आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शामी आणी स्टॉयनिस ने पहिली इनिंग गाजवली आणी दुसर्या इनिंग ची सुरूवात चांगली झालीये (अश्विन ला इंज्यूरी व्हायला नको होती). मयंक आणी सर्फराज साठी मोठी संधी आहे आता.

अंबाती रायडु काल खेळला ती आणि वर्ल्डकप सेमी फायनल मधील खेळपट्टी, स्विंग, यात जमीन अस्मानाचा फरक होता.
>>>>

नक्कीच. पण मी त्या क्लास आणि कॅरेक्टर बद्दल बोलत आहे जो य स्थितीत गरजेचा असतो.. जो ईंग्लण्डमध्ये एखाद्या ना एखाद्या सामन्यात लागणारच होता. रायडू वर्षभर आधी संघात त्यादृष्टीने सेट सुद्धा होता. पण संघात कीपर म्हणून धोनी असताना रायडूला काढून पंत आणि कार्तिक दोन कीपर फलंदाज नेणे आणि त्यांना निव्वळ फलंदाज म्हणून खेळवणे हे तेव्हाही पटले नव्हते. किंबजुना पांड्या असताना रायडूच्या आधी शंकरला नेणेही पटले नव्हते.

असो, त्रासदायक होता तो पराभव. असे काही घडले की आठवण येतच राहणार. किंबहुना अय्यरला सध्या चौथ्या क्रमांकावर सेट झालेले आणि तो जसा खेळतो ते बघून तो देखील जरा आधी चमकला असता आणि वर्ल्डकपचे तिकीट मिळवले असते तर असेही मनात येते....

मयंकच्या प्रयत्नांवर अक्षरशः पाणी पडलं. अर्थात काही अंशी तो स्वतःही जवाबदार आहे. दमल्यामुळेकिंवा मसल मेमरीतून त्या फूलटॉसवर त्याने तो बॉल हवेतून मारण्याऐवजी पॉईट/कव्हर्स मधे टॅप करून सिंगल घेऊन मॅच जिंकायला हवी होती. नंतर रबाडानं सुपरओव्हर अफलातून टाकली.

या वर्षीही आयपीएलच्या स्क्रिप्टेड वाटावे अश्या लास्ट ओवर लास्ट बॉल फिनिश शंकास्पद सामन्यांना सुरुवात झाली.
मयंकचे अगदी जादूई बॅट घेऊन खेळत असल्याप्रमाणे चालू होते. २४ बॉल ५३ चा सामना एकहाती खेचला आणि ऐनवेळी तीन बॉल १ धाव हवी असताना आधी एक डॉट बॉल आणि मग सिंगल हवा असताना फुलटॉस असा हवेत गॅप न शोधता थेट फिल्डरच्या हातात. त्यानंतर शेवटच्या फुलटोसवर अजून एक विकेट.
मग सुपरओवरला देखील मयंकला न पाठवणयाचा भयंकर अनाकलनीय निर्णय. जेमतेम तीन धावा असताना शमीचा लेगसाईड वाईड आणि मग लेगसाईडलाच दोन ईजी रन्स... घ्या दिल्लीकरांनो गेम तुमचाच आहे असे वाटले Happy

आयपीएलच्या स्क्रिप्टेड वाटावे अश्या लास्ट ओवर लास्ट बॉल फिनिश शंकास्पद सामन्यांना सुरुवात झाली..... खुप जण हे बोलणार. माञ रबाडा सुपर ओवर मध्ये काय करू शकतो हे मागच्या वर्षी कोलकाता विरूद्ध ही बघितलं होत.

मयंकला न पाठवणयाचा भयंकर अनाकलनीय निर्णय...... मयंक दमल्यामुळे किंवा मसल मेमरी मुळे पाठवलं नसेल.

>>या वर्षीही आयपीएलच्या स्क्रिप्टेड वाटावे अश्या लास्ट ओवर लास्ट बॉल फिनिश शंकास्पद सामन्यांना सुरुवात झाली.

हे बोलणार्यानी अगोदर दोन्ही सन्घातील २२ खेळाडू घेउन एखादी गल्लीतली मॅच लास्ट ओवर लास्ट बॉल फिनिश पर्यन्त आणून दाखवावी. स्पॉट फिक्सिन्ग होत असेल पण पूर्ण मॅच लास्ट ओवर लास्ट बॉल फिनिश पर्यन्त प्लॅन करणे अगदी २२ च्या २२ खेळाडू सामील असले तरी शक्य नाहीय.

