क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण ३? कार्थिक आणी धोनी - दोघच आहेत. >> जाधव किंवा रायुडू धरले असतील रे. न खेळणारा असेल तर राहुल.

"फे फे कूठे आहे हे विचारायचा मोह आवरत नाही" - 'इसके सिवा जाना कहा?' Wink इथेच आहे.

भाऊंचं म्हणणं खरं आहे. आणी त्याच्यावरचे बाकीचे आरोप सुद्धा तितकेच खरे आहेत. सद्ध्या, जे चांगलं चाललय, ते बघून एंजॉय करू या. बाकी 'वह कहानी, फिर कभीं'.

"जाधव किंवा रायुडू धरले असतील रे' - ओह ओके. ते काही विकेटकीपर्स नाहीत. आयपीएल ला एक एक्स्ट्रॉ बॅट्समन खेळवण्यासाठी ते दोघं किंवा राहूल विकेटकिपींग करतो, पण त्यांनी फर्स्ट क्लास किंवा लिस्ट ए सामन्यांमधे कधी विकेटकिपींग केली नाहीये.

रोहीत च्या विषयावर एक प्रश्नः असा कुठला बॅट्समन आहे का की जो लयीत येऊन खेळायला लागला तर बघवत नाही? ह्यात आपल्या विरूद्ध खेळणारे बॅट्समेन धरत नाहीये मी. पण अगदी चंद्रपॉल, जिमी अ‍ॅडम्स, इजाज अहमद, धोनी सारखे बॅट्समेन सुद्धा लयीत खेळतात, तेव्हा अ‍ॅस्थेटिकली चांगलेच दिसतात. जसा हसरा चेहरा चांगला दिसतो, उमललेलं फूल सुंदर दिसतं तसच आहे हे.

ऊमललेले की कोमेजलेले अकमल ब्रदर्स खासकरून कामरान कधीच नाही आवडले नाहीत बॅट्समन म्हणून.
वेसेल्स, लेहमन सुद्धा नाही.

रोहीत च्या विषयावर एक प्रश्नः असा कुठला बॅट्समन आहे का की जो लयीत येऊन खेळायला लागला तर बघवत नाही? >> कूक, ग्रॅमी स्मिथ.

भाऊ Happy

फेफ, 'बघवत नाही' आणि 'एकही फटका चुकवू नये अशी नजर खिळून राहणे' ह्यामध्ये बर्‍याच पायर्‍या आहेत, असं मला वाटतं. लारा किंवा सचिन हे पूर्वी त्या खिळण्याच्या कॅटेगरीत होते. लाराला स्पिनर्सविरुद्ध भरात आला की नुसतं बघत राहावं वाटायचं. सचिन हाणायला लागला की जी नजरबंदी व्हायची त्याबद्दल बोलायची सोय नाही. पण सगळेच लोक त्या कॅटेगरीमध्ये नसावेत. मधल्या पायर्‍यांवरही असावेत. शर्मा त्या कॅटेगरीमध्ये (वन-डेमध्ये) मोडतो, असं मलाही वाटतं. Happy

एक मार्क वॉ सोडला तर मला गेल्या अनेक वर्षातील कोणताच ऑसी फलंदाज लक्षात नाही अगदी बघत राहावे असा. गिलख्रिस्ट वगैरे सुद्धा विशेष काही नेत्रदीपक वगैरे नव्हते. मार्क वॉ मात्र एकदम रीगल.

एकूणच बघायला मजा येणे हे भारतीय उपखंडातील व विंडीज मधल्या फलंदाजीबद्दल जास्त लागू असेल. कलाकारी.

एक मार्क वॉ सोडला तर मला गेल्या अनेक वर्षातील कोणताच ऑसी फलंदाज लक्षात नाही अगदी बघत राहावे असा. >> पाँटींग सुद्धा ? भरात आलेला पाँटींग विशेषतः त्याचे समोरचे drives एकदम नेत्रदीपक असायचे.

एकूणच बघायला मजा येणे हे भारतीय उपखंडातील >> wrist work का कमाल है बाबू !

पाँटिंग शेड बीलो लारा अ‍ॅण्ड सचिन, त्याच्या पर्पल पॅचमध्ये. असामी म्हणतो तसे ऑन ड्राईव्ह मस्त. पुलही कसला भारी होता पाँटिंगचा. पोएट्री इन मोशन. त्या ५ वर्षांमध्ये.

मार्क वॉ बद्दल अनुमोदन.
भारतीयेतर डिसिल्वा आणि कॅलिस चे ड्राईवही लक्षात राहण्याजोगे होते.

