Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*भाऊ ३६० टर्न हा क्रिजच्या
*भाऊ ३६० टर्न हा क्रिजच्या आधी केला आहे रनप मधे. त्यामूळे हे वरचे सगळे दिसते आहेच.* मी व्हायरल झालेली जी क्लिप पाहिली, त्यात 360 टर्न अंपायरला ओलांडलयावर व
क्रिज ओलंडताना केला आहे. ( मी ती क्लिप पाठवणयाचा प्रयत्न करत होतो पण याबाबतीत मी जरा अडाणीच असल्याने ते जमत नाहीय ).
alt="Punewarriors.JPG" />
तुमच्या ऑर्डरचा पिझ्झा ! डिलीव्हरीबद्दल उगीच कटकट करायचं काम नाही ! अंपायर म्हणून उगीचच ' डेड बाॅल ' दिलात ती क्लिप पाहिलीय मी !!
बोलिंग अॅक्शन मधे कोणताही
बोलिंग अॅक्शन मधे कोणताही मेजर फरक करणार असेल तर अंपायरला व बॅट्समन ला सांगणे आवश्यक आहे. बोलर च्या डिलीव्हरी च्या वेळेस ते "रीड" करणे हे बॅट्समन च्या दृष्टीने महत्त्वाचे असते, अशा अॅक्शन ने ते बदलणार असेल तर आधी कळवून करा की.
सद्ध्याच्या नियमात ही बॉलिंग
सद्ध्याच्या नियमात ही बॉलिंग अॅक्शन बसत नाही. सद्यस्थितीत, समजा एखाद्याच्या नॉर्मल अॅक्शन मधेच तशी गिरकी असेल, तर कुणी आक्षेप घेणार नाही. पण जर तो सरप्राईज एलेमेंट असेल, तर तो नियमबाह्य आहे. पण त्या लॉजिक ने गूगली, स्लोअर बॉल, आर्म बॉल पण नियमबाह्य असायला हवेत. पण ते तसे नाहीयेत.
बाॅलरने बाॅलची करामत दाखवून
बाॅलरने बाॅलची करामत दाखवून फलंदाजांना चकवणं व अंगविक्षेप करून फसवणं या दोन भिन्न गोष्टी आहेत ; पहिली क्रिकेटच्या नियमात व कौशल्यात बसते व दुसरी बसत नाही , असं मला निश्चितपणे वाटतं. अनपेक्षितपणे गिरकी मारून चेंडू टाकणे यांत अंपायर व फलंदाज याना चकवणयापलिकडे चेंडुची करामत दाखवण्याला पोषक कांहीही असेल असं मला जाणवत नाही.
इथली चर्चा वाचून शोध
इथली चर्चा वाचून शोध घेतल्यावर खालच्या लिंक वर ही अॅक्शन सापडली.
https://www.loksatta.com/krida-news/bcci-should-allows-that-dead-ball-ac...
व्यक्तिशः मला यात काही चूक वाटत नाही. अनेक प्रकारे या अॅक्शनचे समर्थन करता येईल. अश्या विचित्र प्रकारे बॉलिंग करणारा हा पहिला बॉलर नाही. पॉल अॅडम्स, मुरलीधरन, मलिंगा, बुमरा यांची अॅक्शन सुद्धा चालून गेली / जात आहे. " विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत " म्हणत त्यांना आपण आपलंसं केलं
३६० डिग्री अॅक्शन या मंडंळीं पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे मान्य आहे , तरीही फारशी आक्षेपार्ह वाटली नाही.
बॉलर्सना चकवायला, बॅट्समन जर रिव्हर्स स्व्हिप, पॅडल स्व्हिप करत असतील, आणि त्याला परिस्थीतीनुसार स्वतःला बदलत यशस्वी पणे बॅटिंग करणे म्हणत असतील, तर यावर सुद्धा बॅट्समन उपाय शोधतीलच. मुळातच बॉलर्सवर इतक्या मर्यादा असताना (बॅट्समनच्या तुलनेत ) कोणाला वेगळा प्रयोग करायचा असेल तर काय हरकत आहे !
रच्याकने, काल विंडीज विरुद्धची टी-२० पाहण्यापेक्षा, विंडीज मधेच चालू असलेल्या विमेन्स टी-२० मधला भारत-पाक सामना पाहूया म्हणत चॅनल बदललं. मजा आली. पाकिस्तानच्या ३ विकेट्स पटापट काढल्यावर झालेल्या पार्टनरशीप मुळे अचानकच आपली फिल्डींग गडबडली. मिसफिल्ड्स, सोपेसोपे कॅचेस सोडणे वगैरे प्रकार घडले. मिताली राज चे अर्धशतक आणि बाकीच्या फलंदाजांची योग्य साथ मिळाल्याने आरामात जिंकलो.
