Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसोटीसाठी पंतला धवनच्या जागीं
कसोटीसाठी पंतला धवनच्या जागीं सलामीला ट्राय करणे म्हणजे एक चूक दुसर्या मोठया चूकीने दुरूस्त करायला पाहण्यासारखंच वाटतंय मला ! >>> भाऊ बहुतेक सगळेच पंत ही धवनची रिप्लेसमेंट म्हणून फक्त आणि फक्त #WC19 संदर्भातच बोलत आहेत.
पंत विकेट कीपर म्हणून कसोटी संघात भारतीय पट्ट्यांवर बॅट्समन म्हणून साहा आणि कार्तिकपेक्षा खूप यशस्वी होईल असे वाटते.
बाहेर कोहली आणि शास्त्रीशिवाय कोणाच्याच पर्फॉर्मन्च्स चा भरोसा देता येत नाही.
राहुल म्हणजे राहुल शर्मा की के एल राहुल हे जरा स्पष्ट करीत जावे. अर्थात दोघेही तसलेच आहेत... >> बाबा राहुल शर्मा..गांजा केस मध्ये अडकून संपलाच की.. त्याला सुद्धा आठवत नसेल कधी तो ईंडियन टीममध्ये होता म्हणून.
भाऊ मला वाटते कि हे फक्त
भाऊ मला वाटते कि हे फक्त लिमिटेड overs पुरतेच मर्यादित आहे. पण अर्थात धवन मर्यादित षटकांमधे चांगला खेळतो तेंव्हा परत मग तिथे त्याला का बदला असा प्रश्नही योग्य ठरेल. तर उत्तर पंत जास्त explosive आहे नि रोहित ला inning बिल्ड व्हायला वेळ मिळू शकेल ह्यापेक्षा अधिक काही नसावे.
मांजरेकर म्हणतो कि भारताबाहेर जिंकण्यासाठी भारतात चालणार्या flashy खेळाडूंपेक्षाही भारताबाहेर चालू शकतील अशांना घेऊन दोन्हीकडे खेळा. जे भाराताबाहेर खेळतील ते भारतात चालणर्या खेळाडूंएव्हढे भारता रतिब घालू शकले नाहित तरी पुरेसा घलतील. हे सगळे in theory ठीक असले तरी
१. भारताबाहेर खेळू शकतील असे खेळाडू नक्की कोण हा कळीचा प्रश्न त्याने अनुत्तरीतच ठेवलाय
२. आपण जास्त सामने भारतात खेळतो तेंव्हा त्यांच्यात chance का घ्या हा प्रश्न पडतो.
तुम्हाला काय वाटते ?
मला वाटते ज्यांना भारतीय
मला वाटते ज्यांना भारतीय खेळपट्ट्यावर धावा (खूप धावा, ३० - ४० नाही, जास्त) काढणे जमते नि गोलंदाजी चांगली करू शकतात म्हणजे खूप जास्त धाव न देता हुकुमी विकेट काढू शकतील अश्यांना भारतातल्या सामन्यांमधे खेळवावे.
अर्थात हे जे मला सुचले ते सगळ्यांनाच सुचले असणार - प्रश्न फक्त असे खेळाडू कोण? धवन की मुरली विजय की पुजारा की राहुल? रहाणे की विहारी, की पंत की पांड्या ?
परदेशात सगळ्या खेळाडूंची नावे एका ड्रममधे भरून जी अकरा नावे येतील त्यांची टीम करावी. कधी कोहली शतक करतो, तर कधी पंत.
खेळाडूंची नावे ही नुसती उदाहरणे आहेत. खरे तर पंत, रहाणे, धवन, इ. यांच्या फलंदाजीचा ही नुसती उदाहरणे आहेत. खरे तर पंत, रहाणे इ. यांच्या फलंदाजीचा तौलनिक अभ्यास करणे मला जमणार नाही! माझ्या बेसिकमेच लोच्या! माझ्या बेसिकमेच लोच्या! मला फक्त Criket is a game of uncertainty असले काहीतरी ऐकून माहित आहे, त्याचा अर्थ काय माहित नाही.
ते १७ आणि १८ सलग दोन सामने
ते १७ आणि १८ सलग दोन सामने खेळायला विरोध होता तो मावळला का?
काय तोडगा निघाला?
