Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*....भागीदारी विशेष उल्लेखनीय
*....भागीदारी विशेष उल्लेखनीय होत्या* .
मला आपल्या फलंदाजीत आणखी एक ऐतिहासिक म्हणण्या इतपत फरक जाणवला - बाहेरच्या चेंडूला बॅटने टपली मारायला धांवणयाच्या आपल्या पारंपारिक खोडीची नव्या खेळाडूंना लागण झालेली दिसत नाहीं . निदान आज तरी तशा चेंडूच्या वाटेलाच ते जात नव्हते !!
रहाणे काल जबरदस्त खेळला.
रहाणे काल जबरदस्त खेळला. विहारी आणी पंत बरोबरच्या अर्धशतकी आणी जडेजाबरोबरची शतकी भागीदारी विशेष उल्लेखनीय होत्या. >>> +१
जबरी झाला कालचा खेळ. जडेजा सुद्धा आत्तापर्यंत मी बघितला नव्हता इतका सांभाळून खेळला. तिसर्या सत्रात ऑसीज ची झालेली दमछाक बघायला मजा येत होती. सोडलेले कॅचेस, खचलेली बॉडी लँग्वेज! असे फार क्वचित दिसतात ते. नाहीतर बराचसा दिवस त्यांच्या प्रमुख तीन बोलर्स नी राखलेली लाइन अॅण्ड लेन्थ जबरदस्त होती.
स्मिथची वैशिष्ट्यपूर्ण विकेट
स्मिथची वैशिष्ट्यपूर्ण विकेट निर्णायक ठरण्याची दाट शक्यता!
९८-५
९८-५
भारतीय संघ विजयाकडे
मालिका १-१
कोहलीची सुट्टी भारताच्या पथ्यावर
99-6 ! ग्रेट !!!
99-6 ! ग्रेट !!!
99-6 ! ग्रेट !!!
अश्विनची आजची क्षेत्ररक्षणातली cmmitmentही कौतुकास्पद !
स्टंपला मायक्रोफोन तसं त्या पंतला सायलेन्सर नाहीं बसवतां येणार ?
पंत ने सोडलेला कॅच महागात जाऊ
पंत ने सोडलेला कॅच महागात जाऊ नये अशी आशा आहे.
जिंकलोय !
जिंकलोय ,गिल व सिराज दोन नवीन आशा पल्लवित करत !!
जिंकलो!
जिंकलो!
खुप दिवसांनी जिंकल्याचा माज न वाटता समाधान वाटतेय.... like good old days
जिंकलो!
जिंकलो!
खुप दिवसांनी जिंकल्याचा माज न वाटता समाधान वाटतेय....>>>>
जबरदस्त अनुमोदन..
आणि भारतीय टीम भारतीय न वाटता न्यूझीलंडची टीम वाटत होती. नो बिग नेमस, पण सांघिक कामगिरीच्या आधारे जिंकले...
छान कामगिरी भारतीय संघाची.
छान कामगिरी भारतीय संघाची. असेच पुढे सुरु ठेवा. पुढच्या सामन्यात उमेश खेळू नाही शकला तर तेवढा एक बदल आणि रोहितला खेळवायचे तर कुठे खेळवावे?कदाचित विहारीला विश्रांती देतील असे दिसते. शुभमनचा सकारात्मक खेळ आणि आत्मविश्वास बघता त्याला संघात ठेवावे.
अजिंक्य रहाणे अभिनंदन!! आता मालिकेतही अजिंक्य हो!
*..माज न वाटता समाधान वाटतेय.
*..माज न वाटता समाधान वाटतेय....>>>>* - रहाणे इफेक्ट असावा !
आज बोर्डरला काॅमेंटस करताना बघून कॅप्टन असतांनाचा तो आठवला, शांतपणे स्थितप्रज्ञासारखा मिड-ऑन, लाॅग-ऑनला उभा राहून खेळावर बारीक लक्ष व डोक्यात डावपेच ! रहाणे विकेटच्या मागच्या बाजूला उभा असतो, इतकंच !!