माझा बोलिंग अॅक्शन ला विरोध
माझा बोलिंग अॅक्शन ला विरोध नाही. प्रत्येक बॉल त्याच अॅक्शन ने टाकणार असेल तर सांगायचीही गरज नाही. फक्त नेहमीच्या अॅक्शन च्या अधेमधे असे करणार असेल तर बॅट्समन ला कल्पना देउन करायला हवे.
फा >> अगदी बरोबर !
फा >> अगदी बरोबर !
*बॉलर्सना चकवायला, बॅट्समन जर
*बॉलर्सना चकवायला, बॅट्समन जर रिव्हर्स स्व्हिप, पॅडल स्व्हिप करत असतील, आणि त्याला परिस्थीतीनुसार स्वतःला बदलत यशस्वी पणे बॅटिंग करणे म्हणत असतील,* फलंदाज बाॅलरसना चकवत नाही तर त्यांच्या त्याला चकवण्याचा डावपेचांवर तोडगे काढतो. वार करायची पहिली संधी गोलंदाजांनाच असते व ते चुकवणयात किंवा पलटवार करण्यांत फलंदाजांचा कस लागतो.
त्यात 360 टर्न अंपायरला
त्यात 360 टर्न अंपायरला ओलांडलयावर व क्रिज ओलंडताना केला आहे. >> बरोबर आहे भाऊ पण अंपायर कुठे उभा असणार नि त्याला ओलांडल्यावर काय बदल करायचे नाही ह्याबद्दल काही नियम असल्याचे ऐकिवात नाही. सद्य नियमांनुसार बॉलिंग अॅक्शॅन फक्त नॉन बॉलिंग आर्म वर केला कि सुरू होते त्या आधी जे आहे ते सगळे रनप चा भाग आहे नि याबद्दल अतिशय क्लीयर कट नियम नाहि आहेत, जर तो प्रत्येक बॉल त्याच अॅक्शन मधे टाकत असेल तर त्यात काहीही surprise element नाही हे मितचे म्हणणे अधिक सयुक्तिक वाटते.
"प्रत्येक बॉल त्याच अॅक्शन
"प्रत्येक बॉल त्याच अॅक्शन ने टाकणार असेल तर सांगायचीही गरज नाही. फक्त नेहमीच्या अॅक्शन च्या अधेमधे असे करणार असेल तर बॅट्समन ला कल्पना देउन करायला हवे." - मी दोन्ही बाजूंनी विचार करतोय. (खरं तर दोन्ही बाजू पटायला लागल्या आहेत
) पण, फा, तू म्हणतोस तसं केलं, तर सरप्राईज एलेमेंट काय राहिला? आणी तसा तो नसेल, तर ह्या अॅक्शन ची गरजच काय?
वर कुणीतरी मुरली आणी मलिंगा च्या अॅक्शन चा उल्लेख केलाय. त्या बाबतीत माझं बिशन सिंग बेदी च्या मताशी संपूर्णपणे जुळणारं मत आहे.
मित शी पूर्ण सहमत.
मित शी पूर्ण सहमत.
आधीही म्हणालो तसे चकिंग नसलेली लीगल बोलिंग अॅक्शन (लगानमधल्या सारखा गोफणदांडा फिरवणे नाही) आणि आधी सांगून ठेवलेले (राईट/लेफ्ट आर्म ओवर/राऊंड द विकेट वगैरे) ला अनुसरून बॉल पीचवर पडल्याशी मतलब...
बोलरने बॉल टाकण्यासाठी रन-अप चालू करून लीगल डिलिवरी टाकेपर्यंत सगळे रन-अपचा भाग म्हणून सोडून द्यावे... रेग्यूलर अॅक्शन असो वा सरप्राईझ अॅक्शन... बॅट्समनला आणि अंपायरला सांगून करण्याची काहीच गरज वाटत नाही.
एखाद्या बोलरने पूर्वी असा बॉल टाकला असल्यास आणि तो ग्राह्य धरला गेल्यास कोणीही पुन्हा असा बॉल कधीही टाकू शकतो एवढे माहित असणे बॅट्समनसाठी पुरेसे आहे.
भाऊंच्या वार-पलटवार थिअरी मागचे अॅझम्प्शन स्विच हिट आणि रिवर्स स्वीप सारखे शॉट्स बॅट्समन खेळतो तेव्हा फेल जाते.
