Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाऊ, व्यंगचित्र उत्तम!
भाऊ, व्यंगचित्र उत्तम!
डिसक्लेमरः कोहली च्या अॅग्रेशन विषयी माझं कुठलच मत नाहीये. तो त्याचं फलंदाज आणी कप्तान म्हणून काम चोख करतोय का नाही इतकंच माझ्या लेखी महत्वाचं आहे. मला स्वतःला द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मन, कुंबळे ई. चा मैदानावरचा वावर आवडायचा. पण कोहली विषयी काही खास तक्रारही नाहीये. प्रत्येक माणुस वेगळा असतो.
मला वाटतं, हे एखाद्या क्षेत्रात मोठी कामगिरी केलेल्या माणसाला, आयुष्याच्या सर्व क्षेत्रात मोठा / रोलमॉडेल मानणं हा प्रकार आपल्याकडे ज....रा जास्तच आहे. उदाहरणार्थ, कोहली एक क्रिकेटपटु आहे आणी त्याचं मुल्यमापन एक क्रिकेटपटु म्हणूनच व्हायला हवं असं मला वाटतं. त्याव्यतिरिक्त तो जे काही करतो, वागतो, जगतो, ते त्याच्यापाशी. अंबानी च्या लग्नात जेवायला वाढलं म्हणून अमिताभ, आमिरखान, शाहरुख खान ह्यांच्यावर टीका करण्याचं काही कारण नाही. त्यांचा अभिनय पहा, आवडला तर कौतुक करा, नाहीतर नावं ठेवा. उगाच एव्हढे मोठे अभिनेते असून अंबानीच्या लग्नात वाढपी झाले वगैरे भिंतीला तुंबड्या कशाला लावायच्या? नसिरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन वगैरे कलाकार मंडळी क्रिकेट विषयी बोलतात / लिहीतात, तेव्हा ते आपल्यासारखे सामान्य क्रिकेट रसिक असतात. त्यात त्यांच्या प्रोफेशन चा भाग कशाला ओढायचा? आपल्या मायबोली वरच्या कॉमेंट्स वाचून, आपल्या प्रोफेशनविषयी मत बनवण्याइतकच हे चुकीचं वाटतं.
मांजरेकर एक क्रिकेट समीक्षक (?) आहे. तेव्हा त्याच्या मताविषयी उहापोह होणं मात्र स्वाभाविक आहे.
* कोहली एक क्रिकेटपटु आहे आणी
* कोहली एक क्रिकेटपटु आहे आणी त्याचं मुल्यमापन एक क्रिकेटपटु म्हणूनच व्हायला हवं * - फक्त फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणच नव्हे तर मैदानावरील वावर हा देखील क्रिकेटपटू असण्याचाच अविभाज्य भाग आहे , याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही . ( कुणाचाही मैदानावरील वावर योग्य
कीं अयोग्य, फक्त यावरच मतभेद असू शकतो ). क्रिकेटपटू म्हणूनच मी तो रोल माॅडेल असल्याचं म्हटलंय . मी मैदानाबाहेरच्या वागणूकीला महत्व देत नाही , जर त्याचा 'मॅच फिकसींग' सारख्या गोष्टींशी संबंध नसेल तर.
"मैदानावरील वावर हा देखील
"मैदानावरील वावर हा देखील क्रिकेटपटू असण्याचाच अविभाज्य भाग आहे" - सहमत आहे भाऊ. 'मैदानावरची वर्तणुक' ह्याबद्दल जो काही आयसीसी चा कोड ऑफ कंडक्ट आहे, त्याचं उल्लंघन कोहलीकडून होत नसावं असा माझा अंदाज आहे. तसं असतं तर त्याला शिक्षा झाली असती. पण तसं काही झालं नाहीये. हे मान्य की तो गाईडलाईन्स च्या मधे न रहाता, त्या रेषेजवळ असतो. पण ज्या अर्थी अजून कुठलेही ऑफिशियल अॅक्शन त्याच्यावर घेतली जात नाही तोवर तो रेषेच्या आत असावा असा माझा कयास आहे.
