Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सदाशिवभाऊ आणि अब्दाली यांची
सदाशिवभाऊ आणि अब्दाली यांची प्रत्यक्ष भेट इतिहासात झाली नव्हती पण या सिनेमात ते समोरासमोर डायलॉगबाजी करत आहेत.
जसं पारो आणि चंद्रमुखी प्रत्यक्ष कधी भेटल्या नव्हता पण सिनेमात डोला रे डोला एकत्र नाचल्या तसं सदाशिवभाऊ आणि अब्दालीही एकत्र एखादी कव्वाली सादर करतील.. पार्वतीबाई आणि सकीनाबेगम झिम्मा ग पोरी झिम्मा म्हणून फेर घालतील..आश्चर्य वाटायला नको Happy
घालतील..आश्चर्य वाटायला नको Happy
Submitted by चीकू on 7 November, 2019 - 10:26 >>>>>>>>>>>
https://www.esakal.com/manoranjan/mard-maratha-songs-shoot-234499
हो , खिलजी येईस्तोवर जोहार
हो , खिलजी येईस्तोवर जोहार पूर्ण झालेला असतो, त्याला फक्त राख दिसते,
म्हणजे एकदा आधी तो पडमावतीला बघून जातो वगैरे एकदा एन्ट्री आहे, पण त्यांनतर तो हल्ला करायचा आतच शेजारचा राजपूत राजा व पडमावतीचा नवरा ह्यांचे युद्ध होते
त्यांनतर खिळजीही तिथे येतो
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=v2YsMtMOq1I
मर्द मराठा: सन्गीत अजय- अतुलचे आहे.
आरारारा! श्या अगदीच भिकार
आरारारा! श्या अगदीच भिकार गाणे अन नाच. जोधा अकबर च्या अझीमोशान शहनशाह च्या सारखाच सेट अप आहे. वेगवेगळ्या दारातून होळकर, शिंदे वगैरे सरदार चालत येत पेशव्यांची स्तुती गीत गाताहेत असा सीन. पण मधेच अचानक स्त्रियांचा जथा नाचायला येतो आणि त्यात सदाशिवराव भाऊ ची बायको पण भर पब्लिक समोर नाचते, पदर कुठच्या कुठे वार्यावर, कमरेचे ठुमके वगैरे साग्रसंगीत
इतर बायका तरी खांद्यावर शाल घेऊन नाचतायत, पेशवीण बाईचे मात्र रिव्हीलिंग कपडे!!
भन्साली बरा की यापेक्षा!! बाजीरावाचा मावळ्यांसोबत बजने दे धडक धडक आणि पिंगा दोन्ही ऐतिहासिक, सांस्कृतिक दृष्ट्या विनोदीच होते. पण ते दोन्ही समहाऊ जबरदस्त एंटरटेनिंग होते. हा नाच (?)महा बोरिंग पण आहे.
>>>
>>>
मर्द मराठा: सन्गीत अजय- अतुलचे आहे.<<
सगळे दिग्दर्शक असे बेकार डान्स का दाखवतात?
इतिहासाची वाटच लावतात. तो भन्साळी, राजस्थानची राणीला, भर सभेत ‘घुमर’ वर नाचवतो. जेव्हा की, अजूनही राजस्थानी संस्क्रूतीत बायका पडदानशीन असतात आणि हे भन्साळी, नाचव्तात भर सभेत...
ह्या असल्या एतिहासिक चित्रपटाचा वैताग आहे. लिबर्टीच्या नावाने काहीही दाखवतात.
पेशव्यानि साऱ्या गावच्या
पेशव्यानि साऱ्या गावच्या बायका खरोखर नाचवल्या,
पेशव्यांच्या बाया सिनेमात नाचल्या तर इतिहास कसा बुडतो म्हणे ?
>> लिबर्टीच्या नावाने काहीही
>> लिबर्टीच्या नावाने काहीही दाखवतात.<<
पेशव्यांवर उगवलेला सूड आहे तो; त्यांनी मराठेशाहि बुडवली म्हणुन...
साँग कुड हॅव बिन बेटर पण
साँग कुड हॅव बिन बेटर पण मल्हारी किंवा पिंगापेक्षा हजारो पटींनी चांगलं आहे! those were cringe-worthy.
क्रितीचा डान्स ओके आहे, एक तर तो तमाशातील गाण्यावर नाही आणि ती एकटीच नाचते आहे (कोणा मस्तानी किंवा तत्सम प्रोफेशनल डान्सरसोबत नाही.) ऑल्सो , तिचं तेव्हा बहुधा लग्न झालेलं नसतं (नसावं).
>>>> पेशव्यांच्या बाया
>>>> पेशव्यांच्या बाया सिनेमात नाचल्या तर इतिहास कसा बुडतो म्हण<<<
प्रतिसादाची गरज न्हवती पण लिहिते,
हा तुम्ही काढलेला अर्थ आहे. आक्षेप इतकाच आहे की, अचाट आणि अतर्क्य दाखवण्यावर...
