आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२४ बॉल्स मधे ८४ ! साधारण अशाच स्टेट मधे काल नेटाने पाहिली होती पुढे काय होते बघू म्हणून, आज नाद सोडून दिला. त्यामुळे पुढचे हुकले Happy

आजच्या मॅचमुळे किशन ने तिवारीचा सीझन ऑलमोस्ट बंद केलाय. तूफान खेळला इशान किशन. तितकंच कौतूक सैनी चं आहे. त्याने इतक्या प्रेशरमधे लाजवाब सुपर ओव्हर टाकली.

तिवारी पण चांगला खेळतोय रे. डी कॉक्स ऐवजी अजून एक बाहेरचा ऑल राऊंडर आणून, थोरल्या पांड्या ला बसवून तिवारी नि किशन दोघेही खेळू शकतात.

मु.ईं. एरवी डावे इजवे कॉम्बो करण्यासाठी तडफडत असतात नि आज नेमके सुपर ओव्हर मधे तसा विचारही केला नाही. मान्य कि पांड्या नि पोलर्ड बेस्ट हिटर्स आहेत पण किशन जे काही खेळात होता ते बघता त्याला पाठवायला हवे होते अशी चुटपुट लागून राहिली.

रोहितने पोस्ट मॅच इंटरव्हूमध्ये सांगितलं की किशन खूप दमून ड्रेन आऊट झाला म्हणून त्याला पाठवलं नाही.
मुंबईच्या इंनिगच्या मिडल ओव्हर्समध्ये अजिबात वाटलं नाही की सुपर ओव्हरपर्यंत जाईल असं. Happy
बादवे बोलर्स खरच अशी बॉलिंग मुद्दाम टाकतायत का? मुंबईच्या किती बॉलर्सनी इतकी धुलाई होत असतानाही एव्हडे शॉर्ट बॉल का टाकले?

>>मुंबईच्या किती बॉलर्सनी इतकी धुलाई होत असतानाही एव्हडे शॉर्ट बॉल का टाकले?<<
फार फार वर्षांपुर्वि केरी पॅकर नावाच्या आझी मिडिया मोघलने लिमिटेड ओवर्सची (६०) टुर्नामेंट आयोजीत केली होती. त्यावेळी बर्‍याच देशांनी त्यावर बंदिहि घातली होती. पॅकर सर्कस किंवा असंच काहिसं त्या टुर्नामेंटच नांव होतं. सध्याच्या आयपिएलची ती जननी म्हणायला हरकत नाहि. कालौघाने, ६० ओवर्सचे ५० झाले, ५० ओवर्सचे २०; पुढे १० ओवर्स देखील होतील. हळुहळु सगळे देश आयपिएल मधे आता भाग घेत आहेत, पण "सर्कस" मात्र इमाने इतबारे सुरु आहे. आणि सर्कस म्हटली कि तिथे असले प्रश्न विचारायचे नसतात... Wink

बहुतेक सर्कस हे नाव रंगीत कपड्यांमुळे आणि मर्यादित षटके वगैरेंमुळे पडले. त्यावेळेस इतके खेळाडू तिकडे जायला उत्सुक होते की कोणाकोणावर बंदी घालणार असा प्रश्न आला असावा. २००७ च्या वर्ल्ड कप नंतर आधी आयसीएल म्हणून एक स्पर्धा सुरू केली गेली होती. ती बहुधा असेच कोणीतरी बंडखोर लोक होते. त्यात लारा वगैरे असणार होते. पण ते फोफावायच्या आधीच बीसीसीआय ने आयपील ची घोषणा केली. तसलाच प्रकार.

पॅकर सर्कस च्या वेळेस अशीच काहीतरी तडजोड होउन ऑस्ट्रेलियात दरवर्षी तिरंगी सामने भरवणे सुरू झाले. तीच ती जाने-मार्च होणारी वर्ल्ड सिरीज स्पर्धा.

