आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी
काय आहेत संपावर जाणार्या शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या ?
१) शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.
२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.
३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.
४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
५) शेतकर्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.
६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.
७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.
८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे.
का केल्या शेतकर्यांनी ह्या मागण्या?
शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली.
मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी?
राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले.
सरकार शेतकर्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का?
दररोज शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्यांन्ची कोंडी केली आहे.
शेतकर्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का?
अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे.
संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.
काही बेसिक प्रश्न आहेत.
काही बेसिक प्रश्न आहेत.
ह्या आधीची शेतकर्यांना कर्जमाफी कधी मिळाली होती? ती किती होती? तेव्ह्या मिळालेली कर्ज माफी घेऊन किती शेतकरी खरच कर्जमुक्त झाले होते? जाहिर केलेल्या रकमेपैकी प्रत्यक्ष किती रक्कम प्रत्यक्ष शेतकर्यांच्या हातात पडली होती? आत्ता परत जे शेतकरी कर्जबाजारी आहेत, ते गेल्या वेळेस कर्जमुक्त झाले होते आणि नंतर परत कर्ज घेऊन कर्जबाजारी झाले आहेत का? आत्ता कर्ज माफ केल्या वर परत हे लोक कर्ज घेताना विचार करुन कर्ज घेणार, की परत मनाला येईल तसे कर्ज घेणार आणि परत दोन वर्षात कर्ज बाजारी होणार? आता जर कर्ज परत करण्यासाठी रक्कम सरकारने दिली तर ती रक्कम प्रत्यक्ष शेतकर्यांपर्यंत पोचण्याची हमी काय आहे?
अरे बापरे. कावीळ झाली का ?
अरे बापरे. कावीळ झाली का ? पिवळे दिसू लागत आहे वेळीच उपचार घ्या.आणि बरे व्हा
ह्या आधीची शेतकर्यांना
ह्या आधीची शेतकर्यांना कर्जमाफी कधी मिळाली होती? ती किती होती? तेव्ह्या मिळालेली कर्ज माफी घेऊन किती शेतकरी खरच कर्जमुक्त झाले होते? जाहिर केलेल्या रकमेपैकी प्रत्यक्ष किती रक्कम प्रत्यक्ष शेतकर्यांच्या हातात पडली होती? आत्ता परत जे शेतकरी कर्जबाजारी आहेत, ते गेल्या वेळेस कर्जमुक्त झाले होते आणि नंतर परत कर्ज घेऊन कर्जबाजारी झाले आहेत का? आत्ता कर्ज माफ केल्या वर परत हे लोक कर्ज घेताना विचार करुन कर्ज घेणार, की परत मनाला येईल तसे कर्ज घेणार आणि परत दोन वर्षात कर्ज बाजारी होणार? आता जर कर्ज परत करण्यासाठी रक्कम सरकारने दिली तर ती रक्कम प्रत्यक्ष शेतकर्यांपर्यंत पोचण्याची हमी काय आहे? >>>
बरोबर.. हे प्रश्न बहुदा मोदी सरकारला आणि योगी सरकरला विचारल्यास योग्य राहिल. तिथे घोषणा आधीच केली आहे.
To put things in perspective
To put things in perspective : The finance ministry on Tuesday said that there are 2,071 accounts with state run banks which have debt exceeding Rs 50 crore and are classified as nonperforming assets or bad loans.
The outstanding amount in these accounts is Rs 3.88 lakh crore, noted Santosh Kumar Gangwar, minister of state in the finance ministry.
The total bad loan and restructured advances in all scheduled commercial banks stood at Rs 8.32 lakh crore in FY 16 as against Rs 7.28 lakh crore in FY 15.
ही बातमी नोव्हेंबर २०१६ ची आहे. सहा महिन्यांत त्यात किती भर पडली असेल?
@बिपिन
@बिपिन
"युपी मध्ये कर्जमाफी बरोबर (शक्य) पण महाराष्ट्रात, मध्यप्रदेशात, गुजरात आणि राजस्थानमध्ये ती चूक (अशक्य)"
या मागचे इकॉनॉमिक्स काय आहे असा माझा प्रश्न होता.
त्याचे उत्तर द्या. तुम्ही खाली लिहिलेले याच धाग्यावर २०० वेळा लिहून झाले आहे.
