Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*रोहितची पुंगी वाजली तर ...*
*रोहितची पुंगी वाजली तर ...* 'पुंगी' ऐवजी रोहितच्या संदर्भात ' तुतारी ', ' रणशिंग' इ. कांहीही वापरणं औचित्यपूर्ण ठरलं असतं असं मला वाटतं. इथला विश्वास संपादन करायला विश्वचषकातली पांच रूबाबदार शतकंही कमी पडावी, हें नवलच आहे !
कांगारू वॉर्नरला नक्की
कांगारू वॉर्नरला नक्की खेळविणार त्यामुळे रोहित संघात हवाच. त्याने ३-४ षटकात खेळपट्टीवर बस्तान ठोकतो. आणि गोलंदाजाला दिशाहीन व्हायला उद्युक्त करतो. त्यामुळे गोलंदाजावर वॉर्नर प्रमाणे दडपण आणू शकतो.
रोहित शर्मा ला उप-कप्तानपद
रोहित शर्मा ला उप-कप्तानपद दिलंय.
टी. नटराजन (यादव च्या जागी) आणी ठाकूर (शामी च्या जागी) भारतीय संघात.
माझ्या मते तिसऱ्या कसोटीत संघ
माझ्या मते तिसऱ्या कसोटीत संघ असा हवा
1 रोहित
2 गील
3 पुजारा
4 रहाणे
5 विहारी
6 पंत
7 जडेजा
8 अश्विन
9 बुमराह
10 नटराजन
11 सिराज
सामा, बहुतेक तसाच असेल
सामा, बहुतेक तसाच असेल त्यातल्या त्यात नटराजन आणी सैनी मधे कुणाला निवडतात ते बघायचं आहे. दोघंही फास्ट बॉलर्स आहेत (ठाकूर फास्ट-मिडीयम आहे). नटराजन डावखोरा म्हणून व्हरायटी अॅड करतो, तर सैनी चा फर्स्ट-क्लास मधला अनुभव नटराजनपेक्षा जवळ जवळ चौपट आहे. बघू कुणाची निवड होते.
इथला विश्वास संपादन करायला
इथला विश्वास संपादन करायला विश्वचषकातली पांच रूबाबदार शतकंही कमी पडावी, हें नवलच आहे ! >> त्यातले किमान एक तरी (अर्धेही चालेल) लाल बॉल समोर ऑस्ट्रेलिआमधे येईतो माझ्यासाठी तरी हि पुंगीच भाऊ. तो टिकला तर काय करतो हे सगळ्यांनाच माहित आहे पण स्विंग होणार्या बॉल्स वर अगदी लिमिटेड ओव्हर क्रिकेट मधेही त्याला कितीदा उघडे पडलेले पाहिले आहे. बाउन्स ला सहज हँडल करू शकतो हि प्ल्स होणारी ओष्ट आहे म्हणून पहिली ८-१० षटके किंवा बॉल जुन अहोइतॉ टिकला तर पुंङीची तुतारी च काय नगारासुद्धा होईल आरामात.
नटराजन असल्यास फूटमार्क चा फायदाहोउ शकेल फक्त त्याला लोंग फॉर्मट चा कितपत अनुभव आहे देव जाणे .
*त्यातले किमान एक तरी
*त्यातले किमान एक तरी (अर्धेही चालेल) लाल बॉल समोर ऑस्ट्रेलिआमधे येईतो माझ्यासाठी तरी हि पुंगीच* - कसोटीत 6 शतकं व 10 अर्ध शतकं ( एक द्विशतक), लाल बाॅल समोरच असावीत ना ! त्यांत अधिक अनुभवाने आलेली परिपक्वता, सध्या सांपडलेली व बहरात असलेली लय , याला कांहींच महत्व नाहीं? आणि, ज्यांच्यावर ( मयांक, गिल, विहारी इ. ) इतका विश्वास दाखवला जातोय, त्यांची ऑस्ट्रेलियात लाल बाॅल समोरची कामगिरी कुठल्या रेकाॅर्ड बुकमधे नोंदवली गेली आहे ? तरी पण तो विश्वास अर्थपूर्ण असतोच ना !
