चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्मित,
ईथे एक लक्षात घ्यायला हवे की प्रेक्षकवर्ग फक्त मराठी माणूस नसून देशभरात पसरलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना काय बघायला आवडेल याचा विचार करून ते देण्याचा प्रयत्न असतो.
पद्मावतचा खिलजी आपल्याला आवडला पण खरोखरच्या खिलजी कुटुंबियांना आवडलाही नसेल.

जोधा अकबर - ऋत्विक
बाजीराव- रणबीर
तानाजी - अजय देवगण
विर -सलमान
पद्मावत - शाहिद....
त्यामुळे कदाचित पानिपत साठी अर्जून ची निवड केली असेल.

सस्मित,
ईथे एक लक्षात घ्यायला हवे की प्रेक्षकवर्ग फक्त मराठी माणूस नसून देशभरात पसरलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना काय बघायला आवडेल याचा विचार करून ते देण्याचा प्रयत्न असतो.
पद्मावतचा खिलजी आपल्याला आवडला पण खरोखरच्या खिलजी कुटुंबियांना आवडलाही नसेल.> >>> नसेलही आवडला. मग? नक्की कशाबद्दल किंवा कशावर लिहिलंयस हे? कंगनाच्या पोस्टवर? मलातबैकैकळलंचनै Happy

पानिपत मधे अर्जुन आणि संजय दत्त मधे अभिनयाची जुगलबंदी होणार. Lol

Submitted by सस्मित on 7 November, 2019 - 02:47

>>> रणांगण आठव्तेय ?

जोधा अकबर - ऋत्विक
बाजीराव- रणबीर
तानाजी - अजय देवगण
विर -सलमान
पद्मावत - शाहिद....
त्यामुळे कदाचित पानिपत साठी अर्जून ची निवड केली असेल.

Submitted by pravintherider on 7 November, 2019 - 01:2

औरन्ग्जेब > अर्जुन

स्वामिनी मालिकेतले सदाशिवराव आणि पार्वतीबाई छान आहेत. हे अमराठी कलाकार कशी तयारी करत असतील. हे सगळं साहित्य हिंदी किंवा इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहे का. असल्या माठांना शिकवायचं म्हणजे दिग्दर्शकाची कसोटी असेल. >>>>>>> अर्जून कपूर माठ हे ठिक आहे. पण क्रिती सॅनोन आणि माठान्च्या कॅटेगरीमध्ये? Uhoh अगदीच काही ग्रेट अभिनय नाही तिचा पण बरेली की बर्फी, लुका छिपी मध्ये छान काम केल होत तिने.

अर्जुन कपूर झोपाळलेला वाटतो. डोळे तर अतिशयच थंड असतात बोलताना. म्हणून तो खून, मारामारी वगैरे टाईप्स चित्रपटात चालून गेला.>>>>>>>>>++++११११११११११

औरन्ग्जेब > अर्जुन >>>>> फक्त सिनेमाच नावच आहे ते हस्तर. तो खर्या औरन्गजेबवर बेतलेला नव्हता. अर्जून कपूरचा डबल रोल होता त्यात.

पानिपत या विषयावर एक मराठी नाटक होतं त्याचं नाव बहुधा रणांगण होतं.
विश्वासरावच काय राधिकेचंही पात्र आहे बहुधा मुव्हीत. इब्राहिम खान गारदी ऑफकोर्स असेलच. एकूणात टू मेनी कॅरेक्टर्स असणारच आहे.
पण 'पानिपत' हा शब्द हेच एक परिपूर्ण स्क्रिप्ट आहे.

>>>>>रणांगण? सचिन आणि स्वप्निल?
>>>>> अभिनयाचि जुगल्बन्दि तिक्दे आहे
छे छे महाग्रु असले की एकतर्फी मामला असतो

सदाशिवभाऊ आणि अब्दाली यांची प्रत्यक्ष भेट इतिहासात झाली नव्हती पण या सिनेमात ते समोरासमोर डायलॉगबाजी करत आहेत.
जसं पारो आणि चंद्रमुखी प्रत्यक्ष कधी भेटल्या नव्हता पण सिनेमात डोला रे डोला एकत्र नाचल्या तसं सदाशिवभाऊ आणि अब्दालीही एकत्र एखादी कव्वाली सादर करतील.. पार्वतीबाई आणि सकीनाबेगम झिम्मा ग पोरी झिम्मा म्हणून फेर घालतील..आश्चर्य वाटायला नको Happy

हो बरोबर आहे त्या दोघांची भेट न्हवती झाली आणि दुसरं म्हणजे अब्दाली युद्धाच्या वेळी दूरवरच्या टेकडीवरून युद्ध पाहत होता पण पिक्चरमध्ये संजय दत्त सगळ्यांच्या पुढे राहून अर्धे मराठे एकटाच मारतो असं काहीतरी दाखवतील.