फडणवीसांचे आधीचे कर्जमाफीबद्दलचे विधान ज्यात त्यांनी पायाभूत सुविधा वाढवायच्या वगैरे म्हंटले होते ते विधान खरंच "अभ्यासाला" धरून होते. त्यामुळेच त्यांच्या नंतरच्या अभ्यासातून फारसे काही निष्पन्न झाले नाही.
फडणवीसांना काँग्रेसनी नाही तर मोदींनी आणि शहांनी अडचणीत आणले आहे.
आणि नुसती गंमत म्हणून जरी
आणि नुसती गंमत म्हणून जरी बघितलं, तरी ज्या राष्ट्रवादीविरुद्ध फडणवीस एवढा आक्रोश करतायत, त्यांना हाय कमांड कधी गुरु म्हणते. तर कधी खास दिल्लीला बोलवून घेते. वास्तविक दिल्लीचे आमंत्रण फडणवीसांना मिळायला हवे होते. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्यायला पवार का लागावेत?
फडणवीसांचे सगळ्यात जास्त अपमान त्याच्या पक्षश्रेष्ठी कडूनच होतात.
फडणवीसांची प्रतिमा/काम/प्रचार कौशल्य मोदींपेक्षा कितीतरी सरस आहे. मोदी -शहा बाजूला राहिले तर फडणवीस स्वबळावर सहज पुन्हा निवडून येतील.
>>>>> फडणवीसांचे सगळ्यात
>>>>> फडणवीसांचे सगळ्यात जास्त अपमान त्याच्या पक्षश्रेष्ठी कडूनच होतात. <<<<
तू केव्हापासुन राजकीय विनोद करु लागलीस सई?
तुझे मुल्यमापन बरोबर असले, तरी ते "कॉन्ग्रेसी" कल्चरला धरुन बरोबर आहे, बीजेपीय कल्चरमधे असले काही नसते.
बरोबर बिजेपीय संस्कृतीत
बरोबर बिजेपीय संस्कृतीत त्यांना मार्गदर्शक मंडळात बसवतात,
मग राष्ट्रीय बैठकीला न बोलावणे, स्टेज वर न बसवणे, वगैरे प्रकार करतात, अपमान करत नाहीत:D
बाकी तो पाणी टंचाइ अन
बाकी तो पाणी टंचाइ अन शहाळ्याचा मुद्दा फारच भारी बर्का... (आजचा दिवस निघाला माझा हसुन खेळून)
अन विहिरींना पाणि वगैरे बाबी तर वाचुन मलाच हर्षवायु व्हायचि वेळ आली.... कारण समुद्राकाठच्या गावात विहिरिंना बारमाही पाणी असते, पण केवळ समुद्र काठाची चिंचोळी शेपाचशे मीटरची उभी पट्टी म्हणजे कोकण नव्हे हे कुणाला सांगणार? पण काये ना, पर्यटनानिमित्त केवळ अन केवळ कोकणातले बीच पालथे घालुन कोकणाबद्दल मत बनले असेल, तर ते कसे काय बदलु शकणार? नै का? असो.
कोकणाच्या मातीत लहानाचा मोठा झालोय ,परंतू तुमच्यासारखा मी शेतकरी नाही . व्यवसायामुळे पर्यटन घडते म्हणा किंवा पर्यटनातून व्यवसाय करतो असं म्हणा, जेथे जेथे जातो तेथील ग्रामीण भागाचा अभ्यास करतो, तेथील शेतीबदद्दल चौकशी करतो. पूर्वग्रह व अनावश्यक तुलना करत बसत नाही.
शहाळ्याचा मुद्दा ट्रॅप होता. आता मला सांगा, कोकणात शेवटचा मोठा कोरडा दुष्काळ कधी पडला? जनावरांसाठी चाराछावण्या कुठे कुठे आणि किती उभाराव्या लागल्या? पाण्यावाचून किती जनावरे दगावली? किती लोकांना पोटापाण्यासाठी आपली गावं सोडावी लागली. नसेल सोडावी लागली तर त्यांनी आपली शेती व जनावरे पाण्यावाचून कशी वाचवली? व स्वतःचा पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवला?
असे कठीण प्रश्न विचारू नये
असे कठीण प्रश्न विचारू नये त्यांच्यात अशा गोष्टींवर अभ्यास घेत नाही
अगदी मार्मिक प्रश्न.