रोहित आतां कांहीं भरीव कामगिरी करेल किंवा नाहीं, हें दुय्यम आहे ( ती गॅरंटी तर कोणाच्याच बाबतीत देतां येत नाहीं). पण , इतक्या प्रतिभावान, अनुभवी, बहरात असलेल्या एका आकर्षक फलंदाजाबद्दल त्याला ' गाजराची पुंगी ' ठरवण्याइतपत कमालीचं उपहासात्मक व नकारात्मक लिहीलेलं वाचून मला खूप वाईट वाटलं, हें मात्र नक्की .
आज शोएब अखतरने बुमराहच्या गोलःदाजीचं विश्लेषण करत त्याच्यावर स्तुतिसुमनांची उधळणच केलीय ! वाचून खूप बरं वाटलं.
दादाला ह्रदयविकाराचा झटका
दादाला ह्रदयविकाराचा झटका
गेट वेल सून दादा
अजून बरेच काही करायचे आहे आपल्याला क्रिकेटसाठी
https://ratnagirikhabardar.com/archives/47103
*गेट वेल सून दादा* +1 !
*गेट वेल सून दादा* +1 !
रोहित आतां कांहीं भरीव
रोहित आतां कांहीं भरीव कामगिरी करेल किंवा नाहीं, हें दुय्यम आहे ( ती गॅरंटी तर कोणाच्याच बाबतीत देतां येत नाहीं). पण , इतक्या प्रतिभावान, अनुभवी, बहरात असलेल्या एका आकर्षक फलंदाजाबद्दल त्याला ' गाजराची पुंगी ' ठरवण्याइतपत कमालीचं उपहासात्मक व नकारात्मक लिहीलेलं वाचून मला खूप वाईट वाटलं, हें मात्र नक्की .+११११११११११११११११११११११११
रोहीत शर्माची एकदिवसीय
रोहीत शर्माची एकदिवसीय कारकिर्द सुरुवातीला अडखळतच झाली. तरी विश्वास दाखवला गेला. संधी मिळाली. सोने केले. आज तो त्या फॉर्मेटमधील लिजंड आहे म्हटले तरी वावगे नाही.
टेस्टमध्ये परदेशात फ्लॉप आहे हे समजू शकतो. पण मायदेशात जे केलेय ते अचाट आहे हे देखील नाकारता येत नाही.
वरील दोन्ही मुद्द्यांचा एकत्र विचार करता रोहीतला या फॉर्मेटम्ध्ये हलके लेखणे मलाही बरेचदा खटकते. त्यामुळे मनापासून ईच्छा आहे की त्याने खेळावे.
आणखी एक गोष्ट म्हणजे आपण मागचा सामना जिंकलो म्हणून आपला ओपनिंगचा प्रॉब्लेम निकालात निघाला आहे असे नाही. मायदेशात ओपनिंगला शर्मा जबरदस्त आणि ईम्पॅक्ट प्लेअर वाटतो. जर तोच परदेशातही चांगला खेळू लागला तर संघ स्थिर होईल. कारण मायदेशात शर्मा आणि परदेशात दुसरा कोणीतरी ओपनर असे तर काही आपण नेहमी करणार नाही.
इतक्या प्रतिभावान, अनुभवी,
इतक्या प्रतिभावान, अनुभवी, बहरात असलेल्या एका आकर्षक फलंदाजाबद्दल त्याला ' गाजराची पुंगी ' ठरवण्याइतपत कमालीचं उपहासात्मक व नकारात्मक लिहीलेलं वाचून मला खूप वाईट वाटलं, हें मात्र नक्की . >> भाऊ तुम्ही ' गाजराची पुंगी ' हा वाकप्रचार कशा अर्थाने वापरता हे माहित नाही पण मी तरी वर एक प्रयोग ह्या अर्थाने वापरला आहे. त्याला बाकीची जोडलेली विशेषणे मी नमूद केलेली नाहीत. हा दौरा सुरू होण्या अगोदर पासून सध्याचे कोणीच ओपनर क्वालिटी स्विंग बॉलिंग सातत्याने खेळायला उपयुक्त नाहीत हे मी वारंवार म्हटले आहे. (ह्याचा अर्थ त्यांनी धावा काढू नये असे मी म्हणत नाही हे ही लक्षात घ्या. ) स्वतःचा कमकुवत पणा नि मर्यादा मान्य केल्याशिवाय प्रगती अशक्य आहे असे मला वाटते त्यासाठी नुसता विश्वास पुरेसा नाही. भारतात (सब काँटीनेंट - सध्याच्या विंडीज मधे) खोर्याने धावा काढणे (हे सोपे आहे असे नाही पण त्यासाठी लागणारे तंत्र वेगळे आहे) नि भारताबाहेर काढणे ह्यात जमिन अस्मानाचा फरक आहे नि दोन्ही कडे यशस्वी होइतो तो फलंदाज परीपूर्ण फलंदाज आहे असे मी म्हणू शकत नाही. रोहित चा लिमिटेड क्रिकेट चा रेकॉर्ड सर्वत्र जबरदस्त आहे म्हणून तो त्यात लिजंड आस्ट, टेस्ट मधे तो मयांक, गिल, शॉ ह्यांच्यांच रांगेमधे अजूनही प्रयोगच आहे.