पूर्ण मॅच लास्ट ओवर लास्ट बॉल फिनिश पर्यन्त प्लॅन करणे अगदी २२ च्या २२ खेळाडू सामील असले तरी शक्य नाहीय.
>>>

धोनी हे एकटाही प्लान करू शकतो Happy

अर्थात मी शंका व्यक्त केलीय. आरोप नाही. पण करायचे ठरवल्यास अवघड नाहीये हे फार. सुरुवातीपासून असे करायची गरज नसते.

मस्त झाली कालची मॅच!
मयंकने अक्षरशः एकहाती काढली होती ती मॅच पण वरच्या फेफच्या मताशी पूर्णपणे सहमत.... चेंडू नुसता तटवला असता तरी जिंकू शकले असते.... हवेतून मारण्याची काही एक गरज नव्हती.
शमीचा सुरुवातीचा अफलातून स्पेल, अय्यर-पंतची इनिंग बिल्डींग आणि स्टॉयनिसची कमाल खेळी.... मस्त झाली पहिली इनिंग!
जॉर्डनने जी काही लास्ट ओव्हर टाकली त्यावरुन मी तरी त्याला परत खेळवला नसता.... गडी शिकायलाच तयार नाही!
पंजाबच्या तीन विकेटस पडल्यावर मॅच गेल्यात जमा होती.... पण मयंकने एकहाती किल्ला लढवला.... मॅच जवळजवळ जिंकवली होती त्याने.... दिल्लीचा सपोर्टर असूनही फिलींग बॅड फॉर मयंक!

रबाडा कमालच आहे सुपरओव्हर मध्ये
मला पण आश्चर्य वाटले मयंकला सुपर ओव्हरला न खेळवल्याबद्दल पण कदाचित तो दमला असावा आणि तो तसा टिपिकल मारधाड प्लेअर नाहिये.... काल पण सुरुवातीला तो ८ बॉलमध्ये १ रन वगैरे असा खेळत होता!
पंजाबची स्ट्रॅटेजी त्याबाबतीत रिजिड वाटली.

पूरन नि राहुल पहिल्या बॉल पासून उचलून मारू शकतात म्हणून ते आले .>>>> ईथेच तर गंमत होती. मयंकसाठी तो पहिला बॉल नसता. सेट झालेल्या फ्लो मध्येच खेळला असता. तीनमध्येही त्याला जागा मिळू नये हे पचायला जडच होते. चूक तर केली त्यांनी

१८ रन्स हवे असताना यॉर्करने गेम सील करायचा तिथे शॉर्ट वाईड लेंथ बॉल फुलटॉस असे प्रकार स्टेनसारख्या अनुभवी बॉलरकडून चालू होते. ३ बॉल ११ ला कोहलीच्या हातात कॅच गेली. पण सिक्स मारायचा बॉल होता तो..

स्टेन, उमेश यादव वगैरे मंडळी चहलला नलिफाय करतात!
सैनी ने बरी केली बॉलींग.... डेथ ओव्हर्समध्ये मॉरीस हवा!

हैद्राबादची मिडलऑर्डर अगदीच तकलादू वाटतीय.... विल्यमसन हवाच!

सैनी ने बरी केली बॉलींग. >> बरी ? सुंदर ने काय पाप केलेले देव जाणे ? एकच ओव्हर ? यादव पुढच्या मॅच मधे नसेल बहुधा. स्टेन किंवा यादव एकच पुरे आहे.

हैद्राबाद बंगलोर सारखे खेळले असे म्हणून शकतो Happy पड्डिकल सहीच खेळला.

एकंदर स्पिन वर सगळे चालणार असे दिसते.

व्हॉटसपवर आलेले भविष्य
वाचा टाईमपास म्हणून आणि बघा असं काही घडतंय का...

