क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

8 गेल्या ! सामना गेल्यात जमा!
*ढेकणं मारायला बंदुकीची काय गरज....* नाही पटत , नाहीं रूचत मला , कोणत्याही संघाबद्दल असं बोललेलं ! Sad
खूप विचारपूर्वक संघाची निवड करणं , सलामीच्या जोडीचा तिढा सोडवणं , शेवटच्या फलंदाजानी चिकाटी दाखवणं महत्वाचं. अजून 2 सामने आहेत !!

सलामीला मी गोलंदाजांना बॅटने उत्तर द्यायलाच जातो . पण ते अंपायर आधीच हात वर करून उत्तर देवून टाकतात ना त्यांच्या प्रश्नाना !!20181213_203929.jpg

भाऊ Lol

आपले शेवटचे ५ फलंदाज बाद होण्यासाठी केवळ पाऊणतास आणि २८ धावा द्याव्या लागल्या...

ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने ३५ धावा केलेल्या.

अत्यंत दुबळी फलंदाजी. आघाडीला राहुल ऐवजी शामी पण चालला असता.. मुरली ऐवजी कुणीही..
आणि ६ नंबर पासून ११ पर्यन्त आनंदी आनंद..
पुजारा पहिल्या कसोटीत खंबीर उभा राहिल्याने केवळ ती जिंकली गेली. ३३० धावांचे लीड असूनही शेवटच्या जोडीने ऑसीजच्या ३२ धावा तर ६ बाद नंतर १३५ धावा केल्या होत्या....
ह्याचे विश्लेषण देखिल करणे गरजेचे आहे.
आपल्या ५ बाद झाल्यावर आपण केवळ ४२ धावा जोडल्या पहिल्या डावतही तीच बोंब विराट बाद झाल्यावर लगेच डाव आटोपला. पहिल्या कसोटीत दुसर्‍या डावात ६ बाद ३०३ नंतर आपण एका स्वैर चेंडूमुळे ३०७ सर्वबाद धावा केल्या म्हणजे शेवटचे ४ प्रत्यक्षात शुन्य धावांवर बाद झाले.

तिकडे न्यूझीलंड आणि श्रीलंका मॅच जोरात चालू आहे, सेकंड इनिंग मध्ये श्रीलंकेनी जबरी कमबॅक केलाय, पहिल्या इनिंग मध्ये जेमतेम 250 झाले होते त्यांचे, आणि न्यूझीलंडचे जवळ जवळ 600 झाले होते, पण श्रीलंकेनी दुसऱ्या डावात फक्त 32 धावांचा लीड शिल्लक ठेवला आहे, आणि अजून 7 गडी बाकी आहेत.

जसा रोहित टेस्टमधे काहीही न करता अन रणजी न खेळता टेस्ट मधे येतो, तीच गत राहुलचीही आहे.
धवनच्या बाबतीतही गोष्ट वेगळी नाही. टेस्ट मधनं ड्रॉप झाल्यावर, रणजी सीझन सुरू असताना पठ्ठ्या मेलबोर्नला कुटुंबासमवेत वेळ घालवतोय. (बाकीच्यांना कुटुंब नसतं बहुतक). आणि तरीही पुढच्या दौर्‍याला त्याचं सिलेक्शन होईल.
कारण टेस्ट सिलेक्शन हे अजूनही मुख्यत: वनडे, टी२० अन आयपीएलमधल्या करंट फॉर्म बेसिसवर होतं.

