Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऐतिहासिक बेडरुम ड्रामा+ आयटेम
ऐतिहासिक बेडरुम ड्रामा+ आयटेम नंबर्स नाही. >> हे कोणी सांगितलं?
अजय अतुल चे संगीत वाया थोडी घालवतील ते. भाऊचा एखादा मस्त ड्यान्स नंबर येईलसुद्धा!
जोक्स अपार्ट, ट्रेलर वरून तरी काहीही वेगळे पणा दिसला नाही. उलट पार्वतीबाईची जरदोजी एब्रॉयडरी केलेली साडी, सैल शेपटा, आधुनिक ब्लाउज हे पाहून भन्सालीला नावे ठेवण्यात काही अर्थ नाही असे वाटते. मला तर ते ओवाळायला क्रिती सगळ्यांच्या मागून पुढे येते तो सीन सेम बाजीराव मस्तानी सारखा, अर्जुन - क्रिती चा एकांतातला रोमॅन्टिक सीन, पार्वतीबाई चा लढतानाचा सीन यावर पण भन्सालीचीच छाप वाटली.
अर्जुन कपूर हा सदाशिवराव भाऊ
अर्जुन कपूर हा सदाशिवराव भाऊ यावरून बरेच निगेटीव्ह कॉमेण्ट आज पाहिले.
मार्केटींगचा एक भाग वाटतो.
जोधा अकबरमध्ये पण अॅशचा
जोधा अकबरमध्ये पण अॅशचा तलवार सीन होता! तिचा आणि क्रितीचा लुक सिमिलर असेल कारण गोवारीकरने सेम डिझानयर घेतली आहे दोन्ही फिल्म्सवर. एकान्तातला रोमँटिक सीन ह्रितिक अॅशने ग्रेसफुली दिला होता( इन लम्होके दामन मे).
जोधा अकबर पोस्टरवर ह्रितिकचा जो लुक होता तो भन्सालीने बाजीरावसाठी कॉपी पेस्ट केला. (आता तोच लुक अर्जुन कपूरला दिलाय. ) जोधाचा लुक त्याने दिपिकाला पद्मावतमध्ये दिला. अगेन कॉपी पेस्ट. बाकी ह्रितिक अॅश लेव्हलची ग्रेस त्याला जमणं शक्य नव्हतंच.
भन्सालीचे मुव्हीज म्हणजे घरगुती पती पत्नी और वो, एकतर्फी प्रियकर वगैरे मिर्चमसाला इतिहासाच्या वेष्टनात प्रेझेंट करतो. त्याच्या फॅन्सना तेच आवडतं त्यामुळे ठीकच आहे!
पण ऐतिहासिक मुव्हीजमध्ये ग्लॅमर, ग्रँजर, रोमान्स , स्केल सगळं अलीकडे जोधा अकबरमध्ये पहिल्यांदा दिसलं.
अर्जुन कपूर पेशवा ईज टोटल नो
अर्जुन कपूर पेशवा ईज टोटल नो नो. गोल गरगरीत आणि बोबडा .
संजय दत्त एकाच सूरात बोलणे ; अजून ते मवाली सूर बोलणे नकोसे वाटते.
क्रीटी सनोन कुठल्या अॅंगलने पेशवाईण?
अर्जुन कपूर पेशवा ईज टोटल नो
अर्जुन कपूर पेशवा ईज टोटल नो नो. गोल गरगरीत आणि बोबडा .>>>>
छान देखणा आहे की. मला तर आवडतो. अर्थात मला स्वप्निल जोशीही आवडतो. एकूणच अश्या टाईप्सचे सौंदर्य मला आवडते. का ते नेहमी राकट दणकट कणखर पुरुषी सौंदर्याचा अट्टाहास.
ट्रेलरमध्ये अर्जुनचा अभिनयही मला छान वाटला. संयत अभिनय करतो तो.
बाकी मिलिंद सोमन तरुण असता आणि त्याची स्टार वॅल्यु मोठी असती तर तो ही छान दिसला असता.
पद्मिनी कोल्हापुरेही आहे ना यात... आणखी किती मराठी कलाकार भरलेत बघावे लागेल.