फक्त फलंदाजी, गोलंदाजी,
फक्त फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणच नव्हे तर मैदानावरील वावर हा देखील क्रिकेटपटू असण्याचाच अविभाज्य भाग आहे , >> जोवर त्याला डिसिप्लिन कमिटीकडून समज मिळत नाही , डीमेरिट पॉईंट्स मिळत नाही तोवर त्याचे मैदानवरील वागणे नियमाला धरूनच आणि म्हणून ग्राह्य आहे. त्याबद्दल बोलण्यासारखे काही नाही.. तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे.. आणि वैयक्तिक पातळीवर एखाद्याला तो आवडत नसला, त्यांच्या रोल मॉडेल च्या व्याखेत तो बसत नसला म्हणून तो अयोग्य वा टीकेस पात्र होतो असे वाटत नाही.
सगळेच खेळाडू केन विल्यमसन , तेंडुलकर, द्रविड मोल्ड मधून निघाले तर गेम बोरिंग होईल.
ओलोंगा, कादिर, वॉर्न, अख्तर असे वेगळ्या व्यक्तिमत्वाचे लोक होते म्हणून तेंडूलकर ऊठून दिसतो... मुरली-तेंडूलकर, अक्रम तेंडूलकर, डोनाल्ड-तेंडूलकर रायवलरी होती पण ती तेवढी थरारक नव्हती... काँपिटिटिव स्पोर्ट्स मध्ये स्कील एवढेच व्यक्तीमतव सुद्धा महत्वाचे आहे.
बर्ग च्या पोस्ट ला अनुमोदन.
बर्ग च्या पोस्ट ला अनुमोदन.
कोहलीच्या मैदानावरच्या वागणूकीबद्दल विषय सुरु आहे म्हणून,
१. माझ्या अल्प अनुभवामते दिल्ली कडची एकंदर जनताच मराथी माणसाच्या तुलनेने आक्रमक वाटते. फक्त बोलणेच नाही तर देहबोली वगैरे सुद्धा. त्यांच्यासाठी ते नॉर्मल असते नि एखादा मराठी माणुस जेव्हध्या सहजतेने साल्या नजरेआड करू शकतो त्याच सहजतेने त्यांचे एकमेकांशी वागणे असते. पण तेच वागणे इतरांसाठी मर्यादा रेषेच्या जवळ जाणरे ठरू शकते.
२. कोहलीच्या वागण्यावर एकंदर जास्तच फोकस असतो . त्याच्या एकंदर खेळामूळेही असेल किंवा त्यातून अधिक गॉसिप्स/news मिळू शकतात हे कारण असेल. त्यामूळे तो अधिक high light होतो.
३. पर्थ मधे चौथ्या दिवशी शमीचा बाउन्सर लॉयन च्या ग्रिल वर लागल्यावर कोहली ची reaction नि concern ( त्याचे facial expression, विशेषतः बॉल लागला तेंव्हाचे नि त्यानंतर तो लॉयनकडे धावत आला तेंव्हाचे बघितल्यावर) त्याची सीमारेषा त्याला तरी नक्कीच माहित आहे हे दिसते.
आता वाएक गम्मत म्हणून ही दोन वाक्ये घेऊन
पहिले कोहलीचे Paine बद्दल आहे "I'm no 1 player in the World and you are just stand in captain"
दुसरे Paine चे विजयला कोहलीबद्दल आहे "I'm sure he is your captain but do you really like him as bloke"
ह्यात कुठल्या वाक्यात खेळाची सीमारेषा ओलांडली गेली आहे असे तुम्हाला वाटते ? मला दुसरे वाक्य थोडे पलीकडे गेले आहे असे वाटते कारण त्याचा दुसरा भाग खेळापलीकडे गेला आहे. पण heat of the moment मधे तेव्हढे क्षम्य असावे.
"I'm no 1 player in the World
"I'm no 1 player in the World and you are just stand in captain" -
थोडं आजुबाजूला **** घातले तर हे टिपीकल ऑस्ट्रेलियन स्लेजिंग आहे.
exactly my feeling. एकदम हेच
exactly my feeling. एकदम हेच मनात आले होते हे वाचले तेंव्हा. This was perfect sledging without crossing any professional line.
*जोवर त्याला डिसिप्लिन
*जोवर त्याला डिसिप्लिन कमिटीकडून समज मिळत नाही , डीमेरिट पॉईंट्स मिळत नाही तोवर त्याचे मैदानवरील वागणे नियमाला धरूनच आणि म्हणून ग्राह्य आहे. * क्रिकेटच नव्हे तर कोणत्याही खेळाचा गाभा ( खिलाडूवृतती, शैलीदार , कौशल्यपूर्ण खेळ इ. ) नियमबदध नसतो कारण तो गृहीतच असतो. नियम फक्त अनिष्ट गोष्टींचा अतिरेक टाळणयापुरतेच असतात. ' बाॅडी लाईन ' गोलंदाजी नियमबाह्य नव्हती म्हणून ग्राह्य व म्हणून स्तुत्य होते का ? कोहली नियमबाह्य वागला तर त्याच्यावर कारवाई होईलच . अशी चर्चा कशाला होईल.
