Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*बॅट्समेन होम कंडिशन मधे
*बॅट्समेन होम कंडिशन मधे खेळताना, इतके कमकुवत नसतील जितके अबुधाबीला होते.* - मान्य. पण तौलनिक दृष्टया फाॅर्म , सर्वांग संतुलीत याबाबतीत हा भारतीय संघ निश्चितच सरस वाटतो व जिंकण्याची शक्यता अधिक आहे. अर्थात, कोणत्याही खेळात 100% अचूक भाकित करणं अशक्यच .
असामी च्या प्लेयिंग ११ बद्दल
असामी च्या प्लेयिंग ११ बद्दल सहमत आहे. एकच बदल मी सुचवीन. रोहीत - विशफुल थिंकिंग आहे हे मान्य आणी राहूल च्या तंत्राविषयी सुद्धा सहमत आहे. म्हणूनच कदाचित मी हनुमा विहारी ला ६ व्या क्रमांकावर सुचवीन. (अगदीच नवखा खेळाडू नको असेल, तर राहूल. पण तो इतका खाली खेळणार नाही. म्हणजे परत एकदा रोहित शर्मा असं स्पायरल आहे.) अगदीच वेळ आली, तर हनुमा विहारी कडून काही ओव्हर्स पण टाकून घेता येतील.
"तौलनिक दृष्टया फाॅर्म ,
"तौलनिक दृष्टया फाॅर्म , सर्वांग संतुलीत याबाबतीत हा भारतीय संघ निश्चितच सरस वाटतो" - भाऊ, ही तुलना, तुम्ही भूतकाळातल्या भारतीय संघांशी करताय की सद्ध्याच्या ऑस्ट्रेलिया आणी भारत संघात? कारण, तसं पाहिलं तर इंग्लंड दौर्यात सुद्धा कोहली च्या कन्सिस्टंट बॅटींग चा आणी बॉलर्स चा अपवाद वगळता बाकीच्यांच्या इनिंग्ज ह्या sporadic च होत्या.
भूतकाळातल्या संघांची तुलना केली, तर २००३ चा आपला संघ हा २००० नंतर चा सगळ्यात संतुलित संघ होता. त्या आधी १९९२ चा संघ चांगला होता (कागदावर). त्याआधी चं इतकं माहीत नाही / आठवत नाही.
*विंडीज सारखा संघ वर्ल्दकपच्य
आपण प्रत्येक संघाबद्दलच काळजी करणं शहाणपणाचं ! 1982च्या कपिल देवच्या संघाला वे. इंडीजने लिंबूटिंबू संघ समजण्याची चूक केली व ती त्याना चांगलीच भोंवली होती ! त्याच स्पर्धेत आपणही झिंबाब्वेला फालतू संघ समजण्याची चूक केली होती पण केवळ नशीबाने ( कपिल देवाची कृपा ) हरता हरता वांचलो होतो ! विशेषतः , मर्यादित षटकांच्या स्पर्धेत कोणत्याही संघाला गृहीत धरणं खतरनाक ठरतं हें वारंवार सिध्द झालंय . << भाऊ ही तुमची भारताविरूद्ध विंडिजसारख्या लो रँक टीमला आणि ते ही भारतातसुद्धा गृहीत न धरण्या बद्द्लची पोस्ट.
आणि ही
ऑस्ट्रेलियाचे सध्या सगळीकडे जे होते आहे , तेच ऑस्ट्रेलियामधेही होईल अशी लक्षणं तर आहेत. << भारत ऑस्ट्रेलियाचे ऑस्ट्रेलियामध्ये अलिकडे झाले तसे पानिपत करेल असे सुचित करणारी पोस्ट.
मान्य वेगळ्या गेम फॉर्मॅटबद्द्लची आहे पण एकंदर तुमच्या भारतीय टीमवरच्या कॉन्फिडन्सचे गणित काही मला कळेना.
मला जर भाऊंसारखे चित्र काढता आले असते तर मी..
