क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॉट अ गेम! विंडीज ने जिगरी खेळ केला. त्याच बरोबर, उमेश यादव (आणी कदाचित शामी ने सुद्धा) ने पुढचा काही काळ देवधर, हजारे ट्रॉफी मधून लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट खेळायची तयारी करावी.

मला उलट वाटतेय. Hetmyer असेतो ज्या condition मधे मॅच होती ते बघून आपण टाय करू शकलो हे कौतुकास्पद आहे. शेवटच्या दहा मधे ६० वगैरे काढणे, हातात पाच विकेट्स असताना आजकाल कॉमन झाले आहे.

वे.इं.ने जिंकणयाची संधी दवडली ! नशीब त्यांचं ' टाय 'वर निभालं !! तरी पण , ' वेल फाॅट , वे.इं ! '
*प्रत्येक वेळी धोनी मैदानात होता. * * प्रत्येक वेळी विंडीज प्रतिस्पर्धी होते*. -- आणि , प्रत्येक वेळी मीं टिव्हीसमोर नाचलो होतो ! Wink

"आणि , प्रत्येक वेळी मीं टिव्हीसमोर नाचलो होतो !" - क्या बात है! Happy

"मला उलट वाटतेय. Hetmyer असेतो ज्या condition मधे मॅच होती ते बघून आपण टाय करू शकलो हे कौतुकास्पद आहे. " - नुसतं ह्या मॅच च्या संदर्भात तुझं म्हणणं खरंय. पण दोन्ही संघांची एकंदरीत ताकद (मानसिक, अनुभव, जिंकण्याची सवय ई. ई.) बघता, वेस्ट इंडीज ने भारताला, भारतात, कोहली ने शतक केल्यावर आणी ३००+ स्कोअर केल्यावर मॅच 'जिंकू दिली नाही' हे कौतुकास्पद आहे. (५०-६०-७०-८० च्या दशकातल्या सर्व माजी वे. इंडीयन प्लेयर्स चे आत्मे तळमळतील हे असं काही ऐकलं तर). Wink

वेस्ट इंडीज ने भारताला, भारतात, कोहली ने शतक केल्यावर आणी ३००+ स्कोअर केल्यावर मॅच 'जिंकू दिली नाही' हे कौतुकास्पद आहे. >> हो नक्कीच आहे . वेस्ट इंडीज ही लिमिटेड क्रिकेट मधे अजूनही एक चांगली टीमच आहे. टेस्ट च्या मापदंडाने लिमिटेड क्रिकेट धरायला नको.

विंडीज सारखा संघ वर्ल्दकपच्य पूर्वसंध्येला सलग दोन सामन्यात सवातीनशे बनवतो हे काळजीचं आहे... भूवी बुमराह, पंड्या नाहीत ही पळवाट देता येईल पण ह्यातला एखादा नसला तर बॅटिंगमध्ये आहेत तसे फळीवरचे दुसरे काही ऑप्शनच नाहीत.

"वेस्ट इंडीज ही लिमिटेड क्रिकेट मधे अजूनही एक चांगली टीमच आहे." - टी-२० मधे नक्कीच. तो त्यांच्या टाईप चा ब्रँड आहे. मॉडर्न वन-डे साठी लागणारा 'पेशन्स'(?), चिकाटी अननुभवामुळे कमी पडते.

*विंडीज सारखा संघ वर्ल्दकपच्य पूर्वसंध्येला सलग दोन सामन्यात सवातीनशे बनवतो हे काळजीचं * - आपण प्रत्येक संघाबद्दलच काळजी करणं शहाणपणाचं ! 1982च्या कपिल देवच्या संघाला वे. इंडीजने लिंबूटिंबू संघ समजण्याची चूक केली व ती त्याना चांगलीच भोंवली होती ! त्याच स्पर्धेत आपणही झिंबाब्वेला फालतू संघ समजण्याची चूक केली होती पण केवळ नशीबाने ( कपिल देवाची कृपा ) हरता हरता वांचलो होतो ! विशेषतः , मर्यादित षटकांच्या स्पर्धेत कोणत्याही संघाला गृहीत धरणं खतरनाक ठरतं हें वारंवार सिध्द झालंय .

"कोणत्याही संघाला गृहीत धरणं खतरनाक ठरतं हें वारंवार सिध्द झालंय ." - हे विंडीज ने तर दोन वेळा (पटकन आठवणारी उदाहरणं) सिद्ध केलंय.

पहिला दणका टोनी ग्रेग च्या इंग्लिश संघाला १९७६ ("I intend to make them growl")
दुसरा १९८३ च्या वर्ल्ड कप नंतर झालेल्या दौर्यात भारताला (५-० टेस्ट सिरीज, ५-० वन-डे सिरीज)

तिसरा ग्रेग चॅपेल कोच असलेल्या भारतीय संघाला २००६ मधे वेस्ट इंडीज सिरीज जिंकाय

इथली चर्चा निवड समिती लक्षात घेत असावी. ऑस्ट्रेलियाच्या दौरयावर टी-20 साठी धोनीला वगळण्यात आलंय ! Wink
( अर्थात, पंत व कार्तिक यापैकी कुणाला पुढे निवडायचं, यासाठीच धोनीला वगळण्यात आलंय हें निवडसमितीने स्पष्ट केलंय ). मुरली विजयची निवड हा उशीरा सुचलेला शहाणपणा!

