क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक दौरा हा पुढच्या दौरयासाठी/ चषकासाठीची तयारी म्हणून बघणं आणखी किती वर्षं चालणार आहे आपलं
>>>

यासाठी किरकोळ वन डे मालिका (मुख्यतः दुरंगी) पहिल्या बंद करायला हव्यात. त्या ऐवजी टी-२० खेळवा (शेवटी त्यात लोकांना एंटरटेनमेंट जास्त मिळते, अन रेव्हेन्यू ही)
किमान ४ / ५ देशांचा सहभाग असेल तरंच वन डे मालिका होऊ द्यावी.

हा संपूर्ण आशिया कप पाहता गर्दी खेचणारा केवळ भारत पाकस्तान सामना होणार त्यामुळे त्यांच्यात किमान दोन सामने होतील ही खबरदारी घेतल्या सारखी दिसतेय. आता अजून एक सामना नक्की झाला भारत पाकीस्तान सुपर ४ मध्ये. आणि झाला तर कदाचित अंतिम सामना पुन्हा भारत पाकीस्तान, जर बांग्ला किंवा अफगाण संघाने दोघांपैकी एकाला बाहेर नाही काढले तर!

सुरवातीला चांगली गोलंदाजी करून पाकिस्तानचे दोन गडी तंबूत पाठवले, पण आता डावाची पुनर्बांधणी होतेय की काय, असं वाटतंय. धोनीने मलिकला आत्ताच ड्रॉप केलं. पाकिस्तान १६ षटकांत ६०/२.

भाचा,
हेच्च लिहायला आलो होतो

जावईबापू ना डोक्यावर चढवलं तर मिऱ्या वीटतील

केदार स्ट्राईक्स

आता पाकिस्तान ला डोकं वर काढायची संधी देता कामा नये. २०० चा स्कोअर सुद्धा फायटींग ठरू शकतो.

१५६-७

ह्या संघात आपल्या ३ यष्टीरक्षक खेळतायेत!

राहुल असता तर चौथा...

विकेट काढारे पटकन
लई बिल झालं फहीम अन आमिरचं

गेला फहीम

वा! १६३. काल हाँग काँग समोर २८५ रोखायला मुश्किल आणि आज पाकिस्तानला १६३ मध्ये गुंडाळले. म्हणून तर हा खेळ आपण बघतो. Happy

Glorious uncertainties...
(Second innings मधे नाही दिसल्या तरी चालेल)

कालचा दिवस खराब खेळले तो शत्रूला गाफिल ठेवायचा गनिमी कावा होता की काय >> धोनीची श्रूड स्ट्रॅटेजी असावी असं म्हंटलं काल कोणीतरी. Proud

धोनी रिटायर झाल्यामुळे हरलो आपण इंग्लंडात. >> अ‍ॅक्च्युअली अर्धामुर्धा रिटायर झाल्यामुळे असे म्हणा.
शास्त्रीच्या जागी पूर्ण रिटायर्ड धोनी कोच असता तर जि़ंकलो असतो... किंवा टेनिस मधल्या डेविस कप सारखी नॉन-प्लेईग कॅप्टनची कॉन्सेप्ट क्रिकेट मध्ये आणली पाहिजे Lol

गावस्कर समालोचनात म्हणाला, की पळून धावा काढायला त्याला मोहिंदर अमरनाथ साथीदार म्हणून सर्वात जास्त आवडायचा. चांगली आठवण. Happy

शोऐब मलिक ने सोन्यासारखी संधी वाया घालवली. पांड्या injured म्हणजे सहावा बॉलर नाही हे दिसताना पाकिस्तान capitalize करू शकले नाही.

चँपियन्स ट्रॉफी मधली पहिली मॅच पण आपण सहज जिंकलो होतो नि मग फायनलमधे फटले पडले होते.

रोहितला लय सापडली कीं टीव्ही समोरून हलूं नये! >> फे फे कूठे आहे हे विचारायचा मोह आवरत नाही Happy

"ह्या संघात आपल्या ३ यष्टीरक्षक खेळतायेत!" - कोण ३? कार्थिक आणी धोनी - दोघच आहेत.

मस्त सुरूवात केलीये भारतानं. लवकर संपवायला हवी , उगाच नेल-बायटींग फिनीश वगैरे नको.

Pages