Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बादवे, अफगानिस्तानचे सगळे
बादवे, अफगानिस्तानचे सगळे खेळाडू स्वतःचे आहेत की इतर देशाचे जाउन खेळतात त्यांच्याकडून? मला वाटाते पाकिस्तानात खेळ्त असावेत.
राहुल नि रायुडू नी सलामीला
राहुल नि रायुडू नी सलामीला येऊन चांगला खेळ केला. आता समजा पांडे नि कार्थिक ने ३ नि ४ वर पण तेव्हढाच चांगला खेळ केला तर Big 3 परत आल्यावर चौघांपैकी कोणाला घेणार ? कसे ठरवणार हे ? (एक च येईल असे धरतो काक्रपाचवा केदार जाधव असेल हे उघड आहे)
पांडे कार्तिकचे सोडा ,
पांडे कार्तिकचे सोडा , भारताची अगदी फ्या फ्या उडालीय. हरू पन शकतात....
अफगाणिस्तान तिनही सामने जिंकू
अफगाणिस्तान तिनही सामने जिंकू शकला असता. जबरदस्त संघ आहे हा. जिगरी एकदम.
असे लिहतोय तोवर त्यांनी सामना बरोबरीत आणला, जडेजाला उडवले की पाचव्या चेंडूवर.
आता सुपर ओवर.
नाही सुपर ओव्हर नाही. बरोबरीत
नाही सुपर ओव्हर नाही. बरोबरीत सुटला. टाय. अफगाणिस्तानची टीम मस्त आहे. आपण तर फ्यान बुवा. त्यानीच जिकावा कप.
*त्यानीच जिकावा कप.* - एक
*त्यानीच जिकावा कप.* - एक लिंबूटींबू समजली जाणारी टीम इतक्या कमी वर्षांत बडया संघांसाठी एक जबरदस्त आव्हान ठरते , हे खरंच कौतुकास्पद ! काल पहिल्या चार विकेट अगदीं सुरवातीलाच गमावूनही त्यानी जी जिगरबाज व आक्रमक फलंदाजी केली , त्यावरून हा संघ येत्या काळात उलथापालथ करणार हें नक्की. त्याची सुरवात आतांच होणंही सहज शक्य नसलं ( भारताच्या फलंदाजीचा बहर पहाता ), तरीही अशक्यही नाही .
या स्पर्धेतले अफगाणिस्तानचे
या स्पर्धेतले अफगाणिस्तानचे पहिले दोन त्यांनी जिंकलेले सामने पाहिले नव्हते. श्रीलंका आणि बांग्लादेशला साखळी सामन्यात हरवणारी टीम कशी खेळतीये पाहूया म्हणून नंतरचे दोन्ही सामने (पाकिस्तान आणि बांग्लादेश) मात्र पाहिले. ते दोन्ही सामने अफगाणिस्तान अक्षरशः जिंकता जिंकता हारले. त्यामुळे आपल्याला हे लोक नक्कीच धक्का देतील असं वाटत होतं (आपली पहिली हाँगकाँग बरोबर ची धडपड पाहता !). अंपायरचे काही निर्णय आपल्या विरोधात गेले, त्याबद्दल धोनीने पण , मला फाइन लागेल म्हणून बोलत नाही असे सांगून एकप्रकारे नाराजी व्यक्त केली . तरी इतके वर्ष क्रिकेट खेळून जे अजूनही झिंम्बाब्वे ला जमत नाही ते अफगाणिस्तान ने करुन दाखवले त्याबद्दल कौतुक.
पाकिस्तानला पुन्हा टेंशन आहेच
पाकिस्तानला पुन्हा टेंशन आहेच ; बांगलादेशचं 240 चं लक्ष्य गाठताना पाक 70 -3 . फायनल प्रवेशासाठी पाकला जिंकणं अत्यावश्यक.
पाक गचकलेच ! 50 षटकांत 220
पाक गचकलेच ! 50 षटकांत 220 -9 !!
पाकिस्तानने अंतिम सामन्यात
पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारताला दणकून हरवू हा दावा केला होता. पण बांग्लाचा अडथळा नडला!
अर्थात भारतिय संघाला आत्मविश्वासहीन पाक पेक्षा बांग्लाच चांगले आव्हान देऊ शकते.
*पाकिस्तानने अंतिम सामन्यात
*पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारताला दणकून हरवू हा दावा केला होता........ ..आत्मविश्वासहीन पाक पेक्षा बांग्लाच चांगले आव्हान देऊ शकते.* - आपण अंतिम सामन्यात असणार नाही, या जबरदस्त आत्मविश्वासामुळेच तर त्यानी तो दावा केला होता !
( अवांतर: - यावरून एक विनोद आठवला . नवरा घरीं येवून बढाई मारतो, " आज रेल्वेला काय गंडवलंय ! रिटर्न तिकीट काढून परत गेलोच नाही !! " )
" आज रेल्वेला काय गंडवलंय !
" आज रेल्वेला काय गंडवलंय ! रिटर्न तिकीट काढून परत गेलोच नाही !! " >>>
अगदी सेम अवस्था पाकची झाली!
पाकिस्तान ची अगदीच दयनीय
पाकिस्तान ची अगदीच दयनीय अवस्था झालीये. आता शुक्रवारी, टागोरांची दोन राष्ट्रगीतं वाजणार.
पण बरे झाले पाक काल हरले
पण बरे झाले पाक काल हरले त्यामुळे बर्याच पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचे टी व्ही सेट तरी सुखरूप राहिले! त्यांनी बांग्लादेशचे आभार मानायला हवे!
उद्याचे अंदाज काय? बांग्ला टफ फाईट करेल. पण तमीम आणि शकीब नाहीत उद्या संघात.
