Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पंजाब नक्की नसेल. त्यांच्या
पंजाब नक्की नसेल. त्यांच्या डेथ ओव्हर्स च्या प्रॉब्लेम ला मुजीब वगळता एकही पर्याय नाहीये. राहुल नि मयांक किती वेळा २००-२०० देणार.
अनुभवापेक्षा गुणवत्ता आणि कमी
अनुभवापेक्षा गुणवत्ता आणि कमी वय हे जास्त प्रभावी वाटत आहेत
>>>>>
अनुभवापेक्षा कमी वय आणि जवानीका जोश असे हवे ना.. गुणवत्ता अनुभवी खेळाडूंकडेही असते. कमी असतो तो फिटनेस ज्याची कमतरता भरून काढायला ते आपला अनुभव पणाला लावतात.
पण मला वाटते सध्या युवा खेळाडूंनाही क्रिकेटचा बरेपैकी एक्स्पोजर मिळतो. त्यामुळे ते तुलनेत लवकर अनुभवसंपन्न होतात. जसे दिल्लीचेच घ्या. यंदा पृथ्वी शॉ गेल्यावेळेपेक्षा जास्त आश्वासक फटकेबाजी करतोय. अय्यरने दोनेक सीजन आयपीएल कप्तानी केल्याने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मधल्या फळीत खेळल्याने आता तो दिल्लीसाठीही तिसरया वा चौथ्या नंबरवर सेट वाटतोय, कर्णधार म्हणून आधीपेक्षा परीपक्व वाटतोय. तसेच बदललेले टॉप ऑर्डर प्लेअर पाहता ऋषभ पंतही प्रत्येक सामन्यात आपली नेहमीची भुमिका बदलून मॅच्युअर खेळी करतोय ज्यात तो कुठेही युवा जोश दाखवायचे टाळतोय. जर युवा खेळाडूंमध्ये लवकर मॅच्युरीटी आली तर फिटनेसच्या निकषावर त्यांचे पारडे जड होणे स्वाभाविक आहे.
राजस्थान आणी सॅमसन - फ्लॅटर
राजस्थान आणी सॅमसन - फ्लॅटर टू डिसीव्ह - परत एकदा!! सद्ध्या तरी मुंबई आणी दिल्ली तगडे वाटतायत. केकेआर चे यंग-गन्स चमकले आहेत पण 'नेहेमीचे यशस्वी' अजून काही विशेष करत नाहीयेत.
आजची यादव ची बॅटींग विशेषतः
आजची यादव ची बॅटींग विशेषतः तो ज्या सहजतेने कव्हर, स्केअर नि फाईन लेग कडे फिल्डर ला नाचवत होता ते बघून डोळ्यांचे पारणे फिटले. अगदी रोहित च्या वरताण सुंदर खेळ होता.
फक्त क्लासिक क्रिकेट वाल्यांनाही हा आनंद उपभोगता आला असता तर असे वाटून गेले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मधल्या फळीत खेळल्याने आता तो दिल्लीसाठीही तिसरया वा चौथ्या नंबरवर सेट वाटतोय, कर्णधार म्हणून आधीपेक्षा परीपक्व वाटतोय >> अय्यर मुंबई साठी मधल्या फळीअतच खेळत आलाय आधी पासून. दिल्ली नि भारतीय संघात खेळण्या आधी पासून.
असामीशी सहमत. सूर्यकुमार
असामीशी सहमत. सूर्यकुमार मस्तच खेळला. अय्यर मुंबईचा वन-डाऊन बॅट्समन होता (रहाणे ओपनर होता). असो.
पण गेल्या काही मॅचेस एकतर्फी झाल्या आहेत. होपफुली, ह्या पुढच्या मॅचेस जरा चुरशीच्या होतील.
आयपीएल मध्ये आता प्लेअर्स चे
आयपीएल मध्ये आता प्लेअर्स चे रेशनिंग करणे जरूरी आहे असे वाटते...चेन्नईचे तेच तेच चेहरे बघून कंटाळा आला. नवीन खेळाडू तर आपल्याला चेन्नईने घेऊ नये अशीच प्रार्थना करत असतील....