*वार-पलटवार थिअरी मागचे अ
*वार-पलटवार थिअरी मागचे अॅझम्प्शन स्विच हिट आणि रिवर्स स्वीप सारखे शॉट्स बॅट्समन खेळतो तेव्हा फेल जाते.* - हे नाहीं पटत. उदा. गुड लेंगथवर नेमका टप्पा पकडून सतत गोलंदाजी करणारा बापू नाडकर्णीसारखा गोलंदाज. 18-15- 6 धांवा व 2 विकेटस , अशा सरासरीने गोलंदाजी. फलंदाजाने काय नुसतं हतबल होवून षटकामागून षटकं पाय पुढे टाकून चेंडू अडवत रहायचं ? मग केवळ त्यावर तोडगा म्हणून बाद होण्याचा धोका पत्करून अचानक पुढे जाणं , स्विच हिट आणि रिवर्स स्वीप इ.इ. फलंदाजाने करून पाहिलं तर त्याला वार म्हणायचं कीं पलटवार !
गोलंदाज फलंदाजाना पेंचात पकडण्यासाठी ज्या प्रकारची गोलंदाजी करतो, त्याला प्रत्युत्तर म्हणूनच फलंदाज नवनवीन फटके शोधून काढतो . उलटं नाही होत .
आणखी एक. गोलंदाजाचा प्रत्येक चेंडू हा अगदीं रन-अप पासून शेवटपर्यंत फलंदाजाच्या एकाग्रतेची खरी कसोटीच असते व त्यात बाद होण्याचा धोकाही असतो . त्या एकाग्रतेवर गोलंदाजाने विनाकारण केलेल्या अंगविक्षेपांचा अधिक भार टाकणं खेळाशी सुसंगत वाटत नाही.
(No subject)
दुसरीकडे कुठेही जावूंया. त्या डिस्कोमुळे बोलींग करताना मधेच गिरकी घ्यायची वाईट संवय लागलीय मला !

भाऊंच्या व्यंगचित्रावरून, मला
भाऊंच्या व्यंगचित्रावरून, मला अब्दुल कादीर आठवला. लहानपणी त्याची बॉलिंग अॅक्शन अशी नाचत नाचत आल्यासारखी वाटायची. खरं तर, जोपर्यंत बॅट्समन ला बॉलर च्या हातातून बॉल दिसतो, तोपर्यंत बॉलर रन-अप मधे काय करतो, हे फारसं महत्वाचं नसावं. मागे एकदा कुणाच्या
तरी (बहुदा ग्रेग चॅपेल) मुलाखतीत वाचलं होतं की बॅट्समन सतत फोकस्ड नाही राहू शकत. बॉलर ने रन-अप सुरू केल्यावर फोकस ची सुरूवात होते आणी जेव्हा तो बॉल हातातून सोडतो, तिथे फोकस पूर्ण झालेला असतो. तिथपासून बॉल खेळेपर्यंत, सर्वोच्च फोकस असावा लागतो.
गोलंदाज फलंदाजाना पेंचात
गोलंदाज फलंदाजाना पेंचात पकडण्यासाठी ज्या प्रकारची गोलंदाजी करतो, त्याला प्रत्युत्तर म्हणूनच फलंदाज नवनवीन फटके शोधून काढतो . उलटं नाही होत . >> भाऊ हे नाही पटले. हे chicken and egg सारखे नाहिये का ? T20 मधे स्लॉग नि hitting through the line by getting underneath yorker ला पर्याय म्हणून बॉलर्स ऑफ स्टंप च्या बाहेर यॉर्कर टाकू लागले. मग त्यावर रॅम्प शॉत वाढला. मग बॉलर्स नी तोच ञोर्कर स्लो टाकयाला सुरूवात केली. हे चक्र कोण सुरू करते हे सांगणे कठीण आहे.
भाऊ,
भाऊ,
)
बॅट्समनची नेहमीची खेळायची शैली (Right had, Left hand) फिक्स आणि ऑन द रेकॉर्ड असते. मान्य?
बोलर आणि त्याच्या कॅप्टन त्याबरहुकूम बोलिंग आणि फील्डिंग लावतो. मग अचानक जेव्हा एखादा ऊजव्या शैलीचा बॅट्समन साईड बदलून डावखुरा शॉट मारतो त्यावेळी बोलरला आणि त्याच्या कॅप्टनला सुद्धा ही फसवणूक आहे असे म्हणता येणे शक्य आहे. तुमचे म्हणणे बॅट्समन तोडगा काढतो/पलटवार करतो , पण हा तोडगा/पलटवार शॉट सापेक्ष झाला ना? राहूल अशी स्वीच हिट मारेल पण रोहित मारणार नाही.