पिलू कांगारू (प्राणी) बॉक्सिंग ग्लव्ज घालून तयार बसले आहे आणि बॅट घेऊन कोहली रिंग मध्ये ऊतरतो आहे असे नोवेंबर मध्ये
आणि
थोडे मोठे झालेले कांगारू बँडेड लाऊन व ठोशांनी डोळा काळानिळा पडलेला कोहली 'ऊफ्फ्फ थोडक्यात बचावलो' अश्या एक्स्प्रेशनसहित जानेवारीमध्ये रिंग मधून बाहेर पडत आहे
असे चित्र काढले असते.

बॉक्सिंग ला बॉक्सिंग डे टेस्ट च्या क्रुशिअल टेस्ट चा संदर्भ आहे हे चाणाक्ष फॅन्सच्या लक्षात आलेच असेल.
थोडक्यात असामी आणि फेफ शी सहमत.
कोणत्याही संघाला गृहीत धरणं व
कोणत्याही संघाला गृहीत धरणं व तौलनिक दृष्ट्या कोणता संघ सरस वाटणं हया भिन्न गोष्टी आहेत. हे लक्षात घेतलं तर *तुमच्या भारतीय टीमवरच्या कॉन्फिडन्सचे गणित काही मला कळेना.* हे गणित सहज सुटेल.
फे फे, राहुल नि रोहित असताना
फे फे, राहुल नि रोहित असताना हणुमा विहारी खेळण्याची शक्यता नगण्य वाटते रे म्हणून मी त्याला धरले नव्हते. राहुल नि रोहित पैकी एकच जण एका वेळी आपण afford करू शकतो.
भाऊंची तुलना Aus संघाशी असावी असे मला वाटते.
"राहुल नि रोहित असताना हणुमा
"राहुल नि रोहित असताना हणुमा विहारी खेळण्याची शक्यता नगण्य वाटते रे" - सद्ध्याच्या टीम मॅनेजमेंट चा विचार केला तर कदाचित तुझं म्हणणं खरं आहे. पण टीम बॅलेन्स चा विचार करता, तोच पर्याय योग्य वाततो. राहूल / रोहित पैकी एकाला खेळवायचं म्हणजे सगली बॅटींग ऑर्डर शफल करावी लागेल कारण ते दोघंही खालच्या नंबर वर येणार नाहीत / येऊन उपयोग नाही. तसच एक बॉलिंग ऑप्शन विहारी च्या रूपाने टीम मधे येतो, जो ते दोघंही देत नाहीत.
भाऊ, ऑस्ट्रेलिया च्या तुलनेत भारतीय संघ बलाढ्य का वाटतो ते वाचायला आवडेल. इंग्लंड आणी द. अफ्रिकेमधे (दोन्ही परदेश दौरे होते), कोहली चा अपवाद वगळता बॅटींग कन्सिस्टंट नव्हती. बॉलिंग मधे ऑस्ट्रेलिया चा काही प्रॉब्लेम नाहीये.
जेंव्हा जेंव्हा आपल्या मोठ्या
जेंव्हा जेंव्हा आपल्या मोठ्या दौर्याच्या आधी "यावेळी बेस्ट चान्स आहे" "त्यांचा संघ दुबळा आहे" "यावेळी सीरीज जिंकूनच येणार" वगैरे स्टेटमेंट्स आली आहेत, तेंव्हा तेंव्हा आपल्याला जबरा धक्के बसलेत. त्यामुळे उगाच हवेत जाऊन आपटण्यापेक्षा, पूर्ण तयारीनिशी आपल्या स्ट्रेंथ्स ओळखून खेळलेलं कधीही चांगलं.
