आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Karthik undid. Dhoni today. स्ट्रॅटेजिक कॅप्टनशिप होती- बॅटींग ऑर्डर, बॉलिंग चेंजेस खूप चतुर होते. नरिन आणी रसेल ला शेवटपर्यंत राखून ठेवणं हा मास्टरस्ट्रोक ठरला. सीएसके कडे काही प्रत्त्युत्तर नव्हतं असं वाटलं. बॉलिंग लेंग्थ्स पण छान होत्या. सीएसके खूप थकलेला संघ वाटतोय. भारतासाठी चिंतेची बाजू म्हणजे जडेजा ची ऑफ-कलर बॉलिंग आणी फिल्डींग. आज गिल आणी त्रिपाठी जडेजाच्या जवळ बॉल ढकलून रन्स चोरत होते. ह्या आयपीएल मधे जडेजाचा एकही डायरेक्ट हिट नाहीये. लास्ट बट नॉट लीस्ट, आज त्रिपाठी झकास खेळला. सुरूवातीला जरा अस्वस्थ वाटला, पण सेट झाल्यावर छान शॉट्स होते त्याचे. होपफुली त्याला ओपनर म्हणून जास्त संधी मिळतील.

अरे कालची पण मॅच मोक्याच्या वेळेस बंद केली आम्ही . १० ओव्हर ९० पहिला होता स्कोर. CSK आरामात जिंकेल वाटलं Sad केदार जाधव कधी खेळणार ?

>>केदार जाधव कधी खेळणार ?

कालचा त्याचा खेळ बघून उरलेल्या सीझनमध्ये त्याला खेळवतील असे वाटत नाही.... काल त्याच्यापेक्षा ब्राव्हो किंवा अगदी गेला बाजार शार्दुल ठाकूर, दीपक चहर चांगले खेळले असते असे वाटले.
आधीच त्याचे आणि जडेजाचे मागच्या मॅचमध्ये वाजले होते.... त्यातून काल दोघे एकत्र पीचवर असताना चाचपडत खेळून त्याने अनेक बॉल वाया घालवले. आधीच जडेजाला स्ट्राईक दिला असता तर मॅचचा रिझल्ट वेगळा लागू शकला असता.
जडेजा जेंव्हा हातातून गेलेल्या मॅचमध्ये शेवटच्या षटकात फटकेबाजी करत होता तेंव्हा तो का कुणास ठाऊक पण केदार जाधवला खुन्नस देत होता असे वाटले.

चेन्नईचा हातातली मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत नेवून ठेवण्याचा सोस कधी संपणार कुणास ठाऊक?

>>Karthik undid. Dhoni today. स्ट्रॅटेजिक कॅप्टनशिप होती- बॅटींग ऑर्डर, बॉलिंग चेंजेस खूप चतुर होते.

त्याला त्याच्या कॅप्टन्सी विषयी इथे झालेली चर्चा कळली असावी Wink
Thats the beauty of IPL.... things are so dyanamic.... every match brings up something new and make us rethink of our opinions which were very firm few matches back!

पण म्हणून काही ठामपणे मते ठोकून द्यायचा किडा मात्र जात नाही Wink

मॅच जिंकायच्या परिस्थितीत असताना जडेजाला स्कोअर करता येत नव्हता. ३ बॉल २५ असे गणित झाल्यावर अचानक बॉल मिडिल व्हायला लागला. शेवटच्या तीन बॉलवर ४,६,४. Happy

मॅच जिंकायच्या परिस्थितीत असताना जडेजाला स्कोअर करता येत नव्हता. ३ बॉल २५ असे गणित झाल्यावर अचानक बॉल मिडिल व्हायला लागला. शेवटच्या तीन बॉलवर ४,६,४. >>> अगदी अगदी..... तोवर द्रे पण कंटाळला होता... बाऊन्सर मधे पूर्ण जीव लावुन टाकत होता असे वाटत नव्हते... आधीचे सगळे बाउन्सर बरोबर डोईवर होते... पण शेवटचे २ वाईड टाकले अन मग एकदम लल्लु फुलटॉस...