अगदी मार्मिक प्रश्न. कोकणकहान्या सांगणारे आकडेवारी व पुराव्यानिशी काही शाबित करत नाहीत हा आतापर्यंतचा अनुभव. केवळ भावनिक बाता.
याच धाग्यावर दोन वेळा तरी विचारुन झालंय, कोकणचं महाराष्ट्रातल्या शेतीत योगदान कीती...?
सर्व कोकणवासियांच्या वतीने:
सर्व कोकणवासी प्रतिसादकांच्या वतीने:
चूक झाली साहेब. माफ करा आम्हाला. कोकणातले लोक हवेवर नाहीतर शहरातल्या नातेवाईकांनी पाठवलेल्या पैशांवर आणि र्वरित महाराष्ट्रातल्या लोकांच्या दानधर्मावर जगतात. कोकणाचे शेतीबद्दलचे काहीच योगदान नाही. भात, मासे, आंबे, फणस, काजू वगैरे सगळी अंधश्रद्धा आहे. उर्वरित महाराष्ट्राबद्दल भाष्य करण्याचा आम्हाला काहीच अधिकार नाही. पुन्हा एकदा, आम्हाला माफी करावी साहेब. अगदी जात जोडून माफी मागतो.
हांगाश्शी... म्ग आधीच नाक वर
हांगाश्शी... म्ग आधीच नाक वर करुन बाता मारायच्या नाहीत कोकणवासीयांनी. निस्त्या बाता माराणारांचे लै हाल होतात म्हाराष्ट्रात...
उगा आपलं नाचायचं, उघडं पडायलं की कांगावा करायचा.....
उपरोध कळण्याच्याही पलिकडे
उपरोध कळण्याच्याही पलिकडे गेलेली आहेत लोकं
बीजेपीय कल्चरमधे असले काही
बीजेपीय कल्चरमधे असले काही नसते.>>> मागच्याच पानावर << सईजी, मी देखिल अत्यादरपूर्वक उत्तर देतो की "मी भाजपाचा प्रवक्ता नाहीये" ,>> म्हणत होतात की!!! ३-४ तासात बराच 'अभ्यास' झालेला दिसतो.
तेच तर... उपरोध करण्यापेक्षा
तेच तर... उपरोध करण्यापेक्षा आकडेवारी अभ्यास असता तर त्या उपरोधाला काही अर्थ राहिला असता... श्या. तेपन जमत नाही.
वर मार्मिक यांच्या प्रश्नांना उत्तरं देतील का कोकणवासीय. वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत.
बाकी, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र असा भेद इथे पेटवण्याची अजिबात गरज नव्हती. आम्हाला तर प्रत्येक मराठी माणसाबद्दल अनुकंपा आहे, कोणाला समस्या असो नसो सगळे आपलेच आहेत. कोकणातल्या माणसाला गणपतीत गाड्या मिळायचा खूप प्रॉब्लेम असतो, अजून काही समस्या असतील तेव्हा उर्वरीत महाराष्ट्रातल्या लोकांना कोकणवासीयांना अक्कल शिकवण्याची इच्छा झाल्याचे दिसले नाही. बंधुप्रेम म्हणत असावेत ह्याला.
हो का? बरं
हो का? बरं
उत्तरं..........?
उत्तरं..........?
नाहीत का? बरं.
असलीच तर तुम्हाला कोण देत
इथे लिहीणार्या कुणाकडे उत्तरं असलीच तर आत्तापर्यंतच्या प्रतिसादांचा अनुभव बघता तुम्हाला कोण देत बसेल यापुढे? तुम्ही तर कोकणात सूर्य पूर्वेकडून उगवतो यालाही नाकाराल.
कोकणाचो कॅलिफोर्निया कधी होईल
कोकणाचो कॅलिफोर्निया कधी होईल याकडे लक्ष द्या अंतू.
की ते ही नारायण राणेंनीच करायचे बाकी तुमचो मुख्यमंत्री काय करायचो ?
नुसतो अभ्यास एके अभ्यास. परीक्षोचो पत्यो नाय यका. परीक्षोला बस तर म्हणत्यो कसो. मका अजुन अभ्यास करु द्या. ३ वर्ष झाली किति अभ्यास करतुलो .
