क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयांकचं अभिनंदन.
खेळाला माझी दृष्ट लागू नये म्हणून आमच्या केबलवालयाने आज टिव्हीवर बंद चालू केलाय ! Sad

विहारीचा बकरा केलाच ह्यांनी... तरी त्याने 66 बॉल म्हणजे प्रचंड वेळ थांबून बॉलची चकाकी कमी करण्याचे काम चोख बजावले आहे.

मयंक जबरदस्त खेळला. विहारी चा बकरा केला हे खरं पण छान खेळला तो पण. विको, पुजारा, रहाणे मिळून अजून ३०० तरी अ‍ॅड करतील ही अपेक्षा आहे.

खेळपट्टी काहीशी संशयास्पद वाटते. कधी तरी एखादा चेंडू उसळतो तर एखादा खाली राहतो.
सकाळपासून असे २-३ वेळा झाले...
पण धोकादायक नाही..
शुष्क गवातामुळे जास्त वळतील चेंडू असेही वाटत नाही!

“अहो रोहित, पंत आणि सर जडेजा पण आहेत! Wink” - ह्या तिघांनी ३०० अ‍ॅड केले तर स्कोअर ४५० पर्यंत जाईल. मग उरलेल्या लोकांना हाणामारी करून ५००+ करता येईल. त्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करायला हवा.

ह्या डावात आता पर्यंतर तरी ऑसीजचा आखूड टप्प्यावर भर आहे. आणि खेळपट्टी पण स्लो वाटते. समोर जास्त स्ट्रोक्स नाही खेळले गेले.
कोहलीचे दोन, पुजाराचा एक आणि एखादा मयंक ने मारला असावा...

दिवसाखेर २-२१५ अशी समाधानकारक धावसंख्या दिसत असली तरी दिवसभरात किमान २५० धावा व्हायला हव्यात असे वाटते.
वेल प्लेड सर्वजण आज! अगदी विहारी सुद्धा! जरी त्याच्या केवळ ८ धावा असल्यातरी...

दूसरा नवीन चेंडूही घातपात न होतां खेळला गेलाय. उद्या आजच्यापेक्षाही सरस कामगिरी होईल अशीच रास्त अपेक्षा ! शुभेच्छा.

अविचित्र पिच आहे एव्हढेच खरे. कमिन्स आधी धोकादायक वाटत होता. त्याच्याच लेंग्थ वर बॉलिंग करणारा इशांत पण धोकादायक ठरेल काय ?

नेहमीची आक्रमक शैली थोपवून मयांक चांगलाच खेळला. बॉल स्विंग होत असता तर काय झाले असते ते सांगणे कठीण आहे. विहारीवर दुसर्‍या इनिंग मधे शॉर्ट बॉल्स चा वर्षाव होणार हे नक्की.

अविचित्र म्हणजे विचित्र नसलेलं.. म्हणजे साधं/नॉर्मल का? Happy
काल बॅटींग बघायला मजा आली. थोडा जास्त रनरेट चालला असता. पण शेवटच्या सत्रात विराट आणि पुजाराने तंबू ठोकला ते बरं झालं.
ह्या मालिकेत ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या नेहमीपेक्षा एकदम वेगळ्याच वाटत आहेत.

मयंक अगरवालची ऑस्ट्रेलियन बॉलर्सविरुद्ध ऑस्ट्रेलियात खेळलेली डेब्यू इनिंग्ज उत्तम होती. He definitely deserved a ton, but that was not to be. विहारीनेही ८ रन्सच काढल्या असल्या तरी नवीन बॉलवर तब्बल ६६ बॉल्स डिफेंड केले हे नजरेआड करुन चालणार नाही. त्याला दुसर्‍या इनिंग्जमध्ये आणि चौथ्या टेस्टमध्ये (खेळवला तर) बंपर्सचा मारा होणार हे नि:संशय.

पुजाराकडे पाहिल्यावर आणि खासकरुन त्याचा डिफेन्स पाहिल्यावर द्रविडची आठवण कितीजणांना झाली? If Dravid was the wall, for sure Pujara is the rock, which can grow into a wall हे म्हणावेसे वाटते. ऑस्ट्रेलियन बॉलर्सचा दम उखडण्याच्या व्रतस्थ भावनेने तो खेळत होता आणि दुसर्‍या दिवशीही खेळत राहावा ही अपेक्षा.

कोहली अगदी कोहलीसारखी इनिंग्ज खेळला. सुरवातीला अ‍ॅग्रेसिव्ह आणि मग circumspect. त्याचा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे दिवसाच्या शेवटच्या काही ओव्हर्समध्ये डिफेंड करणे, ज्याला Playing for the time म्हणतात ते त्याला नेहमीच कठीण जाते. अनेकदा तो दिवसाच्या शेवटी-शेवटी - एकदा तर शेवटच्या ओव्हरमध्ये आऊट झालेला आढळेल. कालसुद्धा त्याची एज लागलीच होती, पण पेनला कॅच घेता आला नाही आणि तो कदाचित ऑस्ट्रेलियाला महाग पडू शकतो.

