आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

टीमबद्दल आपण बोलतोच आहोत... कॅप्टन्सबद्द्ल काय वाटतय मंडळी?
स्मिथ, वॉर्नर कॅप्टन म्हणून यशस्वी आहेत असे मला वाटते.
धोनीच्या कॅप्टन्सीबद्दल अजुन काय बोलावे.... कॅप्टन म्हणून तो उच्च आहेच!
रोहीत मला का कुणास ठाऊक पण एक आळशी खेळाडू आणि कॅप्टन वाटत आलाय.... तो आणि त्याचा खेळ आवडतो पण त्याच्याकडे अजुन खुप जास्त कपॅसिटी आहे असे कायमच वाटत आलेय! कॅप्टन म्हणून मला तो एकदम कूल वाटतो.
कोहली आणि दिनेश कार्तिक हे कॅप्टन्सी मटेऱिअल वाले लोक आहेत असे मला खरच वाटत नाही.
राहुल ओके वाटला पण सगळ्यात जास्त आवडला तो श्रेयस अय्यर! त्याच्यात भारतीय संघाचा कॅप्टन बनण्याची गुणवत्ता नक्कीच दिसतेय!

तुम्हाला काय वाटते?

कार्थिक खूप अस्वस्थ / तापट / टेंपरामेंटल वाटतो / आहे (त्याच्याच इंटरव्ह्यूज वरून). त्यामुळे त्याच्या कॅप्टन्सीबद्दल साशंक आहे मी. बाकी रोहित कॅप्टन म्हणून परिपक्व वाटतो. त्याच्या लेडबॅक चेहर्यामागे एक स्ट्रॅटेजिक कॅप्टन आहे असं वाटतं. स्मिथ जबरदस्त आहे. वॉर्नर ऐवजी मी विल्यमसन ला प्राधान्य दिलं असतं. अय्यर कडे चांगलं पोटेन्शियल आहे. राहूल थोडासा कोहली च्या पठडीत - लिडींग फ्रॉम द फ्रंट - वाटतो. अजून त्याच्या स्ट्रॅटेजिक अँगल विषयी कळायचंय. धोनी - प्रूव्हन कँपेनर आहे.

नविन चेहेर्यांपैकी पडिक्कल, जैस्वाल, कार्तिक त्यागी, नागरकोटी, ऋतूराज गायकवाड, प्रियम गर्ग, रियान पराग, शिवम मावी, रवी बिष्नोई, अभिषेक शर्मा, प्रसिध कृष्णा, इशान पोरेल कडून चमकदार कामगिरी बघायला मिळाली तर आवडेल. ह्यापैकी काही जणांनी रणजी, सैद मुश्ताक अली, अंडर-१९ मधे चांगली कामगिरी केलीये. त्यामुळे अपेक्षा जास्त आहेत.

शर्मा मला आवडतो कप्तान म्हणून. कूल आहोत असा आव न आणता निराशा व्यक्त करतो पण खांदे नाही पाडत. उगाच अतिआक्रमकता दाखवायला आक्रस्ताळेपणा करत नाही. स्ट्रॅटेजी सुद्धा चांगल्या असतात. सापळा रचून विकेट घेताना दिसतो बरेचदा. बॉलिंग चेंजेसबाबत अतिप्रयोग करत नाही. टीम कॉम्बिनेशन प्रयोग करायचे झाल्यास स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पण त्यामागे तो एकटा नसावा. बाकी कॅप्टन लिडींग फ्रॉम द फ्रंट आहेच. पण स्वताच्या अपयशाचा कधी कप्तानीवर परीणाम होऊ देत नाही. मी चार मॅच फेल झालो तरी पाचव्यात शतक मारून एकहाती जिंकवून देईन हा अफाट आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. ईंटरनॅशनललाही मला कोहली ऐवजी तोच कप्तान बघायला आवडेल. पण ईगो प्रॉब्लेम आड येत संघात दुफळी माजायला नको.

