क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनी हल्ली, म्हणजे गेली काही वर्ष, आता उरलो फक्त स्टंपिंग्ज आणी कन्सलटन्सी पुरता, ह्या भावनेनं खेळतोय.

नेल-बायटींग फिनिश होणार असं दिसतय.

*त्याच्या फिनिशर केपेबिलिटीवर इंग्लंड आणि दुबईत मोठ्ठं प्रश्णचिन्ह लागलंय.* - आपली नाजूक स्थिती असताना त्याची कार्तिक बरोबरची 50+ ची भागीदारी ( स्वत:च्या 30+ ) या सामन्यांत आत्यंतिक महत्वाची. यष्टीरक्षण आदर्शवत. आणखी काय अपेक्षित असावं त्याच्याकडून !

आणखी काय अपेक्षित असावं त्याच्याकडून ! >> जिंकून देणे. सिनियर प्लेयर म्हणून तो शेवटपर्यंत राहणे जरुरीचे वाटते. ( विशेषतः आपण Top 3 heavy असताना नि आजूबाजूला पूर्ण अनिश्चितत असल्यामूळे हे अधिकच अपेक्षित आहे) जर तो फिनिशर म्हणून काम करू शकत नसेल तर मग त्याचा बॅटिम्ग क्रमांक बदलता असायला हरकत नसावी.

शेवटच्या over मधे कुलदीप यादव ला strike देणे हा रिस्की प्रकार होता कि master stroke हे match च्या निर्णयावर ठरवायचे का ? Wink

जिंकून देणे. सिनियर प्लेयर म्हणून तो शेवटपर्यंत राहणे जरुरीचे वाटते. >>>
You said it

केदार इंज्युअर्ड असल्यानी कुलदीप ला स्ट्राईक देणं हे नाविलाज को क्या इलाज म्हणून घेता येईल
यावेळी उजवा हॅमास्ट्रिंग दुखावला असल्यामुळे केदारकडून आयपीएल स्टाईल फिनिशची शक्यता नव्हती

मुळात कार्तिक अन धोणी नी जरा फास्ट रन्स केल्या असत्या तर इतकं प्रेशर नसतं आलं
धोणी नी जो न्याय गंभीर अन सेहवागला लावला तोच आता त्याला लावायची वेळ आली आहे

काल धोनी खेळायला आला तेंव्हा अप्रतिम गोलंदाजी, क्षेत्ररक्षण याच्या जोरावर बांगलादेशने प्रचंड दबाव निर्माण केला होता. त्यातच रोहितची विकेट गेली. मैदानाची सीमारेषा दूर असल्याने टोलवाटोलवी धोकादायक होती. अशा परिस्थितीत धोनी व कार्तिकने जो औचित्यपूर्ण खेळ केला, त्याला सामना बघतांना मी सलाम करत होतो. जाधवला अनपेक्षित दुर्दैवी दुखापत झाली नसती, तर त्या जोडीला आपल्याला विजयाच्या दारात आणून सोडल्याचंच श्रेय मिळालं असतं. माझी खात्री आहे कीं बांगलादेशी देखील धोनीच्याच नांवाने बोटं मोडत असतील. म्हणूनच, धोनीला दोष देणं मला खूपच खटकतं.
आणखी एक. पूर्वी धोनीने कांहीं अफलातून खेळी करून आपल्याला विजय मिळवून दिला म्हणून कौतुकाने त्याला ' फिनीशर ' हा किताब चिकटला . पण तीच भूमिका हाच जणूं त्याला संघात स्थान मिळवणारा एकमेव निकष होता व आहे, हेही मला पटत नाही

( मीं शपथपुर्वक सांगतो की मी धोनीचं वकीलपत्र घेतलेलं नाही ! Wink )

असामीजी , मॅचनंतर केव्हिन पीटरसन जाधव व कुलदीप यांच्याशी बोलला. जाधवने आपल्याला नेमकं मार्गदर्शन केल्याचं कुलदीपने कौतुकाने सांगितलं. जें झालं तें विचारपूर्वकच होतं, असं समजायला हरकत नसावी.

काल माझ्या मते खराब चेंडूची वाट बघायचे हे धोरण आखलेले असावे कारण आवश्यक धावा जास्त नव्हत्या. त्यात बांग्लानी चांगलीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. मध्ये जर एखादा पिंच हिटर असता तर कदाचित गोलंदाजाची लय बिघडविणे शक्य झाले असते. केदारने सुरुवात केलेली रुबेलला षटकार खेचून परंतु दुखावल्याने त्याची लय बिघडली. आणि धोनीला धावायला जोडीदार पळणारा हवा त्यामुळे त्याची लय बिघडली नंतर.