सुकु यादव, राणा, किशन, पंत, अय्यर, शॉ, पडिक्कल, सर्फराझ्, राहूल चहार, मावी, गिल, बिश्नोई, गर्ग व्गैरे लोक पहिल्या दुसर्या वर्षामध्येच किती चमकत आहेत... चेन्नईकडे असते तर एव्हाना सडवल्या गेले असते....चेन्नईने अशा किती नवख्यांना बसवून ठेवले असेल ८-१० वर्षात कोण जाणे.
१ ऑक्शन सीझन ३ वर्षांचा असतो ना? मला वाटते प्रत्येक खेळाडूला मॅक्सिमम दोन सीझन्स आणि कॅप्टनला कॅप्टन म्हणून १ सीझन खेळता यावे असे लिमिट्स घालायला हवे. प्लेईंग ११ मध्ये ईंटरनॅशनल न खेळलेले २ डोमेस्टिक प्लेअर्स हवेतच असाही नियम हवा.
ऊमेश यादव, ऊनाडकट, ऊथप्पा, करूण नायर, सुनील नारायण, कार्तिक, मोहित शर्मा, अॅरन, वॉरियर ह्यांची शेल्फ लाईफ संपलेली आहे असे वाटते.... सिराज, राजपूत, खलील, हर्शल पटेल ह्यांनी अनेक सीझन्स मध्ये फारशी काही चमक दाखवलेली नाही.
हरभजन, अश्विन, ईशांत, रहाणे, धोणी, विजय, साहा ह्यांना बघणे आता खूप बोरिंग झाले आहे (धोनी तर ऐकवतही नाही)... त्यांचा पर्फॉर्मन्स प्लेझंट नसतोच आणि असतो तो ही फार काही मॅचच्या रिझल्ट मध्ये भर घालणारा नसतो.
स्टेन, गेल काँपिटिटिव वाटलेच नाहीत...ऊगीच लेगसी आहे म्हणून चालवायचे... ताहिर आणि मलिंगा अजून फार तर एखादे वर्ष खेळतील.
गौतम, धवल कुलकर्णी, जयंत यादव... एखादी मॅच खेळतात मग पूर्ण सीझन्स काहीच नाही.. वय आणि अनुभवही त्यांच्या बाजुने नाही.
रैना, चावला आणि अमित मिश्रा मात्र अपवाद म्हणावे असे आहेत.... ते अजूनही मॅच पलटवणारा परफॉर्मन्स देतात. अक्षर पटेल ईकॉनॉमी मुळे जरा टिकून आहे.
हे फक्त ह्या सीझनमध्ये चान्स मिळालेले लोक आहेत.... कायम बेंच वर असणारे अजून किती तरी असतील.
एकंदर आता एक जोरदार प्लेअर टर्नओवर व्हावा असे वाटते.
मुंबई आणि दिल्ली यांच्यातल
मुंबई आणि दिल्ली यांच्यातल साम्य आणि सामर्थ्य म्हणजे दोन्ही टीम्स मधे बॅटींग आणि बोलिंग मधे डेप्थ आहे. काल रोहित आउट झाल्यावर पुनः एकदा चांगला स्कोअर झाला. पोलार्डला याव सुद्धा लागल नाही. आरसीबी आणि चेन्नाईचा हाच प्रॉब्लेम आहे. दोन तीन खेळाडू फेल झाले की चॅलेज संपतोच.
टी - २० मधे आता पोस्ट टवाटिया युगात प्रेक्षक, खेळाडू आणि कॉमेंटेटर यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल जाणवतो आहे. आता शेवटच्या ३ ओव्हर्स मधे ५० च्या खाली रन्स काढायच्या असल्या तर कोणी निकाल प्रेडिक्ट करायला धजावत नाही. काल मुंबईने पुन्हा शेवटच्या ३ ओव्हर्स मधे ५० च्या वर धावा काढल्या. Looks like this is now new normal.
आणि कालसुद्धा जोपर्यंत बटलर होता तोपर्यंत मुंबईचा विजय नक्की वाटत नव्हता, जरी रन रेट १६च्या वर गेला होता.
ह्या आयपीएल मुळे अनुभवापेक्षा गुणवत्ता आणि कमी वय हे जास्त प्रभावी वाटत आहेत!>> माझ्या मते लॉक डाउन चा जास्त परिणाम जेष्ठ खेळाडूंच्या फिटनेस वर जास्त झाला आहे.
