबईकरांचा भरणा आहे.

श्रेयस एकंदरीत प्रॉमिसींग वाटतो. डोक्यात हवा जाऊ नये म्हणजे झालं.
मुंबईचे (टीम नाही. मुंबईत वाढलेले) बरेच खेळाडू एकदम सध्या चर्चेत आलेले दिसतात. रोहीत, रहाणे आहेतच पण श्रेयस, पृथ्वी, दुबे अशी "नवीन पिढी" पण आहे. सिद्धेश लाडचा अमोल मुजुमदार करू नये म्हणजे झालं.
दिल्लीच्या टीममध्ये बर्याच
दिल्लीच्या टीममध्ये बर्याच मुंबईकरांचा भरणा आहे >>
ही एक पंचाईत असते म्हणजे समजा तुम्ही एक टीम फॉलो करत असल नि काही प्लेयर्स तर ते प्लेयर्स त्या टीम विरुद्ध खेळताना नक्की कोणाला सपोर्ट करायचे ह्यात गोंधळ होतो 
>>नक्की कोणाला सपोर्ट करायचे
>>नक्की कोणाला सपोर्ट करायचे ह्यात गोंधळ होतो Happy
आणि परत आमच्यासारख्या ड्रीम११ खेळणाऱ्यांचा अजुनच गोंधळ होतो
सीएसके ला रैनाची उणीव जाणवत
सीएसके ला रैनाची उणीव जाणवत असणार!
>>दिल्लीच्या टीममध्ये बर्याच
>>दिल्लीच्या टीममध्ये बर्याच मुंबईकरांचा भरणा आहे.<<
मुंबईत क्रिकेट टॅलंट नेहेमीच सरप्लसमधे असतं. कोटा सिस्टम यायच्या आधी भारतीय संघात बहुतेक क्रिकेटर्स मुबईचे असुनहि एक संपुर्ण टीम मुंबईकडे राखीव असायची - रणजी करता. पुढे कोटा सिस्टम आल्याने आणि मुबईत स्पर्धा वाढल्याने मुंबईतले क्रिकेटर्स बाहेर जाउन खेळायला लागले. तिच प्रथा आय्पिएल मधे कंटिन्यु होत आहे...
आज पंतने मारलेला हूक आणि मिडॉफचा ड्राइव चाबूक होता...
पुढे कोटा सिस्टम आल्याने आणि
पुढे कोटा सिस्टम आल्याने आणि मुबईत स्पर्धा वाढल्याने मुंबईतले क्रिकेटर्स बाहेर जाउन खेळायला लागले. तिच प्रथा आय्पिएल मधे कंटिन्यु होत आहे... >> पहिल्या वाक्याचा आय्पिएल शी संबंध नाही रे काही. आय्पिएल मधे ऑक्शन पद्धतीने प्लेयर्स विकत घेतात टीम्स ओनर्स नि मॅनेजर्स. मुंबई इंडियन्स मधेही तीन मुंबईकर्स आहेत.
गेल्या वीस वर्षांमधे दिल्ली, बंगलोर, बडोदा, वगैरे जागी डोमेस्टिक क्रिकेट च्या भरभराटी साठी खास प्रयत्न केले गेले त्याचा परीपाक म्हणून त्या टीम्स पण सरस होउ लागल्या रणजी मधे.
अरे कोटा आणि ऑक्शन मधे तरी
अरे कोटा आणि ऑक्शन मधे तरी कितीसा फरक आहे. एका टिममधे सगळेच बॅट्समन, किंवा सगळेच बोलर्स, किंवा सगळेच ऑल राउंडर्स घेउ शकत नाहि ना. उदा. पृथ्वी, श्रेयस यांना इच्छा आणि पैसा असुनहि टिम मधे घेउ शकत नाहि, कारण त्यांची बॅटिंग स्टाइल्/लाइनप. त्या तोडिचा प्लेयर ऑलरेडि मुंबई इंडियन्सकडे आहे (असावा). तीच गत पुर्वि होती, कोटा सिस्टम मधे. उगाच परकार ब्रदर्स, पॅडि शिवलकर, मुजुमदार इ. सडले काय...
