क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*वन-डे मधे बॅटींग पक्की करण्यासाठी, आपण (द्रविड - २००३) आणी बाकी बर्याच टीम्स सुद्धा थोडा कम-असल विकेटकीपर्स घेऊन खेळलेल्या आहेत. त्यामुळे हे आर्ग्यूमेंट धोनी ला टीम मधे टिकवण्यासाठी पुरेसं नाहीये.* --- तसे देवीगौडा या देशाचे पंतप्रधान व बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतेच ! तडजोड म्हणून व आदर्श म्हणून केलेली निवड यात गल्लत होणं घातक ठरूं शकतं. Wink

केदार जाधवचे फायटिंग स्पिरिट वगैरे फारच मनोरंजक वाटले. तो पूर्णपणे फिट नसताना टीममध्ये आला अशी शंका यायला वाव आहे. फायनलमध्ये तो खेळायला परत येऊच शकला नसता तर ते केवढ्याला पडले असते?

तो पूर्णपणे फिट नसताना टीममध्ये आला अशी शंका यायला वाव आहे.
>>
नाही रे...
आयपीएलमधे डावा हॅमस्ट्रिंग फाटला होता अन त्याच्यावर सर्जरीपण झाली. परवा उजवा हॅमस्ट्रिंग फाटलाय त्याचा.
तो पण भुवीप्रमाणे इंज्युरी प्रोन आहे. शिवाय, ज्यानी फर्स्टक्लास क्रिकेटमधे फार क्वचित बोलिंग केली त्याला इंटरनॅशनल मधे बर्‍यापैकी रेग्युलरली बोलिंग करायला लागतिये. मे बी त्यानी त्याच्या बॉडीवर नसते स्ट्रेसेस येताहेत.

"तसे देवीगौडा या देशाचे पंतप्रधान व बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतेच ! तडजोड म्हणून व आदर्श म्हणून केलेली निवड यात गल्लत होणं घातक ठरूं शकतं." - Happy गूड वन भाऊ! खरं तर व्यंगचित्रं होण्याच्या तोडीचा मजकूर तुम्ही शब्दरूप केलात.

पण धोनी हा कुठल्याही मापदंडाने, आदर्श कॅटेगरीत टीम मधे राहू शकत नाही. त्याची शेवटची substantial, impact inning किमान दीड वर्षापूर्वी, कटक मधे होती (तीच, ज्यात त्याने आणी युवराज ने पार्टनरशिप करून मोठा स्कोअर रचला होता.) Let us not forget, कटक, पाटा विकेट होती आणी आपण पहिली बॅटींग करत होतो.

परवा मांजरेकर ने धोनी ची पाठराखण करताना असं सांगितलं की आपण त्याच्याकडून अपेक्षा मर्यादित ठेवल्या पाहिजे. का? इतकी वाईट वेळ आलीये भारतावर की बाबा, तू जोपर्यंत, स्वतःच्या पावलांवर चालत क्रीझ पर्यंत पोहोचू शकशील, दिलेल्या जर्सीत मावशील, मॅचगणिक एखादं फास्ट स्टंपिंग करशील, कण्हत, कुंथत २५-३० रन्स करशील आणी कोहली ला सल्ला देशील, तोपर्यंत खेळत रहा. आणी कोहली ली इतकी जर सल्ल्याची गरज असेल, तर त्याची स्वतःची कॅप्टन म्हणून कुवत आणी शास्त्री ची कोच म्हणून कुवत दोन्हीवर प्रश्नचिन्ह उभं रहातं. एशिया कप मधे रोहित शर्मा च्या कॅप्टन्सी मधे असं फारसं नाही बघितलं. May be that is the way to go.

एक सहज जाता जाता गंमत म्हणून सांगतो: किमान २५ वन-डेज चा निकष लावला, तर विकेट्स पर मॅच च्या स्टॅट्स मधे, पार्थिव पटेल (१.४४), धोनी (१.२८), द्रविड (१.१५), मोंगिया (१.१) असा क्रम आहे. तेव्हा कदाचित आपण ज्याला देवेगौडा समजतो, ते नरसिंहराव निघायची शक्यता आहे. Wink

