Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>अश्विनला मॅन ऑफ द मॅच म्हणे
>>अश्विनला मॅन ऑफ द मॅच म्हणे.
६ च्या आत सरासरी ठेवून २ विकेट घेणं टी२० मध्ये फलंदाजा च्या २०० च्या स्ट्राईक्पेक्षा कठीण काम आहे. माझ्यामते बरोबर दिलय या वेळी.
मागे बुम्रा ला २० धावा देउन ४ विकेट घेऊन देखिल मॅन ऑफ द मॅच मिळालं नव्ह्तं
*स्टॉईनिस आणि हेटमायर किती
*स्टॉईनिस आणि हेटमायर किती तरी चांगले कंटेंडर होते त्या अवार्ड साठी.* - सहमत.
काल शेन वाॅरनने हजेरी लावलंली दाखवलं. त्या स्मिथला जरा कधीं तरी स्वतासारखं हंसायला शिकव, म्हणावं त्याला!
हा त्यागी खूप आशादायक वाटतोय. मस्त रन-अप व डिलीव्हरी आहे. शुभेच्छा.
हा त्यागी खूप आशादायक वाटतोय.
हा त्यागी खूप आशादायक वाटतोय. मस्त रन-अप व डिलीव्हरी आहे. शुभेच्छा>>>
चांगला आहे. फिटनेस वयानुसार सांभाळणे महत्वाचे आहे.
कपिलदेव नंतर असा फिट एकही भारतीय जलदगती गोलंदाज पाहिला नाही जो परिणामकारक आणि विनाजखमी होता खेळला.
जैस्वालकडून माझ्या खूप
जैस्वालकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या.
*आणि विनाजखमी होता खेळला.* -
*आणि विनाजखमी होता खेळला.* - पण मला आठवतं त्यानुसार इतकं दीर्घकाळ फास्ट बोलींगची धुरा वाहण्यासाठी गुडघ्यावर 3- 4 वेळा तरी शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली होती कपिल देवलाही ! अर्थात, त्याने खेळाच्या आड हें येवू दिलं नाहीं, हें कौतुकास्पदच !!
त्या वेळी क्रिकेट matches कमी
त्या वेळी क्रिकेट matches कमी असायच्या त्यामुळे जखमी होण्याचं प्रमाणही कमीच असणार.
हा कोण आहे अर्शदीप
हा कोण आहे अर्शदीप
पहिल्या ओवरपासून कडक बॉलिंग टाकत होता मागच्यावेळीही
आज याला नवीन बॉल दिला.
पहिलीच ओवर मेडन टाकली.
जा सिमरन जा पंजाब को हराके आ.
जा सिमरन जा पंजाब को हराके आ.
शाखाने परत मॅच फिरवली. मला
शाखाने परत मॅच फिरवली. मला दाट संशय आहे शाखाने मालवण चौकातून दहा हजार रुपयांची बायंगी विकत घेतले.
चेन्नईने केदार जाधवला वगळून
चेन्नईने केदार जाधवला वगळून चूक केली.
मला असं वाटतंय कोहलीने यापुढे
मला असं वाटतंय कोहलीने यापुढे rcb कडून खेळू नये. प्रत्येक आयपीएलला सतत सामने हरून फ्रस्ट्रेशन नसेल येत या माणसाला? टीम चेंज झाल्यावर बहुतेक फरक पडेल. Rcb मध्ये लाल कपडे घातलेला कोहली बघितला की मला दे दणादण मधला लक्ष्या आठवतो.लाल रंग दिसला की पॉवर खल्लास.
आजची कोहली ची इनिंग मास्टर
आजची कोहली ची इनिंग मास्टर क्लास होती. परफेक्ट बिल्ड केलेली, ५०% पेक्षा अधिक धावा त्याच्या एकट्याच्या त्याही जवळजवळ सगळ्या ओव्हर्स खेळून नि फक्त ५ डॉट बॉल्स होते. काय फिटनेस आहे का मस्करी. तुम्ही काय वाट्टेल ते बोला, पण त्याच्या फिटनेस च्या पन्नास टक्के जरी बाकीचे भारतीय खेळाडू असले तर काय होईल विचार करा.
कुरान ला फ्रंट फ्रुट वर येत फ्लिक करत मारलेली सिक्स मी बघितलेला यंदाचा बेस्ट स्ट्रोक होता.
सुंदर च्या जागी मॉरिस ला पिंच हिटर म्हणून पाठवायला हवा होता का ?
*कुरान ला फ्रंट फ्रुट वर येत
*कुरान ला फ्रंट फ्रुट वर येत फ्लिक करत मारलेली सिक्स मी बघितलेला यंदाचा बेस्ट स्ट्रोक होता.* क्लास !! फक्त नेमकं टायमिंग व मनगटाचा वापर !! तसाच एबीडी टाईप ऑफला जावून खालीं पडत लेगला मारलेला फटका, जो मारल्यावर कोहली स्वत:वरच खूप खूष झाला होता ! एकंदरीतच, कोहली आज बहरात होता.
रन्स काढताना बॉलर मध्ये येतो
रन्स काढताना बॉलर मध्ये येतो त्यावर काहीतरी कडक नियम बनवायला हवा. रडीचा डाव खेळला सैनी.