कसोटी जिंकल्यावरचा आनंद
कसोटी जिंकल्यावरचा आनंद वेगळाच, लवकर उठून टीव्ही पुढे बसणं सार्थकी लागलं
आज सामना आपण बर्या पैकी सहज
आज सामना आपण बर्या पैकी सहज जिंकला! तरी देखिल वॉर्नरविना कांगारु दोन पायांऐवजी दिड पायावर पळत असल्या सारखे खेळले. दुसर्या डावात तब्बल १०३ षटके फलंदाजी केली परंतु केवळ २०० धावा जमविल्या. ते इतके संथ आजवर खेळल्याचे स्मरणात नाही! आता ही त्यांच्या फलंदाजीतील उणीव होती की आपल्या केवळ ४ गोलंदाजांनी (उमेशने पहिल्या ३.३ षटका नंतर नाही केली गोलंदाजी) अफलातून गोलंदाजी केली हे विश्लेषण करावे लागेल. सिराजने टप्पा अचूक ठेवला पहिल्याच सामन्यात त्यांने फलंदाजाना वर्चस्व गाजवू दिले नाही हे विशेष. अश्विनच्या फिरकीला नक्की कसे खेळावे ह्या संभ्रमात फलंदाज वाटले. स्टार्कला मिळालेल्या पंचाचा निर्णय ह्या गोष्टीचा लाभ हेजलवूडने चेंडू सोडून दिल्याने घेता आला नाही. जवळपास ४ वेळा पायचितबाबत पंचाचा निर्णय ह्या गोष्टीचा लाभ कांगारूना दुसर्या डावात मिळाला.
तरीही १०० हून अधिक षटके फलंदाज खेळपट्टीवर उभे होते म्हणजे खेळपट्टी भयंकर नव्हती हे मात्र नक्की!
सहसा आधीच्या सामन्यात जिंकणारा संघ हा समोरील संघाला दडपणाखाली ठेवत असतो. ह्या कसोटीत मात्र नेमके उलटे झाले. मागिल सामन्यात जिंकणारा संघ सुरुवातीपासूनच दडपणाखाली असल्या सारखा खेळला.
ह्यावर सर्वात महत्वाचे म्हणजे रहाणेचा खडूस शांतपणा. अगदी कुठेही उद्विग्न वा अती उत्साहात आतातायी निर्णय न घेणे.
* रोहितला खेळवायचे तर कुठे
* रोहितला खेळवायचे तर कुठे खेळवावे ? * मयांकच्या जागीं !
मुखात नेहमी शिव्या असणाऱ्या
मुखात नेहमी शिव्या असणाऱ्या कोहलीच्या दडपणाखाली खेळणारे खेळाडू या कसोटीत मोकळेपणाने खेळले आणि विजय मिळवला.
कसोटी बघायला मजा आली....
कसोटी बघायला मजा आली.... रहाणे अन जडेजा भागीदारी, अन सर्व गोलंदाजांची गोलंदाजी कमाल !!
अश्विनचा टप्पा कोणाला कळत नव्हता... आणी आपल्या सीमरने कमाल सातत्य दाखवल लाईन अन लेन्थ मधे.... एक नंबर मजा आली....
काल कायप्पा वर मेसेज आलेला... भारतीय संघाचा २०२१ मधील निर्धार - "अजिंक्य रहाणे"
जबरदस्त, खणखणीत विजय!!! Take
जबरदस्त, खणखणीत विजय!!! Take a bow - Ajinkya Rahane and team India!!!
२००३ च्या अॅडलेड वरच्या विजयाची आठवण आली. पहिल्या इनिंगमधे विजयाचा मार्गदाखवलेला राहूल द्रविड, दुसर्या डावात विजयी धाव घेताना पीचवर होता, तसंच काल रहाणेच्या बाबतीत झालं.
मस्त मेमोरेबल विजय !!!
मस्त मेमोरेबल विजय !!!
