क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खलील अहमद इतका रेड हॉट मारा करत असताना,>>>

काल खरोखर खलील ने छान गोलंदाजी केली! ५ षटके १३ धावा ३ बळी ५ बळी देखिल घेतले असते कदाचित त्या ओघात. अजून २-३ षटके द्यायला हवी होती..

भारताचा आगामी कांगारु देशाचा दौर्‍यासाठी स्मिथ्/वॉर्नर ह्यांच्यावरील बंदी मागे घेण्यासाठी प्रयत्न अशी बातमी वाचणात आली. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलिया ही बंदी मागे घेणार नाही असे म्हणत आहेत!

एकंदरीत पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचे आखातात खुपच खराब प्रदर्शन झाले!

आज बर्‍याच दिवसांनी गोलंदाजांनी शेपूट नाही वळवळू दिले.
जिंकायला १०५ धावा आवश्यक!

एकदम एकतर्फी झाली शेवटची मॅच. चुरशीची होईल अशी अपेक्षा होती. त्यातून कोहली चा कॅच सोडून आणी रोहित शर्मा ला नोबॉल वर आऊट करून, उरलीसुरली हवा पण पार काढून टाकली विंडीज ने.

तिसरा सामना बराच जिव्हारी लागलेला दिसतोय. एकंदर पांड्या फिट असेल तर पांड्या खलीलच्या जागी नि जडेजा च्या जागी चहल. फिट नसेल तर आजचा काँबो असा प्लॅन दिसतोय जेणे करून एक बॉलिंग ऑल राउंडर (पांड्या/जाडेजा), तीन पेस बॉलर्स, दोन स्पिनर्स, नि केदार बॅकप बॉलर असे combo नेहमी असेल.

बरोबर, मला वाटते कोहली किंवा शास्त्रीने इंग्लंड दौर्‍यानंतर 'तो left arm आहे नि हुकुमी यॉर्कर टाकतो हा प्लस पॉईंट आहे' असे म्हटलेले सो बहुधा नेहरा type replacement ह्यात perfect बसतोय. (तो इंग्लंड ला गेला नव्हता हे मला माहित आहे - तिसरा बॉलर ह्याबद्दल बोलताना हे बोलले गेले होते). शार्दुल, कौल, चहर खाली ढकलले गेलेत hierarchy मधे असे वाटतेय.

ऑस्ट्रेलियात तिथल्या खेळपट्ट्या लक्षात घेवून फलंदाजी भक्कम असण्यावर अधिक भर देणं व त्यावर अधिक विचार होणं महत्वाचं .
.

फेफ, मान्य.
काल जेफ थाॅमपसनने स्मिथ व वाॅरनरचया गैरहजेरीत ऑसी फलंदाजी अगदींच सुमार असल्याचं म्हटलंय. भारतीय तेज गोलंदाजीचं कौतुकही केलंय.

India is sticking to the familiar script. सावध सुरूवात, मोठी ओपनिंग आता फक्त मोठा फिनिश हवाय.

वेस्ट इंडीज ने ह्या फॉर्मॅट मधे तरी तुल्यबळ लढत द्यावी. नाहीतर ही संपूर्ण सिरीज कंटाळवाणी व्हायच्या मार्गावर आहे.

आता फक्त मोठा फिनिश हवाय. >> तोही झाला. ८० m च्या मैदानावर रोहित ने मस्तच धुलाई केलीये. पांड्या खेळतोय ते मस्त वाटते बघायला.

भारताच्या दौरयासाठी स्मिथ व वाॅरनर यांच्यावरील बंदी स्थगित करण्यात येणार आहे - बातमी .

बंदी घालतानाच, ती फक्त कोणतेही सामने नसतानाच लागू असेल, असं जाहीर करावं !

admin.JPG

Happy Happy भाऊ, मस्त!!

रंगणा हेराथ चा शेवटचा सामना इंग्लंड जिंकणार अशी चिन्हं आहेत.

मी बायस्ड आहे. क्रिकेट हा इतका प्रचंड बॅट्समेन ओरिएंटेड गेम आहे, की जर बॉलर्स ने काही क्लृप्ती (अरे, वा, फारच दिवसांनी हा शब्द लिहीला आणी वाचला) लढवल्या, तर मी त्याकडे सहानुभूती ने बघतो. अर्थात त्यात धोकादायक काही नसेल तर. उदाहरणार्थ, फ्लेचर ने जेव्हा बॉलिंग अ‍ॅक्शन मधे थांबून बॉल टाकला होता, ते धोकादायक होतं. कारण, बॅट्समन अशा वेळी पुल-आऊट करतो. पण ३६० अ‍ॅक्शन मधे असं काही नाही वाटलं.