६० ओव्हर्सच्या मॅचेस इंग्लंड मधे याच्या बर्‍याच आधी सुरू झाल्या. पहिले तीन्ही वर्ल्ड कप ६० ओव्हर्सचेच होते. १९८७ मधल्या भारतातील कप पासून हे सामने ५० ओव्हर्स चे झाले, आणि त्यापुढच्या कप मधे रंगीत कपडे आले (जनरल वन डेज मधे आधीच आले होते). त्यानंतरही काही दिवस इंग्लंड मधे वन डे गेम्स ५५ ओव्हर्सच्या होत. बहुधा १९९० च्या भारत-इंग्लंड गेम्सही ५५ ओव्हर्सच्या होत्या. तेथे उन्हाळ्यात दिवस मोठा असल्याने ते सहज शक्य होते. अर्थात नंतर डे-नाइट्स सर्वत्र झाल्याने अजूनही शक्य आहे. पण आता एकूणच भर कमी ओव्हर्स कडे आहे.

बाकी आयपीएल चे शॉर्ट बॉल्स पाहून डब्ल्यू जी ग्रेस चे एक वाक्य आठवले. त्याला एकदा लौकर आउट केल्यावर ते साफ नाकारत तो त्या बोलर ला म्हंटला होता की लोक माझी बॅटिंग बघायला येतात, तुझी बोलिंग नव्हे Happy

फारएण्ड - नशीब एकाला तरी ती ऐतिहासीक घटना आठवतेय. टोनी ग्रेग वाज दि फर्स्ट रिबेल, फॉलोड बाय क्लाइव लॉय्ड. सनी वुड हॅव जॉय्न्ड, इफ दे सर्व्वाय्व्ड... Proud

*आधी आयसीएल म्हणून एक स्पर्धा सुरू केली गेली होती. ती बहुधा असेच कोणीतरी बंडखोर लोक होते..* - कपिल देवचा त्यात पुढाकार होता. किंबहुना, त्यानी केलेल्या spade work चा आयपीएल साठी बीसीसीआयला लाभ झाला.
*काल नेटाने पाहिली होती पुढे काय होते बघू म्हणून, आज नाद सोडून दिला* - माझंही तेंच झालं ! Sad
*...त्या बोलर ला म्हंटला होता की लोक माझी बॅटिंग बघायला येतात, तुझी बोलिंग नव्हे * - डबलयू जी ग्रेस यांच्याबद्दलचा हा किस्सा त्यांच्याविषयीं असलेल्या आत्यंतिक आदर व प्रेमामुळे कौतुकाने सांगितला जातो. इथे नेमक्या उलटया कारणांनी, एवढंच !!! Wink

मागच्या दोन्ही मॅचेसच्या फक्त पहिल्या इंनिग पाहिल्या, कालची पण रोहित शर्मा आऊट झाल्यावर बंद केली Sad

ICL च्या काही मॅचेस झी वर पहिल्या होत्या, लारा आणि इंझी होते.

तो W.G.Grace चा किस्सा, 'फटकेबाजी' मध्ये अम्पायर साठी पण ऐकला होता, कि तो म्हणाला होता लोक माझी बॅटिंग बघायला येतात तुझी अम्पायरिंग बघायला नाही जेव्हा एका नवीन अम्पायर ने काणेकरांच्या भाषेत LBW द्यायची गुस्ताखी केली होती .

हल्ली बेसुमार जेवताय, वर स्वीट डीश ! तुम्हाला आयपीएल 2020 वाटलं कीं काय, रोज 200+ धांवा आंणि वर सुपर ओव्हर !!20190201_190757_0 (1).jpg

तो W.G.Grace चा किस्सा, 'फटकेबाजी' मध्ये अम्पायर साठी पण ऐकला होता >> बरोबर मी ही अंपायरींग संदर्भातच ऐकला होता.

कपिल देवचा त्यात पुढाकार होता. किंबहुना, त्यानी केलेल्या spade work चा आयपीएल साठी बीसीसीआयला लाभ झाला. >> झी ने पुढाकार घेतला होता त्यात. बंडखोर वगैरे नंतर आय पी ल आणायची म्हणून बीसीसीआय ने मनमानी करून ठरवले. लारा शिवाय, बाँद, रायुडू पण त्यात होते. त्यातल्या बहुतेकांवर बीसीसीआय ने बॅन घातला होता कपिल सकट. पुढे शशांक मनोहरच्या काळात निवळत गेले. रायुडू फुकट जाण्याचे एक मुख्य कारण.

