आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी
काय आहेत संपावर जाणार्या शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या ?
१) शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.
२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.
३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.
४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
५) शेतकर्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.
६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.
७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.
८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे.
का केल्या शेतकर्यांनी ह्या मागण्या?
शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली.
मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी?
राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले.
सरकार शेतकर्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का?
दररोज शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्यांन्ची कोंडी केली आहे.
शेतकर्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का?
अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे.
संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.
<<हे असेच वागणे चालू राहिले
<<हे असेच वागणे चालू राहिले शिवसेनेचे, तर काही काळातच पब्लिक रागां ऐवजी उठा वर विनोद करु लागेल.... Wink>>
------ आदेश आल्यावर आपण तसे करतच असतो... अभिव्यक्ती स्वातन्त्र आहे.
रा गा, उठा, फेकू मामु शवराज,
रा गा, उठा, फेकू मामु शवराज, सगळ्यांवर विनोदाचे पीक येऊ द्या, तेच खाऊन पोट भरायचे आता जनतेस
निंदामामा
निंदामामा
शहरीभागात पोस्टरबाजी रंगली
शहरीभागात पोस्टरबाजी रंगली आहे. शेतकर्याच्या तथाकथित कर्जमाफीची जी अजुन दिलीच नाही.
शहरीभागात मुद्दामुन केली जेणेकरून शेतकरी विरुध्द सरकार असा सामना न रंगता शहरी विरुध्द ग्रामिण असा रंगावा. आणि सरकार बाजूला सारून तमाशा बघत बसणार. शहरी लोकांना वाटावे की सरकार फुकटची कर्ज माफी देते आणि तरी ही लोक संप करतात आणि कर्जमाफीचा डोंगर आमच्या टॅक्स मधून "बिचारे" सरकार वसूल करणार. म्हणजे शहरी लोकांचे वाढणार्या टॅक्सला हा शेतकरी वर्गच जवाबदार आहे असे सरकारला शहरातल्या लोकांच्या मनावर बिंबवण्याचे काम पध्दतशीर पणे सुरु केले आहे.
आता निवडणुकांच्या वेळेस शहरीभागात वाढलेल्या टॅक्स बद्दल तिरकसपणे कर्जमाफीवर निशाना साधून मत मागणार आणि ग्रामिन भागात कर्जमफी दिली म्हणून मत मागणार
वैद्यबाई इथेही फिरत असल्याचा
वैद्यबाई इथेही फिरत असल्याचा भास होतोय.
वैद्यबाई इथेही फिरत असल्याचा
वैद्यबाई इथेही फिरत असल्याचा भास होतोय >>
नाव वेगळे असते विचारसरणी तीच त्यामुळं भास होणं शक्य आहे.
नाना पाटेकर्/मकरंद अनासपुरे
नाना पाटेकर्/मकरंद अनासपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी संपाला पाठिंबा दिलाय असं वाचलं.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जगण्यासाठी संप करावा लागतो ही बाब अत्यंत खेदजनक आहे, असं मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे.
स्वामीनाथन आयोग शक्य तितक्या लवकर लागू करावा, ज्या शेतकर्यांना खरंच गरज आहे, त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे असंही ही द्वयी म्हणालीय.
तर आता त्या "नवदहशतवादी" फॉर्वर्डच्या लेखकाचं नाव बदलून विश्वास नांगरे पाटील किंवा डॉ विकास आमटे असं करण्यासाठी काय काय करावं लागेल?
भाजप्यांचे आयटीसेल वाल्यांनी
भाजप्यांचे आयटीसेल वाल्यांनी आता कॉमेडी एक्स्प्रेस मधे स्किट लिहायला सुरुवात करावी
नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे
नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी मत व्यक्त केलं हे चांगलं आहे. गुड. मत काय फक्त आपणच व्यक्त करायचं? या प्रश्नावर सगळे व्यक्त होत आहेत ही चांगली बाब आहे.