पुढच्या टेस्टला खरंच पार्थिवला ओपन करून सोबत पुजाराला खेळवायला हरकत नाही (तसाही वरचेवर तो पहिल्याच ओव्हरमधे बॅटिंगला येतो, अन पूर्वीही त्यानी ओपन केलं आहे).
अगदीच रोहितला चान्स द्यायचाच असेल (कशाला उगाच खरंतर) तर त्याला ओपन करूद्या.
पण राहुल अन विजय दोघंही पुढच्या टेस्टमधे नकोत. (बारावे म्हणूनही)

* म्हणजे शेवटचे ४ प्रत्यक्षात शुन्य धावांवर बाद झाले.* -

तात्या, सुपरस्टार अमिताभ अंबानींच्या लग्नात वाढपी म्हणून वावरतो , मग हे गोलंदाज स्वत च्या संघांच्या ताटात वाटीभर धांवा वाढायला कां लाजतात !!
tatya.JPG

भाऊ, Rofl

पराभव ज्या पद्धतीने झाला त्याचे दु:ख तर आहेच पण कसल्याच प्रकारच्या आत्मपरिक्षणाला कप्तान तयार नाही हे जास्त चिंताजनक आहे. अजूनही 'हेच टीम काँबिनेशन योग्य होते' असाच ताठा असेल तर अवघड आहे. प्रत्येक वेळा स्वतःच्या निर्णयाचे, तो कितीही चुकीचा असला तरी; समर्थन केल्यानेच आपण 'स्ट्राँग लीडर' ठरतो अशी समजूत झालेली दिसते.
एखाद्या देशातील क्रिकेटमध्ये त्याच्या राजकीय-सामाजिक वातावरणाचे प्रतिबिंब पडते असे म्हणतात ते खरेच आहे.

<<<या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन मिडीयाने पर्थची विकेट किती फास्ट आणि बाऊंसी आहे असा गाजावाजा करुन कोहली - शास्त्रीचा मामा केला आणि त्याला फसून त्यांनी चार फास्ट बॉलर्स खेळवले आणि कुर्‍हाडीवर पाय मारुन घेतला.>>>
सामन्या आधी एक दोन दिवस कुणा जाणकाराला सामन्याच्या जागी पाठवून, हवामान, विकेट याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे निवड समितीस सांगणे असे होत नाही का? का सगळे गोर्‍या लोकांनी टीव्ही वर सांगितलेले नि इंग्रजी पेपरात लिहीलेले खरे मानायचे?

ते जाऊ दे. शामीच्या एका डावात सहा विकेट्स, नि कोहलीचे पहिल्या डावातील शतक हे लक्षात ठेवण्याजोगे. बाकीचे रडगाणे आहेच.

खरंच ऑसीजना तरी खात्री होती पीच नेमकं कसं असणार याची . मला दाट शंका आहे याबाबत . आणि , बाऊनसी पीचवर फिरकी यशस्वी होत नाही , असं थोडंच आहे. आज
तर शामीच म्हणालाय, 'there should have been a spinner ! But these things depend on your management ! '
आपण प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे 1) आपली संघ निवड चुकली 2) सलामीच्या जोडीने दगाच दिला व 3) गोलंदाजानी गोलंदाजी दर्जेदार केली पण फलंदाजीत अपेक्षित अशी किमान जिद्द व चिकाटी दाखवली नाही. थोडक्यात, हा सामना सरस संघच जिंकला व आपण सरस ठरायला चूका सुधारणं हा एकमेव उपाय आहे.

काल विहारी आणी पंत ने उभं रहाण्याचा प्रयत्न केला तो कौतुकास्पद होता, पण अल्पजीवी ठरला. हाच प्रयत्न परवा रहाणे ने केला असता तर बरं वाटलं असतं. टीम मधला एक जवाबदार (उप-कप्तान) आणी अनुभवी खेळाडू असून जर तो हे 'गॅलरीसाठी' चं क्रिकेट खेळणार असेल आणी त्याला समर्थन मिळणार असेल, तर प्रॉब्लेम्स दिसतात त्यापेक्षा जास्त डीप रूटेड आहेत असं म्हणावं लागेल. हे इंपोज करणं, नो निगेटीव्ह बोन, टू हेक विथ द नेटप्रॅक्टीस, ** मूंह मे, वगैरे बकवास बंद करून, मानेवर खडा ठेवून, सिन्सीयर क्रिकेट खेळायची गरज आहे. नाहीतर विनाशकाले विपरीत बुद्धी असच म्हणावं लागेल.