(९९-०० च्या दौर्याच्या आधी मात्र जयवंत लेलेनी केलेलं ३-० पराभवाचं भाकीत मात्र आपल्या संघानी सत्य करून दाखवलं होतं)
*ऑस्ट्रेलिया च्या तुलनेत
*ऑस्ट्रेलिया च्या तुलनेत भारतीय संघ बलाढ्य का वाटतो ते वाचायला आवडेल. * -
)
1 ) दोन संघांच्या सध्याच्या ' काॅनफिडनस ' पातळीतील फरक . स्मिथ व वाॅरनर यांच्या गैरहजेरीमुळे
त्यात पडलेली भर ;
2) इंग्लीश वातावरणात चेंडूच्या ' लॅटरल मूवहमेंट ' शी जुळवून घेणं ही भारतीय फलंदाजांसाठी सर्वात मोठी अडचण ठरते . त्यामुळे, ऑस्ट्रेलियात आपली नांवाजलेली फलंदाजी बहरणयाची व भक्कम असण्याची शक्यता खूपच अधिक ;
3) आपला संतुलीत संघ व चांगल्या पर्यायांची उपलब्धता ;
4) कितीतरी सुधारलेला आपल्या फास्ट बोलींग व क्षेत्ररक्षणाचा दर्जा.
( शिवाय , ऑसीजना चांगलाच धडा शिकवण्याची करोडो भारतीयांच्या प्रबळ इच्छाशक्तीचं पाठबळ !
मला आठवतयं पॅकर्स सर्कशीच्या
मला आठवतयं पॅकर्स सर्कशीच्या वेळी असाच ऑसी संघ दुबळा वाटलेला. तरी देखिल ४२ वर्षीय बॉबी सिम्सन ला कर्णधार पदी आणून , ग्रॅहॅम येलॉप, वेन क्लार्क, ब्रुस यार्डली वगेरे नवोदितांना घेऊन ऑस्ट्रीलिया ने मालिका ३-२ जिंकली होती त्यात संघात सिम्सन व्यतिरिक्त मला वाटते फक्त थॉम्सन एक जुना होता!
*पॅकर्स सर्कशीच्या वेळी असाच
*पॅकर्स सर्कशीच्या वेळी असाच ऑसी संघ दुबळा वाटलेला.* - त्यावेळेचा आपला फास्ट अटॅक , क्षेत्ररक्षण, फलंदाजीच्या फळीची लांबी व मुख्यत: ऑसीज विरूद्ध खेळतानाची मानसिकता यात खूप फरक होता, असं वाटतं.
( जरी कांहीं जुने ऑसी खेळाडूच हा भारतीय संघ सध्याच्या ऑसी संघाचा धुव्वा उडवेल , असं म्हणत असले तरीही मला तसं वाटत नाही. पण हा भारतीय संघ ऑसीच्या आतांच्या संघाला हरवण्याची दाट शक्यता आहे , असं मात्र मला निश्चितपणे वाटतं .)
कोणत्याही संघाला गृहीत धरणं व
कोणत्याही संघाला गृहीत धरणं व तौलनिक दृष्ट्या कोणता संघ सरस वाटणं हया भिन्न गोष्टी आहेत. हे लक्षात घेतलं तर >>> भाऊ ह्या गोष्टी भिन्न आहेत असे वाटत नाही. तौलानिक दृष्ट्या विंडिज भारतात भारतापेक्षा सरस वाटत नाही म्हणून ते भारताला डॉमिनेट करणार नाही हे आपल्याला गृहीत धरता येते. ( हा झाला भारतीय संघावरच्या एकंदर कॉन्फिडन्स चा भाग)
तुमचा रोख "विंडिज भारताला अपसेट करू शकते म्हणून त्यांना आणि कोणाही संघाला गृहीत धरू नये" असे म्हणण्याकडे आहे का? तर ते कुठल्याही खेळाच्या बाबतीत त्रिकालाबाधित सत्य आहे... तसा अपसेट होऊ शकतो म्हणूनच तर कमकुवत संघांशीही सामने खेळण्यात मजा आहे आणि सगळ्याच खेळात ते अध्याहृतच आहे.
अपसेट झाला तरी सरस संघ सरस आणि कमकुवत संघ कमकुवतच गृहीत धरल्या जातो. अपसेटच्या पुढच्या सामन्यात कमकुवत संघाला आपण सरस म्हणून नाही तर कमकुवत म्हणूनच गृहीत धरतो. अपसेट सातत्याने होत राहिले तर दोन्ही संघांना तुल्यबळ म्हणून गृहीत धरता येईल.