गिल नि सिराज ह्यांनी अपेक्षेपेक्षा सुंदर कामगिरी केली. राहाणे ला लागलेला सूर असाच जमून राहो. सर्वात कठी ण दिवशी त्याने सोन्यासारखी बॅटींग केली. सातत्य त्याला गेल्या २-३ वर्षांमधे फारच हुलकावणी देतेय. शास्त्री नि एकंदर टीम मॅनेजमेंटचे ही कौतुक करायला हवे. टीम ची निवड वेगळी होती, बॉलिंग चे डावपेच वेगळे होते, एव्हधेच काय पिचच्या बदलत्या स्वरुपानुसार पहिल्य नि दुसर्या डावात बॉलिंग एरिया बदलले होते. राहणे ने अपेक्षप्रमाणे अॅग्रेसिव्ह कॅपट्न्सी दाखवत फिल्ड प्लेस्मेंट केल्या होत्या नि बॉल्र्स नी सातत्याने ठरलेल्या प्लॅन प्रमाणे बॉलिंग करत त्याला साथ दिली हेही मह्त्वाचे. बुमरा चा किती धाक आहे राव, बॅट्स्मन आधीच ठरवून खेळतात असे नेहमी वाटत राहतेय. अश्विन नि जाडेजा ने मस्त बॉलिंङ केली काल, विशेषतः बॉल ला बाऊन्स मिळावा म्हणून जे टोस प होते ते झक्कासच होते.
अजून दोन सामने बाकी आहेत नि ऑसीज अशा वेळी चवताळून खेळतात , स्मिथ नि लबु दोघेही मोठ्या स्कोर साठी ड्यू आहेत तेंव्हा पुढच्या दोन मॅचेस मधे तेव्हढाच फोकस राहील अशी अपेक्षा ठेवूया. मयां ची जागा रोहित घेईल ( दोघेही स्टार्क च्या आत येणार्या चेंडू वर तसेच चकतात फक्त रोहित अजून अन प्रोव्हन आहे एव्हढेच) विहाॠ च्या जागी राहूल येईल नि उमेश फीट नसेल तर सैनी एव्हढेच बदल होतील असे वाटते.
मला एकंदर कोहली वि राहणॅ असा जो सूर लागलेला दिसतो तो बघून मजा वाटतेय. एकंदर विजय नि पराजय हे फक्त कप्तानच घडवतो असे लोकांना वाटते हे उघड आहे.
*विहारी च्या जागी राहूल येईल
*विहारी च्या जागी राहूल येईल नि ,,,,,* - विहारीच्या आधी राहूलला खेळवणं अपेक्षित व तर्कशुद्ध झालं असतं . पण एकदां विहारीवर अधिक विश्वास दाखवल्यावर आतां त्याला आणखी एक संधी देणं क्रमप्राप्त असावं. शाॅ व मयांक इतकं त्याला डावलणं समर्थनीय वाटत नाहीं .
विहारीला काढण्यात मलाही फारसा
विहारीला काढण्यात मलाही फारसा पॉईंट दिसत नाही. कारण या सामन्यात एकदाच खेळला. जास्त धावा केल्या नसल्या तरी खूप चाचपडला असेही नाही. दोन सामने खेळलाय. परीस्थितीशी जास्त एकरूप झाला आहे. येत्या सामन्यात मोठी खेळी करू शकतो. तिसरा सामना द्यायला हरकत नाही.
बाकी पर्सनल चॉईस राहुल आहे. आवडीचा खेळाडू आहे. संघात आला तर आवडेल.
शर्माबद्दल मात्र फार उत्सुकता आहे. त्याच्या आगमनाची सोशल मिडीयात फार हवा आहे. पहिला स्पेल खेळून गेला तर ईम्पॅक्ट प्लेअर आहे. खेळला तर पुन्हा टाळ्या आणि शिट्या, कोहलीच्या खेचाखेचीला सुरुवात होंणार
हेडिंग्ले २००२, पर्थ २००८ आणि
हेडिंग्ले २००२, पर्थ २००८ आणि आता मेलबोर्न २०२०! जबरी कमबॅक्स! रहाणे ची इनिंग ऑल टाइम बेस्ट पैकी! अॅडलेडही आठवण फेफ म्हणतो तशी दोन्ही डावात रहाणे खेळल्याने झाली.
सिराज आणि गिल दोघेही जबरी होते. पदार्पणाच्या सामन्यात खेळत आहेत असे नवखे अजिबात वाटले नाहीत.