भाऊ ह्या boundaries कोण नि
भाऊ ह्या boundaries कोण नि कशा ठरवणार ? ह्या व्यक्तिसापेक्ष नि कल्चर सापेक्ष असणार. नियम हे तर common ground आहे ना ?
एक्झाक्टली ... तेच लिहायला
एक्झाक्टली ... तेच लिहायला आलो होतो असामी.
खिलाडूवृतती, शैलीदार , कौशल्य सगळे सापेक्ष आहे...
कोहली जे पेन ला म्हणाला ते तो डिविलीअर्स आणि विल्यमसनला म्हणणार नाही... किंवा तशी वेळ येणार नाही.
*ह्या व्यक्तिसापेक्ष नि कल्चर
*ह्या व्यक्तिसापेक्ष नि कल्चर सापेक्ष असणार. * माझ्या खेळाडूंबाबतच्या अपेक्षा देखील व्यक्तीसापेक्षच असाव्यात, असं समजूंया ! पण त्या पाॅटींग व कोहली या दोघांच्याही बाबतीत सारख्याच आहेत , हें ही खरं .
)
( * दिल्ली कडची एकंदर जनताच मराथी माणसाच्या तुलनेने आक्रमक वाटते. फक्त बोलणेच नाही तर देहबोली वगैरे सुद्धा. .......त्यांच्यासाठी ते नॉर्मल असते नि एखादा ... तेच वागणे इतरांसाठी मर्यादा रेषेच्या जवळ जाणरे ठरू शकते. * - ऑसीज खेळाडूंच्या वर्तणूकीबाबत असा समजूतदारपणा आपल्याकडे दाखवलेला मी तरी पाहिला, वाचला किंवा ऐकला नाही ! तेंही बहुधा देश सापेक्ष असावं !
अहो आश्चर्यम ! मैदानावर
अहो आश्चर्यम ! मैदानावर स्थितप्रज्ञ असणार्या ॲलन बाॅरडरला मैदानाषर भावना मोकळेपणाने व्यक्त करणारा कोहली आवडतो ! ( इथल्या कोणीतरी माझं थोबाड बंद करायला त्या ॲलनला पटवलं तर नाही !
)
इथल्या कोणीतरी माझं थोबाड बंद
इथल्या कोणीतरी माझं थोबाड बंद करायला त्या ॲलनला पटवलं तर नाही !>>
भाऊ, एक व्यंचि येऊ द्या! एका बाजुला फेफ आणि बॉर्डर कान गोष्टी करतायेत आणि तुम्ही संशयाने बघतायेत!
ख
* एक व्यंचि येऊ द्या* -
अहो, आतां चेहरा कां टाकतां ! आताच्या पिढीला गिटार आवडते तरीही तुम्ही तुमचं तुणतुणंच कां वाजवत असतां !!
भाऊ, इंडियन टीम फॉर्मात नसली,
भाऊ, इंडियन टीम फॉर्मात नसली, तरी तुम्ही आणी तुमची व्यंगचित्रं मात्र सद्ध्या जोरदार फॉर्मात आहेत. (मैदानावरची देहबोली) नावडणार्या कोहली च्या बॅट सारखीच तुमची लेखणी अशीच तळपत राहो आणी आम्हाला नित्य तुमची व्यंगचित्रं पहायचा योग येवो.
"एका बाजुला फेफ आणि बॉर्डर कान गोष्टी करतायेत आणि तुम्ही संशयाने बघतायेत!" -
नाही रे बाबा. कोहली इतका मी बॉर्डर शी सलगी करणारा नाही. बराच मध्यममार्गी आहे. 
वुर्केरी रमन भारतीय महिला संघाचा कोच झाला. द. अफ्रिकेत एकदा एका वन-डे मधे केलेली सेंच्युरी वगळता मला त्या माणसाविषयी फारशी माहिती नव्हती.