मला अजुन एक वाटते म्हणजे... उंडर १९ टीममधे एकही सुपर फिल्डर नाहीये...चांगले नक्कीच आहेत, पण कोहली, जडेजा, रैना जेव्हा आले तेव्हा ते ईतर चांगल्या फिल्डरहुन पुढे होते.... तसे कोणीच नाहीये

भाऊ बिष्नोई बद्दल काय मत आहे ? पोरगं जिगरबाज आहे. फ्लाईट द्यायला घाबरत नाही नि स्लायडर्स, फ्लिपर्स परफेक्ट वापरतो. आजची बेअर स्ट्रो ची विकेट थेट कुंबळे ची होती.

धोनी ह्या आयपील मधे किपींग करताना जीव थोडुन उड्या मारतोय असे कोणाला वाटले का ? एव्हढे मी त्याला कधीच बघितलेले आठवत नाही त्याच्या सिनेमा सोडून.

३ बॉल २५ असे गणित झाल्यावर अचानक बॉल मिडिल व्हायला लागला. >> +१. शेवटच्या ओव्हर पर्यंत खेचणे अजून जमतेय पण संपवता येत नाहीये.

एक मॅच खराब काय खेळला बिचाऱ्या केदार जाधवला सगळे टार्गेट करताहेत. विरेंद्र सेहवाग त्याला युजलेस डेकोरेशन वैगरे बोलला. Uhoh

पृथ्वी शॉची बॅटिंग स्टाईल कुणाला फ्लॉड वाटते का?
त्याचे पाय काही तरी विच्चित्र प्रकारे लॉक्ड असतात जे बघणे आजिबात प्लेझंट वाटत नाही... फूटवर्क नसतांना यशस्वी झालेले सिहवाग, सिद्धू सारखे प्लेअर्स बघितले आहेत... अयशस्वी झालेले सदागोपन रमेश काही प्रमाणात सुजिथ सोमसुंदर सुद्धा बघितले आहेत.
'शॉ लॅक्स प्रॉपर फूटवर्क व्हाईल बॅटिंग' असे अजूनतरी म्हणायचे नाहीये.... पण कोहली, शर्मा किंवा फॉर दॅट मॅटर गिल, पडिक्कल जसे लाईट फुटेड आणि फ्लुएंट वाटतात तशी शॉची बँटिंग वाटत नाही....
सध्या काही ठरवणे फार घाईचे ठरेल पण कसोटी मध्ये दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवसाच्या पीचवर स्पीनर्स समोर ऊभे राहतांना फ्लॉ आहे की कसे त्याचा ऊलगडा होईल असे वाटते.

यशस्वी जैस्वालची बॅटिंग बघायची आहे आज. काही महिन्यांपूर्वी खूप चर्चेत होतं नाव. शरीरयष्टीने एकदम सुका बोंबील वाटतो. बघू आज काय करतोय.

*जसे लाईट फुटेड आणि फ्लुएंट वाटतात तशी शॉची बँटिंग वाटत नाही..* -
हें मुख्यत: त्याच्या हूक शाॅटबाबतीत जाणवतं. तो पोझिशनमधे न येता हा शाॅट खेळतो असं वाटतं. आजही त्याला हें हेरूनच गोलंदाजी होत असावी. एक झेल तसं खेळताना सुटला तरीही शाॅ तो शाॅट खेळण्याच्या मोहात पडतच होता. त्याचा इतर खेळ मात्र तंत्रशुध्द व शैलीदारही आहे. ( गावसकर हूक शाॅटच्या वाटेला जात नसे. अर्थात, मर्यादित षटकांच्या सामन्यात तें चालणार नाहीं)

दिल्लीची वृत्ती खूप भावली ! विकेट पडत असूनही प्रत्येक फलंदाज आपला खेळ बिनधास्त खेळत होता. चॅम्पियन असण्याचा महत्वाचा निकष !!

मला त्याच्या सगळ्याच शॉट्सच्या बाबतीत हे जाणवतं...खासकरून फ्रंट फुटवरच्या सगळ्या शॉट्स.
बॉल बॅटपर्यंत पोचेपर्यंत लाराची अशी थोडी फार लॉक्ड फीट स्टाईल वाटत असे पण बॉल तटवतांना पोझिशनमध्ये येण्यासाठी आधी फ्रंट फूट क्लीअर करून तो जे अफलातून पदलालित्य दाखवत असे ते फार देखणे होते.