मांजरेकर म्हणतो कि भारताबाहेर
मांजरेकर म्हणतो कि भारताबाहेर जिंकण्यासाठी भारतात चालणार्या
मांजरेकर ! ज्याला स्वतःला स्वतःचे करीअर नीट सांभाळता आले नाही आणि सचिनचा दुस्वास करण्यापलिक्डे काही जमले नाही त्याने काही सल्ला द्यावा हा एक विनोदच आहे....
त्याने काही सल्ला द्यावा हा
त्याने काही सल्ला द्यावा हा एक विनोदच आहे.. >> आता आपण नाही का, राहुल शर्माइतकेही क्रिकेट न खेळताइ, इथे बसून सल्ले देत असतो हुडा
ते १७ आणि १८ सलग दोन सामने खेळायला विरोध होता तो मावळला का? > >तो विचित्रच प्रकार आहे. त्यात एक मार्की मॅच आहे. कोण काय खाऊन बसले होते हे ठरवताना देव जाणे. तुमच्या मार्केटींगसाठी सगळ्यात मह्त्वाच्या टीम ला असे करायला लावता ?
धोनी व पंतची तुलना करतांना हे
धोनी व पंतची तुलना करतांना हे मुद्दे महत्वाचे ठरावेत -
1 ) निदान आत्ता तरी धोनीचे reflexes sharp आहेत व त्याच्या फिटनेस, चपळतेने धांवा घेण्याची क्षमता याबददल शंका नाही ;
2) धोनीचं खेळावर सतत बारीक लक्ष असतं व प्रचंड अनुभवामुळे त्याचा सल्ला मोलाचा, निर्णायकही ठरू शकतो ; व
3) धोनीचं 'फिनीशींग' उतरणीला लागलं असलं तरीही त्याच्या झुंजार व धीरोदात्त वृत्तीमुळे तें 'कठीण समय येतां' कामीं येवूं शकतं .
(पूर्वी मीच धोनीबद्दल शंका व्यक्त केली होती पण हल्ली त्याचा खेळ पाहून माझं मत बदललं आहे )
भाऊ सहमत. याच संदर्भात आजच्या
भाऊ सहमत. याच संदर्भात आजच्या पेपरमधला एक लेखः-
https://indianexpress.com/article/sports/cricket/asia-cup-2018-ms-dhoni-...
धोनीने अजून एक वर्ल्ड कप
धोनीने अजून एक वर्ल्ड कप (किंवा एखादी मेजर सिरीज) गाजवून मगच निवृत्त व्हावे असे वाटल्याने मी सध्या त्या बाजूने येणार्या प्रतिक्रियांशी सहमत आहे
भाऊ पहिल्या दोन मुद्द्यांना
भाऊ पहिल्या दोन मुद्द्यांना अनुमोदन. तिसर्या बाबत साशंक आहे. जिंकण्यापेक्षा त्याच्या खेळ्यांमूळे हरण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे नि त्याच्या पाठी कोणीच नसल्यामूळे एकदम कड्यावरून फेकल्यासारखा आपला डाव संपतो. त्याचा नंबर चार वर खेळण्याचा हट्ट सगळा टीम बॅलॅन्स घालवतोय हे बघून वाईट वाटते
एशिया कप मधे ४० च्या वर तापमान असताना एकाच टीम चे दोन लागोपाठ सामने ठेवणारे संयोजक महान कि त्याला मान्यता देणारे महाभाग महान हा खरच प्रश्न आहे. ह्या दोन्ही ग्रूप मधल्या लोकांना ह्या दोन्ही सामन्यांच्या वेळी प्रत्येकी २-३ तास बाऊंड्रीवर उभे करून ठेवण्याची शिक्षा द्यायला हवी.
एशिया कप मधे नं ३ नि ४ मधे पांडे नि रायुडू ला extended run देऊन त्या एका स्पॉटचा काय तो निकाल लावतील अशी अपेक्षा ठेवूया. राहुल middle order experiment संपला असेल असे धरूया.
कोहली आणि धोनी दोघांचा फेवरिट
कोहली आणि धोनी दोघांचा फेवरिट केदार जाधव नाही का अजून रिकवर झाला? स्क्वाड मध्ये नाही का?
सॉरी मी अजून फॉलो करायला सुरूवात नाही केली एशिया कप.
केदार जाधव आहे पण तो बहुतेक
केदार जाधव आहे पण तो बहुतेक वेळा ५-६ वर खेळतो. इथेही तिथेच खेळेल असे वाटतेय.