अरे कोटा आणि ऑक्शन मधे तरी
अरे कोटा आणि ऑक्शन मधे तरी कितीसा फरक आहे. >> बराच फरक आहे रे. कोटा म्हणजे फिट प्लेयर ला, इच्छा नि रिसोर्स असेल तरी घेता येणार नाही. आयपील ऑक्शन बर्यापैकी अमेरिकन स्पोर्ट मॉडेल वर आधारीत आहे. ऑक्शन मधे विदेशी प्लेयर चा कमाल आकडा, एकूण कमाल आकडा नि किमान बोलीचे बंधन ह्याशिवाय प्रातांचे, भाषेच बंधन नाही. अंबानी ला हवे असल्यास तो पूर्ण मुंबईची रणजी टीम मुंबई इंडियन म्हणून खेळवू शकतो.
कोटा सिस्टीम ऑफिशियल नव्हती असे मला वआटते. फक्त निवड समिटी चे सदस्य निवडताना प्रातांप्रमाणे घेतले जात असत नि मग इंप्लीसीट कोटा सीस्टीम येत असे - माझा एक घे नि तुझा एक घेतो अशा प्रकारची अशी माझी समजूत आहे.
परकार ब्रदर्स, पॅडि शिवलकर, मुजुमदार >> परकार ची कल्पना नाही पण बाकीच्या दोघांना अनुमोदन. मुजुमदार दुर्दैवी म्हणायचा कि त्याचा काळ बिग फोर बरोबर ओव्हर लॅप झाला. पॅडी बहुधा बेदी मूळे ?
परकार ब्रदर्स - घुलाम आणि
>>अंबानी ला हवे असल्यास तो पूर्ण मुंबईची रणजी टीम मुंबई इंडियन म्हणून खेळवू शकतो.<<
अरे पण तो व्यापारी आहे. पृथ्वी, श्रेयसला मुंबई इंडियन्स मधे घेउन तो शेवटि आरोआय बघणार कि मुंबई अस्मिता? तेच घडलं, थोड्याफार प्रमाणात कोटा सिस्टम मधे.
परकार ब्रदर्स - घुलाम आणि झुल्फिकार. यातला झुल्फिकार उत्तम विकेट कीपर होता, इंजिनियर मुळे दबला गेला. घुलाम तर गावस्कर बरोबर ओपन करायचा. जाँटि र्होड्स, कॉलिंग्वुड्च्या आधी डॅरेक रँडॉलला झाकोळेल अशी फिल्डिंग घुलाम परकारची होती. हा पठ्ठा एखाद्या चित्यासारखा संपुर्ण ऑफ साइड कव्हर करायचा. असो.
वरच्या यादित रामनाथ पारकरचं नांव हि जोडलं पाहिजे... (हि वाज वे बेटर दॅन चेतन चौहान)
*पॅडी बहुधा बेदी मूळे ?* -
*पॅडी बहुधा बेदी मूळे ?* - होय. पण त्याला नशीबही जबाबदार आहेच. नेमकं त्याच वेळीं निवड समितीचे अध्यक्ष होते लाला अमरनाथ !
अनेक मुंबैच्या खेळाडूंना संधी मिळाली नाहीं याचा सार्थ खेद व्यक्त करताना, मुंबैच्या त्यावेळच्या प्रचंड dominance मुळे इतर राज्यांतील ( यांत महाराष्ट्रही आलंच ) कांहीं गुणी खेळाडूंवर अन्याय/ दुर्लक्ष झालं असण्याची दाट शक्यताही लक्षात घेणं आवश्यकच आहे.
ज्या मुंबई खेळाडूंची नावं
ज्या मुंबई खेळाडूंची नावं तुम्ही घेताय त्यात मराठी एकपण नाही. सगळे दिल्ली, यूपी बिहारी आहेत.
*सगळे दिल्ली, यूपी बिहारी
*सगळे दिल्ली, यूपी बिहारी आहेत.* - परकार बंधू कोकणातले आहेत. पॅडी शिवलकर, रामनाथ पारकर, मुजूमदार हे अस्सल मराठीच. शिवाय, केवळ क्रिकेटपुरते मुंबैत न येतां इथेच स्थायिक असलेल्या कुटुंबातील मुलं क्रिकेटमधे पुढे आली, तर त्याना मुंबैकरच म्हणणं योग्य.
Pages