*......नावडणार्या कोहली च्या
*......नावडणार्या कोहली च्या बॅट सारखीच ...*
कोहली जगातला क्रमांक 1चा फलंदाजच म्हणून नाही तर सर्वच बाबतीत क्रमांक 1चा आदर्श खेळाडू व्हावा हीच एक भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून माझी आत्यंतिक ईच्छा आहे . 'आदर्श खेळाडू 'ची माझी व्याख्या कदाचित सर्वमान्य नसावी.
तेंही बहुधा देश सापेक्ष असावं
तेंही बहुधा देश सापेक्ष असावं ! >> आता हे ओघानेच आले ना ! पण त्याच ऑसी खेळाडूंचा आदर कमावणारे खेळाडू किती आहेत हे बघा
तुणतुणंच आवडले. फक्त आताच्या पिढीला म्हटले म्हणून गम्मत वाटली.
'आदर्श खेळाडू 'ची माझी व्याख्या कदाचित सर्वमान्य नसावी. >> माझ्यापुरते बर्ग वर म्हणतो तसे सगळे एकाच साच्यातले झाले तर मजा काय उरणार ? ब्रॅडमन पासून थेट स्मिथ-कोहली पर्यंत प्रत्येकाची शेइलीच (खेळाचीच नव्हे तर वागण्या बोलण्याचीही) वेगळी होती/आहे म्हणून तर त्यात मजा आहे. नाही तर नगाला नग उरणार फक्त.
द. अफ्रिकेत एकदा एका वन-डे मधे केलेली सेंच्युरी वगळता मला त्या माणसाविषयी फारशी माहिती नव्हती. ?? >> मस्त स्टाईलीश होता (लेफ्टी असल्यांमुळे नॅचरल होते ते). रोहित शर्माची जुनी आव्रुत्ती म्हण टायमिंगच्या बाबतीमधे. एडलजी त्याबद्द्ल आधीच आरडाओरड करते आहे.
कोहली जगातला क्रमांक 1चा
कोहली जगातला क्रमांक 1चा फलंदाजच म्हणून नाही तर सर्वच बाबतीत क्रमांक 1चा आदर्श खेळाडू व्हावा हीच एक भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून माझी आत्यंतिक ईच्छा आहे . 'आदर्श खेळाडू 'ची माझी व्याख्या कदाचित सर्वमान्य नसावी. >> भाऊ ही 'लीग ऑफ जंटलमन' म्हणून नाही तर 'लीग ऑफ एक्स्ट्रा ऑर्डिनरी जंटलमन' म्हणून बघा. त्या लीग मध्ये प्रत्येक जण शॉन कॉनरी असेल तर कशी मजा येईल? ते आज एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत पण ते ईथवर त्यांच्या लहानपणापासून घडत आलेल्या व्यक्तिमत्वाने पोहोचले आहेत. तुम्ही आज जर ते व्यक्तिमत्व बदलून मागितले तर मग कोहली 'एक्स्ट्रा ऑर्डिनरी' कोहली ऊरणार नाही तो फक्त ऑर्डिनरी ऊरेल.
वुर्केरी रामन हा अजय शर्मा,
वुर्केरी रामन हा अजय शर्मा, रमण लांबा या नेहेमी शर्यतीत राहिलेल्या पण संधी मिळाल्यावर त्याचे फारसे सोने करू न शकलेल्यांच्या यादीतला आहे.
वुर्केरी रामन हा अजय शर्मा,
वुर्केरी रामन हा अजय शर्मा, रमण लांबा या नेहेमी शर्यतीत राहिलेल्या पण संधी मिळाल्यावर त्याचे फारसे सोने करू न शकलेल्यांच्या यादीतला आहे. >> +१
सुजित सोमसुंदर, एस श्रीराम हे अजून काही.
माझ्या मते सोमसुंदर दुसरा द्रविड होऊ शकला असता.
हेमांग बदानी सुद्धा असेल
हेमांग बदानी सुद्धा असेल त्यात
<<<आणि वैयक्तिक पातळीवर
<<<आणि वैयक्तिक पातळीवर एखाद्याला तो आवडत नसला, त्यांच्या रोल मॉडेल च्या व्याखेत तो बसत नसला म्हणून तो अयोग्य वा टीकेस पात्र होतो असे वाटत नाही.>>>
तसे प्रसिद्धीस पावलेल्या व्यक्तीचे बोलणे, वागणे या कडे अनेक लोकांची बारीक नजर असते. आणि त्या सर्वांचे एकमत होणे कठीण.