*सध्याचे कोणीच ओपनर क्वालिटी
*सध्याचे कोणीच ओपनर क्वालिटी स्विंग बॉलिंग सातत्याने खेळायला उपयुक्त नाहीत हे मी वारंवार म्हटले आहे. * - असामीजी, ' सध्याचे 'च कां, अगदीं दुर्मिळ अपवाद वगळता ,क्वालिटी स्विंग बॉलिंग विश्वासपूर्वक खेळणारे ओपनर आपल्याकडे कधींच नव्हते व त्याची कारणंही स्पष्ट आहेत. तरीही आपण खेळवलेले कांहीं ओपनर आश्चर्यकारक कामगिरी करून गेले आहेत, अगदीं याच ऑस्ट्रेलियातही (उदा. श्रीकांत, सेहवाग इ.). त्यामुळे, रोहितसारखा प्रतिभावान, अनुभवी व फाॅर्मात असलेला ओपनर सुदैवाने उपलब्ध झालाच आहे , तर साशंकता निर्माण न करतां त्याला कसोटीसाठी निखळ शुभेच्छा देणंच योग्य, हें माझं मत.
' गाजराची पुंगी' याचा प्रचलित अर्थच मीं घेतला आहे; जर नाईलाजाने बुमराह, उमेश यादव किंवा चहल अशाना ओपनर म्हणून खेळवावं लागलं असतं, तर हा वाक्प्रचार चपखलपणे वापरतां आला असता. रोहितच्या बाबतीत तो वापरणं मात्र उपहासात्मकच होतं, याची मला खात्री आहे. आपल्याला तो तसा वापरायचा नव्हता असं असेल, तर उत्तमच.
आता तो पंतचा चाहत्याला मिठी
आता तो पंतचा चाहत्याला मिठी मारायचा अति उत्साह रोहित, गिलना नडु नये म्हणजे झालं.
टेस्ट मधे तो मयांक, गिल, शॉ
टेस्ट मधे तो मयांक, गिल, शॉ ह्यांच्यांच रांगेमधे अजूनही प्रयोगच आहे>>>
आणि म्हणूनच त्याला उपकाप्तान करणं हा बाकी रेग्युलर टेस्ट प्लेअर्स वर अन्याय आहे.
पुजारा, आश्विन यापैकी कुणालाही करता आलं असतं
माध्यमं आणि एक्स्पर्ट लोकांनी त्याला अगोदरपासूनच सुपर ह्यूमन ट्रीटमेंट दिली आहे. तो येऊन सगळं ठीक करणार अशी हवा आहे. त्यात त्याच्या कंफर्ट झोन च्या बाहेर खेळताना त्याच्या डोक्यावर उपकप्तान पदाची जवाबदारी कशाला???
*आणि म्हणूनच त्याला उपकाप्तान
*आणि म्हणूनच त्याला उपकाप्तान करणं हा बाकी रेग्युलर टेस्ट प्लेअर्स वर अन्याय आहे.* - कर्णधार व उपकर्णधार निवडीला 'सिनिऑरिटी' च्या निकषाव्यतिरिक्त इतर निकषही महत्वाचे असतात. रोहितचं दोन कसोटीतलं स्थान नक्की असल्याने त्याला त्याच्या कर्णधार म्हणूनच्या चांगल्या व दीर्घ अनुभवावरून 2 कसोटींपुरताच उपकप्तान केलं, यांत अन्यायकारक काय आहे हें कळलं नाहीं.
रोहितचं दोन कसोटीतलं स्थान
रोहितचं दोन कसोटीतलं स्थान नक्की असल्याने
>>
जर रोहितचा परफॉर्मन्स पृथ्वि शॉ टाईप्स झाला, तर शॉ ला लावलेला न्याय त्याला लागू होणार नाही का?