बाकी रोहित कॅप्टन म्हणून परिपक्व वाटतो. त्याच्या लेडबॅक चेहर्यामागे एक स्ट्रॅटेजिक कॅप्टन आहे असं वाटतं. >> तो भयंकर डेटा ड्रिव्हन आहे असे त्यानेच सांगितलेय Happy तो शांत असतो नि त्याच्या प्लेञर्स ना बॅक करतो हा त्याचा सर्वात मह्त्वाचा गुण. थोरला पांद्या नि यादव ही दोन उदाहरणे. स्पिनर्स अतिशय चांगला वापरतो. कोहली ला शेवटचा भाग शिकण्यासारखा आहे.

धोनी - प्रूव्हन कँपेनर आहे. >>धोनी इंस्टींक्टीव्ह आहे.

वॉर्नर ऐवजी मी विल्यमसन ला प्राधान्य दिलं असतं >> +१

पेडीकल मला दुधी खेकडा वाटतो. उसनी ताकद घेऊन शॉट मारल्यासारखे स्ट्रोक आहेत. स्टार चांगले आहेत म्हणून चाललंय त्याच. पुढच्या सिझनला एव्हडा नाही चमकणार

करुण पंड्याला (मला तो गोलंदाजी करताना त्याची करुणा येते म्हणून) का घेत असावेत अंतीम ११ मध्ये
>> अंबानी कृपा...

पण सगळ्यात जास्त आवडला तो श्रेयस अय्यर! त्याच्यात भारतीय संघाचा कॅप्टन बनण्याची गुणवत्ता नक्कीच दिसतेय!
>> कोहलीला बदलायची वेळ जेंव्हा येईल (येत्या १-२ वर्षात) त्यावेळी उगाच रोहित शर्माच्या वाट्याला न जाता अय्यरला कॅप्टन बनवायला पाहिजे.
जसं पाँटिंगला स्टीव्ह वॉ नंतर बनवलं होतं / क्लार्कला पाँटिंग नंतर बनवलं
फक्त अय्यर अजूनतरी टेस्टमधे अनटेस्टेड आहे. पांढर्‍या कपड्यात नवे (नेक्स्ट जेन) ओपनर्स (शॉ, मयंक) तयार आहेत, नवे स्पिनर्स (कुलचा) तयार आहेत पण नवे मिड्ल ऑर्डर बॅट्समन आणि पेसर्स (बुमरा सोडून) अजूनतरी कुणी सापडले नाहियेत. विकेट कीपरचे तर आत्ताच वांधे आहेत. (साहाला बळंच बाहेर ठेवताय्त आणि पंतला एक्सपोज करायची घाई करतायत)

शास्त्रीबुवा लवकर ७० पार करूदेत म्हणजे भारतीय क्रिकेट सुटेल वेढ्यातून.

आज बटलर कसा बाद झाला ते पाहिले का ? पाकिस्तान च्या मॅचेस मधे त्याला अशीच शॉर्ट थर्ड मॅन लावली होती. तिथे तो बाद झाला नाही पण आज झाला. डेटा ड्रिव्हन असेल का ?

सॅमसन चे परत सुरू झाले का ? Sad

आजचा दिवस अजून तरी बॉलर्सनी गाजवलाय. आर्चर, कमिन्स आणी मावी! तिघांनी अप्रतिम बॉलिंग केलीये. आता नागरकोटी काय करतोय ह्याची उत्सुकता आहे. ..... असं लिहेपर्यंत पहिल्याच बॉल ला विकेट काढली त्यानेपण. (अर्थात does Uthappa's wicket really count? he looks so out of his prime). राजस्थान ची अवस्था बिकट आहे. स्मिथ आणी संजूनी अगदीच टाकल्या आज विकेट्स. बटलर अजून त्याच्या एलेमेंट मधे आल्यासारखा नाही वाटत. रियान पराग ला मोठी इनिंगे खेळायची संधी आहे.

नागरकोटी च्या दोन झाल्या रे. त्याचे १४० च्या वरचे बॉल्स १४० च्या वर आहेत असे वआटत नाहीत. आर्चरचे सपकन येतात असे वाटते तसे. फसवा आहे. Uthappa च्या जागी जैस्वाल असेल पुढच्या मॅच मधे. Uthappa अगदीच ऑट ऑफ फॉर्म वाटतो.