पाँटिंगची बॅकलिफ्ट जवळपास पूर्णतः मनगटांवर पेललेली असायची पुलला. हात शरीराजवळ. आणि बॉलच्या रिलीजला पाय हवेत असायचा, बॅट त्याला बॅलन्स करायची. आपल्याविरुद्ध खेळत नसताना मस्त वाटायचं. Proud

शेड बीलो >> हे समजायला जरा वेळा लागला. तू प्रयत्नपूर्वक मराठीत लिहितोस म्हणून स्विच झालेच नाही Happy

पुलही कसला भारी होता पाँटिंगचा. >> yes pull पण भारी असायचा. वर्ल्ड कप फायनलला मारलेले अजूनही आठवतात. nonchalantly बॉलरचा आत्मविश्वास खछी करून टाकणारे. रोहितचे front foot pulls तसेच असतात (जेंव्हा तो भरात असतो तेंव्हा).

स्टीव्हन स्मिथ शब्दशः मस्त वआटतो असे म्हणता येणार नाही पण त्याच्या त्या awkward stance नि trigger movement नंतर तो perfect balanced राहून चारी दिशांना बॉल मारतो हे मला प्रेक्षणीय वाटते. मी जआणीवपूर्वक तसे करण्याचा प्रयत्न करून बघितल्यावर (म्हणजे बॉलरला अगदी कल्पना देऊन्कि मला इथे बॉल हवाय नि अमकाच टप्पा हवाय वगैरे) हा प्रकार किती कठीण आहे हे लक्षात आल्यामूळे आदर पण वाढला.

जाँटी र्होड्स पण मस्त fluid वाटायचा खेळताना. वॉ वगैरे सारखा graceful नाही पण मस्त flowy वाटत असेल बघताना.

डिसिल्वा चे drives चाबूक घेऊन मारल्यासारखे वाटत असत. सपासप जात असत. त्याची Lords वरची इनिंग अजूनही लक्षात आहे.

रोहीत च्या विषयावर एक प्रश्नः असा कुठला बॅट्समन आहे का की जो लयीत येऊन खेळायला लागला तर बघवत नाही? >>

संजय (बद्धकोष्ठ) मांजरेकर
रॉबिन सिंग (नुसता स्वीप किती वेळा बघणर)
युसुफ पठाण (रन्स काढत असेल, पण नुसता रावडी गेम, क्लास शून्य)

डिसील्व्हा नक्कीच. पॉण्टिंग चा पुल आवडायचा पण इतर फटके काही विशेष वाटले नाहीत. मार्क वॉ चे तर स्लिप कॅचिंगही अफलातून होते.

शैलीदार बॅटिंग मधे डेव्हिड गॉवर बद्दल ऐकले होते पण प्रत्यक्ष पाहिल्याचे आठवत नाही.

शैलीदार बॅटिंग मधे डेव्हिड गॉवर बद्दल ऐकले होते >> मला गॉवर पेक्षाही वॉ जास्त आवडलाय. चाचपडला तरी glorious वाटत असे Happy

रावडी गेम वाले बरेच जण आहेत. पण रावडी गेमचे मला थोडे आपल्या 'गुंडा' सारखे वाटते. it's so bad that it's so good Wink

मलाही अ भारतीयांमधे मार्क वॉ द बेस्ट. गॉवर फ्लो मधे पाहिलाच नाही त्यामुळे माहीत नाही.

अभारतीयांमधे इतर आवडणारे बघायला म्हणजे लारा आणि रिचर्ड्स हे ऑब्व्हियस. पण पाकड्यांमधे इन्झी द बटाटा सुद्धा चांगला वाटायचा फ्लो मधे. ग्रीनीज तेव्हा फारसा लक्षात नाही पण आता क्लिप्स पाहताना मस्त वाटतो.

एका प्रश्नावर केव्हढे रिस्पॉन्सेस आले!! बागुलबुवासारखा धागा काढण्याचा जोडधंदा करावा का? Wink नको, आहे ते पुरेसं आहे.

तर, महत्वाचं म्हणजे जिंकलो. पुन्हा पाकिस्तान समोर आले, तर इतका एकतर्फी सामना व्ह्यायची शक्यता कमी आहे. पण आज मस्त खेळले. कु. भुवनेश, बु. जसप्रित आणी जा. केदार ने बॉलिंग आणी श. रोहित आणी ध. शिखर ने बॅटींग जबरदस्त केली. खाली का. दिनेश आणी रा. अंबाटी ने पडझड न होऊ देता, शांतपणे मॅच जिंकली. कुलदीप ने काढलेली विकेट crucial होती. त्यानंतर पाकिस्तान ला स्थिरावायला वेळच मिळाला नाही.

Acute lower back injury म्हणजे अवघड आहे लगेच खेळणं. विजय शंकर ला संधी मिळेल का?

पुन्हा पाकिस्तान समोर आले, तर>>

आयोजकांनी भारत पाकीस्तान किमान २ आणि अंतिम सामन्यात समोरा समोर आले तर ३ सामने व्हावे ही खबरदारी घेतली आहे!

Pages