कर्णधार म्हणूनच्या चांगल्या व दीर्घ अनुभवावरून
>>
रोहितला लाँगर फॉर्मॅट मधे कर्णधारपदाचा अनुभव कुठे आहे?
व्हाईट बॉल / लिमिटेड ओव्हर्सच्या सामन्यातली रणनीती, अन टेस्ट मधली रणनीती सारखीच??
त्यात गेल्या काही वर्षांमधे रोहित सातत्यानी रणजी / भारत अ सारख्या प्रथमश्रेणी सामन्यांमधे खेळला नाही आहे.
पुजारा / अश्विन या दोघांनीही (३-४ दिवसाच्या) प्रथमश्रेणी सामन्यांमधे कर्णधार म्हणून काम पाहिलं आहे. गेलाबाजार विहारी अन राहुलनी पण हे केलंय.
त्यांच्या रेलेव्हंट अनुभवाला डावलून, रोहितला, जो व्हाईट बॉल परफॉर्मन्सवर टेस्ट टीम मधे येतो, उपकर्णधार करणं हा अन्यायच आहे.
*जर रोहितचा परफॉर्मन्स पृथ्वि
*जर रोहितचा परफॉर्मन्स पृथ्वि शॉ टाईप्स झाला, तर शॉ ला लावलेला न्याय त्याला लागू होणार नाही का?* - रोहितबद्दल इथं सतत असं नकारात्मकच बोललं जातं, म्हणूनच मला त्याची गुणवत्ता अधोरेखित करण्याचा मोह आवरत नाहीं ( तो माझा आगाऊपणा वाटला तरीही ). झाली त्याची कामगिरी शाॅसारखी तर जाईलही तो पडद्याआड व मला तें खेददायकच वाटेल. पण आत्ता तरी त्याचा फाॅर्म कसोटीतही टिकून संघाला लाभ होईल असा विचार कां नको ? आणि, ' जो व्हाईट बॉल परफॉर्मन्सवर टेस्ट टीम मधे येतो ', हेंही खरं आहे का ? तो टेस्ट खेळाडू होता व आहे . फक्त, व्हाईट बाॅल परफॉर्मन्समुळे त्याला आतां पक्की लय सांपडलयाचं सिद्ध झालं इतकंच. तिसरं, नेतृत्व गुण व खेळाची जाण याबाबतीत कर्णधार म्हणून फाॅरमॅटमुळे फारसा फरक पडतो असं मला तरी वाटत नाहीं.
मयांकने 'स्टान्स' बदलल्याने
मयांकने 'स्टान्स' बदलल्याने त्याची गोची होतेय , अस॔ गावसकरने एका मुलाखतीत सांगितलय. दुसर्या एका कोचनेही त्याला दुजोरा दिलाय. मला पडलेले प्रश्न - इतकी ढोबळ चूक असेल तर ती बॅटींग कोच , शास्त्रीजी , संघातले अनुभवी खेळाडू यापैकी कुणाच्याच लक्षात आली नाहीं ? मुलाखती ऐवजी गावसकर हेंच अनौपचारिकपणे संबंधितांना सुचवूं शकत नाहीं का ? कांहीं अलिखित प्रोटोकॉल आड येतात का ?
नशीब, 'त्या' पांच खेळाडूंचे रिपोर्ट निगेटीव्ह आलेत , ही एक पॉझिटीव्ह बातमी !
मुलाखती ऐवजी गावसकर हेंच
मुलाखती ऐवजी गावसकर हेंच अनौपचारिकपणे संबंधितांना सुचवूं शकत नाहीं का ? कांहीं अलिखित प्रोटोकॉल आड येतात का ?>> गावस्करला त्याचे पैसे थोडीच मिळतात
मुलाखतीचे मिळतात..
रोहितने ऑस्ट्रेलियामध्ये दोन
रोहितने ऑस्ट्रेलियामध्ये दोन टूर्समध्ये (२०१४, २०१८) ५ कसोटी खेळल्या आहेत. १० डावांत २ अर्धशतकं, ४ सिंगल डिजिट खेळ्या आहेत. ह्या वेळेस काही फार दिवे लावेल अशी अपेक्षा करवत नाही. खेळला तर ठीकच आहे. तरीही शतकाचीसुद्धा त्याच्याकडून अपेक्षा कितपत करायची हा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने मी असामीशी सहमत आहे.