काल अनुकूल नावाच्या नविन आणि तरूण खेळाडू सबने अफलातून कॅच घेतला बटलरचा. जबरदस्त. माझ्या मते आता पर्यंतचा बेस्ट कॅच.
सुर्यकुमार यादव ! ! काल
सुर्यकुमार यादव ! ! काल खतरनाक खेळला. परवाची स्टॉईनिसची अर्धशतकी हिटींग आणि कालची सुर्याची खेळी या दोन्ही खेळी जितके सहज ते खेळले तो दोन्ही सामन्यातील डिफरन्स ठरला.
स्पेशली काल त्या आर्चरने आधी पांड्याच्या तोंडावर एक बॉल फेकला. मुंडकेच उडवले असते. पण पुरेशी दिलगिरीही व्यक्त केली नाही. लगेच त्याच ओवरला एक बाऊन्सर सुर्याच्या डोक्यावर आदळला. तो खाली कोसळला. तरी हा पुढे बघायला गेला नाही. मनातून उतरला काल तो आर्चर.
पण खरी कमाल म्हणजे पुढच्याच बॉलला सुर्यकुमार यादवने गुडघ्यावर बसून त्याला मागे सिक्स मारला ते अफाट होते. उभे राहून टाळ्या वाजवल्या मी त्या शॉटसाठी. ग्रेट ! हॅटस ऑफ !!
*खरी कमाल म्हणजे पुढच्याच
*खरी कमाल म्हणजे पुढच्याच बॉलला सुर्यकुमार यादवने गुडघ्यावर बसून त्याला मागे सिक्स मारला ते अफाट होते.* +1 ! ग्रेट ॲटिसिपेशन व एकझिकयूशन ! हा सूर्यकुमार कधी तळपतो याचीच वाट बघत होतो. हे तरूण खेळाडू राष्ट्रीय निवडसमितीची खरी कसोटी घेणार आहेत !!
काल सॅमसनने मात्र एक सुवर्णसंधी गमावून निराशा केली . ( त्याने मागे धावत जावून घेतलेला झेल मात्र अफलातून होता )
ढच्याच बॉलला सुर्यकुमार
ढच्याच बॉलला सुर्यकुमार यादवने गुडघ्यावर बसून त्याला मागे सिक्स मारला ते अफाट होते. >>>
लहानपणी विटी दांडू खेळताना गलीवर विट्टी ठेवुन कोलताना ती कशी पाठीमागे कोलली जायची कधी कधी. तसा अक्षरशः चेंडू कोलला यष्टीरक्षकामागे सुर्यकुमारने. आणि तो देखिल सीमापार.... स्मिथ देखिल अवाक झालेला तो फटका पाहून. काल स्मिथच्या फिल्ड प्लेसिंग सोबत अक्षरश: खेळत होता सुर्यकुमार.
गुणवत्ता अनुभवी खेळाडूंकडेही असते. >>> असतेच असे नाही ( सर्वोत्कृष्ट उदाहरण रवी शास्त्री़ ) कारण गुणवत्ता मुळात असावी लगते. गिरवून फक्त सराव होतो. अनुभवा नुसार गुणवत्ता प्रगल्भ होते.
कृष्णा, माझ्या म्हणण्याचा
कृष्णा, माझ्या म्हणण्याचा अर्थ गुणवत्ता कॉन्स्टण्ट. युवा असो वा अनुभवी दोघांकडे असू शकते.
फरक पडतो ते युवांकडे अस्तो फिटनेस ज्येष्ठांकडे असतो अनुभव.
फक्त जेव्हा काही नवीन करायचे असते तेव्हा युवाही नवीन आयड्या घेऊन येऊ शकतत. आणि या फॉर्मेटमध्ये हे फार महत्वाचे आहे.
शुभमन गिलला विनाकारण खेळवत
शुभमन गिलला विनाकारण खेळवत आहेत. काय कामाचा नाही तो. मी तर ऐकून आहे सचिनच्या आग्रहामुळे त्याला घेतलाय टीममध्ये.
नारायणचा प्रयोग थांबवायचे हे
मॉर्गन सहावा येतो बॅटींगला
नक्की काय रोल आहे संघात
दिनेश कार्तिक फ्लॉप आहे तो त्याच्या आधी येतो
नारायणचा प्रयोग थांबवायचे हे अजून यांना समजत नाहीये.
