आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राहूल आयपीएल मधे जसा फ्रीली खेळतो तसा नेहमी खेलला तर आपला चौथ्या नंबरचा प्रश्न तरी नेहमीसाठी सुटेल.
>>> राहुल आयपीएलमधे ओपन करतो, कितीहि चांगला फॉर्म असला तरी ओपनिंग परफॉर्मन्सवर मिड्ल ऑर्डर स्लॉट साठी सिलेक्ट करता कामा नये. तसंच टी-२० परफॉर्मन्स वर वन-डे सिलेक्शन अवलंबून नको.
जर राहुलला कीपर केल्यानी अजून एक फलंदाज खेळवता येतो हेच कारण असेल, तर मग राहुलनी त्याच्या कोअर स्किल वर बॅटिंग ऑर्डरमधे फिट होणं गरजेचं आहे. त्याला ४ / ५ नंबरला पाठवून सिचुएशन प्रमाणे इनिंग्ज बिल्ड करायची / फिनिश करायची जवाबदारी देणं आणि शिवाय कीपिंगही करवणं हे त्याच्यासाठी अन्यायकारक असेल.
श्रेयस नी चौथ्या नंबर वर चांगला परफॉर्मन्स दिलाय, त्यामुळे सध्यातरी तो स्लॉट त्याच्याकडेच राहुदे.
राहुल ला तिसरा ओपनर म्हणूनच असूदे. (आणि राहणेनी पुजाराप्रमाणे आता फक्त टेस्टवर फोकस करावं)

शुभमन गिल काय मस्त खेळतो!! बॉल मेरीटवर खेळत इनिंग बिल्ड करणारा बॅट्समन बघायला खूप छान वाटतं.

येस!! त्याने एक कव्हर ड्राईव्ह मारला, जो अडवला गेला, पुढचा बॉल त्यानं कट केला, जो पॉईंटला अडवला गेला. त्याच्या पुढच्या बॉलवर, काहीही वेडेपणा न करता त्याने बॉल मिडविकेटकडे पुश करत सिंगल घेतली. आहाहा!!

आजचं टारगेट सोपे होते
शुभमन गिलला त्याचा सहजसुंदर खेळ करायचा स्कोप होता
मोठं टारगेट चेस करताना कसा गेअर बदलतो ते बघणे रोचक
कदाचित हा फॉर्मेट त्याला मोस्ट सूटेबल नाही. पण प्लेअर मस्त आहे. अंडर उन्नीसपासून आवडता. पृथ्वी शॉ त्याही आधीपासूनचा. दोघे फ्यूचर आहेत. त्यांचा रायडू वा संजू सॅमसन होऊ नये. त्या दोघांबद्दलही असेच वाटायचे.. फ्युचर आहेत. पण काहीतरी स्पेशल दाखवल्याशिवाय या भारतीय संघात कोणा फलंदाजाला जागा मिळवणे सोपे नाही. तरी पृथ्वी शॉ बाबत असे होणार नाही वाटते. त्याच्यात ऋषभ पंतसारखाच आपला असा एक एक्स फॅक्टर आहे.

प्रत्येक संघाचे एक दोनच सामने झालेत
त्यावरून पहिला अंदाज असा

मुंबई दिल्ली पंजाब राजस्थान हे प्लेऑफला जातील

बेंगलोर, हैदराबाद, कलकत्तासह यंदा चेन्नईचीही गाडी थोडक्यात सुटेल

अरे पण तो व्यापारी आहे. पृथ्वी, श्रेयसला मुंबई इंडियन्स मधे घेउन तो शेवटि आरोआय बघणार कि मुंबई अस्मिता? तेच घडलं, थोड्याफार प्रमाणात कोटा सिस्टम मधे. >> राज उगाच वादासाठी वाद घालतोयस का ? हे वाक्य तुला कोटा नि ऑक्शन मधे जो जमिन आस्मानाचा फरक आहे हे सांगण्यासाठी लिहिले होते हे उघड आहे. कोटामधे आरोआय पेक्षाही फेवरिज्म होता. ह्याउप्परही कोटा नि ऑक्शन एकच आहेत असे तुला वाटत असेल तर असो बापडे माझे काही म्हणणे नाही पुढे ह्यावर.

शुभमन गिल काय मस्त खेळतो!! >> एकदमच. त्याला ओडिआय मधे कायम्स्वरुपी ओपनर म्हणून आणून ठेवायला पाहिजे. शॉ वर अन्याय होतो हे माहित आहे पण कोहली सारखी इनिंग बिल्ड करू शकण्याची कॅपॅसिटी वाटते त्याची शॉ पेक्षा अधिक. रोहित स्वतःहून निघत नाही तोवर माझ्यासाठी ते पहिले सर्कल आहे ओडिआय मधे .