बॉलर च्या ३६० अ‍ॅक्शन issue बद्दल काय मत आहे ? >> बॅट्स्मनला स्विच हिट मारायला परवानगी असेल तर बॉलरलाही असावी. बॉल टाकण्याआधी बॉलरने काय करावे हे सध्या नियमांनी फारच बांधलेले आहे त्यामुळे बॅटिंग सारखे ह्या क्षेत्रात काही ईनोवेशनच होत नाही. चकिंग नाही एवढेच काटेकोरपणे बघावे बाकी सगळे 'अ‍ॅक्शन रिलेटेड' ग्राह्य धरायला हरकत नाही.. अर्थात अंडर आर्म वगैरे एकदम टोकाचे होईल ते नको.
सध्या जवळजवळ सगळेच नियम बॅट्स्मनला फेवरेबल आहेत.

It seems umpires think it is fetching too far. खरं तर जर कंट्रोल नसेल तर बॉलरची लाईन चुकण्याचा धोका अधिक आहे त्यामूळे जर कोणी रिस्क घेत असेल तर बॉलर, तेंव्हा परवानगी द्यावी असे वाटते.

* बॉलर च्या ३६० अ‍ॅक्शन issue बद्दल काय मत आहे ?* -
मला वाटतं गोलंदाजाने स्टंप लाईन ओलांडली कीं अंपायरला त्याची डिलीव्हरी अॅकशन, पायाची पोझिशन हें सपष्ट दिसणं अत्यावश्यक आहे व असलंच पाहिजे . गोलंदाजाची ती प्राथमिक जबाबदारी आहे. 360 अॅकशनने त्याचा बोजवारा होईल;
गोलंदाजीतही फलंदाजांना फसवण्याच्या अनेक क्लृप्ती नियमात बसणारया आहेतच. मला आठवतं कीं रे लिंडवाॅल हा लिजंडरी ऑसी तेज गोलंदाज रन-अप व अॅकशन न बदलतां अप्रतिम लेग-ब्रेक टाकत असे !
फलंदाज जें अनपेक्षित करतो त्यावर दोन अंपायरसची कडक नजर असते व तो कांहीही नियमबाह्य लपवून करू शकत नाही. 360 अॅकशन फलंदाजाबरोबर अंपायरलाही चकवूं शकते.

*...त्यामुळे बॅटिंग सारखे ह्या क्षेत्रात काही ईनोवेशनच होत नाही. * फलंदाजीत इनोवहेशन करतांना फलंदाज बाद होणयाचा अतिरिक्त धोका घेत असतो. त्याबदलयात त्याला लाभ मिळणं योग्यच ठरतं. ( गोलंदाजीत इनोवहेशन करताना दोन- चार धांवा देण्यापलिकडे कांहींच धोका नसतो )

दुसरा, तिसरा, नकल बॉल, स्लो बॉल टाकण्याच्या विविध पद्धती हे सर्व बोलिंगमधले नवनवीन प्रयोगच नाहीत का?

*सर्व बोलिंगमधले नवनवीन प्रयोगच नाहीत का?* - किंबहूना, फलंदाजीतले प्रयोग हे बव्हंशी गोलंदाजीतलया चालीना प्रतिचाल म्हणूनच अस्तित्वात आले . उदा.-
ऑफ साईड क्षेत्ररक्षण लावून लेगबरेकचा मारा करणं याला उत्तर म्हणून फलंदाज फिरकीच्या विरुद्ध फटके ( जें आधी निषिध्द मानलं जायचं ) व रिव्हर्स फलीक मारूं लागले.

हरमनप्रीत कौर ची एकंदर जर्नीच जबरदस्त आहे.

मला वाटतं गोलंदाजाने स्टंप लाईन ओलांडली कीं अंपायरला त्याची डिलीव्हरी अॅकशन, पायाची पोझिशन हें सपष्ट दिसणं अत्यावश्यक आहे व असलंच पाहिजे >> भाऊ ३६० टर्न हा क्रिजच्या आधी केला आहे रनप मधे. त्यामूळे हे वरचे सगळे दिसते आहेच.

३६० चा व्हिडिओ पाहिला. एखाद्याला असे वळून बोलिंग करायची असेल, नाहीतर आयत्या वेळेस शीर्षासन करून मग बॉल टाकायचा असेल, तरी हरकत नाही. फक्त अंपायरला व त्याच्याद्वारे फलंदाजाला कल्पना देउन करणे बरोबर आहे. ओव्हर द विकेट चे राउण्ड द विकेट जाताना सुद्धा करतात. नेहमीच्या बोलिंग अ‍ॅक्शन मधे काही बदल होणार असेल तर हे बरोबर आहे.

रनप कसा आहे ह्याची कल्पना बॉलर बॅट्समनला देतो का ? तो टर्न रनप चा भाग नाही का ? किंवा असे समज कि माझा रनप दहा पावलांचा आहे. मी सुरूवातीला दोन पावले टाकल्यानंतर ३६० मधे वळून उरलेली आठ पावले टाकली तर चालेल का ? जर चालणार असेल तर मग ह्याची सीमारेषा कुठे मांडायची हा एक जटिल प्रश्न होउन बसेल.

Pages