कृष्णाजी, सहमत . दबाव असूनही धोनी व कार्तिकने परिस्थितीनुरूप अचूक धोरण शिस्तबद्धपणे राबवलं .
( बाद झाल्यावर वाईट वाटताना त्यांच्या मनात असंही समाधान असावं - ' हम लायैं है तुफानसे कशती निकालके.......)

वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठीचा संघ जाहीर झालाय.-
राहुल, शॉ, पुजारा, कोहली, मयांक, राहणे, विहारी, पंत, अश्विन, सर, कुलदीप, शामी, उमेश, सिराज, ठाकुर

भज्जी सकट बरेच जण करंट (वन-डे) परफॉर्मन्सच्या जोरावर रोहित ला का घेतलं नाही म्हणून हंगामा करताहेत.
मला हा पॉईंट ऑफ व्ह्यू पटत नाही. निवडलेला संघ बर्‍यापैकी ठीक वाटतो. (करूण नायरला विनाकारण डिच नसता दिला तर काहीच तक्रार नसती).
दुसरा ओपनर आणि यष्टिरक्षक नसल्यानी शॉ चा डेब्यू अन पंत ला पूर्ण सिरीज मिळणार हे नक्की दिसतंय.
मयांक अन विहारीला एक-एक मॅच मिळणार असं वाटतंय (पहिल्या मॅच मध्ये खेळणार्‍यानी फारच सुपर्ब कामगिरी केली तर मात्र त्यालाच दोन्ही मॅचेस्मधे चान्स मिळेल.)
पहिली मॅच खेळायला माझी ११:
राहुल, शॉ, पुजारा, कोहली, राहणे, विहारी, पंत, अश्विन, सर, शामी, उमेश (बारावा- मयांक)

तुम्हाला काय वाटतं? रोहित हवा होता का? नायरला चान्स न देता हकलणं बरोबर आहे का?

जर माहित असूनही तुम्ही या प्रश्णांची उत्तरं दिली नाहीत, तर तुमच्या हेल्मेटवर बॉल आदळून त्याची शकलं होऊन तुमच्या पायाशी लोळण घेतील...

वेस्ट इंडीज विरूद्ध नवीन खेळाडूना संधी देण्याचं विचारपूर्वक धोरण राबवायचंच असेल , तरच राहूलला वगळणं कांहींसं समर्थनीय ठरतं. तसं नसेल , तर मात्र आपल्या सर्वोत्तम सःघात , कसोटीसाठीच्याही संघात , राहूलला निश्चितच स्थान असावं .

टेस्ट टीम चांगली आहे आणी बॉलर्स वगळता (कदाचित, साहा पण परत येऊ शकतो), बहुदा, ही future test team वाटते. नायर ला संधी मिळायला हरकत नाही आणी पुढे-मागे कदाचित मिळेलही. मयंक ला संधी मिळाल्याचं पाहून बरं वाटलं. गेले दीड वर्षं, तो सातत्यानं रन्स करतोय.

रहाणे कदाचित लास्ट रोप वर असावा. त्याने ह्या सिरीज मधे खोर्यानी रन्स केल्या नाहीत, तर अवघड आहे.

भुवनेश आणि बुमराचा काय प्रॉब्लेम आहे? भुवनेशची तर वर्ल्डकप -१९ एक्सपायरी डेट असल्यासारखी पुरवून पुरवून वापरणं चालू आहे.
सिराज आणि ठाकुर मध्ये मला काहीच स्पार्क दिसत नाही.... सिराजपेक्षा मावी/नागरकोटी आणायला पाहिजे होते.
मयंक ऐवजी करूण नायरलाच ठेवायला हवे होते किंवा बेस्ट म्हणजे रोहित शर्मा... रोहित शर्माला टेस्ट साठी फक्त कॉन्फिडन्स हवा आहे बाकी त्याच्याकडे स्कील, टेंपरामेंट, अनुभव, जाण सगळं आहे... अफ्रिका, ईंग्लंडपेक्षा हा तुलनेने सोपा पेपर आहे... प्रेशर कमी आहे.. रोहितने टेस्ट टीममध्ये ओपनर म्हणून कायम होणे सगळ्यांच्याच हिताचे आहे.