शॉ शॉट्स शरीराच्या बाजूला खेळतो पण गावस्कर च्या म्हणण्या नुसार त्याला शॉत्स खेळायला बराच वेळ असतो त्यामूळे हे असे होते.

जैस्वाल भारी गोंधळलेला वाटतो.

हो जैस्वाल एक बाजू लाऊन धरून प्लेसमेंट करत शंभरच्या आत बाहेरच्या स्ट्राईक रेट ने खेळणारा प्लेअर वाटतो..
ओपनिंग ला येऊन मोठे स्त्रोक्स खेळणे हा त्याचा खेळ वाटत नाही.

स्मिथ आणि मॅक्स्वेल आयपील साठी एकाच क्रॅश कोर्सला जाऊ आल्यासारखे एवढे विचित्र खेळत आहेत की.... त्यांच्या सगळ्याच फॉर्मॅट साठीच्या बॅटिंगचं भजं होईल की काय अशी मला शंका वाटते.

सॅमसन गेला अपेक्षेप्रमाणे
त्याच्या पहिल्या इनिंगलाच मी म्हटलेले की तो दर सीजनला सुरुवातीला अफाट टायमिंग वाल्या एक दोन खेळी करतो आणि मग थंड होतो.
स्पेशली ईथे आता पिच स्लो होऊ लागलेत तसे त्याला जमत नाहीये आधीच्या टायमिंगने खेळायला.. आणि तो सुद्धा त्याच आवेशात खेळतोय. दरवेळी नवीन खेळपट्टी, नवी इनिंग, ॲडजस्ट करून इनिंग बिल्ड करणे जमत नाही त्याला अजूनही हेच खरे

स्टॉईनिस, हेटमायर कोहलीच्या कॅप्टन्सी मध्ये खेळतांना दडपणाखाली दिसत(एबी आणि चहल सोडून सगळेच मला कायम तसेच दिसतात).. ईथे दिल्ली मध्ये त्या दोघांचा चेहरा बर्‍यापैकी प्रफुल्लित दिसतो.. आणि खेळही चांगलाच होतो आहे.

शारजाहला सारे २००+ करत होते खरे पण गेल्या सामन्यापासून पाहता खेळपट्टी स्लो होऊ लागलीय. कोणीही येईल आणि मारेल अशी स्थिती ऊरली नाहीये आता. टॉस जिंकून पहिली गोलंदाजी घेणे हा निर्णय चुकला ईथे आज. त्यानंतरही हेटमायरसमोर जोफ्रा आर्चर वेळीच न आणता १८-२० व्या ओवरसाठी ठेवले. अन्यथा १६० ला रोखता आले असते.

जिंकली दिल्ली.
अय्यर आणि पंत धावबाद होऊनही .. याने त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढेल. बॅटींगमधील डेप्थ समजली त्यांना. हे पाहता पंतची भुमिका बदलायला हरकत नाही आता. कारण ती फार फार सपक करून टाकलीय त्याने मजा गेलीय आधी मस्त कसाही बिनधास्त मारायचा. कधी लवकर जायचा पण कधी अचाट फटकेबाजी करायचा. प्रेक्षकांचे मनोरंजन करायचा. आताचा त्याचा रोल दिल्लीच्या आणि भविष्याचा विचार करता त्याच्या स्वत:च्याही हिताचा असावा. पण माझ्यासारखी पब्लिक बोअर होतेय.

*स्टॉईनिस, हेटमायर कोहलीच्या कॅप्टन्सी मध्ये खेळतांना दडपणाखाली दिसत(एबी* - मीं वर म्हटलंय त्याप्रमाणे दिल्लीचे सर्वच खेळाडू एकंदरीत मोकळेपणाने व मन लावून खेळताना दिसतात. श्रेयस व संघ व्यवस्थापनाला याचं श्रेय जात असावं.