कोकण्यांनी कधी "सरकारकडे हात
कोकण्यांनी कधी "सरकारकडे हात पसरलेत्/आंदोलने वगैरे केलीत" असे कधिही आढळले नाहि.
मुळात कोकणाच्या शेतीची तुलना महाराष्ट्रातील ईतर भागातील शेतीशी करणं चुकीचं ठरेल. कोकणात शक्यतो पाउस कमी पडला म्हणून पीक जळालय असं होत नाही. मुख्य पीक भात हे त्याच्या गरजेपुरता का होईना हे मिळतंच. किनारपट्टीचा प्रदेश असल्यामुळे खाण्यासाठी मासे भरपुर प्रमाणात उपलब्ध असतात ,भाज्या नसल्या तरी त्यांचे भागते. वाळवलेले मासे वर्षभर साठवता येतात, त्याची विक्रीही वर्षभर करता येते. . पिण्यापुरते का होईना पाणी विहीरीत उपलब्ध असते आणि शुद्ध 'मिनरल वॉटर' विकतही घ्यावे लागत नाही दारातील झाडावरून शहाळं काढलं की झालं. आंबा,फणस,कोकम, नारळ व काजु उत्पादनातून चार पैसे मिळतात. निसर्गाने कोकणाच्या माणसाच्या पोटपाण्याची सोय केली असल्यामुळे तो उपाशी राहात नाही. ह्याउलट तुम्ही ज्याला 'घाटी' म्हणता त्याची निसर्ग कायम परिक्षा घेत असतो. कधी खरीपाचे पिक पावसाअभावी कमी येते . सामान्य पाउस पडून पिक जास्त आले तर बाजारात भाव नसल्यामुळे उत्पादन खर्च निघत नाही. दुष्काळ पडल्यास जनावरांसाठी व पिण्याच्या पाण्याकरता मैलोनमैल पायपीट करावी लागते. एका वेळचं अन्न मिळणेही कठीण होते. सगळे पर्याय वापरुन झाल्यावर त्याने सरकारकडे हक्काने मदतीसाठी हात का पसरू नये?
कोकणातल्या नांगराने' घाटावरचे' शेत नांगरता येणार नाही.
ह्या कोकण विषयक दृष्टिस दुरुन
ह्या कोकण विषयक दृष्टिस दुरुन डोंगर साजरे इतकेच म्हणू शकतो. कोकण म्हटले की आंबा आणि मासे हे शेतीउत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आणि मत्स्य दुष्काळ म्हणून इकडे काय परिस्थिती आहे ते प्रत्यक्ष पाहिले की कळून येते. एक बोट बन्द पड़ते म्हणजे एक अक्खी फैक्टरी बंद पड़ते .... बोटी वरील सर्व खलाशी वगैरे जेटीवर कार्यरत कामगार आणि फ़ूड स्टॉल्स टेम्पो वाहतूक ....अजुन थोड़े पुढे म्हणजे प्रोसेसिंग यूनिट आणि त्यातील शंभरेक कुटुंब .. अश्या अनेक बोटी मत्स्य दुष्काळात नामशेष झाल्या. हीच गोष्ट अवकाळी किंवा वादळी पाऊस आणि आंब्याचा मोहोर गळणे इत्यादी साठी लागु आहेच जेथे आंबा बाग़ म्हणजे त्यानुषंगाने अनेक फ़ेक्टर्स पूर्ण चेन मध्ये कार्यरत असतात.
त्यामुळे सगळ्या ठिकाणी शेतकरी सारखेच झळ सोसत असतात तिथे घाट माथा कोकण हां भेद उरु शकत नाही
शुद्ध 'मिनरल वॉटर' विकतही
शुद्ध 'मिनरल वॉटर' विकतही घ्यावे लागत नाही दारातील झाडावरून शहाळं काढलं की झालं.
>>
शप्पथ
-----------------
अंबज्ञ, कोकणातली वस्तुस्थिती कथन केल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद. मी स्वतः कोकणातला असल्याने हे सगळ्म प्रत्यक्ष बघितलेलं आहे.