बर्याच पाकिस्तानी क्रिकेट
बर्याच पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचे टी व्ही सेट तरी सुखरूप राहिले!
>>
त्यांच्या कडे ही एवढे भाबडे कुणी राहिले नाही. सामनेच एवढे झालेत टीव्ही तरी किती फोडायचे ?
पाकिस्तान, वेस्ट-इंडिज आणी
पाकिस्तान, वेस्ट-इंडिज आणी झिंबाब्वे क्रिकेट ची अवस्था बघून वाईट वाटतं. तुल्यबळ टीम्स खेळताना बघायला मजा येते. १९९२ च्या वर्ल्ड कप नंतर, मोठ्या संख्येनं, स्ट्राँग टीम्स एकत्र खेळताना बघायला नाही मिळाल्या.
पाकिस्तान, वेस्ट-इंडिज आणी
पाकिस्तान, वेस्ट-इंडिज आणी झिंबाब्वे क्रिकेट ची अवस्था बघून वाईट वाटतं >> ह्यात लंका पण घाल. पाकिस्तानची टीम खर तर promising आहे पण त्यांच्यात अजिबात professionalism नाही हे नेहमीच नडते त्यांना.
मला वाटतं देशात नुसतीच
मला वाटतं देशात नुसतीच प्रतिभा असणं पुरेसं नसावं ; योजना पूर्वक ती प्रतिभा शोधणं , जोपासणं हें ही जागतिक स्तरावर अग्रेसर होण्यासाठी तितकंच महत्वाचं. त्यासाठी , नियामक मंडळ किती कुशल व प्रभावी आहे, हे निर्णायक ठरतं. आपण बीसीसीआयला कितीही पैशांच्या हांवेबददल दोष दिला , तरीही आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यावसायिकता खेळात रुजवण्याचं श्रेय बवहंशी बीसीसीआयलाच जात असावं. ज्या देशांमध्ये प्रतिभा असूनही जागतिक स्तरावर दर्जा घसरतो , तिथे नेमकी हीच उणीव कारणीभूत असावी .
Asia cup INDIA जिंकणार!!!
Asia cup INDIA जिंकणार!!!
असामी, लंका पण त्याच कॅटेगरीत
असामी, लंका पण त्याच कॅटेगरीत येते - खरय.
भाऊ, बीसीसीआय बद्दल अनुमोदन. १९८७ पासून जितक्या प्रयत्नपूर्वक, बीसीसीआय ने क्रिकेट भारतात आणी भारत क्रिकेट जगतात रुजवलाय, जोपासलाय त्याला तोड नाहीये.
खेळपट्टी निरखल्यावर गावसकर
खेळपट्टी निरखल्यावर गावसकर म्हणाला ' पहिल्या बॅटींगचं पीच ! '. टाॅस जिंकूनही बांगलाला बॅटींग दिल्याचा परिणाम रोहितला जाणवत असावा. बांगलादेश 66 - 0 (10षटकं ) !
शेवटी केदार जाधव आणावा लागला
शेवटी केदार जाधव आणावा लागला जोडी फोडायला!
१२०-१, २१ षटके!
इंटरेस्टींग स्ट्रॅटेजी आहे
इंटरेस्टींग स्ट्रॅटेजी आहे बांग्लादेश ची. त्यांनी असलेल्या रिसोर्सेस चा छान वापर केलाय बॅटींग मधे. ४ विकेट्स जाऊनही अजून सरकार बॅटींग ला यायचाय. बर्याच दिवसांनी असं काहीतरी पहायला मिळालं.
इतकी छान सुरवात झाली असूनही
इतकी छान सुरवात झाली असूनही बांगलादेश त्याचा पुरेपूर लाभ नाही उठवू शकली. 197 -7 ! मुरतझाने तर आतां विकेट फेकलीच म्हणायला हवं !
नाबाद १२० वरून सर्वबाद २२२
नाबाद १२० वरून सर्वबाद २२२.
दासचे १२१ बाकी १० जणांचे १०१.
भारताने अप्रतिम गोलंदाजी व
भारताने अप्रतिम गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करून सामना तर हाताबाहेर जावूं दिला नाहीं. धोनी तर अधिकाधीक प्रभावी होतोय !
रोहित शर्मा च्या कॅप्टन्सी चं
रोहित शर्मा च्या कॅप्टन्सी चं कौतुक आहे. मस्त कमबॅक केला. आता सॉलिड बॅटींग ने मॅच जिंकावी.
अचूक गोलंदाजी, नेमकी
अचूक गोलंदाजी, नेमकी क्षेत्ररचना व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यामुळे भारतावर दडपण आणण्यात बांगलादेश बराच यशस्वी. 112-3 .धोनी पूर्वीच्या लढाऊ मूडमधे . दिनेश कार्तिकची छान साथ. फायनलला साजेसा खेळ दोन्ही संघांचा !
४-१३७ सहज नाही एवढे
४-१३७
सहज नाही एवढे
भूवी पहिले ७, ८ बॉल फार
भूवी पहिले ७, ८ बॉल फार भेदरलेला वाटत होता. आता जरा ठीक चाललंय
केदारची इंज्युरी फार सीरियस नसूदे
धोणीशी एकदा सिलेक्टर्सनी प्रेमळ संवाद साधायची गरज आहे.
त्याच्या फिनिशर केपेबिलिटीवर इंग्लंड आणि दुबईत मोठ्ठं प्रश्णचिन्ह लागलंय. केवळ उपयोगी टिप्स देतो या स्किलवर वर्ल्डकप खेळवणं फार रिस्की आहे.
बाकी काही झालं तरी आज हरू नये म्हणजे झालं
Pages