२ वर्षांपूर्वी मी नोंदवलेलं
२ वर्षांपूर्वी मी नोंदवलेलं एक निरीक्षण पुन्हा गंमत म्हणून - पंतच्या त्या एका ऑस्ट्रेलिया (टेस्ट) सिरीजमधल्या एकूण धावा ह्या धोनीने ऑस्ट्रेलियामध्ये ३ (टेस्ट) सिरीजमध्ये जितक्या धावा केल्या, त्यापेक्षा जास्त होत्या.
*ह्या वेळेस काही फार दिवे
*ह्या वेळेस काही फार दिवे लावेल अशी अपेक्षा करवत नाही* - ज्या आंकडेवारीच्या आधारे हा अंदाज बांधला आहे , ती आंकडेवारी मलाही माहित आहे. पण उपजत प्रतिभा, चूका सुधारून स्वत:ला सिद्ध करणयाची जिद्द व मुख्य म्हणजे गवसलेला दिर्घकालीन फाॅर्म , हे घटक आंकडेवारीला मात्र माहित नसतात. या घटकांच्या आधारेच तर खेळाडू दीर्घकालीन ' बॅड पॅच' मधूनही बाहेर येवून आंकडेवारीला धाब्यावर बसवत नवीन उंची गाठूं शकतात .म्हणून, रोहितही आतां ' दिवे ' लावण्याची दाट शक्यता मला दिसते, खात्री नसली तरीही !
भाऊ माझ्या आठवणी प्रमाणे
भाऊ माझ्या आठवणी प्रमाणे २००८ च्या आसपास रोहित ची चर्चा नेक्स्ट बिग थिंग म्हणून होऊ लागली होती. हि चर्चा फक्त लिमिटेड क्रिकेट पुरती मर्यादित नसून जनरल होती. भवती न भवती करत, वेगवेगळ्या कारणामुळे तो टेस्ट मधे रेग्युलर व्हायला तब्बल ९-१० वर्षे लागली. गुणवत्ते बाबत वाद नाही, सध्याच्या फॉर्म बद्दल्ही प्रश्न नाही नि लिमिटेड क्रिकेट मधे त्याचे नाव कोहली च्या आधी सर्कल केले जावे ह्यात शंका नाही पण ह्या सर्वांचा अर्थ त्याला टेस्ट मधे तेही स्पेसिफिकली ऑस्त्रेलियामधे सुपर ह्यूमन ट्रीटमेंट देणे मला तरी पटत नाही. तो यश्स्वी व्हावा का ह्याबद्दल कोणताच सच्चा चाहता काकू करणार नाही पण त्याबद्दल साशंकता व्यक्त करणे सुद्धा खटकावे ? एक सेहवाग चा खणखणित अपवाद वगळता आपले ओपनर स्लोवर टाईप चे होते. जेंव्हा जेंव्हा पहिली १५-२० षटके खेळून पन्नास साठ धावांची सलामी देतात तेंव्हा मधळी फळी धुमाकूळ घालत आलेली आहे. रोहित , शॉ सारखे खेळाडू खेळतात तेंव्हा मोमेंटम हिरावून घेतात ह्यात शंकाच नाही पण किती वेळा ते होणार हे अनिश्चित आहे अशा वेळी नव्या बॉल ची लकाकी घालवू शकतील अशा ओपनर मधे इन्वेस्ट करणे जास्त श्रेयस्कर नाही का ?
रोहित च्या वयाचा मुद्दा तर मी घेतच नाही.
असामीजी, रोहितविषयी तुम्हाला
असामीजी, रोहितविषयी तुम्हाला शंका अधिक व आशा कमी आहे व माझं प्रमाण नेमकं उलटं आहे. तसं असण्याची कारणंही मीं व तुम्हीही दिली आहेत. आतां सर्वांसाठीच फक्त महत्वाचं म्हणजे, प्रत्यक्षात काय घडतं . इच्छा असो वा नसो, शेवटीं तेंच खरं असणार व ठरणार आहे व आपण तें स्वीकारणारच आहोत !!
)
(असामीजी, तुमच्याशी थोडा वाद घालून इतरांना माझी दखल घ्यायला लावण्याचा माझा हेतू सफल झाला, असंच समजा !