राहूल व मयांक (शतक) सलामीला येवून अप्रतिम खेळले , 10-11 धावांची सरासरी कायम ठेवून. 224चं लक्ष्य आरआरसाठी कठीणच वाटतंय (बटलर लवकर बाद झालाय !)

व्हाट अ मॅच !!! तेवाटीया एक स्वप्नवत , अविस्मरणीय इनींग खेळला आज !!! आरआर 224-6 ( 19.2 षटकं) विजयी !!!! अर्थात, सॅमसनचा बहुमोल सहभाग !

आजही शेवटी शमी असो वा कॉट्रेल, सगळे बॉल शॉर्ट वाईड लेंथ बॉल लेग साईड आपटून असे का टाकत होते?
सरळ सरळ दिसून येते हे घ्या मारा मजा करा.... पण अश्याने आपली मजा जाते मॅच बघायची

तेवटियाच्या ऐवजी आर्चरला पाठवायला पाहिजे होते अशी आमची चर्चा चाललीच होती तेव्हढ्यात तेवटियाने एका ओव्हरमध्ये मॅच फिरवली Happy

जबरी मॅच !! जो येईल तो सिक्स मारत होता. Happy

आजही शेवटी शमी असो वा कॉट्रेल, सगळे बॉल शॉर्ट वाईड लेंथ बॉल लेग साईड आपटून असे का टाकत होते? >>> अगदी ! माझ्याही डोक्यात हेच आलं!

रच्याकने, मॅच नंतर जी ढीगभर बक्षिसे देतात ती सगळी बॅटिंग स्पेसिफिक का आहेत ?

दुसऱ्या रच्याकने, कोण म्हणत होतं ते की स्टिव्ह स्मिथ फारसा फॉर्ममध्ये नाहीये म्हणून ?? Wink

मीच तो Wink

तो फॉर्ममध्ये आहे हे पहील्या मॅचच्या पहील्या दोन चार ओव्हर्समध्येच जाणवले...... दोन्ही मॅचेस मस्तच खेळलाय स्मिथ!
त्याच पोस्टमधल्या सॅमसनबद्दलच्या विधानाला पण आत्ताच undo करावे का Wink

आज त्या राजपूत ने ऑफ साइड वाइड्/ऑल्मोस्ट वाइड टाकायचा प्लॉय चांगला वापरला शेवटच्या ओव्हर्स मधे. त्यामुळे पंजाब चे रन्स बरेच रोखले गेले. अंपायर जरा लॅक्स वाटला तो. एका लिमिट पुढे जर बॅट्समन बॉल खेळायला ऑफ कडे सरकत असेल तरीही तो बॉल वाइडच द्यायला हवा. एक दोन बॉल्स तर वाइड क्रीज लाइनच्याही पलीकडे होते. पण ते वाइड न दिल्याचा त्याचा फायदा त्या बोलरने चांगला घेतला.

कोण म्हणत होतं ते की स्टिव्ह स्मिथ फारसा फॉर्ममध्ये नाहीये म्हणून ?? >> LOL

आजही शेवटी शमी असो वा कॉट्रेल, सगळे बॉल शॉर्ट वाईड लेंथ बॉल लेग साईड आपटून असे का टाकत होते? >>ड्यू मुळे होत असू शकेल. कॉर्टेल एव्हढा विचित्र नाही टाकत एरवी. तेवाटियाचा ऑफ स्टंपबाहेर जाऊन मारलेला चौथा सिक्स खल्लास होता. बॉल कुठे असेल हे सॉलीड रीद केला राव. हॅट्स ऑफ.

आज मयंक, संजू, स्मिथ आणी दोन्ही राहूल ‘वरचा क्लास‘ खेळले. पाटा विकेट आणी इटुकलं ग्राऊंड जरी असलं तरी शॉट्स चा दर्जा, इनिंग बिल्ड करण्याची आणी प्रेशर हँडल करण्याची क्षमता हे फारच जबरदस्त होते. तिवातिया परत असं खेळू शकेल की नाही ते माहीत नाही, पण आजची त्याची इनिंग fairytale होती.

>>माझे काही म्हणणे नाही पुढे ह्यावर.<<
फेअर इनफ. माझा पॉइंट कोटा आणि ऑक्शन्स, दोन्हित एखाद्या खेळाडुवर अन्याय होउ शकतो, हा आहे. असो.

>>पण अश्याने आपली मजा जाते मॅच बघायची<< +१
अरे, हे गल्ली क्रिकेट बघतोय असं वाटत होतं. बॅट्स्मनचं ठिक आहे पण बोलर्स इतकं धोपटुन घेत होते, तेहि मॅच हातात असताना? लॅमंटेबल...