शर्मा १
शर्मा १
धवन/पंत/राहूल २
कोहली -३
धोनी -४
रायुडू ५
जाधव ६
पंड्या ७
भुवनेश ८
कु यादव ९
बुमरा १०
चहाल ११
असे नाही का चालणार? ४-५ बदलू शकतात सिच्युएशनप्र्माणे....असे काही तरी
कोहली -३ नाहि खेळत आहे एशिया
कोहली -३ नाहि खेळत आहे एशिया कप.
असामीजी , धोनीला करियरच्या
असामीजी , धोनीला करियरच्या या भागात फलंदाजी क्रमांक हा प्रतिष्ठेचा मुद्दा असणार नाही व खेळाच्या स्थितीनुसार तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला येईल असं मला वाटतं.
एशिया कप मधे भारत वि.
एशिया कप मधे भारत वि. हाँगकाँग मॅच सुरू आहे. धवन चा इंग्लंड सिरीज वरचा उतारा. आता ओढा खोर्यानी रन्स - करा लेको चैन, मटार उसळ शिकरण वगैरे.
केदार जाधव, रायडू, धोनी ही मिडल ऑर्डर फारच ठिसूळ वाटते. अजय जडेजा, रॉबिनसिंग आणी एक कुणीतरी (संजय मांजरेकर, ह्रिषिकेश कानिटकर, अमय खुरासिया, अतुल बेदाडे) ह्या मिडल ऑर्डर सारखी वाटते. पण बाकीचे पर्याय सुद्धा फारसे सशक्त नाहीयेत. त्यातल्या त्यात मनीश पांडे कडून अपेक्षा आहेत. त्याच्याकडे क्षमता आहे आणी आत्ता दुलीप ट्रॉफी मधे रन्स सुद्धा झाल्या आहेत. बघू, काय होतं ते.
अजय जडेजा, रॉबिनसिंग आणी एक
अजय जडेजा, रॉबिनसिंग आणी एक कुणीतरी (संजय मांजरेकर, ह्रिषिकेश कानिटकर, अमय खुरासिया, अतुल बेदाडे) ह्या मिडल ऑर्डर सारखी वाटते. >>
धवन ची सेंच्युरी झाली. गंगेत
धवन ची सेंच्युरी झाली. गंगेत घोडं न्हायलं. आता अजून दोनेक मोठ्या इनिंग्ज ह्या स्पर्धेत झाल्या (अफगाणिस्तान, लंका, बांग्लादेश वगैरे आहेतच) की मिशांना पीळ, मांडीवर थाप आणी दंडात बेटकुळी - बोले तो लाईफ सेट. उरलं सुरलं सावरायला वेस्ट-इंडीज ची इंडिया टूर आहेच. मग डिसेंबरमधे जावईबापूंचा नाताळसण साजरा होईल ऑस्ट्रेलियात.
फेफ, इकडे बघ.
फेफ, इकडे बघ.
"At the same time, opening, you would agree, is a clear area where the first-choice guys have been found wanting?
- Boss, it was tough (chuckles). These are the best openers we have."
--- इंग्लंड (टेस्ट?) सिरीज बद्दल, शास्त्रीबुवा, क्रिकइन्फोवर
नाताळसणाची फुल्ल तयारी आहे.
" Boss, it was tough
" Boss, it was tough (chuckles). These are the best openers we have." - मग झालं तर. ठरलं. गेल्या २० वर्षातली सर्वोत्कृष्ट टीम. बेस्ट अॅव्हेलेबल ओपनर्स. शास्त्री सारखा खंदा कोच बघता ...................................................................... विलो टीव्ही चं सबस्क्रिप्शन काढून ते पैसे स्टॉक्स मधे किंवा इटीएफ मधे घालावेत म्हणतो.
एक दैवदुर्विलास म्हणजे, इंडिया टीम मधून ड्रॉप केल्यावर मुरली विजय इसेक्स कडून काऊंटी क्रिकेट खेळायला गेला आणी पहिल्याच मॅच मधे एक हाफ-सेंच्युरी आणी एक सेंचुरी मारली. दुसर्या मॅच मधे, पहिल्या इनिंग ला ८५ केले.
हे सगळं लिहेपर्यंत तिकडे धोनी येऊन गेला सुद्धा.