अर्जुन कपूर नाही तर दुसरा कोण
अर्जुन कपूर नाही तर दुसरा कोण सुटेबल होता हाही प्रश्न पडतो. >>>> रणवीर रणबीर शाहिद किंवा विकी कौशल पण चालून गेले असते. अर्जुन कपूर च्या तोंडावरची माशीसुद्धा हालत नाही....फारच बोर वाटतो.
मोहनीश बहल, झीनत अमान सुद्धा
मोहनीश बहल, झीनत अमान सुद्धा दिसताहेत.
राकट दणकट कणखर पुरुषी
राकट दणकट कणखर पुरुषी सौंदर्याचा अट्टाहास>>>>>
युद्धावर लढणाऱ्या वीराचा रोल आहे तो
मंद डोक्याच्या, अर्धवट वाढ झालेल्या लग्नाळू पुणेकराचा तुपकट नव्हे
तिथे शोभतो स्वप्नील जोशी
जरा अति झालेत ना असे ऐतिहासिक
जरा अति झालेत ना असे ऐतिहासिक पिक्चर?
सगळीकडे तेच भव्य दिव्य, घोडे हत्ती, कॉस्च्युम, लाल कपड्यातल्या सुंदऱ्या, लाऊड ओव्हर ड्रेस्ड खलनायक इत्यादी इत्यादी.
बाजीराव मस्तानी पाहून झाल्यावर 'आता बाकीचे राहूदे, थोडं सारखंच वाटेल' असं होतं.
ट्रेलर बरा आहे पण अर्जुन कपूर
ट्रेलर बरा आहे पण अर्जुन कपूर का ? कोणी दुसरा नाही मिळाला का ?+१११
रणवीर रणबीर शाहिद किंवा विकी
रणवीर रणबीर शाहिद किंवा विकी कौशल पण चालून गेले असते. > तुम्बाड मधला हीरो पण चालला अस्ता
जरा अति झालेत ना असे ऐतिहासिक पिक्चर?
सगळीकडे तेच भव्य दिव्य, घोडे हत्ती, कॉस्च्युम, लाल कपड्यातल्या सुंदऱ्या, लाऊड ओव्हर ड्रेस्ड खलनायक इत्यादी इत्यादी. > +१
युद्धावर लढणाऱ्या वीराचा रोल
युद्धावर लढणाऱ्या वीराचा रोल आहे तो
>>>>
असेना, म्हणून त्याच त्याच छापाचे कलाकार घेत सिनेमे बनवत सुटायचे का?
जो बाजीराव तोच खिलजी
जी मस्तानी तीच पद्मावती
जी जोधा तीच पारो
आणि मुळात अर्जुन कपूरची पर्सनॅलिटी काय वाईट आहे?
सिक्स पॅक दाखवणे गरजेचे आहे का या रोलला?
पद्मावतमध्ये शहीद कपूरही किती छान वाटला होता राज्पूत राजा
असेना, म्हणून त्याच त्याच
असेना, म्हणून त्याच त्याच छापाचे कलाकार घेत सिनेमे बनवत सुटायचे का?
स्टिरीयोटाईप्स काय नवीन आहेत का बॉलीवुडला
एखादी डिश आवडली की तिचं अजिर्ण होईपर्यंत खाऊ घालण्यात हातखंडा आहे त्यांचा.
हॉटेलवाले कसे एकच पनीर ग्रेव्ही १५-२० वेगळ्या नावांनी खाऊ घालतात तोच प्रकार
अजीर्ण होईपर्यंत खाऊ नका मग.
अजीर्ण होईपर्यंत खाऊ नका मग.
वेगळ्या विषयावरचे वेगळे चांगले सिनेमे पण येतात. पण ते बघायला कितीसं पब्लिक जातं?
मला वाटतं हे लोक सगळं
मला वाटतं हे लोक सगळं एकमेकांकडे फिरवत असतील.आळीत एका घरी लाल भोपळे खूप आले की ती बाई आजूबाजूच्या शेजाऱ्यांना भोपळे वाटते, मग सगळ्या घरात पुढचे 2 दिवस भोपळा कोशिंबीर, भाजी, रायतं, घाऱ्या यांचा रतीब चालू होतो तसं.