असामी, भाऊ +१
असामी, भाऊ +१
आधी लिहिले तसे चेन्नई टीम खेळतांना बघणे अतिशय boring झाले आहे. मॅचेस हरणे वेगळे पण आधी परफॉर्मन्स आणि आता इंटेंट दोन्ही हरवत आहे त्यांच्या खेळातून. Sam Curran सोडून एकही deserving बॅट्समन दिसत नाहीये ह्या टीम मध्ये. जर धोनी आता अव्हेलेबल नाही असे एक मिनिट गृहीत धरले तर पाहिल्या 7 पैकी किती जण एखाद्या ipl टीम मध्ये असतील आणि सतत playing 11 मध्ये जागा मिळवू शकतील ते सांगणे अवघड नाही .. Curran सोडून.
धोनी बद्दल काय बोलणार...
A team's performance is only as good as it's captain's.
हार के जीतनेवाले को बाझीगर
हार के जीतनेवाले को बाझीगर कहते है
शाहरूख बद्दलचा माझा आदर आज अजून वाढला
कोहलीची अशी इनिंग बघणे हे आयपीएलमधील सुख असते.
एकोणीसाव्या ओवरला चार बॉल दुबे सलग खेळला तिथे कोहलीलाच स्ट्राईक हवा होता.. आजचे शतक हवे होते रेकॉर्डला..
मॉरीसची आजची गोलंदाजी पाहता बेंगलोर अजून थोडी स्ट्रॉग होईल. वॉशिण्गटन सुंदर पॉवरप्लेमध्ये या पिचेसवर आता ट्रंप कार्ड ठरू लागलाय.. दिल्लीत आश्विनही तेच करतोय.
धोनीकडे पाहून असे वाटते त्याला निवृत्त व्हायचेय पण त्याचे आणि ईतरांचे आर्थिक गणित बिघडू नये म्हणून तो मैदानावर आहे.
कोहलीच्या आजच्या खेळाबद्दल,
कोहलीच्या आजच्या खेळाबद्दल, फिटनेसबद्दल, त्या सिक्सबद्दल काय बोलावं!! प्रचंड कौतुक!!! त्याच्या मनगटात स्टीलच्या वायर्स बसवल्या असाव्या कदाचित.
तसंच कौतुक केकेआर च्या परफॉर्मन्सचं, कार्थिकच्या कॅप्टन्सीचं, नरिन आणी प्रसिधकृष्णाच्या बॉलिंगचं. रसेल इंज्युअर झाल्यावर कार्थिकचं डेथ ओव्हर्सचं गणित बिघडून ही मस्त मॅनेज केले बॉलर्स. पंजाबने मॅक्सवेलच्या जागी प्रभासिम्रन ला पाठवून स्ट्रॅटेजिक चूक केली.
(No subject)
आज मस्त होईल मॅच, मुंबई वि. दिल्ली !!
काय हो, आज ती कंगना गेली असेल ना यूएईला , तुमच्या मुंबैविरूद्ध ओरडायला !!
(No subject)
अआई
जरा गंमत, कुणालाच उद्देशून नक्कीच नाहीं ! -
बाकीची टीम जावून स्थिरसावर झाली हाॅटेलात, तरी हा तंबूच शोधतोय ! बरं पडतं म्हणे, बॅटींग करताना लगेचच तंबूत परतायला !!
राजस्थान - ये रे माझ्या
राजस्थान - ये रे माझ्या मागल्या.
Spoke too soon?? Well played
Spoke too soon?? Well played RR (Riyan & Rahul)
रहाणे मुबैविरुद्ध नेहमी
रहाणे मुबैविरुद्ध नेहमी चांगला खेळतो म्हणून त्याला खेळवत असतील आज.
>>Spoke too soon?? Well
>>Spoke too soon?? Well played RR (Riyan & Rahul) Happy
तीच तर गम्मत आहे
रियान परागला दिलेला ब्रेक सार्थकी लागला!
रियान पराग मस्त प्लेयर आहे.
रियान पराग मस्त प्लेयर आहे. प्रॉमिसिंग नवीन खेळाडूंपैकी तो एक आहे.
त्याने बिहु डान्स मस्त केला
त्याने बिहु डान्स मस्त केला
आसामी आहे ना तो!
कंगना वाला कार्टून खल्लास
कंगना वाला कार्टून खल्लास
तेवाटीया च्या आत्मविश्वासाला मानले पाहिजे राव.
तेवातिया मॅच सिच्युएशन चांगली
तेवातिया मॅच सिच्युएशन चांगली assess करतोय.
अय्यर, धवन मस्त खेळले. आता रोहित अॅण्ड को. ची पाळी. ही मॅच (मॉक फायनल??) मस्त होईल असं वाटतय.
CSK ची टीम सर्वात रटाळ
CSK ची टीम सर्वात रटाळ क्रिकेट खेळतेय
रहाणे ने डॉट बॉल खेळून
रहाणे ने डॉट बॉल खेळून फंदफितुरी केली आपल्या टीम च्या विरुद्ध आणि शॉ ने गचाळ फिल्डिंग करून.
दिल्लीने काय विचार करून (विकत) घेतले राहणे ला कुणास ठाऊक.
Pages