आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आज श्रेयसचा प्रत्येक फटका चाबूक होता. !
पृथ्वी छान खेळला. आज थ्रो लागल्याने पुन्हा दुखापतग्रस्त होतो कीं काय अशी भिती वाटली.
दिल्लीने 226 झळकावलेच !

५ ओवर ९२
सहा विकेट गेलेल्या
३ ओवर ६१ मारले
२ ओवर ३१ हवेत
रोचक

आपल्याला सामन्याचा आनंद घेता यावा म्हणून भर दुपारी दुबईत जीवघेण्या उन्हात जीवाची पर्वा न करता खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना मानाचा मुजरा.

मुंबई पुन्हा 200+ स्कोअर ! एसॢआरएच 9.5ची सरासरी ठेवून लक्ष्य गांठणयाचया प्रयत्नात 106-2 ( 10.4 षटकं). वाॅरनर जिंकण्याच्या जिद्दीने खेळतोय !

मुंबई चा प्रोफेशनल पर्फॉर्मन्स!! वॉर्नर अगदीच एकांगी लढला.

आता पंजाब वि. सीएसके! पंजाबने आज केलेल्या टीमबदलातला सगळ्यात सुखावह बदल म्हणजे करूण नायर बाहेर.

आज मुंबईचं क्षेत्ररक्षण खूपच वरच्या दर्जाचं, किशन आऊटस्टॅडींग ! बुमराहसारखा गोलंदाज शेवटच्या षटकांसाठी हाताशी असणं, यासारखं कर्णधाराला आश्वासक काय असूं शकतं ! मुंबई गुणवत्तेवरच आज सरस ठरली !

चेन्नईचे दोन सिनिअर सिटीजनच आज पुरून ऊरले
१० विकेट आणि १४ चेंडू राखत १८० धावा चेस Happy

आता बघा कसे हे झपझप वर जातील
धोनीची टीम आहे. मग फॉर्मेट कुठलाही असो. स्पर्धा कुठल्याही स्तरावरची असो... कॅप्टन कूलच्या चॅम्पियन टीमला साजेसा विजय Happy

काल मुंबईचा सफाईदार विजय होता. फक्त रोहीतवर टीम अवलंबून नाही.

चेन्नाईचे जेष्ठ नागरीक चांगले खेळले. दमवणार्‍या सामन्यानंतर एकाच दिवसाच्या विश्रांतीनंतर हे विषेश. नेहमी शांत दिसणारा फ्लेमिंग काल फ्लेमिंग (पेटलेला) होता. Happy

काल मला वाटलं चेन्नई हारेल. वॉटसन पहिल्या दुसऱ्या ओव्हरला आऊट होईल, नन्तर रायडू वीस पंचवीस रन्स काढून आऊट होईल, नन्तर धोनी टेस्ट खेळून मॅच फुगवेल आणि शेवटी धापा टाकत रन्स काढेल अशी स्वप्न मी रंगवत होतो. नन्तर रात्री कधीतरी जड दुःखद अंतःकरणाने झोपी गेलो.

दिल्ली खूपच स्ट्रॉंग टीम वाटते. Crickbuzz वर DC पाहिलं की मला थोड्या वेळासाठी वाटतं डेक्कन चार्जर्स आणि मी काही वेळासाठी 2007-08 च्या काळात जाऊन येतो.

आज मनिष पांडेने अफलातून झेल घेतला. >> आधीच्या दोन मिस फिल्ड्स चे फस्ट्रेशन काढले त्याने असे वाटले. कसला जबरदस्त फिल्डर आहे. काल रेअर चूका दिसल्या.

आजी कॅप्टन वि. भावी कॅप्टन >> नाही वाटत तसे होईल असे. त्या आधी शॉ होईल. अय्यर मुंबईचा पण नाहीये ना कॅप्टन.

पृथ्वी शॉ बाद झाल्यावर कोहलीची प्रतिक्रिया आणि कोहली बाद झाल्यावर श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया यांनी दोघांमधील फरक दाखविला.
कोहलीची अस्वस्थ वाटली..

*कोहली कॅप्टन्सी करताना फार डेस्परेट वाटतो.... कायम स्वताला प्रूव्ह करायला धडपडतोय असे वाटते!* +1. कांहीं ऑसी खेळाडूनी याचंच कौतुक केलं व कोहलीला आतां तें ईमेज सोडवत नसावं ! Wink

जाऊ द्या हो, त्यांचा मालक एकतर त्यांना टाकून पळालाय. त्यात तुम्ही त्यांचं मनोधैर्य अजून कमी करू नका. एखादा rcb चा खेळाडू असला मायबोलीवर विनाकारण खचून जायचा.

Rcb ची लायकी नाहीय... लक आहे..
>>>>
हेच बोलायला आलेलो. आणि त्यांनी आपली लायकी आज दाखवली.
अवांतर - लायकी हा शब्द वापरला की उगाच एखाद्याला हिणवतोय असे वाटते. बाकी कोहली एबीडी या खेळाडूंची लायकी आयपीएलपलीकडची आहे. कोहली तर गोट आहे.

फायनल दोन सामने दिल्ली मुंबई चेन्नई या तीन संघांचे आपसात बघायला आवडतील.
फायनल दिल्ली विरुद्ध या दोघांपैकी एक
आणि दिल्ली जिंकली तर जास्त आनंद जे मी पहिल्याच पानावर माझी फेव्हरेट टीम घोषित केलीय. माझा दिल्लीच्या कौतुकाचा धागाही तयार आहे....

*फायनल दिल्ली विरुद्ध या दोघांपैकी एक* +1 . यंदाच्या आतां पर्यंतच्या कामगिरीवरून तरी दिल्ली गुणवत्तेनुसार फायनलमधे येणं निश्चित वाटतंय. संघ म्हणून छानच वाटतेय दिल्ली!

दिल्ली आणि आर आर संघांचे सरासरी वय इतर संघांपेक्षा बरेच कमी असावे!
दाक्षिणात्य दोन्ही संघ वयस्कर असावे इतरांच्या मानाने. ( ह्या आयपीएल मुळे अनुभवापेक्षा गुणवत्ता आणि कमी वय हे जास्त प्रभावी वाटत आहेत!)

*ह्या आयपीएल मुळे अनुभवापेक्षा गुणवत्ता आणि कमी वय हे जास्त प्रभावी वाटत आहेत!)* -
अनेक तरूण, प्रतिभावान खेळाडूंमधे (विशेषत: फलंदाजामधे ) राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी असलेली तीव्र स्पर्धा व त्यामुळे निर्माण झालेली ईरषा, हेही त्यामागचं कारण असावं.

आयपीएल बद्दल मला वाटते ५०% पूर्ण झाल्याशिवाय कोण पहिल्या चारात असेल ह्याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

>>आयपीएल बद्दल मला वाटते ५०% पूर्ण झाल्याशिवाय कोण पहिल्या चारात असेल ह्याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

पहील्या चारात कोण नसेल याचा अंदाज बांधूया.... आतापर्यंतच्या खेळावरुन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफला नसतील असे वाटतेय!

Pages