********

आज IPL 2020 का चौथा मैच राजस्थान रोयल और चैन्नई सुपर किंग के बीच में शारजहाँ में खेला जायेगा। आज के मैच की मीन लग्न और वृश्चिक राशि है। लग्न का नक्षत्र गुरू/राहु/शनि है। चन्द्रमा का नक्षत्र बुध/बुध/बुध है। बुध का नक्षत्र मंगल/बुध/बुध/बुध है। आज के मैच में मंगल, राहु, गुरू, शनि, बुध का प्रभाव रहेगा। बुध सप्तमेश होकर अष्टम भाव में बैठा है। लग्नेश गुरू केतु के साथ दशम भाव में शुक्र/शनि/राहु नक्षत्र में बैठा है। राहु आज मिथुन की राशि में चौथे भाव में मंगल/बुध/बुध नक्षत्र में बैठा है। आज का मैच बुध की दशा में शुरू हो रहा है। शुरू के 5-6 ओवर में 2-3 विकेट जायेंगे। पहले ही ओवर में विकेट जाने की संभावना है। मैच रुक रुक कर होगा, बाद में बैटिंग करने वाले खिलाड़ियों की बॉलिंग या बैटिंग के समय चोटिल होने की सम्भावना है। 7-8 ओवर केतु की दशा में डाले जायेंगे, केतु केतु/केतु/केतु नक्षत्र में है। यहाँ केतु बैटिंग को सपोर्ट करेगा कोई विकेट नहीं जायेगा रन बनेंगे। 9-15.5 ओवर शुक्र की दशा में डाले जायेंगे, शुक्र की दशा में रन अच्छे बनेंगे, लेकिन शुक्र/राहु में विकेट जायेगा। राहु बॉलिंग टीम को सपोर्ट करेगा। 16.5-17.5 ओवर सूर्य की दशा में डाले जायेंगे, सूर्य सूर्य/बुध/सूर्य नक्षत्र में बैठा है। यहाँ सूर्य बैटिंग को सपोर्ट कर रहा है, अच्छे रन बनेंगे। इसके बाद चन्द्रमा की दशा आयेगी, चन्द्रमा बुध/बुध/बुध नक्षत्र में बैठा है। 17.5-20 ओवर चन्द्रमा की दशा में डाले जायेंगे, यहाँ विकेट जायेंगे रन नहीं बनेंगे। स्कोर सामान्य ही रहेगा। दूसरी पारी में 1 ओवर मंगल की दशा में डाले जायेंगे, मंगल केतु/शुक्र/बुध नक्षत्र में है।एक दो बाउण्ड्री आयेगी। पहले खेलने वाली टीम बहुत अधिक स्कोर नहीं बना पायेगी, लगातार विकटों के गिरने से रन रेट ऊपर नीचे होती रहेगी।
बाद में खेलने वाली टीम के 1 से 7 ओवर राहु की दशा में डाले जायेंगे। कुछ कैच छूटेंगे और अच्छे रन बनेंगे। राहु के बाद 8- से 13.5 ओवर गुरू की दशा में डाले जायेंगे, यहाँ कई विकेट जायेंगे।रनों पर अंकुश लगेगा, रन रेट धीमी होगी। इसके बाद शनि की दशा आयेगी शनि की दशा 13.5 से मैच के अन्त तक चलेगी, शनि वक्री है। शनि सूर्य/राहु/मंगल के नक्षत्र में है। शनि बाद में बैटिंग टीम के लिये सफलता में बाधक है, लेकिन शनि राहु के नक्षत्र में है। राहु बैटिंग टीम को सपोर्ट कर रहा है। लेकिन गोचर में राहु संधि में होने से आज न्यूट्रल हो गया है, लम्बे शॉट लगवायेगा, लेकिन कैच भी छुड़वायेगा, कुछ रन आउट करवायेगा। लेकिन यहाँ एक बैट्समैन धैर्य से खेलेंगा, आक्रामक शॉट लगायेगा। शनि पहली टीम को सपोर्ट करेगा, यहाँ विकेट जायेंगे, रन रेट धीमा रहेगा। आज का मैच बुध तय करेगा। *तमाम उतार चढ़ाव के बाद अन्त में बाद में खेलने वाली टीम के जीतने की सम्भावना दिखाई दे रही है।*

>>सैनी ने बरी केली बॉलींग. >> बरी ?
अरे बरी एव्हढ्यासाठीच की समोर खेळणारे रशीद आणि भुवी होते.... इतरांसमोर तो डेथ ओव्हर मध्ये कसा परफॉर्म करतोय ते बघू आणि मग चांगला वगैरे म्हणू (उगाच पुणेरीपणा ;))

सुंदरला अजुन ओव्हर्स मिळायला पाहिजेल होत्या पण शिवम दुबेची बॉलिंग चालल्यामुळे मिळाला नसेल कदाचित चान्स!

पंजाब ला शॉर्ट रन चा फटका बसला ते मान्य. पण अंपायरचं डिसीजन कधीही कुणाच्याही फेवरमधे जाऊ शकतं.
पण त्या नंतरही पंजाबला खूप चान्स होता आणि त्यांनी पूर्ण चोक केलं, ते ३ चेंडूंमधे १ रन करू शकले नाहीत म्हणून हरले.

सूपर ओव्हरमधे पण पंजाबच्या खेळाडूंना काही खास करता आलं नाही (फलंदाजी, गोलंदाजी दोन्हीत) म्हणून ते हरले.

शॉर्ट रन चा बहाना करून अत्याबाईला मिशा असत्या तर वगैरे कमेंट्स निदान सेहवागकडून अपेक्षित नाहीत.