'सामन्याचा निकाल गृहीत धरू नका' हे मान्य पण संघाची ताकदच (सरस वा कमकुवत) गृहीत धरू नका असे म्हणता येणार नाही.
माफ करा, शब्दच्छल करत नाही आणि तुम्हालाही कदाचित ह्याच अर्थाचे म्हणायचे आहे पण वेगळ्या दृष्टीकोनातून असे वाटते.
काल इंडिया ए वि. न्यूझिलंड ए
काल इंडिया ए वि. न्यूझिलंड ए सामना सुरू झाला. अजून तरी विजय आणी रहाणे ला सूर गवसल्याची चिन्हं नाहीयेत. विजय काऊंटी मधे चांगलं परफॉर्म करून आलाय आणी रहाणे ने देवधर ट्रॉफी च्या फायनल ला (लिमिटेड ओव्हर्स) १४४* केले होते. पण आता त्या दोघांनाही ते रन्स आणी कॉन्फिडंस ऑस्ट्रेलिया मधे परफॉर्मन्स मधे कन्व्हर्ट करावे लागणार आहे.
आपण जिंकणारच अशा आविर्भावात
आपण जिंकणारच अशा आविर्भावात कांहीशा बेफिकीरीने खेळणं याला मी विरूद्ध संघाला गृहीत धरणं म्हटलंय. कदाचित त्यामुळे माझी विधानं विसंगत वाटली असावीत.
आलं लक्षात भाऊ
आलं लक्षात भाऊ
ईंग्लंड आणि ऑस्ट्रॅलियातल्या मैदानांवर खेळण्यातला अजून एक मोठा फरक म्हणजे मैदानांचे क्षेत्रफळ. रोहित्/राहूल (आत असल्यास), धवन, पंत, पंड्या सारखे आपले २०-२० बहाद्दर जेवढा ग्राऊंड स्ट्रोक्स वर भर देतील तेवढा त्यांचा कॉफिडन्स वाढेल असे वाटते.
फॅन म्हणून गाबा, वाका पीचेसचा जेवढा दरारा पहिले वाटायचा आता तेवढा वाटत नाही. धडाडीचे बॅट्समन आणि हुशार्/तय्यार बोलर आपल्याकडेही आहेत ह्याचा दिलासा वाटतोच. त्यामुळे ईंग्लंड/अफ्रिकेच्या मानाने आपल्या संघाच्या खेळाला घाऊकमध्ये निगेटिवली अॅफेक्ट करणारे "मॅक्रो फॅक्टर्स" ऑस्ट्रेलियात कमी आहेत. "मायक्रो फॅक्टर्स" म्हणजे प्लेअर्स (खासकरून नव्या) च्या स्टाईल आणि स्किल ला अॅफेक्ट करणारे फॅक्टर्स जास्त म्हत्वाचे ठरणार आहेत असे मला वाटते.
हाब, पंड्या नाहीये टीम मधे.
हाब, पंड्या नाहीये टीम मधे. अजून इंज्युअर्ड आहे. म्हणूनच तर रोहीत / राहूल / हनुमा असे पर्याय आहेत. नाहीतर तो ऑल-राऊंडर म्हणून सरळ तीम मधे आला असता.
बाय द वे: मिथाली राज
बाय द वे: मिथाली राज भारताकडून टी-२० (आंतरराष्ट्रीय) मधे सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. दुसर्या क्रमांकावर रोहित आणी तिसर्या क्रमांकावर कोहली आहेत. आणी भारतीय महिला संघ टी-२० वर्ल्ड कप च्या सेमी-फायनल ला पोहोचला आहे.
महिला संघाला शुभेच्छा.
महिला संघाला शुभेच्छा.
महिला ऑसीज संघाला त्या येणार्या पुरूष दौरयाची चुणूक दाखवतीलच !