येस, अय्यर प्रॉमिसिंग आहे ! रोहित शर्मा उत्तम कॅप्टन आहे. त्याला वन डे मध्ये तरी फुल टाईम कॅप्टन करायला हवं.
राहूल मला तरी अजून फार भरवश्याचा वाटत नाही ना कॅप्टन म्हणून ना बॅट्समन म्हणून. आत्ता शेवटच्या काही सिरीजच्या आधी तर तो केवळ दाढी आणि सिक्स प्यॅक ह्या क्रायटेरीयात बसल्याने टीममध्ये आहे की काय असं वाटायचं. Proud

करुण पंड्याला (मला तो गोलंदाजी करताना त्याची करुणा येते म्हणून) का घेत असावेत अंतीम ११ मध्ये?

Submitted by कृष्णा on 29 September, 2020 - 22:53

>> त्याने अ‍ॅप्प्लिकेशन मध्ये के पंड्या असे लिहिलेले आडनाव पाहुन घेत असावेत.
पण आई वडिल करुण, पार्थिव अशी नावे मुलांची का ठेवतात?

ते कृणाल आहे, करूण नाही.
>> मला वाटले की करुण पंड्या पण आहे की काय कोणत्या दुसर्या टीम मध्ये!

पार्थिव म्हणजे Earthen किंवा royal.
>> हो पण बोलायला कसे वाटते. आपण प्राण गेलेल्या शरिराला म्हणतो ना!

हो पण बोलायला कसे वाटते. आपण प्राण गेलेल्या शरिराला म्हणतो ना! >> तो गुजराथी आहे. ते मृतदेहाला पार्थिव नसतील म्हणत.

हो पण बोलायला कसे वाटते. आपण प्राण गेलेल्या शरिराला म्हणतो ना! >> तो गुजराथी आहे. ते मृतदेहाला पार्थिव नसतील म्हणत.
>>
हिन्दीत वापरतात आणि गुजरातित पण वापरतात मराठी इतका नाही.

*...आर्चरचे सपकन येतात असे वाटते ... * -
टी20 मधे फलंदाज कशीही आडवी- तिडवी फटकेबाजी करतात म्हणून त्याला शह द्यायला गोलंदाजही गोलंदाजीत सर्व प्रकारचे प्रयोग सतत करताना दिसतात. आर्चरसारखे अपवादात्मक गोलंदाज मात्र शिस्तबद्ध, नाॅर्मल गोलंदाजी सातत्याने केल्याने टी20मधेही ती परिणामकारक. प्रभावी व घातकही ठरते हें दाखवून देतात. आर्चरला सलाम!

शेवटच्या पाच ओव्हर्स मधे शंभर+ काढले. काहीच्या काहीच

ऋ, आजच्या रेडीफ वर बुकीज बद्दल लिंक आहे ते बघ. तुझ्या क्रिकेट प्रेमासाठी उपयोगी आहे.

६ ओवरला १०४ आले
लास्ट ओवर पांड्या आणि पोलार्डसमोर स्पिनरला दिली. चार सिक्स आले Happy

लास्ट ओवर स्पॉट फिक्सिण्ग ? Happy

*लास्ट ओवर पांड्या आणि पोलार्डसमोर स्पिनरला दिली. चार सिक्स आले* - लास्ट ओव्हर स्पीनरला दिली पण पेसर शीनॅमच्या 16 व18 व्या षटकांतही एकूण 40+ धांवा झाल्याच होत्या कीं !

*शेवटच्या पाच ओव्हर्स मधे शंभर+ काढले. काहीच्या काही* -
अरे, हें टेस्ट क्रिकेट आहे, आयपीएल नाहीं.शेवटचेच चार पांच दिवस अभ्यास करून पेपरात ठोकाठोकी केलीस, तर इथं फाॅलो-ऑन मिळतो त्याच वर्गात !!
20181230_225041_0.jpg

@ असामी, जेव्हा मला गौडबंगाल वाटते तेव्हा मी त्या सामन्याला वा त्यात झालेल्या अचाट खेळींना सिरीअसली घेत नाही. पण त्याच्यासह मी आयपीएल एकूण एक बॉल बघतो आणि मस्त एंजॉय करतो. जेव्हा गौडबंगाल असते तेव्हा मी सामना बघता बघताच भविष्यवाणी करायला सुरुवात करतो. व्हॉटसपग्रूपवर त्या टाकतो आणि त्या खरे होतानाचा आनंद घेतो.
दोनेक महिनाभर आयपीएल चालते. आवडीचे प्लेअर असतात. त्यांचे खेळ एंजॉय करायचे. आणि त्यापेक्षा आवडीचे म्हणजे व्हॉटसपग्रूपवर बॉल बाय बॉल चर्चा करायची हा माझा या काळातील कार्यक्रम. त्यामुळे भले विश्वासार्हता का कमी असेना आई लव्ह आईपीएल ॲण्ड आई एंजॉय आईपीएल Happy