>>>> तुम्ही तर कोकणात सूर्य
>>>> तुम्ही तर कोकणात सूर्य पूर्वेकडून उगवतो यालाही नाकाराल. Proud <<<<


उण्यापुर्या चाळीस एक वर्षांपूर्वीच, कोकणचा "कॅलिफॉर्निया" करु म्हणून तत्कालिन यच्चयावत पांढरीटोपीवाले फुडारी धोषा लावुन होते... कदाचित अभ्यासदौरा म्हणून त्यातिल काहीजण खर्याखुर्या कॅलिफॉर्नियासही जाऊन आले असतील....
पण यांचे हातुन काही कोकणचा कॅलिफॉर्निया झाला नाही तो नाहीच.... पण त्या सततच्या घोषणांचाच पश्चात परिणाम म्हणून धागाकर्त्यास वरील प्रश्न पडले असतील तर नकळे... !
काही कोकणचा कॅलिफॉर्निया झाला
काही कोकणचा कॅलिफॉर्निया झाला नाही तो नाहीच... << अरेच्या एकी कडे कोकणात विकास झाला म्हणून आत्महत्या करत नाही म्हणतात तर दुसरी कडे कॅलिफॉर्न्या झालाच नाही म्हणतात. अरे किती डब्बल ढोलकी वाजवतात यार ही लोक
आवरा राव यांना
उत्तरे नसलि की अशा उड्या
उत्तरे नसलि की अशा उड्या माराव्या लागतात.....
साधे प्रश्न आहेत. स्वतःचे अनुभव नाही मागत कोणी. ते सापेक्ष असतात. खालील प्रश्नांची उत्तरे वस्तुनिष्ठ असतात.
१.कोकणात शेवटचा मोठा कोरडा दुष्काळ कधी पडला?
२.जनावरांसाठी चाराछावण्या कुठे कुठे आणि किती उभाराव्या लागल्या?
३.पाण्यावाचून किती जनावरे दगावली?
४.किती लोकांना पोटापाण्यासाठी आपली गावं सोडावी लागली.
५.नसेल सोडावी लागली तर त्यांनी आपली शेती व जनावरे पाण्यावाचून कशी वाचवली?
६.व स्वतःचा पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवला?
वरील सहापैकी कोणत्याही ३ प्रश्नांची उत्तरे देण्यात यावी. पहिल्या तीन प्रश्नांची दिलीत तरी पैकीच्य पैकी मार्क्स. कारण त्याची अधिकृत माहिती उपलब्ध असतेच. अभ्यास करणार्यांना काय अवघड आहे?
अरेच्या एकी कडे कोकणात विकास
अरेच्या एकी कडे कोकणात विकास झाला म्हणून आत्महत्या करत नाही म्हणतात तर दुसरी कडे कॅलिफॉर्न्या झालाच नाही म्हणतात. अरे किती डब्बल ढोलकी वाजवतात यार ही लोक
ट्रॅपमध्ये अडकलेत बिच्चारे. ह्यापुढे त्यांना शहाळ्याचे पाणीही गोड लागणार नाही.
>>>> अरेच्या एकी कडे कोकणात
>>>> अरेच्या एकी कडे कोकणात विकास झाला म्हणून आत्महत्या करत नाही म्हणतात त <<< वेड पांघरुन किती ते पेडगावला जायचे !
कोकणात कॉन्ग्री राज्यात कधीच विकास झाला नाही, अन तरीही कुणी आत्महत्या करीत नाहीत असे मुळचे सांगणे आहे.
दर वेळी दंगा/ तोडफोड//बंद
दर वेळी दंगा/ तोडफोड//बंद पुकारणार्यांना दंगा आवरायचा अनुभव नाही आहे
आणि हिच खरी भाजपाची गोची आहे. एखाद्या ढ दंगेखोर तोडफोड करणार्या मुलाला अचानक वर्गात उभे करून "हा नाम्या बोल बर १३ चा पाढा" असे शिक्षकांनी विचारल्यावर नाम्याची अवस्था कशी होते. तशीच अवस्था सध्या भाजप्यांच्या नेत्यांची झाली आहे. काय करु कुणाकडे बोट करू, काय उत्तर देऊ, कशी वेळ मारू असे विविध उत्तरे भाजपाची पेड भक्त मंडळी शोधत फिरत आहे.
महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांतील
महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांतील लोकसंख्येचा स्त्री-पुरुष अनुपात पाहिला, तर दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण हजारपेक्षा जास्त असलेले दोनच जिल्हे आहेत. रत्नागिरी : ११२२ आणि सिंधूदुर्ग : १०३६. (एकंदर राज्यासाठी ९२९)
असं का आहे? २००१-२०११ या दशकात तीन जिल्ह्यांनी लोकसंख्येत घट नोंदवली . मुंबई -७.६ (मुंबई उपनगर हा वेगळा जिल्हा आहे), रत्नागिरी -४.८, सिंधुदुर्ग -२.२
२०१३-१४ साली NET DISTRICT DOMESTIC PRODUCT रत्नागिरी १७,२९४ करोड सिंधुदुर्ग १०,१४२ करोड.
रत्नागिरीपेक्षा कमी उत्पादन असलेले जिल्हे नंदुरबार ८४४८ , जालना १४३०६, परभणी १२८५६, हिंगोली ६०५१, बीड १६१८०, उस्मानाबाद ११९७६, अकोला १५५४०,वाशिम ९५२२ ,वर्धा १२ ५५२ भंडारा ९८०९ गोंदिया ९३२६, गडचिरोली ६,३६४. एकूण १२. त्यातले सिंधुदुर्गपेक्षा कमी उत्पादन अस्लेले जिल्हे ६.
*** २०१६-१७ चे आकडे पाहिले. रत्नागिरी क्रमावारीत होता तिथेच आहे. सिंधुदुर्ग एक स्थान खाली घसरला आहे. गोंदियाने सिंधुदुर्गला मागे टाकलेय, तर भंडार्याने जवळजवळ गाठलेय.
माफी स्वीकारायचा विचार करा मंडळी.
कोकणात कॉन्ग्री राज्यात कधीच
कोकणात कॉन्ग्री राज्यात कधीच विकास झाला नाही, अन तरीही कुणी आत्महत्या करीत नाहीत असे मुळचे सांगणे आहे. >> अरे उणीपुरी ५ वर्ष सत्तेत मारामारी करत घालवणार्या लोकांनी फक्त ५ वर्षात कोकणाचा विकास केला आणि बाकीचे ६५ वर्ष कोकणातलो माणूस शहाळाचे पाणी पित बसलेला का?
आज कॉमेडी नाईट विथ लिंबूभाऊ असा एपिसोड जोरदार रंगला आहे. किती हसू किती नको असे झाले
व्वा भरत, मानल पाहिजे
व्वा भरत, मानल पाहिजे तुम्हाला, तुमच्या अभ्यासाला
त्याच वेळेस जिल्ह्यांचे क्षेत्रफळ व लोकसंख्या कळले असते तर तुलना अधिक सखोल करता आली असती.
जर जुन्या आकारातील रत्नागिरी बघितला, तर रत्नागिरी + सिंधुदुर्ग मिळून २७,३०० करोड होतिल
अन हे कधी? तर
.
चार महिन्यात बदाबदा पाऊस कोसळून समुद्रात वाहुन गेल्यावर उरला कोरडा ठाक कालावधी असताना ! मुरमाड जमिन असताना, अत्यंत तुरळक एमायडिस्या असताना. याच्या कितीतरी पटीने अधिक सुबत्ता/सुविधा पश्चिम महाराष्ट्रात एकवटल्या असुनही तिथे रड असतेच. अन आता तर निमित्त मराठवाडा/विदर्भ/खानदेशाचे करताहेत रडीचा डाव खेळायला!असो वरील आकडेवारी बघुन कोकणी लोकांबद्दल अन स्वतः कोकणी असल्याबद्दल उर अभिमानाने भरुन आला
>>>> आणि बाकीचे ६५ वर्ष
>>>> आणि बाकीचे ६५ वर्ष कोकणातलो माणूस शहाळाचे पाणी पित बसलेला का? <<<<
पुन्हा पुन्हा तेच.... दाराबाहेर झाडावर चढुन शहाळ प्यायच.... ही कन्सेप्ट तुम्हाला फारच भावलेली दिसते.
पण ते काही असो, तो शहाळी पित असेल नैतर ताडी/माडी.... पण घाटावरल्यांसारखे राजकारण्यांमागे आंधळेपणे जाऊन संप/तोडफोड /नासधुस्/ओलिस धरणे इत्यादी नक्कीच करीत नाही.
Pages