मुंबईच्या किती बॉलर्सनी इतकी धुलाई होत असतानाही एव्हडे शॉर्ट बॉल का टाकले?<< अ‍ॅबी ला फुल लेंग्थ किंवा यॉर्क करणे ह्यात जी चूक होऊ शकते त्या पेक्षा शॉर्ट बॉल वर त्याच्याकडून चूक होन्याची शक्यता अधिक आहे ह्या विचारानुसार (ऐकीव माहिती) आय पी एल बर्‍यापैकी डेटा ड्रिव्हन असते असे वाटते.

भाऊ Happy

(ऐकीव माहिती) आय पी एल बर्‍यापैकी डेटा ड्रिव्हन असते असे वाटते. >>>> इनसाईड एज मध्ये ऐकलस का? Wink

इनसाईड एज मध्ये ऐकलस का? >> तिथे किंवा क्रिक ईंफो सेशस्न मधे . नक्की आठवत नाही पण एकंदर सूर असा होता कि स्पाँटेनियटी किंवा इंस्टींक्ट पेक्षा डेटा ड्रिव्हन निर्णय सरासरी जास्त चांगले रीझल्ट्स देतात.

मुंबईने एबीडीला बॉलिण्ग करताना ती पहिली इनिंग होती. एबीडीला बांधून ठेवून रन रोखण्याऐवजी बाद करून रन्स रोखणे प्लान असू शकतो
चेस करताना मात्र एकदा १५+ रनरेट झाल्यावर ते देखील ५-६ ओवर शिल्लक असताना लेंथ बॉलिण्गवर विकेट घ्यायचा प्रयत्न करणे म्हणजे कश्यात काही नसताना बॅटीण्ग टीमला संधी देणे. झाले
वा मुळातच तोच हेतू असतो. आई मीन सुपरओवर झाली की दोन्ही संघांना पैसे वैसे मिळतात की काय अशी शंका येते Happy

बाई दबे,
आज यॉर्कर पडले. आणि दिल्लीची नाकेबंदी झाली.
अर्थात आज दव पडलेच नाही म्हणू शकतो. तरीही रोज भरमसाठ पडायचे अश्यातला भाग नव्हता.

>>अर्थात आज दव पडलेच नाही म्हणू शकतो.<<
अरे बाबा, ते दिवस गेले. पिच वर किती दंव पडलंय, किती गवत आहे, किती ओल आहे इ. बघुन पतौडि सारखे कॅप्टन्स सामन्याच्या निकालाचा अचूक होरा बांधायचे. आताच्या फॉर्मॅटमधे त्याला काहि अर्थ नाहि. विकेट्स सुद्धा टि-२०च्या फॉर्मॅटला कंड्युसिव बनवतात. बॉलला त्याच्या मेरिट नुसार ट्रीट करायचं, इज ओल्ड क्रिकेट. अब सिर्फ, बल्ला घुमाव; लगा तो चौका, वरना दुसरेको मौका... Happy

सामन्याच्या निकालाचा अचूक होरा बांधायचे. >> तरी बर सध्याचा संघ जास्त सामने जिंकतो आधीच्या संघांपेक्षा. ते जास्त मह्त्वाचे नाहि का निकालाचा अचूक अंदाज बांधण्यापेक्षा Wink

बॉलला त्याच्या मेरिट नुसार ट्रीट करायचं, इज ओल्ड क्रिकेट. >> वीस ओव्हर मधे दहा विकेट्स हाताशी आहेत हे म्हटल्यावर हे साहजिक नाही का ? फॉर्मॅट वेगळा आहे, गरज वेगळी आहे. बॉलला त्याच्या मेरिट नुसार ट्रीट करण्याएव्हढेच कौशल्य त्याच चांगल्या बॉल वर पण चौका ठोकणेही कौशल्याचे काम आहे ना ? तू म्हणशील नुसता पॉवर गेम असतो तर सगळेच फक्त पॉवर वापरत नाहीत. अ‍ॅबी किंवा स्मिथ बॉल च्या कुवतीपलीकडे जात क्रिज वर आडवे तिडवे फिरत एका बाजूचा बॉल दुसर्‍या बाजूला लिलया भिरकवतात हे गावस्कर च्या बॉल ला लाईन करत स्ट्रेट ड्राईव्ह एव्हढेच सुंदर नाही का ?