फेफजी , पूर्वीचा धोनी व आतांचा धोनी अशी तुलना न करतां सध्या उपलब्ध असलेल्या इतर यष्टीरक्षक- फलंदाज यांच्याशी सध्याच्या धोनीची तुलना व्हावी. मला तसं केल्यास धोनीची
उपयुक्तता आजही सरस वाटते. ( त्याचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो , हा बोनस पाॅईंट वगळूनही !) . अर्थात, यावर मतभेद शक्य आहेच .
( फक्त सहज जातां जातां- फलंदाज व गोलंदाज यांच्या बळींचया आंकडेवारीत , सरासरीत व यष्टिरक्षकांच्या तशाच सरासरीत खूप फरक आहे. यष्टीरक्षकाकडे बळी मिळवायची संधी यावी लागते व तो ती कशी साधतो , हें महत्वाचं; तो
स्वत:च धांवा काढणं, विकेट घेणं यासारखं नाही करूं शकत. तुलना करताना बळींची सरासरी यष्टिरक्षकांच्या बाबतीत संदर्भहीनच म्हणायला हवी. )

पांड्या आणि जाधव/जडेजा धोनी(४) नंतर येणार असतील तर धोनीचा रोल फिनिशरचा कसा असू शकतो?
त्याची पोझिशन फ्लेक्सिबल असावी हे मान्य.. पण कुठल्याही पोझिशनवर तो फिनिशर रोल मधेच असावा ही आस्क टू मच आहे.
सध्याच्या विकेटकीपर्स मध्ये मला फक्त ईन फॉर्म बटलर धोनीपेक्षा बेटर बॅट्समन वाटतो. डीकॉक (सध्या गंडला आहे), पेन, सर्फराझ, रॉंची पेक्षा धोनी अजूनही कैक पटींनी बेटर बॅट्समन आहे...
धोनीला रिप्लेसमेंट म्हणून येऊन जाऊन पंत चे नाव येते... पण बॅट्समन म्हणून पंत लोअर ऑर्डर मध्ये (ओपनर म्हणून तर काही स्कोपच नाही) किंवा नंबर ४ वर येऊन ईनिंग बिल्ड करण्याबाबत कंप्लीटली अनटेस्टेड आहे.
पंत नंतरची चॉईस राहूल... त्याचा ही ऑर्डरच्या बाबतीत तोच ईश्यू आहे...
आधी कोणी तरी म्हणाले तसे... वर्ल्डकप पर्यंत तरी धोनीच्या रिप्लेसमेंटची चर्चा करू नये... अनलेस त्याने एबी सारखी स्वतःच माघार घेतली.

"सध्या उपलब्ध असलेल्या इतर यष्टीरक्षक- फलंदाज यांच्याशी सध्याच्या धोनीची तुलना व्हावी. मला तसं केल्यास धोनीची
उपयुक्तता आजही सरस वाटते." - ही तुलना शक्य नाही, कारण धोनी वगळून इतर विकेटकीपर्स ना तशी संधीच दिली गेली नाहीये. केवळ उदाहरणापुरतं बघायचं झालं, तर रिषभ पंत ने इंग्लंड मधे संधी मिळाल्यावर काही वाईट परफॉर्म नाही केल. त्यामुळे इतरांच्या तुलनेत धोनी चांगला आहे हा दावा पोकळ वाटतो. उगाच जागा अडवून बसण्याचा हा अट्टहास अवास्तव आहे.

हाब, इतर देशांच्या विकेटकीपर शी तुलना कशासाठी करायची? (बाय द वे, राँकी रिटायर झालाय). ते आपल्यासाठी उपलब्ध नाहीयेत. धोनी ला पर्याय हा पंत, किशन, संजू, भारत, स्मित पटेल वगैरेंमधूनच येणार आहे.

असो. वर्ल्डकप पर्यंत तरी ह्या परिस्थितीत काही बदल होणार नाहीये. त्यामुळे ही नुसतीच 'चाय पे चर्चा'. Happy

*त्यामुळे इतरांच्या तुलनेत धोनी चांगला आहे हा दावा पोकळ वाटतो. * - पण त्यामुळेच इतरांच्या तुलनेत धोनी टाकाऊ कसा काय ठरूं शकतो ?

त्याची पोझिशन फ्लेक्सिबल असावी हे मान्य.. >> अरे तुला मान्य असून काय उपयोग आहे ? त्याला मान्य नाहि आहे हा problem आहे. तो चार वर आला की आधीचा tempo जातो नि त्याला inning लांबवून शेवटी जिंकता येणे कठीण होतेय. (खर तर त्याने पांड्याच्या आजूबाजूला येवून आफ्रिदीसारखे फिरवावे असे मला उगाचच वाटते) त्यावरून आठवले कि finisher म्हणूनही धोनी over rated होता असा एक चांगला (चांगला अशा अर्थाने कि त्याने बर्‍यापैकी आकडेवारी दिली होती ह्याबाबत थेट bevan पासून सुरू करून नि काही मोजक्या inning मूळे धोनी वर हा शिक्का कसा बसला हे उलगडलेले होते) लेख cric info monthly magazine वर होता.