कोणी म्हणेल बॅट्समन रिस्क घेतो.. मग बोलरही त्याचा नेहमीचा स्टान्स बदलून एक वेगळा बॉल (उद्द. ३६० डिग्री फिरून) टाकत असेल तर ती सुद्धा रिस्कच आहे की त्याच्यासाठी. फूलटॉस, वाईड काहीही पडू शकते.
किंवा ह्याचीच दुसरी बाजू --- जसे आजकाल बॅट्समन स्वीच हिट मारण्याची नेट प्रॅक्टिस करतात तसेच बोलरही प्रॅक्टिस करून तो बॉल टाकणार ना? मग रिस्कचा प्रश्न कुणालाही पडायला नको. (फेडी दोन पायांच्या मधून बॉल मारतांना आठवला
तरी (बहुदा ग्रेग चॅपेल) मुलाखतीत वाचलं होतं की बॅट्समन सतत फोकस्ड नाही राहू शकत. बॉलर ने रन-अप सुरू केल्यावर फोकस ची सुरूवात होते आणी जेव्हा तो बॉल हातातून सोडतो, तिथे फोकस पूर्ण झालेला असतो. तिथपासून बॉल खेळेपर्यंत, सर्वोच्च फोकस असावा लागतो. >> बॅट्स्मन ने चार्ज घेत पुढे येत रहाणे (कर्स्टन).. स्टंपच्या समोर पुढे मागे करणे (एबी) ह्यामुळे बोलरच्या भंगणार्या फोकसचे काय?
मला वाटते बोलर, बॅट्समन आणि अंपायरने सुद्धा सगळ्या प्रकारांना आत्मसात करायला शिकले पाहिजे...लीगल डिलवरी टाकणे महत्वाचे.
"बॅट्स्मन ने चार्ज घेत पुढे
"बॅट्स्मन ने चार्ज घेत पुढे येत रहाणे (कर्स्टन).. स्टंपच्या समोर पुढे मागे करणे (एबी) ह्यामुळे बोलरच्या भंगणार्या फोकसचे काय?" +१
(No subject)
असं तर नाही ना , तुम्हाला त्यानी कधींच 10च्यावर धांवा करूं दिल्या नाहीं, म्हणूनच गोलंदाजांविरूद्ध हट्टाने बाजू घेताय !
भाऊ
भाऊ
(No subject)
ऑस्ट्रेलियामधे काय्होईल असे
ऑस्ट्रेलियामधे काय्होईल असे वाटतेय ?
*ऑस्ट्रेलियामधे काय्होईल असे
*ऑस्ट्रेलियामधे काय्होईल असे वाटतेय ?*- ऑस्ट्रेलियाचे सध्या सगळीकडे जे होते आहे , तेच ऑस्ट्रेलियामधेही होईल
अशी लक्षणं तर आहेत.
भाऊ, एक नंबर!
भाऊ, एक नंबर!
ऑस्ट्रेलियात रोहितला कसोटीत खेळवायला हरकत नसावी. खरेतर खेळवायला हवे.
*ऑस्ट्रेलियात रोहितला कसोटीत
*ऑस्ट्रेलियात रोहितला कसोटीत खेळवायला हरकत नसावी. खरेतर खेळवायला हवे.* - +1.
अरे देवा ! कोहलीची सेना आतांच कां ?
We are already down under !!
ऑस्ट्रेलियात रोहितला कसोटीत
ऑस्ट्रेलियात रोहितला कसोटीत खेळवायला हरकत नसावी. खरेतर खेळवायला हवे.
>>>
कुणाच्या जागी?? ओपनिंग ला की मधल्या फळीत?
धवन ला उडवून की धवन सोबत??
राहुल ला कुठे फिट करणार मग?
की पुजारा / राहणेच्या जागी?? (म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स अजून डाऊन, अन रोहित फ्लॉप गेल्यावर त्या कॉन्फिडन्स कमी झालेल्या परिस्थितीत त्याच्या धावा झाल्या नाहीत की अजून दडपण
आत्ता ऑसींचा कचरा करायची चांगली संधी आहे. पूर्ण ताकदीनिशी, कुठलेही प्रयोग न करता बेस्ट ११ घेऊन खेळायला हवं.