>>अ‍ॅबी किंवा स्मिथ बॉल च्या कुवतीपलीकडे जात क्रिज वर आडवे तिडवे फिरत एका बाजूचा बॉल दुसर्‍या बाजूला लिलया भिरकवतात हे गावस्कर च्या बॉल ला लाईन करत स्ट्रेट ड्राईव्ह एव्हढेच सुंदर नाही का ?<<
नाहि. यालाच (अ‍ॅबी/स्मिथ) "सर्कस" म्हणतात. खर्‍या टॅलंटेड बॅट्स्मनला क्रॉस खेळायची गरजंच पडत नाहि. त्याची तयार झालेली नजर, बॉल बोलरच्या हातातुन सुटतानाच बरोबर अंदाज बांधते, कुठला शॉट खेळायचा याचा. भले ऑफ साइडला टाइट फिल्डिंग लावलेली असेल, तरीहि गुडलेंग्थ, ऑफस्टंपवरच्या डिलिवरीवर त्याचा कवर ड्राइव बंदुकिच्या गोळीसारखा गॅप काढुन सीमापार होतो. ते खरं क्रिकेट. ऑन साइडला कमी फिल्डर्स म्हणुन क्रॉस बॅट खेळणं हे माझ्या मते तरी गल्ली क्रिकेट आहे...

राज, ते दव यॉर्कर विरुद्ध लेंथ बॉल या संदर्भाने म्हणालो म्हणालो की आम्हाला यॉर्कर टाकायला भिती वाटत होती कारण ओला बॉल हातातून सटकत होता हे एक्सक्यूज दिले जाते. जे ईथे तितके होत नाहीये खरे तर.

मोक्याच्या वेळी हलवे कॅच सोडतात आणि लाईटीकडे बघतात. पकडणारे बाऊण्डरीच्या आतबाहेर टणाटण उड्या मारत कॅच पकडत असतातच.

नो बॉल सुद्धा मोक्याच्या वेळी टाकतात. फ्रि हिट रुलने तर नुसते एक्स्ट्रा धावाच नाही तर हात मोकळे होत मोमेंटमही मिळते.

जो बॉल कुठेही मारायचा असतो तो फिल्डरच्या हातायच कॅच दिला जातो.
आणि ज्या बॉलवर सिक्सही मारणे शक्य असते तिथे चौकारच मारला जातो कारण जिंकायला एक बॉल पाच हवे असतात Happy . आणि म्हणूनच मला वाटते सुपरओवरचे दोन्ही संघांना पैसे मिळतात Happy

ऑन साइडला कमी फिल्डर्स म्हणुन क्रॉस बॅट खेळणं हे माझ्या मते तरी गल्ली क्रिकेट आहे... >> To each his own. फक्त "खर्‍या टॅलंटेड बॅट्स्मनला क्रॉस खेळायची गरजंच पडत नाहि" हे वाचून गम्मत वाटली. मनातल्या मनात किती लिजडस तू बाद केलेस ते मोजले. Happy

र्‍हू, तुला मागे एकदा स्वरुप ने (बहुधा) विचारलेला प्रश्न परत विचारतो, जर फिक्स्ड आहे असे वाटतेय तर प्रत्येक मॅच आटापीटा करून का बघतोस ? बघतोस ते बघतोस वरती इथे येऊन 'असे का बॉलिंग करतात' वगैरे प्रश्न का विचारतोस ? सगळे फिक्स्डच आहे हे वाटतेय तर आश्चर्य का वाटून घेतोअस नक्की ?

हैद्राबाद चे प्लेयिंग ११ निवडताना खरं तर पहिलं नाव विल्यमसन चं लिहायला हवं. काय खेळतो हा माणूस!! जबरदस्त!! कुठल्याही फॉर्मॅटमधलं क्रिकेट लिलया खेळतो.

उद्या राजस्थान वि. केकेआर! मजा येईल उद्या.

*त्या पेक्षा शॉर्ट बॉल वर त्याच्याकडून चूक होन्याची शक्यता अधिक आहे ह्या विचारानुसार (ऐकीव माहिती) आय पी एल बर्‍यापैकी डेटा ड्रिव्हन असते असे वाटते.* -
अहो, कसलं आलं आहे ' डेटा ड्रिव्हन ' वगैरे ! गोलंदाज, कोच इ. वेगवेगळे डांवपेंच अजमावतच असतात व त्यातला एखादा 'क्लिक ' होतो. माझ्यासारख्या अनाडी प्रेक्षकाची शाॅरट बाॅल बोलींगच्या टीकेवरची ही 28 सप्टेंबरची पोस्ट काय ' डेटा ड्रिव्हन ' थोडीच होती ? -