राहुल त्रिपाठी बहुधा मागे एका सीजनला ओपनिंगला येऊन मारायचा तो कमिन्सनंतर आठवा येतो.
गंडलेय सारे कॉम्बिमेशन
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 October, 2020 - 23:14
>>>>
ऐकले आज माझे. होपफुली आता हे कंटिन्यू करतील. लगेच रिझल्टची अपेक्षा न धरता
चावला बरेच वर्षे kkr कडून
चावला बरेच वर्षे kkr कडून खेळालाय म्हणून धोनीला संशय आहे की याला टीममध्ये घेतला तर मुद्दाम खराब चेंडू टाकून kkr ला जिंकवायचा म्हणून बसवलाय त्याला आज.
जर एखाद्या शुभमन गिलला बसवत
जर एखाद्या शुभमन गिलला बसवत असतील तर या आयपीएलचा भारताला फायदा काय....
- एक क्रिकेटप्रेमी
आऊट झाला गिल. बोललो ना काय
आऊट झाला गिल. बोललो ना काय कामाचा नाही तो. विनाकारण खेळवताहेत.
आज केकेआर ने बॅटींग ऑर्डर
आज केकेआर ने बॅटींग ऑर्डर बदलणं हा सुखावह बदल आहे. होपफुली, मॉर्गन चौथ्या क्रमांकावर खेळेल. मॉर्गन, रसेल नंतर कार्थिक हा क्रम जास्त योग्य वाटतो.
चेन्नई जिंकेल काय?
चेन्नई जिंकेल काय?
चेन्नई चे ईम्गिन दू प्लेसी
चेन्नई चे ईम्गिन दू प्लेसी आहे. तो लवकर उडाला तर रायुडू वर प्रेशर येईल. टिथे केकेआर जिंकू शकेल.
ऋन्मेष तुझा हिरो आलाय मॅच
ऋन्मेष तुझा हिरो आलाय मॅच बघायला.
चेन्नई जिंकल्यात जमा आहे. बंद
चेन्नई जिंकल्यात जमा आहे. बंद केलं मॅच बघणं.
बोकलत,
बोकलत,
त्यादिवशी शाहरूख आलेला. केकेआरला जिंकवून दिलेले.
आज समोर चेन्नई आहे
टक्कर दोन सुपरहिरोंची आहे
अवांतर - शाहरूखचा मास्क नव्हता मगाशी योग्य जागी. यावरून एक धागा काढावा का विचार करतोय..
शाखा परत एकदा फिरवतोय वाटतं
शाखा परत एकदा फिरवतोय वाटतं मॅच.
चेन्नई जिंकल्यात जमा आहे. बंद
चेन्नई जिंकल्यात जमा आहे. बंद केलं मॅच बघणं.
नवीन Submitted by बोकलत on 7 October, 2020 - 09:43
>>
जिंकतील पण सोपे वाटत नाही.
अहो बोलत काय मिस करताय हो
अहो बोलत काय मिस करताय हो तुम्ही.
मी परत बघायला लागलो तीन विकेट
मी परत बघायला लागलो तीन विकेट गेल्यावर. शाखाने जादू केली.
का हो , धोनी ने काय फिक्स
का हो , धोनी ने काय फिक्स केली होती की काय.
केदार , जडेजा, धोनी ,,, पॅथेटिक.
तीन विकेट्स गेल्यावर मी समजून
तीन विकेट्स गेल्यावर मी समजून गेलो आता kkr जिंकण्याचे चान्सेस आहेत. भारी झाली मॅच. पण केदार जाधवला रसलने खेळवलं ते पाहून जरा वाईट वाटलं.
शाखा परत एकदा फिरवतोय वाटतं
शाखा परत एकदा फिरवतोय वाटतं मॅच.
>>>>
फिरवली सुद्धा..
धोनीने अमरीशपुरी बनत जा सिम्रन जा केले..
शाखाने जादू केली.
>>>>>
खरेच जादू करावी ती शाहरूखनेच... बाकीचे करणी करतात मेले
तीन विकेट्स गेल्यावर मी समजून
तीन विकेट्स गेल्यावर मी समजून गेलो आता kkr जिंकण्याचे चान्सेस आहेत. भारी झाली मॅच. पण केदार जाधवला रसलने खेळवलं ते पाहून जरा वाईट वाटलं. >> +१
Pages