हे पाहा मिळाले
http://www.espncricinfo.com/story/_/id/24507849/why-there-no-such-thing-...

"पण त्यामुळेच इतरांच्या तुलनेत धोनी टाकाऊ कसा काय ठरूं शकतो ?" - धोनी इतरांच्या तुलनेत नाही, स्वतंत्रपणे संपलाय असं माझं मत आहे. त्याचं रेकॉर्ड गेले दीड वर्षं असंच दाखवतय. त्याचं designated काम - भक्कम, मॅच-विनिंग बॅटींग करणं - त्याला गेले बरेच दिवस जमत नाहीये. वयाप्रमाणे, रिफ्लेक्सेस स्लो झाले आहेत. धोनी टेक्निकली साऊंड बॅट्समन कधीच नव्हता, पण हँड-आय को-ऑर्डिनेशन वर तो परिणामकारक खेळायचा. आता ते जमत नाही.

हाब, इतर देशांच्या विकेटकीपर शी तुलना कशासाठी करायची? >> तुलना नाही पण विकेट कीपर अगदीच धडाकेबाज बॅट्समन असावा असा जो एक समज ठाम होतो आहे त्याबद्दल बोलत होतो.
जोवर तुम्ही धोनीची रिप्लेसमेंट देत नाही तोवर धोनीचे कितीही अ‍ॅनालिसिस केले तरी फार काही हाती येत नाही. मी आधीही म्हणालो तसे... कार्तिकला सोडून पंतला फक्त बॅट्समन म्हणून घ्या काही सामने.. मग कोहलीसारखी धोनीला अधूनमधून रेस्ट देत पंतला विकेटकीपिंग पण द्या.

धोनी टेक्निकली साऊंड बॅट्समन कधीच नव्हता, पण हँड-आय को-ऑर्डिनेशन वर तो परिणामकारक खेळायचा. आता ते जमत नाही. >> म्हणून तर तो आता टेक्निकली साऊंड व्हायचा प्रयत्न करतो आहे. Proud
लक्ष्मण त्यादिवशी त्याच्या पूर्वीच्या आणि आताच्या फ्रंट फूट स्टान्स मधे त्याने कसा जाणीवपूर्वक बदल केला आहे .. म्हणून तो आता कसा जास्त बॅलन्स राखू शकतो असे बरेच काही सांगत होता.
लेख वाचतो पण बीवन वगैरे एकदम वेगळ्या काळातली वेगळी ब्रीड होती.... त्यावेळी २५०-२७५ म्हणजे आजचे ३२५-३५० वगैरे.

* रिफ्लेक्सेस स्लो झाले आहेत. * - Objection , My Lord ! Dhoni's recent lightning stumpings are more than enough to dispel this charge instantly !! Wink
आणि , त्या लेखाबददल उद्या. ( झोप अनावर झालीय आतां)

सुप्रभात.
असामीजीनी संदर्भ दिलेला लेख नीट वाचला . मला कळलेला निष्कर्ष असा - खेळाडूची' फिनीशर' अशी प्रतिमा म्हणजे तो त्या खेळातला असामान्य खेळाडू असल्याचा दाखला नव्हे. केवळ, ऐन मोक्याच्या वेळी त्याने केलेलीं चमकदार खेळी/सहभाग निर्णायक ठरते व म्हणून प्रेक्षकांच्या मनात ती ठासून कायमची भरते , इतकंच. ' फिनीशर' असा खेळाडूंचा खास वर्ग नसतोच.
लेखात धोनीचं किंवा इतर कुणाच्या कामगिरीचं अवमूल्यन नसून , उलट, तथाकथित 'फिनीशर्स'कडून असामान्य खेळाडू
सारखी नियमित मोठया कामगिरीची अपेक्षा करणारयाना लेखात कोपरखळीच मारली आहे. ( लेखातील हा निष्कर्ष माझ्या दि. 29- 9 -18 च्या हया पोस्टशी मिळता जुळता आहे , असंही मला तरी जाणवतं - * आणखी एक. पूर्वी धोनीने कांहीं अफलातून खेळी करून आपल्याला विजय मिळवून दिला म्हणून कौतुकाने त्याला ' फिनीशर ' हा किताब चिकटला . पण तीच भूमिका हाच जणूं त्याला संघात स्थान मिळवणारा एकमेव निकष होता व आहे, हेही मला पटत नाही * )

माझ्या मते धोनीला संघात १२ वा ठेवून विकेट किपर म्हणून ठेवावे फिल्डिंगच्या वेळी! कशी काय कल्पना?
>> 'सुपर सब' रूल असताना हे करता आलं असतं.