श्रेयस व संघ व्यवस्थापनाला याचं श्रेय जात असावं.
>>>>
मुळात श्रेयस हे नाव ईतके मोठे झाले नाही की त्या दडपणाखाली कोणी येईल. पण तो आपल्या पोजिशनची फुशारकी मारत नाही की ढिलाही राहत नाही हे मात्र कौतुकास्पद आहे. ऋषभ पंतही त्यामुळे दिल्लीत खेळताना वेगळा भासतो आणि देशासाठी खेळताना वेगळा...
मुद्दा बाकी योग्य आहे. चहल एक लाडका आहे कोहलीचा. (जसा कडेजा धोनीचा) बाकीच्यांना मोकळा श्वास घेता येत नाही त्याच्या संगतीत.

मुळात श्रेयस हे नाव ईतके मोठे झाले नाही की त्या दडपणाखाली कोणी येईल. >> ह्याचा ऊलटा प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो जो कार्तिक ला होतो आहे...किंवा झाला होता...ऊथप्पा असतांना. टीम तुमचे कर्तुत्व आणि नेतृत्व मान्य करत नाही. मला वाटते कर्तुत्व आणि नेतृत्वाचा पर्फेक्ट बॅलन्स फक्त रोहित शर्माला जमला आहे. थोडा फार वॉर्नर/विल्यमसनला सुद्धा जमतो...प्ण त्यांची धर सोड चालू असते विविध कारणामुळे.

धोनी आपले ती चार भक्त आणि फाफ, वॅट्सन, करन सारखे कॅप्टन कुठलाही असो आपले व्यक्तीमत्व आणि खेळाबरहुकूमच कायम खेळणारे स्ट्राँग आणि ईंडिपेंडंट पर्सनॅलिटी वाले लोक निवडतो. म्हणजे त्याला फक्त ४-५ लोक मॅनेज करायचे असतात.
राजस्थान आणि पंजाब मध्ये तर कर्तुत्व आणि नेतृत्व ह्याची सांगड घालणारा एकही माणूस त्यांना अनुक्रमे वॉर्न आणि गिलख्रिस्ट नंतर मिळालेला नाही.

ह्याचा ऊलटा प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो जो कार्तिक ला होतो आहे.
>>>
हो म्हणूनच तर श्रेयसचे पुढच्या वाक्यात कौतुक केलेय. गंमत म्हणजे कार्तिकच डोळ्यासमोर आलेला माझ्या...
आणि दुसरी गंमत म्हणाजे सेम रोहीत शर्माचेच उदाहरण देणार होतो मी. पण मागच्याच एका पानावर त्याच्या कप्तानीची फार मोठी कौतुकाची पोस्ट लिहून झालेली त्यामुळे टाळले Happy
मला केव्हाही त्याला भारताचा कप्तान बघायला आवडले असते. कोहली उगाच आड आलाय. जसे सचिन असताना दादा वा द्रविड कर्णधार होऊ शकतो तसे कोहली असताना शर्मा नाही होणार कारण कोहलीचा स्वभाव वेगळाय ॲटीट्यूड. वेगळा आहे..

दिल्ली आज फक्त ३ ऑवरसीज प्लेअर्स घेऊन खेळली आणि अजून बेंच वर अ‍ॅलेक्स कॅरी पण आहे...तो हजर आहे की नाही हे मात्र माहित नाही. पंतला फ्री हँड द्यायचा असेल तर त्यांना हेटमायरला बसवून कॅरीला आत घ्यावे लागेल... तो पडझड झाल्यास हेटमायर पेक्शा जास्त चांगले सावरू शकतो.
हा प्रयोग ते ९-१० मॅचेस झाल्यावर करतील.

लाबुशाने ला अजून कोणी घेतले नाही का?

आज दिल्ली ची टीम मस्त खेळली. कुठल्याही क्षणी त्यांच्या खेळात हारण्याची शक्यता दिसली नाही. संजू सॅमसनविषयी मला आता तो भारतीय क्रिकेट चा ‘What could have been’ होतो की काय अशी भिती वाटायला लागलीय . राजस्थानची शेवटची आशा स्टोक्स असावी. पण असं एका खेळाडूवर अवलंबून रहाणं धोकादायक आहे.

Pages