जॉन राईट कोच असताना, झहीर आणी नेहरा सुद्धा बॅटींग करायचे. एका मुलाखतीत नेहरा म्हणाला होता की 'रन्स नही बनाऊंगा तो कोच डंडा लेके पिछे आयेगा'. जॉन राईट ने एकदा हरभजन सिंग बेजवाबदार शॉट मारून (टेस्ट मधे) आऊट होऊन पॅव्हेलियन मधे परतल्यावर, त्याला अंगावरचं गियर न उतरवता, आत्मपरिक्षण करायला लावलं होतं. दुर्दैवानं नंतर च्या काळात हे घडलं नाही. त्या आधी सुद्धा दिल्ली टेस्ट मधे बेजवाबदार फटका मारून विकेट फेकल्याबद्दल कपिलदेव आणी संदिप पाटील ला एक मॅच बाहेर बसावं लागलं होतं. (कपिल परत आला. पाटील चं करियर संपलं). आता तर शिस्त वगैरे शिकवणारा कोच आला तर त्याला, बीसीसीआय ला इ-मेल्स करून हाकलता येतं. खेळापेक्षा, संस्थेपेक्षा, खेळाडू मोठा होण्याचं आणी त्याचे दुष्परिणाम डोळे झाकून भोगण्याचं हे दुर्दैवी उदाहरण आहे.

*काल विहारी आणी पंत ने उभं रहाण्याचा प्रयत्न केला तो कौतुकास्पद होता, पण अल्पजीवी ठरला* - आपण बाद म्हणजे डावच संपला , हया भावनेच्या प्रचंड दबावाखाली पंत व विहारीचा खेळ बहरणं अवघडच आहे. गोलंदाजांनी फलंदाजीबाबत कुंबळे , अश्विन, भुवी यांचा कित्ता गिरवणं म्हणूनच आत्यंतिक महत्वाचं.

अग , तुझ्या मागे मागे इतकीं पोरं असतात , पण तुला आपला त्या अनिल , रविंद्र, भुवी.........यांचाच ध्यास !!20181219_105812.jpg

ipl auction chi charcha naste ka ithe?
>>> नाही, ती तिकडे शेजारच्या खिडकीत. इथे आय पी एल च्या दुष्परीणामांची चर्चा असते.... Happy

...

पण आय पी एलवर दुसरा धागा काढला तरी तिथे कसोटी सामन्यांच्या दुष्परिणामांची चर्चा होणार नाही असे वाटते.
खरे तर आय पी एल मधे कसोटीसारखे खेळले तरी ते वाईटच, पण आपला संघ कसोटीत नि टी २० दोन्हीकडे समभावाने बघतो. चित्त विचलित होऊ न देता, जसे खेळायचे तसेच खेळतो. टीकेला जागाच नाही!

भारतीय संघ टी-२०, वन डे (विकेट्स हातात ठेऊन, शेवटी हाणामारी) सारखा खेळतो, टेस्ट, टी-२० (डिफेन्स वगैरे आऊटडेटेड गोष्टी न करता, अ‍ॅग्रेसिव्ह क्रिकेट) सारखा खेळतो आणी वन-डे, टेस्ट सारखा (पार्टनरशिप बिल्डिंग).

Time and time again Kohli's attitude towards criticism showed that he is too proud to accept and acknowledge his mistakes. He probably thinks, accepting mistakes is a sign of weakness which might affect his game adversely. Cricketer Kohli and captain Kohli are at odds and the coach is neither willing to nor capable of helping the man candle burning on both the ends.

तिसर्‍या कसोटीसाठी ओपनर म्हणून कोण येतेय ? (पार्थीव कि मयांक) नि राहुल नि विजय ह्यातले कोण बाहेर जातेय ह्याची उत्सुकता लागली आहे. ह्यावर एकंदर टीम मॅनेजमेंट काय विचार करतेय हे कळेल.