विजय - धवन (जर सराव सामन्यांमधे / पहिल्या टेस्ट मधे कुणी बेकार खेळला तर त्याच्याजागी शॉ), पुजारा, कोहली, राहणे, पंत, जडेजा, भुवी (विकेट जर फिरकीवाली बनवली असेल तर अश्विन), शामी, ईशांत, उमेश (बारावा - राहुल, फील्डिंग सिल्स साठी).
I would love to be proven
I would love to be proven wrong and would love to eat my words. पण, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हारवणं, मला तरी अवघड वाटतय. कोहली (फलंदाज) प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, बॉलर्स बर्यापैकी यश मिळवतील (ऑस्ट्रेलिया आणी इंग्लंड मधल्या विकेट्स आणी हवामान भिन्न आहे), पण तरीही कोहली (कॅप्टन) आणी शास्त्री (कोच - हा शब्द स्लीपर कोच अर्थानं घ्यावा) ही जोडगोळी मला फारशी आश्वासक नाही वाटत. बाकीच्या बॅट्समेन ची सुद्धा फारशी शाश्वती नाहीये. रहाणे, त्याची एक कस्टमरी इनिंग (एक क्रूशल इनिंग पर सिरीज), पुजाराच्या दोनेक इनिंग्ज वगळता परत एकदा सगळी भिस्त कोहलीवरच आहे. शॉ कसा खेळतो हे बघण्याची उत्सुकता आहे. रोहित शर्मा आणी टेस्ट हे समीकरण काही जमत नाही. तो वन-डे मधेच ठीक आहे. ही बहुदा त्याची शेवटची संधी असावी टेस्ट मधे.
* ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात
* ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हारवणं, मला तरी अवघड वाटतय. * सध्याच्या ऑसीज संघाबाबत खुद्द ऑसी खेळाडूच ( नवे व जुने ) याविषयी आपल्याशी असहमत असतील .
"सध्याच्या ऑसीज संघाबाबत
"सध्याच्या ऑसीज संघाबाबत खुद्द ऑसी खेळाडूच ( नवे व जुने ) याविषयी आपल्याशी असहमत असतील" - नक्कीच. आणी मिडीया मधे हवा सुद्धा अशी आहे की भारत ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला हारवणार. तसं झालं तर आनंदच वाटेल. पण तरीही क्रिकेटींग लॉजिक तसं सांगत नाहीये. त्यांची बॅटींग कमकुवत (वॉर्नर आणी स्मिथ नसल्यामुळे) झाली असेल, पण बॉलिंग अजूनही भेदक आहे. ख्वाजा, फिंच, मार्श बंधू आणी तो नविन लॅबुशॅग्ने वगैरे बॅट्समेन होम कंडिशन मधे खेळताना, इतके कमकुवत नसतील जितके अबुधाबीला होते.
फे फे ला सखेद अनुमोदन.
फे फे ला सखेद अनुमोदन. त्यांची बॉलिंग ऑस्ट्रेलिया मधे तरी नक्कीच अधिक भेदक असणार ह्यात शंका नाही. जर हेजलवूड, कमिन्स, पॅटिन्सन ह्यापैकी एक जण जरी पूर्ण फिट असेल तर स्टार्क च्या बरोबर ती जोडी भारी पडेल असे मला वाटते.
इंग्लंड दौर्या आधी लावलेले पालुपद परत लावून, उगाच overconfidence मधे खेळत नेहमीप्रमाणे पहिला सामना गमावून catch up करत बसण्यापेक्षा ६ + १ + ४ बॉलर अशी सुरूवात करावी. ह्यातही उगाच उफराटे प्रयोग करत बसण्यापेक्षा
विजय (माझा अजूनही त्याच्यावर विश्वास आहे बाकीच्या पर्यायांपेक्षा) , शॉ (surprise element), पुजारा, कोहली, राहणे, पंत,
(रोहित्/राहुल) (प्रामाणिकपणे I'm not sold on either of them. ऱोहित हे wishful thinking वाटते नि राहुल ला सध्या तरी भयंकर Technical problem आहे जो पूर्णपणे exploit केला जाईल) +
बुमराह,, इशांत, शमी + कुलदीप (जो काही aggressive संदेश द्यायचा आहे तो कुलदीपला खेळवून देता येईल. अश्विन देशाबाहेर सेम बॉलर नसल्यामूळे नि जाडेजाच्या डार्ट्स पेक्षा विकेट टेकिंग अॅबिलिटी असलेला कुलदीप अधिक सरस पर्याय वाटतो) हा संघ मी खेळवेन.
Pages