विहारी ला बहुतेक काढणार नाहीत
विहारी ला बहुतेक काढणार नाहीत, किंबहूना काढू नये असं वाटतं. त्याने पहिल्या इनिंग ला चांगली बॅटींग केली. रहाणे बरोबर ५०+ ची पार्टनरशिप सुद्धा होती. लायन च्या बॉलिंगवर छान फूटवर्क होतं. लायन ला डॉमिनेट करताना आऊट झाला, पण बॅट्समन-बॉलर च्या द्वंद्वात ते कधीतरी घडतंच. एक (लागलाच तर) बॉलिंग ऑप्शन सुद्धा विहारी मुळे मिळतो जो पुढे मागे वापरायला लागू शकतो. असामी म्हणतो तसं लबूशेन आणी स्मिथ मोठ्या स्कोअरसाठी ड्यू आहेत, कदाचित वॉर्नरसुद्धा टीम मधे येईल. अशा वेळी एखादा पार्ट-टाईमर बॉलर उपयोगी पडू शकतो.
रोहित - with all due respect to his outstanding credentials in white ball cricket, is unproven (or even failed) in his limited outings in away tests. त्याने यशस्वी व्हावं ह्या सदिच्छा आहेतच. पण एकदम त्याच्यावर अवलंबून रहावं असं काही घडलेलं नाहीये. तरी पण तो कदाचित मयंक च्या जागी खेळेल असं वाटतंय. तिथे त्याला यश मिळालं तर भारताला चांगली ओपनिंग मिळेल.
सैनी चा डेब्यू होईल असं वाटतंय. उरलेल्या ३ नेट बॉलर्सपैकी कुणाला तरी १५च्या स्क्वाड मधे घ्यावं असं वाटतं.
रोहित- The biggest factor in
रोहित- The biggest factor in his favour is that he is in peak of his form & self-confidence backed by vast experience ! Every reason to believe & hope that he will now click in Tests also.
माझ पण गट फिलींग सांगतय रोहित
माझ पण गट फिलींग सांगतय रोहित मस्त खेळणार म्हणून
रोहित ला मयंक च्या जागी
रोहित ला मयंक च्या जागी सलामीला खेळवयला पाहिजे. टाइम्स मधल्या बातमीनुसार नटराजन सिडनी टेस्ट मध्ये debut करू शकतो, हे खरे असेन तर माझ्या मते चांगला निर्णय आहे. नटराजन कंट्रोल आणि variety देऊ शकेल, सैनी कधी कधी खूप स्वैर मारा करतो, ऑस्ट्रेलियाला तिन्ही डावात लवकर बाद करण्यात discipline गोलंदाजीच कारणीभूत आहे.
भाऊ, स्वरूप, तुमच्या, माझ्या
भाऊ, स्वरूप, तुमच्या, माझ्या आणी असंख्य क्रिकेट-रसिकांच्या सदिच्छांना यश येवो आणी रोहित टेस्टमधे यशस्वी होवो.
*रोहित टेस्टमधे यशस्वी होवो.*
*रोहित टेस्टमधे यशस्वी होवो.* -
आमेन !!
यादवच्या जागी शार्दूल येईल
यादवच्या जागी शार्दूल येईल असे आज वाचले. डोमेस्टीक क्रिकेट चा निष्कर्ष लावून बघणार असतील तर ठाकूर सैनी च्या पुढे येईल ह्यात शंकाच नाही.
गावस्कर ने विह्रारीची जागा गिल ने घ्यावी नि रोहित मयांक ह्याअंनी ओपन करावे असे सुचवले आहे. मलाही हि कल्पना आवडली. गिल मधल्या फळीला स्थैर देऊ शकेल नि रोहितची पुंगी वाजली तर गिल सारखाच प्लॅटफॉर्म तोही सहज देऊ शकतो. तुम्हाला काय वाटते ?
गिल ओपनिंगला चांगला खेळलाय...
गिल ओपनिंगला चांगला खेळलाय.... उगाच त्याला तिथन हलवायला नको.
मयंकच्या जागी रोहित ठीक आहे.... विहारी गरज पडल्यास एक बॉलिंग ऑप्शन म्हणून हाताशी असावा.
Pages