रहाणे कदाचित लास्ट रोप वर असावा
>> मुळात राहणेचा प्रॉब्लेम हा कॉन्फिडन्सचा आहे. त्याला क्लीअर व्हिजिबिलिटी देऊन थोडा लाँग रन दिला पाहिजे (कदाचित इंग्लंड टूर अन वे.ई. सिरीज हा त्या लाँग रन चा भाग असू शकतो). पुजारा परत एकदा व्हाईस कॅप्टन होईल राहणेला धक्का मिळाला तर.

आपल्या सर्वोत्तम सःघात , कसोटीसाठीच्याही संघात , राहूलला निश्चितच स्थान असावं
>>> भारतात खेळताना असावं, बाहेरचं सांगता येत नाही. टी२० मधे मात्र असायलाच हवा.

भुवनेश आणि बुमराचा काय प्रॉब्लेम आहे
>>> भुवी इंज्युरी प्रोन आहे. इंग्लंडमधेही इंज्युअर्ड झाला होता. सो वर्ल्डकप पर्यंत त्याच्या बाबतीत नो रिस्क पॉलिसी दिसतेय.

मयंक ऐवजी करूण नायरलाच ठेवायला हवे होते
>>> जर ट्रायल सिरीज असेल तर कोहलीला एक्सटेंडेड रेस्ट देऊन मयांक (करंट फॉर्म बेसिस वर) अन करूण (इंग्लंड टूर च्या काँपेन्सेशन मधे) दोघांना चान्स देता आला असता. कॅप्टनसीच्या जवाबदारीत राहणेही कॉन्फिडन्सनी खेळला असता (मिच कॅप्टन म्हणजे मला काही कुणी काढत नाही).

मला तरी अग्रवाल, शॉ ह्या चांगल्या पायर्‍या वाटत आहेत. विजय ला मागच्या दौर्‍यामधे मधे नि धवनला नंतर डच्चू देऊन We are moving on हा clear signal दिला आहे. सध्या जे खोर्‍याने धावा जमवत आहेत किंवा promising वाटले आहेत ह्यामधे ह्या दोघांचा क्रमांक वरचा आहे. राहुल ला शेवटच्या सामन्यामधले शतक नि विजय चे अजिबात न खेळणे भयंकर लाभले आहे (फे फे. राहुल हा नवा रोहित आहे ह्याबद्दल तुझे काय म्हणणे आहे ? Happy ) रोहित शर्मा as a test opener हा प्रयोग आधीही झालेला आहे. lateral move होणारे बॉल हा त्याचाही कमकुवत दुवा असल्यामूळे अशा प्रयोगांपेक्षा जे regular open करतात त्यांना आधी संधी देणे उचित वाटते. मयांकने भारतातच नाही तर Aus नि England मधे धावा काढलेल्या आहेत त्यामूळे शॉ च्या आधी त्याला संधी मिळणे योग्य ठरेल.

करुण नायर बद्दल वाईट वाटले पण Aus दौर्‍यामधे ना काढलेल्या धावा त्याला भारी नडल्या आहेत हे उघड आहे. विहारी ने गेल्या दीड दोन वर्र्षांमधे जो रतिब घातला होता तो बघता नि पांड्या बाहेर आहे हे बघितल्यावर त्याला संधी मिळणे चुकीचे वाटत नाही. राहाणे चा problem confidence चा वाटतो आहे म्हणून पुजारा, राहाणे, ह्यांना अजिबात हात लावू नये.

पूर्वी धोनीने कांहीं अफलातून खेळी करून आपल्याला विजय मिळवून दिला म्हणून कौतुकाने त्याला ' फिनीशर ' हा किताब चिकटला . पण तीच भूमिका हाच जणूं त्याला संघात स्थान मिळवणारा एकमेव निकष होता व आहे, हेही मला पटत नाही >> नसावाच. कीपर म्हणून त्याला अजूनही पर्याय नाही असे माझे मत आहे. पण त्याच्याकडून सिनियर बॅटसमन म्हणून ज्या अपेक्षा आहेत त्या तो नक्कीच पुर्‍या करत नाहिये. हा फक्त एका इनिंगचा प्रश्न नाहीये तर मागच्या वर्षभराचा trend आहे. परत चौथ्या नि पाचव्या क्रमांकावर खेळण्याचा त्याचा आग्रह त्याच्या slow सुरुवातीमुळे महागडा पडतो. विशेषतः बाकीची middle order ढिसूळ असताना.

