आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दिल्ली चं प्रति-आक्रमण कौतुकास्पद आहे. पहिल्या तीन विकेट्स इतक्या झटकन गेल्यावर पंत-अय्यर ने केलेली सकारात्मक फलंदाजी जबरदस्त होती. १५७ चं टारगेट फार मोठं नसलं तरी फायनल मॅच चं प्रेशर असतं त्यामुळे आव्हानात्मक ठरू शकतं.

डि कॉक प्रति आक्रमणाचा धडा देतोय. रोहित ने अश्विन ला सिक्स मारून पॉसिटिव्ह व्हाईब्स दाखवलेत पण तो फारसा आश्वासक वाटत नाहीये. लेग स्पिनिंग हि त्याची दुखती नस आहे हे बघता दुबे ला लवकर आणले जाईल का ? अर्थात दुसरीकडे डि कॉक असल्यामूळे ...

धवन स्टेटमेंट द्यायच्या नादात वाहून गेला. बुमरा च्या यॉर्कर वर वाचल्यावर ज्या तर्‍हेने त्याने आधी स्टंप्स कडे बघितले ते बघून आधीच्या मॅचचे भूत अजून त्याच्या मानगुटी वर होते हे दिसत होते. राहणे चे काय झालेय ते बघवत नाही Sad

"मै हुं ना" - Happy मस्त!

त्याने आत्ता विकेट sacrifice केली. टेक्निकली त्याने पळायला हवे होते, कारण रोहित चा कॉल होता. पण तरी सु.कु.चं कौतुक वाटलं.

जिंकली मुंबई Happy हेजिंग शेअर मार्केटमध्ये केलेलीच चांगली. रियल लाईफमध्ये केली की असं होतं. ना धड विजयाचा आनंद ना धड हारण्याचं दुःख Lol

जिंकले मुंबई !!! याआय !
रोहीत चांगला खेळला ते बरं झालं.
ण तरी सु.कु.चं कौतुक वाटलं. >>> + १

Well played Mumbai. It was obvious from start to finish. Not only today but through out 2020 IPL.
2020 is anyway odd year.

मस्त खेळले मुंबई - आणी जिंकले!! वेल डन!! रोहित ची खेळी खूप गरजेची होती. किशन चं पण कौतुक आहे. मागच्या वर्षीपेक्षा त्याच्या खेळात यंदा थोडी जास्त परिपक्वता दिसली. बोल्ट आणी बुमराह तर जबरदस्त!

मुंबईचा सुरूवातीच्या फेज मधला बेस्ट (किंवा दुसरा) बॉलर पॅटीन्सन नाही , अतिशय लिमिटेड नि बर्‍यापैकी एकाच प्रकारचा स्पिन बॉलिंग अ‍ॅटॅक असताना मुंबई ने एव्हढे डॉमिनेट केले बॉलिंग च्या जोरावर हे कौतुकास्पद आहे. आज शेवटी सगळ्या काँट्रिब्युटर ने हात लावून घ्या अशा स्टाईल मधे बॅटींग केली Wink

आजचा मॅन ऑफ द मॅच बोल्ट असला पाहिजे, त्याच्या पहिल्या बॉल ने जो टोन सेट केला त्यानंतर दिल्ली फक्त कॅचप करत राहिले. बोल्ट ला ज्या कोणी टीम ने टेड केले यंदा त्यांना भारीच पश्चाताप होत असणार. झहिर ज्या तर्‍हेने बॉल्र्स त्यांच्या प्लस पॉईंट प्रमाणे वापरतो ते जबरदस्त कौतुकास्पद आहे. यादवला चहरच्या जागी आणणे गट्सी होते. यादव मागच्या वेळी पण फायनल मधे खेळला होता का असाच ?

किशन अंडर १८ चा कप्तान होता ज्यात गिल नि पंत होते. गिल पूर्ण टूर्नामेंट दाबून खेळला होता नि फायनल मधे पंट धडाकेबाज खेळून गेला होता.

आमच्या इथल्या ग्रूप्स मधल्या चेन्नईवाल्यांना गप्प बसवायला मागच्या वर्षीचा विजय पुरेसा होता पण यावर्षी पुन्हा कल्ला सुरू झाला होता. आता मजा येइल.

त्यातून कोणी पकवू लागला तर रणजी मधले ४१ विजय मी त्यावर फिरवतो. To sweeten the deal!

प्लेऑफ मधली गेम पाहता मुंबई आयपीएल मधली ऑस्ट्रेलिया होत चालली आहे असे वाटले होते. लीग मधे एक लेव्हल व सेमीज/फायनल्स मधे त्यावरची लेव्हल. आज तितकी एकतर्फी नाही, तरी जिंकले हे महत्त्वाचे.

"किशन अंडर १८ चा कप्तान होता ज्यात गिल नि पंत होते. " - पंत होता. गिल नाही. गिल, शॉ, मावी, नागरकोटी, अभिशेक शर्मा, अनुकूल रॉय हे सगळे एका टीममधे होते (२०१८) - जे यंदा आयपीएलमधे होते. रॉय मुंबईचा गो टू फिल्डींग सब होता. तुला २०१६ ची टीम आठवतेय ज्यात किशन, पंत, सर्फराझ खान, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, लोमरोर होते.

यंदाच्या टीममधले गर्ग, जैस्वाल, त्यागी, बिष्नोई आयपीएल मधे खेळले.

हो रे मी काही टिम्स एकत्र केल्या असत:), मला नीट आठवत नव्हते नि गूगल करायचा आळस केला Happy तू पंत चे नाव दोन्ही टीम्स मधे लिहिलेयस ? १६ वर्षांचा होता का पहिल्यांदा खेळला तेंव्हा ?

पंत आज खेळला अखेर ते छान वाटले. त्याची भुमिका उगाच बदलून त्याची वाट लावलेली यंदा. आणि अखेरीस त्याचे त्यालाच यातून बाहेर पडता येत नव्हते. बिचारा आत्मविश्वास गमावून बसलेला असे वाटत होते. पण आज त्या शेलमधून बाहेर पडला. आऊट चुकीच्या वेळी झाला. १८० होत होते तो असेपर्यंत. मग सामना कदाचित वेगळा झाला असता. कदाचित मुंबईचा सुरुवातीचा ॲप्रोच वेगळा असता. १६० चा सामना मुंबईला शेवटपर्यंत नेण्यात ईंटरेस्ट नव्हता. १८० चा नेण्यात ईंटरेस्ट असता. एक चांगली फायनल जरासाठी हुकली.

असो
आता मात्र पाच सहा महिन्यातच जी पुढची आयपीएल असेल त्यात चेन्नईने पुन्हा मुसंडी मारलेली बघायला आवडेल.

*आता मात्र पाच सहा महिन्यातच जी पुढची आयपीएल...* -

काय हो, आतां परत वर्षभर तरी नाहीं ना तुमची 'इंडीयन पीडा लीग ' !!!
20190115_202830.jpg

Pages