पंजाब ला संधी होती, त्यांनी ती घालवली हे खरंय. पण अंपायरिंग धन्य आहे हे ही तितकच खरं. आज सुद्धा टॉम करन च्या थायपॅड ला लागून आणी धोनी ने एक टप्पा (हाफ व्हॉलीवर) उचललेल्या बॉलवर आधी त्याला आऊट दिलं, मग मोठ्या स्क्रीनवर रिप्ले बघून थर्ड अंपायरकडे डिसीजन रिफर केला.

पण आजची मॅच जवरदस्त झाली. संजू अप्रतिम खेळला.

हो... काल संजूचा दिवस होता.... किपींगही भारी केली त्याने.... संपूर्ण सीझन असाच सातत्यपूर्ण खेळू दे म्हणजे रिषभ पंतला एक चांगला पर्याय उभा राहील.
स्मिथही अगदी पहील्या बॉलपासून चांगला खेळला... कॅप्टन्स नॉक! बटलर आल्यावर अजुन मजा येईल.
यशस्वी आणि ऋतूराजने निराशा केली.... यशस्वीला अजुन संधी नक्की मिळेल पण रायडू आल्यावर ऋतूराजला बाहेर जावे लागेल.

फाफ जस्ट रॉक्स!
धोनीने आता चार नंबरवर खेळायला पाहिजेल आणि फिनिशरचा रोल केदार जाधव, जडेजा, करन, ब्राव्हो वगैरे मंडळींकडे दिला पाहिजेल.
तो काल वरती आला असता तर पडझड नक्की थांबली असती आणि कालचे पीच बघता विकेट्स हातात असत्या तर कालचे टारगेट अज्जिबात अवघड नव्हते.
पहील्या पाच ओव्हरनंतर ते जिंकण्यासाठी वगैरे न खेळता NRR फार घसरु नये एव्हढ्यासाठी खेळले वगैरे मान्य पण धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये जे केले ते दोन ओव्हर आधी सुरु केले असते तर चेन्नई जिंकले असते.

असो! पण भारी झाली मॅच Happy

संजू सॅमसन दरवेळी मध्येच एक दोन ईनिंग अश्या अविश्वसनीय टायमिंगवाल्या खेळतो. पण ईतर दिवशी लगेच बाद होतो. त्याला इनिंग बिल्ड करता येत नाही. जोपर्यंत हे शिकणार नाही तोपर्यंत त्याची भारतीय संघात कायमस्वरुपी जागा कधीच बनणार नाही.

बुमराहने खरे तर पहिल्या सामन्यात निराश केलेले. फॉर्म नसेल वा खेळपट्टीचा अंदाज नसेल, मदत नसेल, पण तरीही सामान्य गोलंदाज भासत होता.
काल मात्र बुमराह पुन्हा बुमराह वाटला. शेवटच्या ओवरला झाले ते होऊ शकते. स्पेशली सामन्याचा निकाल लागलेला असताना. पण आधी केले ते भारी होते. रसेल आणि मॉर्गन या फॉर्मेटमधील खास प्लेअर त्यांच्यासमोर तो अटॅक करत होता. रसेलला तर मस्तच, बाऊन्सर न टाकता विकेटवर अटॅक करत होता. मागचा सामना साधारण गेल्यानंतर आणि एकूणच त्याआधी ईंटरनॅशनलमध्येही फारसा फॉर्ममध्ये नसताना कालची स्वतःच्या अ‍ॅबिलिटीवर विश्वास असलेली बॉलिंग आवडली.

*जोपर्यंत हे शिकणार नाही तोपर्यंत त्याची भारतीय संघात कायमस्वरुपी जागा कधीच बनणार नाही.* -
सॅमसन माझा खूप आवडता खेळाडू . कदाचित, भारतीय संघात कायम जागा मिळण्याच्या दीर्घकालीन अनिश्चिततेमुळेच त्यांच्य खेळात , विशेषत: फलंदाजीत, परिपक्वता येत नसावी. अंडं आधी कीं कोंबडी, असाच काहीसा हा प्रकार असावा.

मी एक नवीन ट्रिक काढले आवडत्या टीमचे सामने बघण्यासाठी. क्रीकबझ साईटवर स्कोर ओपन करायचा आणि हॉटस्टार वर 1 बॉल डिले ठेवायचा म्हणजे पुढच्या बॉलला काय बघायला मिळेल हे आपल्याला आधीच समजतं. जर 4 6 जाणार असेल तर कसा मारला हे बघण्याची उत्सुकता आणि विकेट गेली तर दुःख सोसण्याचं बळ मिळतं. तेव्हडा भाग स्कीप करून बघितला तरी चालतो.

Pages