काल फेबु वर एक कमेंट वाचली पानिपत आशुतोष गोवारीकरचा आहे त्यामुळे अ‍ॅक्चुअल युद्धापेक्षाही जास्त लांबीचा पिक्चर असू शकतो. Proud

अ‍ॅक्चुअल युद्धापेक्षाही जास्त लांबीचा पिक्चर असू शकतो. Biggrin

हा मीम पण भयंकर फनी वाटला मला ट्रेलरवरचा. लोकांचं काय डोकं चालतं! Lol

https://twitter.com/allindiamemers/status/1191907215021621248

लो कल्लो बात! Happy
"अफगाणिस्तानात अब्दालीला आदराने ‘अहमद शाह बाबा’ म्हटलं जातं. त्यामुळे चित्रपटात त्यांचं नकारात्मक पात्र रंगवू नये अशी अफगाणिस्तानच्या सोशल मीडिया युजर्सची मागणी होत आहे. "
“अहमद शाह बाबा यांचा कुठल्याही प्रकारे अपमान होणार नाही यासाठी गेल्या दीड वर्षांपासून भारतातील अफगाणी प्रयत्नशील आहेत. अहमद शाह बाबा यांची भूमिका खराब असती तर ती मी स्वीकारलीच नसती, असं संजय दत्त यांनी मला सांगितलं आहे.”
>>> लोकसत्ता .

अबदाली खिलजीइतका वेडसर नसावा. नाहीतर रणविरलाच रोल ऑफर झाला असता.
पानिपतमध्ये 'विजय' मिळाला असं समजून नाचत राहिला नाही. अफगाणिस्तानात परत गेला- नॉर्थ मराठ्यांना रिक्लेम करायला सोडून.

पानिपत वर झालेल्या पराभवामुळे मराठ्यांची झालेली सगळ्यात मोठी नामुष्की काय?
अर्जुन कपूर ला सदाशिवराव भाऊंचा रोल मिळणे >>> Lol

पानिपत मधे अर्जुन आणि संजय दत्त मधे अभिनयाची जुगलबंदी होणार >>> Lol

युटयुबवर ट्रेलरखालचे कमेण्टस वाचले. त्यात अर्जुन कपूरला का घेतल हे सगळे विचारतात. सन्जय दत्तची मात्र स्तुती केलीये कमेण्टसमध्ये.

अर्जुन कपूर ने रोल साठी मेहनत घेतली पण असेल.
मला फक्त आता या ऐतिहासिक पिक्चर्स चा कंटाळा आला आहे.एक मोठा पिक्चजार काढल्यावर 3 वर्षं दुसरा काढता येणार नाही असा नियम पाहिजे.
अफगाणिस्तान ने हरकत घेतली आहे अब्दाली च्या पात्रावर.

मला हा प्रमोशन चाच भाग वाटू लागला आहे, निर्मातेच गळ घालत असतील चित्रपटाला कोणीतरी विरोध करा, मोर्चे काढा, काळं फासा

काहीही करा पण चित्रपट चर्चेत राहील असं बघा

अबदाली खिलजीइतका वेडसर नसावा.> खिलजी ही वेडा नव्हताच. पद्मावत मध्ये सगळ्यात अन्याय खिलजीवरच झाला आहे. तोच एकमेव खरी व्यक्तिरेखा आहे आणि त्याचेच चित्रण पूर्ण चुकीचे केले आहे.

पदमा वती मूळ कथेनुसार , शेजारचा राजपूत राजा पडमावतीसाठी तिच्या नवऱ्याला मारतो
म्हणून पदमावती जोहार करते

त्यांनतर मग खिळजीची एन्ट्री आहे

पानिपतचा ट्रेलर पूर्ण नाही बघितलाय. पदमिनी कोल्हापुरे गोपिकाबाई झाली आहे अस वाचलय लोकसत्तामध्ये.

पदमा वती मूळ कथेनुसार , शेजारचा राजपूत राजा पडमावतीसाठी तिच्या नवऱ्याला मारतो
म्हणून पदमावती जोहार करते

त्यांनतर मग खिळजीची एन्ट्री आहे

जोहार केल्यावर?

अरे काय त्या अर्जुनाने ट्रेलरमधे शेवटचे २ संवाद चांगले म्हटलेत की. असेच अजुन ३० तरी म्हटले तरी काम झाले.

Pages