कालची मॅच बघून समजलं आयपीएल फिक्स असते. शमी आणि कोरटेल यांना सांगितलं असावं मुद्दाम तशी बॉलिंग करा म्हणजे सामना शेवटच्या ओव्हरला जाईल. सगळे हैराण होते त्यांची बॉलिंग बघून.

*तेवाटियाचा ऑफ स्टंपबाहेर जाऊन मारलेला चौथा सिक्स खल्लास * - +1. anticipation ग्रेटच होतं. मला वाटतं गोलंदाजी खराब होती यापेक्षा मैदान छोटं होतं व त्यामुळे षटकार मारतांना फलंदाज कचरत नव्हते. कदाचित, या मोहात पाडून फलंदाजांना चूक करायला भाग पाडावं, हाही गेलंदाजीच्या डांवपेंचांच भाग असेल. ( स्मिथ षटकार मारण्याच्या नादात सीमारेषेवर झेलबाद झालाच.)
स्मिथने सुरवातीपासूनच 10-11 धांवांची सरासरी ठेवण्याची फलंदाजांना सूचना दिली असावी. संजू बाद झाल्यावर घसरलेली ही सरासरी तेवाटीयाच्या अनपेक्षित झंझावाताने भरून निघाली.
222चं लक्ष्य घेवून फलंदाजीला उतरतानाही स्मिथची body language खूपच सकारात्मक व प्रेरणादायक होती, हेंही महत्वाचं!

कालच्या सामच्या वेळी संजू सॅम्सन बाद झाल्यावर टीव्ही बंद करायचा विचार केला. आधीच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन संपूर्ण षटक तेवातिया खेळनार म्हणून पण तेवढे एक षटक पहायचे ठरविले आणि ५ षटकार मारून त्यानेच सामना फिरवला!!

तेवाटिया झीरोचा हिरो झाला काल आठ बॉल मधे. हरण्याची शक्यता ९९ % पर्यंत झाली असताना आणि कुणाच्या ध्यानी मनी नसताना राजस्थानने मॅच जिंकली. (याला पॅरलल म्हणजे आपण ऑस्ट्रेलिया विरूद्ध जिंकलेली टेस्ट मॅच. )
मजा आली. आधी तेवाटिया हुकत होता तेंव्हा वाटले चुकला डिसिजन. पण कॉमेंटेटर म्हणत होता की ज्याअर्थी त्याला पाठवलय त्याअर्थी कुणीतरी काहितरी पाहिल असणार त्याच्यात. एकदम खरे निघाले. Happy

मजा आली. आधी तेवाटिया हुकत होता तेंव्हा वाटले चुकला डिसिजन. पण कॉमेंटेटर म्हणत होता की ज्याअर्थी त्याला पाठवलय त्याअर्थी कुणीतरी काहितरी पाहिल असणार त्याच्यात. एकदम खरे निघाले. >>
संजू सॅमसन च्या म्हणण्याप्रमाणे रॉयल्स्च्या कँपमधे सिक्स मारायच्या स्पर्धेत तेवाटिया सुटला होता. तेंव्हा अशा त्यावर स्पेशल मेहनत घेतली गेली. बाहेरून आत येणारे चेंडू लेग वर मारणे ह्या त्याच्या खासियते ला अजून टोन केले गेले. गम्मत म्हणजे त्याला काल स्पिनर्स ना मारण्यासाठी पाठवले होते नि मॅक्सी ने त्याला जखडून ठेवले होते. कॉर्डेल नेमका लेफ्टी सीमर ज्याला बॉल आपटायला आवडते नि त्यांचा अँगल तेवाटियासाठी परफेक्ट ठरला. तेवाटियाचे कौतुक ह्यासाठी कि त्याने पहिले १५ बॉल मधे जे झाले ते नजरेआ ड केले नि स्वतःला बॅक केले. क्रेझी इनिंग !

मला वाटतं गोलंदाजी खराब होती यापेक्षा मैदान छोटं होतं व त्यामुळे षटकार मारतांना फलंदाज कचरत नव्हते. >> हो उत्थपा बघा ना. थोडा कचरला नि कॅच गेला. छोट्या मैदानावर बिनधास्त पणे खेळणे मह्त्वाचे ठरले. स्मिथ सुद्धा एरवी एव्हढा उचलून खेळत नाही.

कालच्या सामच्या वेळी संजू सॅम्सन बाद झाल्यावर टीव्ही बंद करायचा विचार केला. >>> सेम हिअर कृष्णा. अजून थोडे पाहू म्हणून थांबलो आणि बरे झाले Happy

* आज कोणी कोणी टिव्ही बंद केला आहे ?* - पडक्कल बद्दल कुतूहल होतं व त्यापुरताच टिव्ही आज लावला. हेतू साध्य झाला. Wink

Pages