कोकणातल्या यशस्वी शेतकर्
कोकणातल्या यशस्वी शेतकर्यांनी पुढाकार घेऊन घाटी लोकांना शेती शिकवावी असा मी इथे प्रस्ताव मांडतो.
मूलभूत समस्या माहिती नसतांना केवळ तर्काच्या आधारे एखाद्या समस्येचे आकलन करणे त्यावर उपाययोजना सुचवणे हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. तस्मात, वेन्जॉय...
घाटावर आता खरोखर शेती शिकावीच
घाटावर आता खरोखर शेती शिकावीच असे म्हणेन. एवढी काळीभोर सुपिक माती दिलीय देवाने त्याची पार शब्दशः माती करून टाकलीय. कोकणातला भरपूर पाऊस दिसतो पण लाल माती दिसत नाही तुलना करताना. इकडे कित्येक एकर जमिनीत अनेक मातीवीना शेती किंवा कातळावर यशस्वी शेतीचे प्रयोग आर्थिकदृष्ट्या सफल घडलेले आहेत. म्हणजेच लाल माती म्हणून कोण रडत बसत नाही ज्याला खरोखर प्रगती करायची इच्छा आहे मात्र ज्याला जुन्याच पद्धति कवटाळून पारंपरिक मार्ग अवलंबणे योग्य वाटते त्यांना खरोखरच नवीन काही शिकणे कमीपणाचे किंवा निरुपयोगी वाटते अन् मग शेतीमध्ये अपयश आले की सर्व दैवाला आणि सरकारला दोष देवून मोकळे . चुकत तर दोन्ही बाजुनी असते - सरकारी धोरण आणि शेतीच्या अपयशी पद्धती.
त्यामुळे टाळी एका हाताने वाजत नाही एवढे समजून घेतले तरी पुरेसे ठरावे
अंबज्ञ, जिथे तूर टंचाई होती,
अंबज्ञ, जिथे तूर टंचाई होती, आयात करावी लागत होती, तिथे एकाच वर्षात तूर विकत घेताना सरकारची दमछाक होतेय. हे शेतकर्यांनी नवीन काही न शिकण्यामुळे, न करण्यामुळे , परंपरांना चिकटून बसल्याने होतेय असे म्हणाल का?
खरं सांगायचं तर या संपाआधी माझी मतेही तुमच्या या वरच्या मतांपेक्षा फार वेगळी नव्हती. पण या संपाच्या निमित्ताने बरंच काही वाचनात आलं आणि त्यामुळे सगळीच नाही, तरी पुष्कळशी मते बदलली.
कोकणावर माझं कितीही प्रेम
कोकणावर माझं कितीही प्रेम असलं तरी माझीच लाल असा प्रकार मला जमत नाही. घाटावरच्या जमिनीवर कोणता प्रयोग तुम्हाल अपेक्षीत आहे जो अजुनपर्यंत कोणी केला नाही?
महाराष्ट्रात राज्यात कोकण,प. महाराष्ट्र, खानदेश , मराठवाडा,विदर्भ असे भौगोलिक विभाग आहेत. घाट विभाग नेमका कुठे येतो ?
भरत
भरत
खरोखर पुन्हा एकवार सांगतो हे सर्व नवीन काही न शिकण्या मुळेच घडले आहे मग ते तूर असो का अजुन काही पिक.
आपण जे सायन्स शिकलो ते फक्त नोकरी मिलवण्यास वापरले तर कसे होणार ? रोजच्या जीवनात आणि आपल्या अजुबाजूस न शिकलेल्या लोकांच्या भल्यासाठी ते नाही वापरले तर ह्या सायन्सच्या प्रगतीचा काय उपयोग ?