रोहित शर्मा फिट असेल तर आत येईल ही काळ्या दगडावरची रेघ दिसतेय. राहाणे ने विहारी नि पुजाराकडून स्पिन कसा खेळायला हवा ह्याचे धड गिरवायला हवेत. मूंबईचा खेळाडू असून एव्हढी वाईट परिस्थिती Sad

"राहाणे ने विहारी नि पुजाराकडून स्पिन कसा खेळायला हवा ह्याचे धड गिरवायला हवेत. " - रहाणे ने एकंदरीतच इनिंग बिल्ड करणे, पार्टनरशिप करणे, अवघड परिस्थितीत टिच्चुन उभं रहाणं, टेस्ट मॅचेस हा वन-डे मधे कमबॅक करण्याचा मार्ग नाहीये हे लक्षात घेणं वगैरे गोष्टी शिकल्या तर बरं होईल.

Is it not possible to prepare a pitch that is
tailor-made for tail- enders?20181219_225008.jpg

भाऊ, मस्तच! Lol

हे आपल्याच शेपटाला लागू फक्त.

भाऊ... मस्त..

विराटच्या ऑन फील्ड अ‍ॅग्रेशनबद्दल काहीही तक्रार नाही. आताशा तो शिवीगाळ करत नाही. अन मैदानाबाहेरचं त्याचं बिहेविअर हे बिल्कुल वेगळं असतं. त्यामुळे साठी बुद्धी नाठिरुद्दिन शहा अन टोटल पनवती मांजर्‍याच्या मुक्ताफळांवर टोटल इग्नोर. एक बहुतेक नशेत अन दुसरा आसूयेच्या प्रभावाखाली बरळला असावा.

फक्त ऑन फील्ड चुकांना अ‍ॅक्सेप्ट न करणं हे वेळीच सुधारलं नाही तर मात्र अवघड आहे.

विराटच्या ऑन फील्ड अ‍ॅग्रेशनबद्दल काहीही तक्रार नाही.>>
ऑस्ट्रेलिया असताना तर हवेच

ठकासी व्हावे ठक,
खटासी व्हावे खट,

ही उक्ती तिथे आचरणात हवी..

* हे आपल्याच शेपटाला लागू फक्त. * - अर्थातच! आपलंच शेपूट नेहमीच शेपूट घालतंय !! Wink

* विराटच्या ऑन फील्ड अ‍ॅग्रेशनबद्दल काहीही तक्रार नाही.* - तक्रार नसली तरी कांहींशी नाराजी असणं समजणयासारख आहे कारण - 1) एका असामान्य फलंदाजाकडे ' रोल माॅडेल ' म्हणून क्रिकेटविश्वात पाहिलं जातं व भारतीयांना तें अभिमानास्पदच आहे ; ती प्रतिमा असल्या कारणाने डागाळणं दु:खदायकच होतं 2) कर्णधार म्हणून जिद्द दाखवण्याची संयमी पद्धत संघाला अधिक प्रेरणादायी ठरते , हा सर्वसाधारण अनुभव आहे 3) जर शतक झाल्यावर आनंद साजरा करताना विराट " मी माझ्या बॅटनेच बोलतो ", अशी खूणेने बढाई मारतो , तर सामना खेळताना सतत खुन्नसचं प्रदर्शन करायची तरी गरज काय व 4) खेळाच्या आनंदावर आक्रमतेच्या अतिरेकाने विरजण पडतं . ( माझ्यासारख्या लाखो सामान्य क्रिकेटप्रेमीना मैदानावरील खेळाचा आनंद महत्वाचा; विराट् मैदानाबाहेर कसा वागतो , हें अगदींच गौण )

विराटला एक असामान्य खेळाडू म्हणून त्रिवार सलाम व त्याने
तसाच मानाचा मूजराही मैदानावरील त्याच्या वागणुकीने मिळवावा , ही प्रार्थना.

Pages