याच्यासह मी आयपीएल एकूण एक बॉल बघतो आणि मस्त एंजॉय करतो. >> एंजॉय करतोस ना ? मग आम्हाला पण करू दे ना, दर मॅच नंतर तेच तेच पोस्ट टाकण्यात कसला विकृत आनंद रे ? स्किप केल तरी नजर जातेच ना. एकदा बोललास आय पी एल फिक्स , झाले ना आता.

एकदा बोललास आय पी एल फिक्स , झाले ना आता.
>>>>
सरसकट सारे फिक्स नसते ओ
आणि सरसकट सारेच फिक्सर नसतात
काही फिक्सर लोकांमूळे गुणवान लोकांवर अन्याय होतो याचे मला बाईट वाटते. त्यामुळे जिथे शक्य तिथे भांडेफोड करतो अश्यांची. पण सरसकट सर्वांना बोल नाही लावत. ओले सुके वेगळे करतो. लोकं नकली परफॉर्मन्सचे कौतुक करतात आणि त्यात असली गुणवत्ता झाकोळली जाते. त्या असली गुणवत्तेवर अन्याय होऊ द्यायचा नसतो मला.

घरी बसून टीव्ही बघत 'अमके फिक्स असते, तमके फिक्स असते' हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. तुझ्याकडे काही पुरावा असेल तर जा कि बीसीसीआय कडे. मायबोलीवर बोलून काय फायदा आहे ? क्रिकेट प्रेमी म्हणवतोस नी एव्हढेही नाही करवत तुला ?

>>शेवटच्या पाच ओव्हर्स मधे शंभर+ काढले. काहीच्या काहीच<<
आईशप्पथ, मला वाटलं हे ऋन्म्यानेच लिहिलंय... Wink

बाकि, आज रोहित आणि पांड्याचे ड्राइव्हज मस्त. खणखणीत नाणं मोजुन घ्यावेत असे...

अमके फिक्स असते, तमके फिक्स असते' हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत
>>>>
अहो कित्येक जण पुराव्यानिशी पकडले गेलेत, त्यांनी स्वताही कबूल केलेय आणि त्यांच्यावर बंदीही आली आहे. आणि हे सगळे ईंटरनॅशनलमध्ये तर मग आयपीएलमध्ये होत नसावे का?

क्रिकेटवर प्रेम आहे म्हणून फिक्सिंग नजरेआड करून क्रिकेटची मजा घेणे मला नाही जमत. आजही अझर जडेजा वगैरे फिक्सर लोकांना टीव्हीवर बघतो तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. अश्यांना पुन्हा का क्रिकेटसंबंधित चर्चांमध्ये तरी आणतात म्हणून चीड येते.

जर आपण फिक्सिंग नजरेआड करत क्रिकेट बघायची मजा लुटत राहू तर हि किड अशीच राहणार.. सोशलमिडीयात आवाज उठत राहील तितका अंकुश राहील.

असो, चांगल्या प्रामाणिक खेळाचे कौतुक आहेच. ते मी ईथे करतोच आणि करत राहणारच. पण जिथे कालागांडी दिसतेय ते नमूद करत राहणे गरजेचे आहे. नाहीतर क्रिकेटचे वाटोळे करण्यात आप्णच जबाबदार ठरू असे मला वाटते.

आज रोहितच्या पहिल्या शॉटलाच असं वाटून गेलं की आज तो मोठी इनिंग खेळणार. मजा आली त्याची बॅटींग पहायला. पंड्या आणी पोलार्ड सुटले होते. उद्या विल्यमसन चा खेळ बघायची उत्सुकता आहेच पण त्याच बरोबरीनं ऋतुराज गायकवाड मोठी इनिंग खेळणार का ह्याची पण उत्सुकता आहे.

Pages