एकाने पौराणिक कपडे घोडे हत्ती राजवाडे सेट वर खर्च केला की मग बाकी सगळे रियुज करून पुढचे काही वर्ष ऐतिहासिक पिक्चर काढत बसतात.
क्रीटी सनोन कुठल्या अॅंगलने
क्रीटी सनोन कुठल्या अॅंगलने पेशवाईण?
अश्लिल अश्लिल अश्लिल
ट्रेलर बरा आहे पण अर्जुन कपूर का ? कोणी दुसरा नाही मिळाला का ?+१११
रन्बीर ?
पिक्चर त्याचा; त्यात ओतला
पिक्चर त्याचा; त्यात ओतला जाणारा पैसा त्याचा पण इथे कास्टींग मात्र प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे हवेय
अर्जून कपुरच इश्कजादे,
अर्जून कपुरच इश्कजादे, औरन्गजेब, गुण्डे ह्या चित्रपटात पोटेन्शिअल दिसल होत. ग्रे शेडच्या भुमिका त्याला शोभतात. गुडी गुडी रोल्समध्ये तो झोपाळू अभिनय करतो.
स्टिरीयोटाईप्स काय नवीन आहेत का बॉलीवुडला >>>>>> मराठीत सुद्दा स्टिरियोटाईप्स काय कमी आहेत. एक तमाशापट हिट झाला तर दुसरा तमाशापट, त्यानन्तर लक्ष्या- अशोक सराफच्या विनोदी सिनेमान्ची लाट आली. आता टिन एजर्स लव्हस्टोरीज काढत सुटले.
जरा अति झालेत ना असे ऐतिहासिक पिक्चर? >>>>>>> मराठीतही येत आहेत. फर्जन्द झाला. हिरकणी रिलीज झाला. आता फत्तेशिकस्त येतोय. सिरियल्समध्ये सुद्दा तेच.
क्रीटी सनोन कुठल्या अॅंगलने पेशवाईण?
अश्लिल अश्लिल अश्लिल >>>>>>>> नक्की तुम्ही ट्रेलर कुठला बघितला, हस्तर? पानिपतचा की हाऊसफुल ४ चा?
पानिपत वर झालेल्या पराभवामुळे
पानिपत वर झालेल्या पराभवामुळे मराठ्यांची झालेली सगळ्यात मोठी नामुष्की काय?
अर्जुन कपूर ला सदाशिवराव भाऊंचा रोल मिळणे
स्टिरीयोटाईप्स काय नवीन आहेत
स्टिरीयोटाईप्स काय नवीन आहेत का बॉलीवुडला
एखादी डिश आवडली की तिचं अजिर्ण होईपर्यंत खाऊ घालण्यात हातखंडा आहे त्यांचा.
>>>>
जोपर्यंत विकतेय तोपर्यंत बनवणार. व्यवसाय आहे तो. चितळे ईतके वर्षे एकाच चवीच्या बाकरवड्या बनवून विकत आहेत. उगाच आता बस्स बोअर झालो म्हणत बर्गर बनवायला घेतील का विचारा त्यांना...
ऋन्म्येष, चितळ्यांच्या
ऋन्म्येष, चितळ्यांच्या बाकरवड्यांबद्दल काही बोलशील तर खबरदार !!!
चितळे बाकरवडीबद्दल कोणी
चितळे बाकरवडीबद्दल कोणी काहीही बोललं तर म्हणजे रॉसचा too far amy, too far डायलॉग ऐकवावा लागेल.
तर पानिपत the great betrayal म्हटलंय हे काय आहे? नजीबने दिलेला धोका का? की जाट राजपूत इत्यादी? हिंदीत पानिपत बनवायचा म्हणजे ट्रिकी आहे खरंतर. नजीबचा धोका दाखवायचा तर मुस्लिम व लिबरल लॉबी अंगावर येणार. किंवा मराठे महाराष्ट्रातून उठून उत्तरेत देश वाचवायला गेले, त्यांना बाकीच्या प्रांतीयांनी मदत केली नाही, स्वतःही काही देशासाठी केलं नाही- हे त्यांच्याच वंशजांना दाखवून चित्रपट कसा सेल करणार?