कोणतीहि व्यक्ति ही टीकेस पात्र नसते, फक्त त्यांचे बोलणे, वागणे कधी कधी कुणाला वैयक्तिक दृष्ट्या टीकेस पात्र वाटते. तेसुद्धा त्या त्या प्रसंगापुरते. कधी कधी एकाहून अनेक प्रसंगी, मग लोकांचे लक्ष तिकडेच रहाते. इतर काही दिसतच नाही त्यांना.
* ईथवर त्यांच्या
* ईथवर त्यांच्या लहानपणापासून घडत आलेल्या व्यक्तिमत्वाने ... जर ते व्यक्तिमत्व बदलून मागितले तर मग ...* - इथवर पोहोचेपर्यंत जबर इच्छाशक्ती व मेहनत याच्या बळावर कोहलीने आपल्या फलंदाजीत अनेक बदल व सुधारणा केल्याच असणार . जर आपल्या मैदानावरील वागण्यातही सुधारणा व्हावी असं त्याला वाटलं , तर तें त्याला नक्कीच शक्य आहे. पण त्याला व त्याच्या चाहत्याना ( ज्यात आतां बाॅरडर , लेहमन इ.ची भर पडते आहे ) त्याची सध्याची प्रतिमाच आवडत असेल, तर केवळ माझ्यासारख्याना हवा म्हणून तो बदल घडवण्याचा प्रश्नच नाही.
संजय मोनेंचा या धाग्याशी
संजय मोनेंचा या धाग्याशी संबंधित एक खुसखुशीत लेख :-
https://www.loksatta.com/me-gypsy-news/such-a-bad-cricket-association-18...
*संजय मोनेंचा या धाग्याशी
*संजय मोनेंचा या धाग्याशी संबंधित एक खुसखुशीत लेख :-* -
असंच 'माबो'वरचं 'एक्सपर्ट पॅनेल' बनव म्हणावं त्या मोनेला . बघूं आणखी कोण कोण येतं त्या भाऊ नमसकरच्या जोडीला !!
*संजय मोनेंचा या धाग्याशी
भाऊ तूफान बॅटिंग चालू आहे
भाऊ तूफान बॅटिंग चालू आहे तुमची..
* भाऊ तूफान बॅटिंग चालू आहे
* भाऊ तूफान बॅटिंग चालू आहे तुमची..* -
खरं तर मला एक वेगळाच मुद्दाही मांडायचा होता - क्रिकेट हा जितका लोकप्रिय तितकाच कांही खेळाडूंसाठी क्रूर खेळही ठरतो. वास्तविक, सर्वोत्तम संघ व मोनेंचा संघ यातील खेळाडूंच्या गुणवत्तेत, परिश्रमांत फार फरक नसावा. एक खेळाडू योग्य वेळी चमकतो व यशाच्या दिशेने भरारी मारतो तर दुसरा , कुठंतरी माशी शिंकते आणि कायमचा यशाला मुकतो. माझ्या माहितीत अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणून, मोनेंच्या संघातील खेळाडूंबददलही मला सहानुभूतीच नाही तर आदरही आहे . ( अर्थात, सर्वच क्षेत्रात असं होत असलं तरीही क्रिकेटमध्ये तें मोठया प्रमाणात होत असावं.)
मोनेच्या लेखात सतत जाणवणारी
मोनेच्या लेखात सतत जाणवणारी आणि नेहमीचीच थीम म्हणजे रणजीमध्ये वाघ भासणारे आंतरराष्ट्रीय पातळीवर पार उघडे पडतात. इथे मुद्दा मानसिक तयारीचा असावा.
भाऊंच्या फटकार्यांचे षटकार
भाऊंच्या फटकार्यांचे षटकार सुरु आहेत!
रणजीमध्ये वाघ भासणारे आंतरराष्ट्रीय पातळीवर पार उघडे पडतात. >>
ह्यात वसिम जाफर ह्या खेळाडूला नाहक डावलले गेले असे मला कायम वाटते!
त्याची कसोटीची आकडेवारी निश्चित चांगली होती... ३१ कसोट्यात २१२ अत्युच्च धावांसह ५ शतके ४८ ची सरासरी ही वाईट कामगिरी नव्हती!
आजही वयाच्या ४१व्या वर्षी त्याने ५५ वे शतक केले रणजीमध्ये..
Pages