आपण बायोमेट्री, डेटा प्रोसेसिंग, पाय डायग्राम पासून अनेक ग्राफिकल प्रेसेंटेशन वापरतो ? का ! काय मिलवतो त्यातून ? आपल्या कंपनीची ग्रोथ होण्यासाठी काय करता येईल ह्याचा मार्ग शोधण्यासोबत कंपनीचे नुक्सान टाळणे कसे शक्य होणार हेसुद्धा परामर्श घेत राहतो ! बरोवर .
मग शेतात मी सायकल पद्धतीने काय पिकवणार आणि आपल्या अजुबाजूस कोण किती पिक त्यातील लावतोय ह्याचा डेटा ना सरकार कड़े ना त्या शेतकऱ्याकडे .... मग असे विक्रमी (खरेतर अंदाधुंद) पिक आले की सगळेच वांदे होणार ! ह्यसाठी काही सिस्टिम ठरवून येणाऱ्या उत्पादनदनाचा बॅलन्स साधला तर का एवढे प्रोब्लेम्स उद्भवतील (अपवाद फक्त नैसर्गिक आपत्ती)
सरकारकडे डेटा असतो. याआधीही
सरकारकडे डेटा असतो. याआधीही कोणीतरी लिहिलंय. नोटाबंदीच्या काळात पेरणीखालचं क्षेत्र वाढल्याचं सरकारने सांगितलं होतं.
मार्मिक
मार्मिक
प्रयोग म्हणजे अचाट आकड्यांचे उत्पादन नव्हे तर सर्वकष विचार आणि उपाययोजना !
भरमसाठ पाणी उपसणारी पीके सलग घेवून येणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करण्यास काय बॅक अप प्लान राबवला - शेतकऱ्यांनी ? जर आपले पोट जमीन आणि पाणी ह्यावर अवलंबून आहे तर त्याची काळजी घेण्यासाठी ज्या काही उपाय योजना असतात त्या नको का आत्मसात करून घ्यायला ? असे दुष्काळ काय अचानक येतात का ? बरेचदा मानव निर्मित डिझास्टर असतात कारण पर्यावर्णाचा अपरिमित ऱ्हास.
जे तिकडे घडले त्याच धर्तीवर इकडे कोकणात मासेमारी क्षेत्रात पर्ससिनर बोटिंमुळे घडले आणि गेल्या 2 वर्षापासून सरकारी अंमल बजावणी कड़क केल्यावर आता सर्वांचा फायदा होतोय.
भरमसाठ पाणी उपसणारी पीके सलग
भरमसाठ पाणी उपसणारी पीके सलग घेवून येणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करण्यास काय बॅक अप प्लान राबवला - शेतकऱ्यांनी ?
ऊसही ठिबक सिंचनने केला जातो हे तुम्हे बघितले नाही का?
पुन्हा तेच
पुन्हा तेच
थिबक सिंचन म्हणजे आहे तेच पाणी वापरले न ! आधी पेक्षा फक्त थोड्या प्रमाणात (तेही आता प्रकरण गळ्याशी आल्यावर) वापरले एवढाच काय तो फरक पण मुळात पाण्याची पातळी वाढवण्यास काय उपाय केले का ? किती प्रमाणात ? हां मूळ प्रश्न आहे
आणि वर मी म्हटले तसे टाळी एक हाताने वाजत नाही त्यामुळे ह्या प्रयत्नात सरकार आणि शेतकरी दोघांचा सहभाग अपेक्षित होता
Ambdnya
Ambdnya
अल निनो प्रकार माहीती आहे का ?
संपाचे फलित काय? मागण्या
संपाचे फलित काय? मागण्या मान्य झाल्या म्हणजे समस्या कायमस्वरुपी सुटली/सुटल्या का? समस्यांचा स्त्रोत सरकार (मग ते कोणत्याही पक्षाचे असेना का) असते का?