इच्छा असो वा नसो, शेवटीं तेंच
इच्छा असो वा नसो, शेवटीं तेंच खरं असणार व ठरणार आहे !! >> आशा करूया की सगळ्यांना आवदेल असे ते असेल
रोहितविषयी तुम्हाला शंका अधिक व आशा कमी आहे व माझं प्रमाण नेमकं उलटं आहे. >> हे मी SNES देशांबद्दल च आहे.
रोहित ने यशस्वी व्हावं ह्या
रोहित ने यशस्वी व्हावं ह्या अपेक्षा सगळ्यांच्याच आहेत. त्याला शुभेच्छा! पण त्याचं अवे आणी त्यातूनही ऑस्ट्रेलियातलं टेस्ट रेकॉर्ड बघता, 'आला रे, आला, भारताचा तारणहार आला' अशी जी एक भुमिका माध्यमांतून घेतली जातेय, पुजारा, अश्विन वगैरे टेस्ट सिनियर्स ना डावलून त्याला उपकप्तानपदी बसवलं गेलंय, ह्याला कुठलाच आधार नाहीये. बाकी मुद्दे जे वर असामी आणी भा ने मांडले आहेत त्याच्याशी सहमत आहे.
*पण त्याचं अवे आणी त्यातूनही
*पण त्याचं अवे आणी त्यातूनही ऑस्ट्रेलियातलं टेस्ट रेकॉर्ब बघता, ..* मी माझ्या "पण उपजत प्रतिभा, चूका सुधारून स्वत:ला सिद्ध करणयाची जिद्द व मुख्य म्हणजे गवसलेला दिर्घकालीन फाॅर्म , हे घटक आंकडेवारीला मात्र माहित नसतात" , यावर ठाम आहे. फक्त रेकॉर्ड बघून केलेलीं खेळाडूची पारख व भाकीतंच खरी ठरत असतील, तर माझ्यासाठी तरी क्रिकेटमधील गंमतच निघून जाईल .
आला रे, आला, भारताचा तारणहार
आला रे, आला, भारताचा तारणहार आला' अशी जी एक भुमिका माध्यमांतून घेतली जातेय
>>>>
माईंडगेम असू शकेल हा. असल्यास चांगली स्ट्रॅटेजी आहे. नसल्यासही हे फायदेशीर आहे.
सद्यस्थितीत शॉ चा खेळ आणि मयंकचा फॉर्म बघता रोहीतची थेट जागा संघात होतीच. मग आता नाईलाजाने तिसरा पर्याय वापरतोय, अजून आमचा ओपनिंगचा प्रॉब्लेम सुटला नाहीये हे दर्शवण्याऐवजी का नाही रोहीतच्या एंट्रीची हवा करून एकंदरीतच संघाचे मॉरल बूस्ट करा.
बाकी कोणाला कोहलीचा पहिला ईंग्लंड दौरा आठवतो का? कि विसरली लोकं
"पण उपजत प्रतिभा, चूका
"पण उपजत प्रतिभा, चूका सुधारून स्वत:ला सिद्ध करणयाची जिद्द व मुख्य म्हणजे गवसलेला दिर्घकालीन फाॅर्म >> माझा काही गोंधळ होत नसेल भाऊ तर प्रतिभे बद्दल हा वाद नाहिये. उरलेल्या दोन घटकांमधे पहिला घटक नक्की तुम्हाला कसा जाणवला ह्याबद्दल लिहू शकाल का ? मला आठवतेय तेंव्हापासून रोहित तसाच नि त्याच चेंडूंवर अगदी लिमिटेड ओव्हर्स मधेही बाद होत आला आहे (लेग स्पिनर, किंवा आत येणारा बॉल) . इनिंग बिल्ड करयाची मॅच्युरिटी, वाढवत नेलेला स्ट्राईक रेट हे त्याचे जबरदस्य प्ल्स पॉईंट आधीपासूनच आहेत (किंबहुना त्यामूळे लिमिटेड ओव्हर्स मधे लिजेंड ठरलाय ). तिसर्या घटकाबद्दल तुम्ही लिमिटेड ओव्हर्स नि टेस्ट मधे ओव्हर लॅप करता आहात असे मला तरी वाटतेय पण हा पर्स्पेक्टीव्ह चा भाग असल्यामूळे सोडून देऊ.
प्रियांक पांचाल नि इस्वरन हे दोघे रणजी मधे बर्यापैकी आब राखून ठेवेलेले ओपनर्स आहेर्स, अ टीम मधून खेळतात. क्लासिकल ओपन्र्स आहेत.
Pages