"Objection , My Lord ! Dhoni's recent lightning stumpings are more than enough to dispel this charge instantly." -

माझा मुद्दा त्याच्या बॅटींग विषयी आहे. स्टंपिंग विषयी नाही. स्टंपिंग स्पेशलिस्ट म्हणून टीम मधे नाहीये तो. (तसंही, दर तीन मॅच-गणिक एक स्टंपिंग ratio आहे.) धोनी बॅट्समन म्हणून अपयशी ठरतोय आणी त्यामुळे टीमसाठी त्याची उपयुक्तता कमी आहे, ह्या आर्ग्युमेंट वर, त्याच्या स्टंपिंग चा दाखला कसा लागू पडेल?

धोनी बॅट्समन म्हणून अपयशी ठरतोय आणी त्यामुळे टीमसाठी त्याची उपयुक्तता कमी आहे, ह्या आर्ग्युमेंट वर, त्याच्या स्टंपिंग चा दाखला कसा लागू पडेल? >> If you believe in runs saved is runs scored.... then why not?

आता मला वाटते एका संघात २५-३० खेळाडू, असा नियम करावा. नि अमेरिकन फूटबॉलमधे जसे ऑफेन्स टीम वेगळी, डिफेन्स टीम वेगळी, स्पेशल्टी टीम वेगळी तसे! म्हणजे सात आठ बॉलर्स, ११ फलंदाज, विकेट कीपर वेगळा, नि स्लिप्स चे वेगळे असे!!

"If you believe in runs saved is runs scored.... then why not?" - It does not always work like that. पण तरीही वादापुरतं ते मान्य केलं, तर बाकीच्या विकेटकीपर्स ना असं कुठे ट्राय-आऊट करून बघितलंय, की ते तितक्याच परिणामकारकरित्या बॉल्स अडवू शकतील की नाही ? उदाहरणार्थ, टेस्ट मधे साहा खूप क्वचित बाईज देतो.

वन-डे मधे धोनी ने एक काळ गाजवला, म्हणून त्याच्या पलिकडे पहायचच नाही हा आग्रह कशासाठी? Let us be thankful for that good ole' times and move on.

तर बाकीच्या विकेटकीपर्स ना असं कुठे ट्राय-आऊट करून बघितलंय, की ते तितक्याच परिणामकारकरित्या बॉल्स अडवू शकतील की नाही ? उदाहरणार्थ, टेस्ट मधे साहा खूप क्वचित बाईज देतो. >> स्टंपिंग आणि विकि चा विषय चालला आहे म्हणून... सगळे विकि आयपीएल मधे विकिग करतात पण धोनी एवढ्या डोकेबाज पणे आणि कन्सिस्टन्सी ने .... एका छोट्याश्या मोहरीएवढ्या संधीचे (स्टंपिंग, रन आऊटचे कॉल्स, अनकन्वेश्नल फील्ड प्लेसमेंट ई.) मॅच फिरवून थेट टुर्नामेंटच्या सोनेरी कपाला हात लावण्याईतपत सोने केलेले दिसले आहे का? आणि ते ही ऑल्मोस्ट प्रत्येकवेळी.

वन-डे मधे धोनी ने एक काळ गाजवला, म्हणून त्याच्या पलिकडे पहायचच नाही हा आग्रह कशासाठी? Let us be thankful for that good ole' times and move on. >> तो गुड ओल्ड असेल पण म्हणून राईट ऑफ करण्याच्या लायकीचा झाला आहे हे गृहीत धरले का?