मी काही तज्ञ् नाही फक्त एकच
मी काही तज्ञ् नाही फक्त एकच शंका आहे , कोकण आणि इतर प्रदेश तुलना होतेय म्हणून आणि तसाच विषय सुरूच आहे म्हणून विचारते , कोकणातला शेतकरी भात शेती म्हणजे पावसाचे ४-५ महिने शेती पीक घेतो , अगदीच वाटलं तर बांधावर काही कडधान्य , भाजीपाला घेतो गप्प बसतो , जमिनीला १२ महिने ओरबाडत नाही , अस सतत शेती, पीक , खत फवारणी ह्या सगळ्या प्रकारामुळे जमिनीचा कस कमी होत नसेल का ? जास्त हाव करायचीय काय ? निसर्ग देतोय म्हणून इतकं सतत? १०० - १५० वर्षांपूर्वी सुद्धा असाच प्रकार होता का ?
भरमसाठ पाणी उपसणारी पीके सलग
भरमसाठ पाणी उपसणारी पीके सलग घेवून येणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करण्यास काय बॅक अप प्लान राबवला - शेतकऱ्यांनी ? >>>
ऊसही ठिबक सिंचनने केला जातो हे तुम्हे बघितले नाही का? >>> खुपssssss च कमी लोक ठिबक सिंचन करणारे आहेत. पाणीवाले बाबा त्यांना काही सांगायला गेले की त्यांनाच शिव्या देतात.
अंबज्ञ, तुम्ही जे बोलत आहात
अंबज्ञ, तुम्ही जे बोलत आहात तेच मी वर्षभराआधी बोलत होतो. आता माझ्या विचारात प्रचंड फरक पडलाय. त्याचे कारण असे आहे बघा.
फार महाराष्ट्ही बघायची गरज नाही. नाशिकमध्ये दोन भाग आहेत. शहराच्या दोन दिशेला. एक दिंडोरी-ओझर-वणी वगैरे आणि दुसरा घोटी-सिन्नर भाग. दोन्ही कडच्या शेतींमध्ये अंदाजे ५० किमी चे अंतर आहे. नाशिकला केंद्रस्थानी ठेवून एक वर्तुळ काढले ५० कीमी व्यासाचे तर या वर्तुळाच्या परिघावर प्रत्येक दहा किमी ला वेगळी जमीन, वेगळी पाण्याची व्यवस्था, वेगळे हवामान दिसते. (सरासरी काहीही असले तरी सूक्ष्म फरक आहेत) यासोबतच इथला शेतकरीही वेगवेगळा आहे. द्रा़क्षबागा करणारे शेतकरी एखाद्या पीएचडी झालेल्या शेतीतज्ञाला घाम फोडतील इतके प्रचंड हुशार आहेत. त्यांना पिकांना लागणार्याच प्रत्येक गोष्टीची, रोगांची, औषधांची, त्यातल्या घटकांची तसेच त्या घटकांच्या काम करण्याच्या पद्धतीची लेटेस्ट अपडेटेड माहिती असते, प्रयोग करायला ते थेट परदेशातून माणसे आयात करतात, दोन दोन लाख रुपये फीया देऊन मार्गदर्शन घेतात. काहीतरी नवीन शिकायला मिळेल म्हणून प्रत्येक सेमिनारला जातात, टीम ने काम करतात, इन्फर्मेशन शेअर करतात. नवनवीन यंत्रे वापरतात. ह्या सगळ्याचा फायदा त्यांना निश्चित होतो. दोन एकर द्राक्षबाग व्यवस्थित उत्पादन असेल तर साधारन १५ टन माल निघतो. ८० रुपये भाव मिळाला तर १२ लाख घसघशीत मिळतात, यात इन्वेस्टमेन्ट पहिल्या दोन वर्षात असते, नंतर औषधे खते व मेन्टेनन्स चा खर्च असला तरी आर ओ आय प्रचंड आहे. एक बाग साधारण ८ ते १० वर्षे चालते. म्हणजे फक्त मेन्टेनन्सचा खर्च. द्राक्षबाग करणारे शेतकरी हुशार झाले कारण हे अर्थकारण. जेवढी मेहनत, हुशारी ते करतील तितका जास्त फायदा त्यांना होतो आहे व जितका फायदा होतो आहे तितका हुरुप वाढतो आहे. म्हणजे सोप्या भाषेत पैशाकडे पैसा जात आहे.