अहो पुरे . कळलं मला वाद कां
अहो पुरे . कळलं मला वाद कां घालताय तें . पण आतां
गिरकी देखील घेवून दाखवाल, तर अंडी फुटतील ना पिशवीतली !!
भाऊ, भारीच ३६० डिग्री !!
भाऊ, भारीच ३६० डिग्री !!
महिला विश्वचषक t20 भारत वि
महिला विश्वचषक t20 भारत वि ऑस्ट्रेलिया सामना बघताय का कोणी? मानधनाने 85 धावा केल्या, शेवटी विकेट गेल्या खूप तरी स्कोअर जिंकण्यासाठी पुरेसा ठरेल गोलंदाजी नीट केली तर
जिंकण्यासाठी पुरेसा ठरेल
जिंकण्यासाठी पुरेसा ठरेल गोलंदाजी नीट केली तर>>
सहज जिंकली! आणि भाऊंनी म्हटल्या प्रमाणे चुणूक पण मिळाली.
फक्त दोघींच्या धावा.. हा देखिल चुणूकचाच एक भाग का?
"परदेशी मालिका जिंकण्याची
"परदेशी मालिका जिंकण्याची सर्वोत्तम संधी" नामक मोहक भ्रमात अनेकदा ठेचा खाऊनही यावेळी परत वाटतेय की... ही आपली सर्वोत्तम संधी आहे!
यावेळी तरी हा मोहक भ्रम नसून
यावेळी तरी हा मोहक भ्रम नसून भक्कम आशावाद आहे, असं वाटतं . ( शिवाय , फार पूर्वीपासून क्रिकेटच्या इथल्या अलोट लोकप्रियतेचा पाया तर ' मोहक भ्रम ' हाच आहे !
)
* मोहक भ्रमात अनेकदा ठेचा
* मोहक भ्रमात अनेकदा ठेचा खाऊनही यावेळी ... * - आज आणखी एका ऑसी क्रिकेटपटूचं , डीन जोन्सचं , विधान आहे , ' हया भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवलं नाहीं, तरच तें आश्चर्य होईल ! '
न्यूझिलंड वि. पाकिस्तान टेस्ट
न्यूझिलंड वि. पाकिस्तान टेस्ट थ्रिलिंग झाली. शेवटच्या ४० रन्स आणी ७ विकेट्स हातात असताना पाकिस्तान सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण किवीज चा डेब्युटंट स्पिनर पटेल पाकिस्तान चा काळ ठरला.
India A team NZ मधे खेळतेय.
India A team NZ मधे खेळतेय. त्यात शॉ, विजय, पटेल, विहारी नि राहणे खेळताहेत जे Aus मधे जाणार आहेत. राहुल ला का पाठवले नाहि देव जाणे ? जे लॉजिक राहणे ला लागतेय तेच त्यालाही लागायल हवे कि first choice opener म्हणून त्याला न धरता शॉ, विजय, पार्थिव पैकी दोन धरले जात आहे ? पार्थिवला खेळवून ५ नि ६ नंबर रोहित नि जाडेजा/विहारीला (sort of all rounder) ओपन करण्याचा विचार आहे कि काय कोण जाणे ?
बरेचसे कांगारू खेळाडू भारत
बरेचसे कांगारू खेळाडू भारत जिंकू शकतो म्हणून भारतीय संघाला गाफिल करू इच्छितायेत असे दिसते!
@असामी जी, राहुल आत्ता
@असामी जी, राहुल आत्ता ऑस्ट्रेलिया मधे आहे २०-२० सामने खेळन्यासाठि...
*भारत जिंकू शकतो म्हणून
*भारत जिंकू शकतो म्हणून भारतीय संघाला गाफिल करू इच्छितायेत असे दिसते* - पूर्वी ऑसी खेळाडू " हा भारतीय संघ अगदींच कमकुवत आहे " असं म्हणत , तेंव्हा ते मुद्दाम मानसिक दबाव निर्माण करताहेत असं म्हटलं जायचं !
Pages