सगळे विकि आयपीएल मधे विकिग करतात पण धोनी एवढ्या डोकेबाज पणे आणि कन्सिस्टन्सी ने .... एका छोट्याश्या मोहरीएवढ्या संधीचे (स्टंपिंग, रन आऊटचे कॉल्स, अनकन्वेश्नल फील्ड प्लेसमेंट ई.) मॅच फिरवून थेट टुर्नामेंटच्या सोनेरी कपाला हात लावण्याईतपत सोने केलेले दिसले आहे का? आणि ते ही ऑल्मोस्ट प्रत्येकवेळी. >> एक कार्थिक वगळता इतर कोणी (इथल्या चर्चेमधे असलेले) कॅप्टन नसल्यामूळे ही तुलना गैर लागू आहे. ते फार तर कप्तान किंवा बॉलरला सुचवू शकतात पण निर्णय त्यांचा नसेल. ह्याउलट धोनी सांगतो ते ब्र्हमवाक्य असते CSK साठी हा मोठा फरक आहे.

पण म्हणून राईट ऑफ करण्याच्या लायकीचा झाला आहे हे गृहीत धरले का? >> माझ्या मते फे फे त्याच्या बॅटींग च्या द्रुष्टीने बोलतो आहे हे त्याने स्पष्ट केले आहे त्यामूळे त्याचे इतर गुण त्याचे बॅटींग मधले वाढते वैगुण्य झाकत आहेत हे मान्य असल्याशिवाय फक्त circle मधे जात राहणार हि चर्चा.

हाब, आयपीएल हा आंतरराष्ट्रीय निवडीचा निकष असू शकत नाही, हे माझं मत आहे. तो एक क्लब क्रिकेट चा ग्लोरिफाईड - ग्लॅमरस प्रकार आहे. तिथे उगाच केदार जाधव ने पण विकेटकिपींग केली आहे. केदार जाधव चं डोमेस्टीक करियर बघितलं तर तो महाराष्ट्राचा 'स्टार' मिडल-ऑर्डर बॅट्समन आहे. त्यामुळे तो प्रकार जाऊ दे.

धोनी हा मुळात विकेटकीपर आहे. त्यामुळे तो चांगली विकेटकिपींग करतो हा मुद्दा वारंवार येऊ शकत नाही. That is a part of his job and he is good at it. प्रश्न आहे की एक बॅट्समन म्हणून, मुळात ठिसूळ असलेल्या मिडल ऑर्डर मधे तो बॅटींग च्या स्किल्स वर जागा कमांड करतो का. तर गेले दीड वर्षाचा त्याचा परफॉर्मन्स पहाता, मला तरी त्याचं उत्तर नकारात्मक वाटतं. त्याला फिनिशर म्हणा अथवा नका म्हणू, पण त्याची बॅटींग ची स्टाईल - शेवटपर्यंत मॅच खेचून, शेवटी बॉलर वर दबाव आणून मॅच जिंकून द्यायची - गेले दीड वर्षं सातत्यानं अपयशी ठरतीये.

पृथ्वी शॉने करावा रणजीप्रमाणे खेळ: रहाणे
>>>
अरे रहाणे , तुझा पगार किती ? तू बोलतो किती? तुझ्या धावा किती मागच्या सेरिज मध्ये. तुझे स्वतःचे धोतर सुटायला लागले आहे ते सांभाळ आधी. हे कोहलीने बोलले तर ठीक आहे पण ज्याचे स्वतःचे बूड संघात स्थिर नाही त्याने टिप्स द्याव्यात हे फार होतंय हां... Proud

जा, आधी नेट मध्ये प्रॅक्टीस कर ....

खेळाडूना , कप्तानाला , निवड समितीला सल्ले देणे, हा कोणत्याही रसिकाचा मूलभूत हक्क आहे. Wink
पण performance नसलेल्या खेळाडूला तो नसतो...

* माझा मुद्दा त्याच्या बॅटींग विषयी आहे. स्टंपिंग विषयी नाही. * - पण त्याचं कारण त्याचे reflexes slow झालेत असं दिलंत. माझी काॅमेंट ' reflexes slow 'वर होती ; मला नाही वाटत बॅटींगसाठी व विकेट किपींगसाठी एकाच खेळाडूच्या reflexesचा वेग वेगवेगळा असतो असं.
* तसंही, दर तीन मॅच-गणिक एक स्टंपिंग ratio आहे.*
स्टंपिंगच्या किती संधी आल्या, हे न सांगताच ही आंकडेवारी निरर्थक आहे. फक्त पांच वेगवान गोलंदजच असलेल्या संघातील विकीच्या नांवावर तर अख्या मालिकेत एकही स्टंपिंग नसूं शकतं !

Pages