"राहुल हा नवा रोहित आहे ह्याबद्दल तुझे काय म्हणणे आहे ?" - मैने उसे, उस नजर से कभी देखा ही नहीं| Happy

"कीपर म्हणून त्याला अजूनही पर्याय नाही असे माझे मत आहे. " - वन-डे मधे बॅटींग पक्की करण्यासाठी, आपण (द्रविड - २००३) आणी बाकी बर्याच टीम्स सुद्धा थोडा कम-असल विकेटकीपर्स घेऊन खेळलेल्या आहेत. त्यामुळे हे आर्ग्यूमेंट धोनी ला टीम मधे टिकवण्यासाठी पुरेसं नाहीये. असो. ह्या विषयावर काहीही बोलण्यात अर्थ नाहीये. तो २०१९ चा वर्ल्डकप खेळूनच जाणार आहे. ज्या धोनीने अनेक सिनिअर्स ना वयाचा, टीम मधे आवश्यक तितकं काँट्रीब्यूट करण्याचा दाखला देत काढलं, त्याच्या स्वतःच्या बाबतीत हा न्याय लागू पडला नाही - what goes around, does not 'always' come around हे मात्र खरं.

राहुल हा नवा रोहित आहे ह्याबद्दल तुझे काय म्हणणे आहे ?
>> रोहित बर्‍यापैकी डाऊन टू अर्थ आहे, फुल फ्लो मधे बॅटिंग करताना समोरच्या बॉलिंगचा मर्डर करत असला तरी डोक्यात हवा गेलेला वाटत नाही. राहुल मात्र बरेचदा (टी२० च्या) अर्ध्या हळकुंडानी पिवळा झालेला वाटतो. अ‍ॅग्रेशन वेगळं अन माज वेगळा. राहुलचा माज दिसतो अन रोहितचं अ‍ॅग्रेशन.

के एल राहुलने कसोटी पदार्पण केले तेव्हा तो राहुल द्रविडचा सक्सेसर आहे अशी सगळीकडे हवा होती. तो आजकाल शाहिद आफ्रिदीचा सक्सेसर वाटतो.

मी राहुल रोहित आहे हे त्याच्या temperament संदर्भात बोलत नसून
१. तो भयंकर टॅलेंटेड आहे
२. पण तेव्हढाच inconsistent आहे
३. तो flow मधे खेळतो तेंव्हा पारणे फेडावे असे शॉट्स मारतो पण जेंव्हा झगडत असतो तेंव्हा हा एव्हढ्या level ला कसा काय खेळतो बाबा असा प्रश्न पडतो.
४. ५-६ मॅच fail गेला, लोक प्रश्न विचारायला लागले कि पुढच्या मॅच मधे एखादी मोठी इनिंग खेळून जातोच.
ह्या दृष्टिने बोलत होतो.

१. तो भयंकर टॅलेंटेड आहे
२. पण तेव्हढाच inconsistent आहे
३. तो flow मधे खेळतो तेंव्हा पारणे फेडावे असे शॉट्स मारतो पण जेंव्हा झगडत असतो तेंव्हा हा एव्हढ्या level ला कसा काय खेळतो बाबा असा प्रश्न पडतो.
४. ५-६ मॅच fail गेला, लोक प्रश्न विचारायला लागले कि पुढच्या मॅच मधे एखादी मोठी इनिंग खेळून जातोच.
ह्या दृष्टिने बोलत होतो. >>> कोहली सोडून हे कोणाला लागू पडत नाही? सर्व्हे घेतला तर लोक वरचं वाचून रोहित, धवन, पुजारा, विजय, राहूल, रहाणे, जडेजा, धोनी, पंड्या अशी वेगवेगळी नावं घेतील. Proud
कोणाच्या डोळ्याचं काय पाहून पारणं फिटतं कसं सांगणार Lol

जाडेजा, पांड्या ह्यांचे शॉट्स डोळ्याचे पारणे फेडणारे वाटत असणार्यांशी काय वाद घालायचा रे Wink

जाडेजा, पांड्या ह्यांचे शॉट्स डोळ्याचे पारणे फेडणारे वाटत असणार्यांशी काय वाद घालायचा रे >>अरे सूरत, जामनगरच्या कॉलेजात कॉमर्सच्या तिसर्‍या वर्षाच्या तरूणीच्या डोळ्यातून बघ रे... Proud

Pages