* विंडीज ने तर दोन वेळा (पटकन आठवणारी उदाहरणं) सिद्ध केलंय.* - वे.इं.ने आज भारताचा पराभव करून पुन्हा एकदां हें सिद्ध केलं !
कोहलीला सलाम !! लागोपाठ शतक !
'आक्रमक खेळणयाकडे कल असणं ' व ' आक्रमक खेळणं अनिवार होणं ( compulsive urge) ' यातला फरक लवकरात लवकर उमजणं हें पंतला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावायला अत्यावशक आहे .
वे.इंडीजचं अभिनंदन.

पाटा विकेटवर आपल्या गोलंदाजाना विकेट मिळवायला वेगळा चेंडू व अधिक 'मोटीवेशन' आवश्यक असावं -tricolor.JPG

जुन्या सामन्यांची क्षणचित्रे (उंचदिवे) बघत होतो. भारत वि. ऑस्ट्रेलिया २००१च्या प्रसिद्ध मालिकेतला शेवटचा सामना चेन्नईला होता. त्यात तेंडुलकर, दिघे, झहीर खान, साईराज बहुतुले आणि निलेश कुलकर्णी असे मुंबईचे पाच खेळाडू होते. फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या संघातून फक्त तेंडुलकर फलंदाज म्हणून होता, दिघे यष्टीरक्षक आणि बाकी तिघे गोलंदाज!
यापेक्षा अधिक मुंबईचे खेळाडू परत एकत्र कसोटी संघात खेळले का?

कुलकर्णींनी १ बळी आणि बहुतुलेनी २ बळी घेतले. हरभजन टर्मिनेटर होता: ७ + ८ बळी!
पण दिघेनी शेवटचा कसोटी सामना काढला होता २२ धावा करून

भाऊ, मस्त! Happy

सहाव्या गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध नाही केला!
माझ्या मते एखादी दोन षटके कोहली स्वतः किंवा रोहित शर्मा ने टाकायला हरकत नव्हती ह्या पुर्वी दोघांनी गोलंदाजी केली आहे आंतर्राष्ट्रिय सामन्यात.
आज केदार खेळेल बहुदा धोनी कदाचित विश्रान्ती घेईल हा अंदाज!

* धोनी ने नाही विश्रान्ती घेतली.* निवडसमितीने एवढी मोठी विश्रांती ऑस्ट्रेलिया दौरयाच्या वेळी त्याला बहाल केलीय तर आतां कशाला घेईल धोनी विश्रांती ! Wink

अलिकडच्या काळात भुवीचा वन-डे मधला (बॉलर म्हणून) फिटनेस आणि परफॉर्मन्स बर्‍यापैकी घसरला आहे असे वाटतेय का?

"अलिकडच्या काळात भुवी" - भुवनेश इंज्युरी आणी नंतर विश्रांती नंतर परत आलाय. मला वाटतं, he lacks the match practice.

"धोनी ने नाही विश्रान्ती घेतली" - घेतली की. थोडा वेळ बॅटींग मधे वॉर्म-अप पुरता आला होता. Wink

फारच एकतर्फी चाललीये आजची मॅच.

७ बाद ७७ नंतर १५० च्या वर स्कोर करू दिला. मागचा सामना ह्यामुळेच गमावला. ८ बाद २२७ नंतर २८३ रन्स करू दिले..
इंग्लंड मध्ये असेच झालेले. शेपूट गुंडाळणे जमत नाही...

खलील अहमद इतका रेड हॉट मारा करत असताना, त्याला थांबवून जडेजा-कुलदीप जोडी चा मारा का सुरू केला ते कळलं नाही. खलील ला सलग कोटा पूर्ण करायला लावलं असतं तरी चाललं असतं.

धोनी ने नाही विश्रान्ती घेतली
>> वर्ल्डकप पर्यंत वनडे मधून न काढण्याच्या बोलीवर टी२० मधे विश्रांती कबूल केली असावी.

कोहली ऐवजी रोहितला वनडे अन टी२० कॅप्टन करून पहायला पाहिजे एखादी सिरीज. (कोहली टीम मधे असताना).
रोहितकडे ३ आयपीएल अन १ चँपियन्स लीग, १ एशिया कप, १ निधहास ट्रॉफी टायटल्स आहेत.
कोहलीला अजून मोठ्या टूर्नामेंट्समधे खातं उघडायचंय.

"कोहली ऐवजी रोहितला वनडे अन टी२० कॅप्टन करून पहायला पाहिजे एखादी सिरीज." - का? कोहली ने काय वाईट कॅप्टन्सी केलीय?

रोहित चं मोठ्या धावसंख्येचं appetite कौतुकास्पद आहे. वेल प्लेड!

कोहली ने काय वाईट कॅप्टन्सी केलीय?
>> (अंडर १९ वर्ल्डकप नंतर) टायटल विन नाहीये. आयपीएलचंच बघ. कोहली द प्लेअर, अमेझिंग. पण टायटल विन साठी टीम बांधून जाणं कुठेतरी मागे पडतं.
रोहितनी ते मल्टिपल ऑकेजन्सला करून दाखवलंय.
म्हणून ट्राय करून पहायला काय हरकत आहे??

Pages