याउलट पारंपरिक पिके घेणारा सिन्नर-घोटी भाग. इकडे टोमॅटो, वांगी, फ्लावर, ओला कांदा वगैरे भाजीपाला पिके घेतली जातात. इथल्या वीस वर्षे टोमॅटोची शेती सातत्याने करत असलेल्या शेतकर्या ला आपल्या टोमॅटोवर कोणता रोग आलाय तेही कळत नाही. याचे मला आश्चर्य वाटले. तो दुकानात ते ते रोगग्रस्त पान घेऊन जातो, मुळ्या, फळ घेऊन जातो, आणि दुकानदार ते बघून तिथल्या तिथे डायग्नोसिस करुन औषधे देतो. त्यातल्या त्यात बाजारभाव बघून किती माहाग औषधे मारायचे हे ठरते. बाजारभाव चांगला असेल तर कितीही महाग औषध मारुन रोग आटोक्यात आणण्याकडे बघितले जाते. भाव नसेल तर रोगावर औषध देखील मारत नाही, सोडून देतात सरळ तसे च्या तसे पीक. हे असे का होते? कारण हे मार्केट प्राइससेन्सेटीव आहे. तसेच आरओआय उत्तम नाही. जेवढे घातले तेवढे निघतात, कधी जास्त निघतात्,कधी तोटा होतो. आता फायदा कधी होइल आणि तोटा कधी होइल हे माहित नसल्याने शेतीच केली जाते, कायम तोटा असेल तर शेती करणे काय कोणताच उद्योग शक्य नाही. पण असे होते की फायदा तोट्याच्या सायकल चालू असतात. आता लॉस झाला तर उद्या प्रॉफिट होईल याची आशा असते. मागच्या मोसमात टोमॅटोला १२०० भाव मिळाला, आता १५० आहे पण ह्या दोन्ही सिच्युएशन असतातच म्हणून शेतकरी शेतीच करत राहतो. पोटापुरते मिळतेच.
हां तर काय सांगत होतो. भाजीपाल करणारे द्राक्ष करणार्यांइतके हुशार नाहीत. कारण त्यांनी हुशार व्हावे असे उद्युक्त करणारे त्यांच्या शेतीत काही नाही. दोनशे रुपये खर्च करुन द्राक्षवाला हजार कमावतो, दोनशे खर्च करुन टोमॅटोवाला अडीचशे कमावतो. साहजिक उत्साह आणि शिकण्याच्या, नवीन प्रयोग करण्याच्या प्रमाणात फरक पडतोच.
पाणीवाले बाबा त्यांना काही
पाणीवाले बाबा त्यांना काही सांगायला गेले की त्यांनाच शिव्या देतात.
>> तुम्हाला आयटी सोडून आयटीआय करा असा सल्ला जर मी दिला तर मला बक्षीस देणार की शिव्या...?
कोकणाचे एकूण महाराष्ट्रातल्या
कोकणाचे एकूण महाराष्ट्रातल्या शेतीउत्पादनात काय योगदान व काय स्थान आहे हा प्रश्न मी विचारला होता. आता कोकणाची बाजू मांडणारे अनेक दिसत आहेत, तर मी हा प्रश्न परत एकदा विचारतो, उत्तर द्याल का कोणी.
माणसाने अंथरूण बघुन पाय
माणसाने अंथरूण बघुन पाय पसरावेत, नाहीतर पाय उघडे पडणारच की हो.
पाणी असेल तेव्हा रात्रंदिवस मोकळं सोडायचं आणि नसला की उभा उस जळुन जातो. कसं व्हायचं अशानं ?
ऊसशेतीबद्दल माहिती असेल तर
ऊसशेतीबद्दल माहिती असेल तर बोला श्री... बातम्यांमधल्या माहितीवर अवलंबून स्टेटमेंट करु नका.
Pages