क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इम्रान खान ने म्हटलं होतं की भारतानं एक पाऊल पुढे टाकलं, तर आम्ही दोन पावलं पुढे टाकू. मग बीसीसीआय ने कोहली ला न खेळवून एक पाऊल पुढे टाकलं, तर पाकिस्तान ने आक्खी टीमच न खेळवून दोन पावलं पुढे टाकली. Happy

असा माझ्या एका पाकिस्तानी मित्राने, त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप वर आलेला विनोद मला सांगितला. Happy

असा माझ्या एका पाकिस्तानी मित्राने, त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप वर आलेला विनोद मला सांगितला. >> हे खरे भरतवाक्य आहे का? Proud

वरच्या शैलीदार चर्चेत आमचे हैद्राबादी लक्ष्मण किंवा अझर नाही का? >> बरेच भारतीय खेळाडू असतात शैलीदार असतात ह्या गृहितकामूळे. हि यादी न संपणारी आहे नि प्रचंड वर खाली होणारी आहे. अगदी वुर्केरी रामन सुद्धा भयंकर स्टायलिश नि तेव्हढाच frustrating होता.

इतना फ्रस्टेशन बरं नव्हे.. ऑस्ट्रेलिया मध्ये खेळातील आपले खेळाडू नीट.
फक्त वर्ल्डकप ला माती खातील अशी शंका वाटते आहे.. सचिन सारखा कोहली सगळ्यात जास्त धावा काढणार ठरेल पण कप दुसराच देश नेणार..

"हे खरे भरतवाक्य आहे का?" - Happy Happy

"अगदी वुर्केरी रामन सुद्धा भयंकर स्टायलिश नि तेव्हढाच frustrating होता." - अरे ह्या चर्चेत वुर्केरी रमन च्या बरच आधी आपला विनोद कांबळी येईल ना. पण अझर, लक्ष्मण वगैरे नाही येणार कारण चर्चा, अनाकर्षक बॅट्समेन ची चालली होती.

संघ निवडताना कोणतीही निवड समिती खेळाडूला 'शैलीदार व आकर्षक ' हा निकष लावत असेल, असं मला वाटत नाहीं. पण एक रसिक प्रेक्षक म्हणून निवडलेल्या खेळाडूला पसंतीची दाद देतांना मात्र तो निकष लावण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. यात गोची अशी होते कीं कांहीना मॅथ्यू हेडन आकर्षक वाटतो तर कांहीना पाॅटींग !

गुंडप्पा विश्वनाथ यांची मद्रदेशीची २२२ धावांची खेळी मी 'दुर्दशान' संचावर बघितलेली तेंव्हा चेंडू एका दिशेला आणि कॅमेरा दुसर्‍या दिशेला असे.
ओह आणि टाळ्या ह्यावरून समजायचे काय झाले असावे!
पण ती खेळी खेळत असताना त्यांचे नजाकती फ्लीक्स आणि कट्स आजही आठवतात जास्त पळावे लागुन नये म्हणून साहेब गॅप बरोबर शोधत ३१ चौकार मारलेले!

कांहीं खेळाडूंचे कांही फटके ही त्याना मिळालेली दैवी देणगीच असते व ती पहायला मिळणं ही रसिकांसाठी पर्वणीच . विश्वनाथची हुकमी . लयदार व लिलया मारलेली square cut त्यापैकीच एक !
वर अझरचा उल्लेख आला आहे. शैलीदार , मनगटी खेळाचा तो नमुना असूनही धांवाच्या बाबतीतही नियमित व सरस होताच. ( पदार्पणातच पहिल्या तीन कसोटीत शतकं ! ) पण , क्षेत्ररक्षणही अचूक व शैलीदार असूं शकतं , हेंही त्याला पाहिल्यावर जाणवायचं . His instant pick up & throw on the run was not only accurate but was full of grace ! पतौडी , सोलकर असे इतरही शैलीदार क्षेत्ररक्षक.
( अर्थात, आतां क्षेत्ररक्षणाचा दर्जाच खूप उंचावला आहे व जाॅटीने तर त्याला शास्त्राचाच दर्जा देवून टाकलाय ! )

बांग्लादेश ५ डाऊन! (हे भ्रमण मंडळातल्या, 'सत्रा डाऊन?" च्या चालीवर वाचू नये Wink )

सरांनी पुनरागमन धडाक्यात साजरं केलय दोन्हीकडे. रोहित ची कॅप्टन्सी सुद्धा वेगळी वाटते कोहलीपेक्षा. मस्त!

ओह आणि टाळ्या ह्यावरून समजायचे काय झाले असावे! >>> Lol

ही चर्चा बरीचशी अभारतीय फलंदाजीबद्दल होती म्हणून आपले मनगटवीर आले नाहीत त्यात.

दुसरीकडे अफगाणिस्तानने २५०+ केले पाक विरुद्ध त्यामुळे ही मॅच पण पाकिस्तानला अवघड जाणार. रशिद एकदा सुरु झाला की काही खरं नाही त्यांचं !

वेल प्लेड अफगाणिस्तान. शेवटच्या ओवर मधे २ चुकीच्या बाॅल्समुळे पकड निसटली. मस्त फाइट दिली पण पाकिस्तानला !

आता जिंकले बीसीसी आय म्हणून बोलायचे नाही, पण याहि वेळी ७/१०१ वरून १७३ पर्यंत खेचली इनिंग बांगलादेशनी. ?!

मॅच मधे शून्यावर बाद झाला तरी एकवेळ चालेल, पण स्टंपमागे किंवा एकंदर टीममधे धोनी का पाहिजे हे कालच्या आपल्या बांग्लादेश विरुद्धच्या मॅच मधे शकिब उल हसन च्या विकेट मुळे परत एकदा समजलं ! Happy

मला वाटतं आणखी एक विकेट धोनीच्या क्षेत्ररक्षक ठराविक ठिकाणी हलविण्याच्या सल्यामुळे मिळाली.

237 ! जिंकायला हव्यात 238 . बघूं, फाॅर्मात असलेली आपली फलंदाजी कसं पेलते हें कठीण नसलेलं आव्हान! विकेट कांहीं गडबड करेलसं अजिबात वाटत नाहीं. पाक प्रयत्नांची शिकस्त तर करणारच .
सामना रंगतदार व्हावा अशी रास्त अपेक्षा !

Pages