धोनी हल्ली ४-५ गेममध्ये एकदा
धोनी हल्ली ४-५ गेममध्ये एकदा बरा खेळतो, त्यामुळे तो ही स्टॅटिस्टिकल अडचण लोअर रँक्ड टीमविरुद्ध खेळताना काढून घेतोय. ह्यांच्याविरुद्ध खेळताना लवकर आउट होऊन घेऊ, म्हणजे मग महत्वाच्या मॅचआधी आपली इनएव्हिटेबल फेल्युअर्स होऊन जातील आणि मग इनएव्हिटेबली आपण चांगले खेळू, अशी श्र्यूड स्ट्रॅटेजी आहे त्याची. धोनीला गेम नॉलेज आहे म्हणतात ते उगीच नाही.
"अशी श्र्यूड स्ट्रॅटेजी आहे
"अशी श्र्यूड स्ट्रॅटेजी आहे त्याची." -

आजच्या शतकाची धवनला सुद्धा
आजच्या शतकाची धवनला सुद्धा लाज वाटली असेल....
श्र्यूड स्ट्रॅटेजी >> धोनी
श्र्यूड स्ट्रॅटेजी >>
धोनी बद्दल बोलले तर बागुलबुवा येतो.
नवा पोरगा कसा बॉलिंग करतोय ?
पांडे च्या जागी कार्थिक का हे कळले नाही. कार्थिक England मधे चालला नाही मग परत त्याला आणण्यात नक्की काय डावपेच आहे ? इथे चालला तरी World Cup England मधे आहे तिथे चालेल असे छती थोकपणे संगता येत नसताना परत तोच प्रयोग का ?
हाँगकाँग ८५/०, १२ षटकात .
हाँगकाँग ८५/०, १२ षटकात . अमेझिम्ग
हाँगकाँगनी हवा टाईट केलेली
हाँगकाँगनी हवा टाईट केलेली होती विकेट पडे पर्यंत.. एक पडल्यावर दुसरी लगेचच पडली पण.. दोन्ही सेट बॅट्समन आऊट झाले... आता बहुतेक जिंकेल बीसीसीआयची टीम(झक्की स्पेशल टर्म) आजची मॅच..
जिंकले बाबा एकदाचे.. कुंथून
जिंकले बाबा एकदाचे.. कुंथून कुंथून !
मला वाटत होतं की फक्त श्रीलंकाच वाईट खेळतीये...
प्रत्येक दौरा हा पुढच्या
प्रत्येक दौरा हा पुढच्या दौरयासाठी/ चषकासाठीची तयारी म्हणून बघणं आणखी किती वर्षं चालणार आहे आपलं ! अशा मानसिकतेमुळे ' चलो , जाने दो . हुआ सो हुआ .! ' हेंच पालुपद प्रत्येकच दौरयात तोंडात बसतं , असं नाही वाटत ? प्रत्येक दौराच नव्हे तर प्रत्येक सामना हा आत्यंतिक महत्वाचा आहे , ही वृत्तीच जिंकण्याची मानसिकता रूजवते , असं मला वाटतं. प्रत्यक्ष हरणं / जिंकणं यांपेक्षा ही वृत्तीच खेळासाठी , खेळाडूंसाठी व क्रिडाप्रेमींसाठीही महत्वाची!
कालची मधली फळी म्हणजे निव्वळ
कालची मधली फळी म्हणजे निव्वळ फळकूट वाटले...
अरे किंचीतसा प्रतिकार नाही त्या किंचित शहा सारख्या गोलंदाजाचा!!
काय होणार आज?
काय होणार आज?
मौका मौका... की धोका धोका??
ठाकुर च्या जागी बुमरा येणार हे नक्की, पण कार्तिक ऐवजी पांडे अन खलील ऐवजी पांड्या येणार का?
कालचा मिड्ल ऑर्डरचा पर्फॉर्मन्स पाहता पांड्याच्या (ऑन पेपर) बॅटिंगची गरज दिसते. अन्यथा खलीलला ठेवायला काहीच हरकत नव्हती.
माझी आजची ११:
रोहित, धवन, रायुडू, पांडे, धोणी, केदार, पांड्या, कुलदीप, भुवी, चहाल, बुमरा
राखीव: राहुल (फील्डिंग / कॅचिंग पॉईंट ऑफ व्ह्यू)
Pages