Again the first session in the morning is crucial. आपण जर टी-टाईम पर्यंत खेळून ४००+ रन्स केल्या तर ऑस्ट्रेलियाच्या गोट्या कपाळात जाण्याची शक्यता आहे. (Remember Shastri's गोटी मूंह में था comment?)

क्राईस्टचर्च टेस्टमध्ये ८८ / ४ वरुन श्रीलंकेचा १०४ मध्ये खुर्दा.
काल सकाळी श्रीलंकेच्या लकमलने किवींच्या विकेट्स काढल्या तेव्हाच अशाच कंडीशनमध्ये ट्रेंट बोल्ट आणि साऊदी काय धुमाकूळ घालू शकतील याची कल्पना आली होती. किवींना १७८ मध्ये गुंडाळल्यावर साऊदीने श्रीलंकेला ५० / ४ वर रखडवलेच होते, पण मॅथ्यूज आणि सिल्वाने कसेबसे दिवसाअखेरीला ८८ / ४ पर्यंत आणले. आज सकाळी बोल्टने १५ बॉलमध्ये ४ रन्समध्ये ६ विकेट्स उडवत लंकेचा पुरता खिमा केला आहे.

लंका ९४/२ वरून १०४/१०. धडाधड विकेट्स पडल्या.

पुजारा एकदम नैसर्गिक टेस्ट प्लेयर आहे. मजा येते बघायला.

सलग दुसरे विनाबळी सत्र!! ऑसीज थकविले!!
११७ षटकापैकी ३० षटके कोहली, ५० षटके पुजारा खेळला!

आता वेग वाढायला हवा थोडा..

क्राईस्टचर्चला श्रीलंकेला १०४ मध्ये उखडल्यावर दुसर्‍या इनिंग्जमध्ये जीत रावल आणि लॅथम त्यांना रडवत आहेत. रावलच्या करीअरच्या दृष्टीने फार महत्वाची इनिंग्ज आहे. तो ऑलरेडी ५०+ आहे. पहिल्या टेस्टप्रमाणे या टेस्टवर पाणी पडले नाही तर श्रीलंका किती रन्सनी हरणार एवढाच प्रश्न बाकी उरणार आहे.

११७ षटकापैकी ३० षटके कोहली, ५० षटके पुजारा खेळला!

आता वेग वाढायला हवा थोडा..
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

उरलेल्या ३७ ओव्हर्सपैकी अगरवाल २६ आणि विहारी ११ Lol
लंचनंतर थोडाफार स्ट्राईकरेट वाढवणे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर विकेट बॅटींगला अगदी सोपी नाही आणि ऑस्ट्रेलियाची बॉलिंग बर्‍यापैकी अ‍ॅक्युरेट आहे. एखादी विकेट गेल्यास रहाणेच्या ऐवजी रोहित / पंत / जाडेजा यांना प्रमोट करुन पाहण्यास हरकत नाही. Nothing to loose.

कोहलीची अपरकट थर्डमॅन बाऊंड्रीवर स्ट्रेट फिंचच्या हातात.
कोहली ८२, भारत २९३ / ३

अरेरे ! कोहली गेला . किती छान खेळत होता !! बॅड लक. रन-रेट वाढवण्याची गरज व पाठीचा त्रास यामुळे असावं .

पुजारा १०६ वर आऊट. बोल्ड!
अनफॉर्च्युनेटली बॉल लो राहीला.
भारत २९९ / ४.
आता शर्माजी काय करतात ते पाहू.

रोहित रहाणे जोडीने सव्वाशे षटके वाट पाहिली फलंदाजीसाठी आता दमलेल्या ऑसीजवर हल्ला करून वेग वाढवायला हवा थोडा!

कांगारुंच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची दाद द्यायला हवी.
एवढे दिडशेच्या घरात षटके खेळूनही अजुनी सहज धाव नाही देत! एकदम खडूस!!!
एव्हाना आपले गोलंदाज क्षेत्ररक्षक गळपटले असते 'करा तुम्हाला काय धावा करायच्या घोषीत करा एकदाचे आम्हाला जावू द्या जरा आराम करायला!' Wink

भाऊ आणि कृष्णा इथली दोन टोकं आहेत अगदी! Happy
कृष्णा, सध्याच्या आपल्या टीमचा फिटनेस खूपच चांगला आहे हो ! आपल्या टीमने ह्या मालिकेत आत्तापर्यंत ९८, ११९, १०८, ९३ (एकूण ४१८) षटके गोलंदाजी / क्षेत्ररक्षण केले आहेत. तेच ऑसींनी ८८, १०६, १०५, ५६ (एकूण ३६५) केले आहे. अजूनतरी कोणी सामन्यादरम्यान "करा तुम्हाला काय धावा करायच्या घोषीत करा एकदाचे आम्हाला जावू द्या जरा आराम करायला" म्हणालेले नाही. Wink

Pages