दुसरा ट्रेलर कधी येणार? दत्ताजी शिंदे, मल्हारराव होळकर, समशेर कृष्णराव, विश्वासराव हे महत्वाचे सरदार अजून दाखवले नाहीयेत.
स्वामिनी मालिकेतले सदाशिवराव
स्वामिनी मालिकेतले सदाशिवराव आणि पार्वतीबाई छान आहेत. हे अमराठी कलाकार कशी तयारी करत असतील. हे सगळं साहित्य हिंदी किंवा इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहे का. असल्या माठांना शिकवायचं म्हणजे दिग्दर्शकाची कसोटी असेल.
ऋन्म्येष, चितळ्यांच्या
ऋन्म्येष, चितळ्यांच्या बाकरवड्यांबद्दल काही बोलशील तर खबरदार !!!
Submitted by धनि on 6 November, 2019 - 20:42
>>>>
त्याला उकसवू नका. बेण धागा काढून मोकळं होईल.
चितळेंचे एक व्यावसायिक
चितळेंचे एक व्यावसायिक म्हणून कौतुकच करतोय.
चित्रपट हा देखील व्यवसाय म्हणून करणारे त्याच धर्तीवर माल खपतोय तोपर्यंत बनवतात हे योग्यच करतात असे म्हणतोय.
असो
आज फेसबूकवर एक वाचनात आले की चित्रपटात विश्वासरव ही व्यक्तेर्रेखाच नाही.
विश्वास पानिपतात मेला अशी जगप्रसिद्ध म्हण असताना हे शक्य् आहे का? की फक्त चर्चा घडवायला अन मार्केटींगला उठवलेली हूल आहे.
विश्वास पानिपतात मेला अशी
विश्वास पानिपतात मेला अशी जगप्रसिद्ध म्हण असताना हे शक्य् आहे का? की फक्त चर्चा घडवायला अन मार्केटींगला उठवलेली हूल आहे.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 6 November, 2019 - 22:01
टाकलाच ट्विस्ट
>>
>>>> राकट , दणकट....<<
>>>> राकट , दणकट....<<
अर्जुन कपूर झोपाळलेला वाटतो. डोळे तर अतिशयच थंड असतात बोलताना. म्हणून तो खून, मारामारी वगैरे टाईप्स चित्रपटात चालून गेला.
नाहितर, रुबाबदार मराठा वाटण्यासारखे ना दिसणं , ना बोलणं. रणवीरने बरचसं बरं काम केलं , बाजीराव मध्ये.
कंगना राणावतचा, मणिकर्णिका
कंगना राणावतचा, मणिकर्णिका पाहून भोवळ आली पहिल्या अर्ध्या तासात... तिचे ते हर हर महादेव किरट्या आवाजात एकून.
अभिनय काहीही खास न्हवता आणि ताठ चालणं आणि डोळे व भुवया ताठरणे हाच अभिनय वाटतो एतिहासिक चित्रपटात ह्या कलाकारांना...
नाहितर, रुबाबदार मराठा
नाहितर, रुबाबदार मराठा वाटण्यासारखे ना दिसणं , ना बोलणं.
>>>
हा आपला माईण्डसेट झालाय की तेव्हाचा राजा रुबाबदार मराठा अमुकतमुक असाच हवा. आपण कोणीही प्रत्यक्षात ते कसे होते हे पाहिले नाही वा तेव्हाचे विडिओ चित्रणही उपल्ब्ध नाही. आपला माईण्डसेटही आधीच्या चित्रपट मालिकांमुळेच झाला आहे.
बथ्थड चेहर्याची आणि बथ्थड अ
बथ्थड चेहर्याची आणि बथ्थड अॅक्टींग करत बथ्थड डायलॉग फेकणारी कंगना झाशीची राणी खपवून घेतली लोकांनी.

तिला फक्त सायको आणो दारुडे रोल सुट होतात.
काय तो सिनेमा!? काय फॅशनेबल कपडेपट?! काय ती राणी?!
आता सदाशिवरावांची पाळी
पानिपत मधे अर्जुन आणि संजय दत्त मधे अभिनयाची जुगलबंदी होणार.
Pages