"मला वाटतं गोलंदाजी खराब होती यापेक्षा मैदान छोटं होतं व त्यामुळे षटकार मारतांना फलंदाज कचरत नव्हते. कदाचित, या मोहात पाडून फलंदाजांना चूक करायला भाग पाडावं, हाही गेलंदाजीच्या डांवपेंचांच भाग असेल. ( स्मिथ षटकार मारण्याच्या नादात सीमारेषेवर झेलबाद झालाच.) "
माझा थोडाफार अनुभव मला सतत हेंच सांगतो, आंकडेवारीनुसार क्रिकेट घडत नाहीं तर मैदानावर घडतं त्याने आंकडेवारी तयार होते !!! ढोबळमानाने अंदाज घेण्यापलिकडे आंकडेवारीला महत्व देणं म्हणजे क्रिकेटमधला रोमांचच वजा करण्यासारखं आहे !!

आय पी एल बर्‍यापैकी डेटा ड्रिव्हन असते असे वाटते. >> अर्थातच. फक्त आयपीएल नाही तर सर्वच बाबतीत डेटा अ‍ॅनॅलिसिस आणि त्याबरहुकूम कोचिंग आणि खेळाचा प्लॅन हा नवयुगाचा अविभाज्य भाग आहे. ऑस्ट्रेलियाचा जॉन बुकानन हा एक सर्वात यशस्वी कोच क्रिकेट मधे डेटा बेसड कोचिंग व प्लॅन करणारा पहिला कोच होता. पूर्वीही हे होत नाही अस नाही. पण त्याच शास्त्र बुकाननने बनवल. आता तर डेटा अ‍ॅनॅलिस्ट प्र्यत्येक यशस्वी टीमचा अविभाज्य भाग असतो.

नवदीप सैनी जबरदस्त. पडिक्कलही खूप सहज आणि सुरेख खेळतो. काल त्याने एक बॅकफूट वर पंच आणि एक फ्रंट फूट ड्राइव लागोपाठच्या बॉलला मारलेले फटके अप्रतीम होते. या आयपीएलची भारतीय संघाला देवदत्त भेट आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

*पडिक्कलही खूप सहज आणि सुरेख खेळतो.* +1 ! त्याला टेंपरॅमेंटही खूपच चांगलं असावं असं जाणवतं. शुभेच्छा!
*डेटा अ‍ॅनॅलिसिस आणि त्याबरहुकूम कोचिंग आणि खेळाचा प्लॅन हा नवयुगाचा अविभाज्य भाग आहे.* याबद्दल शंकाच नाहीं. फक्त, क्रिकेटमधे spontaneity व instnctivenessला अधिकाधिक इतकं दुय्यम समजलः जाणं हितावह आहे का, इथं दुमत होवूं शकतं. तेवाटीया , किशन यांच्या आत्तांच्या डेटा ॲनलॅसिसला छेद देणार्या खेळीच
क्रिकेटचा गाभा आहे, हें आपलं माझं वैयक्तीक मत.

भाई आपल्याला नेहमी वाटत आलेले आहे की काही निर्णय कसे स्पॉण्टानियस आणि इन्स्टिङ्टीव होते. पण त्यामागे सुद्धा अभ्यास असतो तो नेहमीच दिसतो असे नाही. पण ते स्पॉण्टानियस आणि इन्स्टिङ्टीव भासवणे हा एक ड्रामा (चांगल्या अर्थाने) असू शकतो. Happy

करुण पंड्याला (मला तो गोलंदाजी करताना त्याची करुणा येते म्हणून) का घेत असावेत अंतीम ११ मध्ये?

क्रिकेटच नव्हे तर डाटा ॲनालिसिस आणि डाटा ड्रिव्हन डिसिजन हा एकूणच जगण्याचा अविभाज्य भाग झालाय.
आधीपासूनही तो होता फक्त वेगळ्या स्वरुपात.... तो डाटा लोक आपल्या मेंदूत साठवायचे आणि योग्य वेळी वापरायचे आणि त्याला आपण अनुभव म्हणायचो Wink

आता खुपच इझीली उपलब्ध होणाऱ्या या डेटाला कायम चकवत ठेवणे.... नवेनवे डेटा पॅटर्न निर्माण करत राहणे हे यशस्वी होण्याचे गमक झालेय.

Pages