बायका कधी बाहेर सुद्धा येत नसत अशी संस्कृती असताना, पारदर्शक चंदेरी नेसून ते अंगविक्षेप नाच..
भगवान उठा ले, मुझे नहि इन्हे; असं झालं.
मस्त गाणे आहे.
मस्त गाणे आहे.
ते मर्द मराठा रे ऐकताना अंगावर काटा येतो..
पेशव्यानि साऱ्या गावच्या
पेशव्यानि साऱ्या गावच्या बायका खरोखर नाचवल्या, पेशव्यांच्या बाया सिनेमात नाचल्या तर इतिहास कसा बुडतो म्हणे ? >> बुडूक... बुडूक.... बुडूक...

अर्जुन कपूरला जॉब
अर्जुन कपूरला जॉब सिक्युरिटीची सध्या गरज असावी, म्हणून सदाशिवरावाचा रोल घेतला. पानिपतचा सिक्वेल तोतयाचे बंड काढला तर रोल पुन्हा अर्जुन कपूरला...
पेशव्यानि साऱ्या गावच्या
पेशव्यानि साऱ्या गावच्या बायका खरोखर नाचवल्या, पेशव्यांच्या बाया सिनेमात नाचल्या तर इतिहास कसा बुडतो म्हणे ? >> बुडूक... बुडूक.... बुडूक... Wink Happy
जेव्हा करिष्मा करीन ह्या राजकपूर ह्यांच्या नाती हेरॉईन बनायला आल्या तेव्हा हेच वाक्य लोक बोलाले होते
मस्त गाणे आहे.->+१
मस्त गाणे आहे.->+१
अर्जुन कपूरला जॉब
अर्जुन कपूरला जॉब सिक्युरिटीची सध्या गरज असावी, म्हणून सदाशिवरावाचा रोल घेतला. पानिपतचा सिक्वेल तोतयाचे बंड काढला तर रोल पुन्हा अर्जुन कपूरला... >>
सन्जय खानची ' द ग्रेट मराठा'
सन्जय खानची ' द ग्रेट मराठा' सिरियल लागायची पुर्वी दुरदर्शनवर. त्यात ' मेरा मर्द मराठा' अस गाण बघितलेल आठवतय. त्यात स्त्री पुरुषान्चा कोरस त्यावेळच्या कपडयात नाचत होता.
औरन्ग्जेब > अर्जुन >>>>> फक्त
औरन्ग्जेब > अर्जुन >>>>> फक्त सिनेमाच नावच आहे ते हस्तर. तो खर्या औरन्गजेबवर बेतलेला नव्हता. अर्जून कपूरचा डबल रोल होता त्यात.
Submitted by सूलू_८२ on 7 November, 2019 - 07:
ट्रेलर मध्ये पण औरंगजेबाचा उल्लेख आहे ,निदर्शने पण झाली होती नाव बदला म्ह्णून
मक्ख आणि झोपाळू चेहर्याचा
मक्ख आणि झोपाळू चेहर्याचा अर्जुन कपुर सदाशिवभाउ म्हणुन??माशी हलत नाही त्याच्या चेहर्यावरुन, देवा!!!
गाण अचाट आहे. क्रिति सॅनन डोळ्यानी खाणाखुणा करत नाच्तेय ते तर अजुनच अचाट आहे.
पेशवे मराठा काळात रोमान्स
पेशवे मराठा काळात रोमान्स चालायचाच नाही, स्त्रीसुलभ अल्लडपणा गंमतीशीर खोडकर अवखळ स्वभाव वगैरे कोणाचे नसायचेच असे लोकं नक्की कश्याच्या आधारावर बोलतात. जसे काही टाईममशीन मध्ये जाऊन तो काळ बघून आल्यासारखे.
गाणं भंकस आहे. अर्जुन कपूर
गाणं भंकस आहे. अर्जुन कपूर ठोंब्या दिसतोय.
)
क्रीती सुं द र दिसतीये. खरंच सुंदर. रेशमी लाल साडी आणि नाजुक बांध्याची क्रीती. (आता ज्यांनी गाणं पाहिलं नाही ते पण बघतील
बा म तल्या प्रिचो पेक्षा मेकप कमी आहे.
नाच अचाट आहे. सग्ळे सरदार वैगेरे गाणी गातात ते बोर आहे. सगळ्या बायका नाचताना आत अपद्मिनी कोल्हापुरे पण नाचेल की काय असं वाटलं.
आजघर , माजघर, मागच अगण,
आजघर , माजघर, मागच अगण, गवाक्ष असे शब्द एकुन माहित अस्ले आणी किमान थोडे तरी एतिहासिक पुस्तक वाचले असले मग कळेल , मगळागौर ,आवळी भोजन वैगरे बायकाना अवखळपणा दाखवता यावा यासाठीच होते बाकी चारचौघात त्यावेळेस अशा पेशवे स्त्रियाच काय पुरुष कशाला नाच गात असतिल? काहीही !! सलिभ काय आणी गोवारिकर काय सगळ्यानीच इतिहास मला आवडेल तसा दाखवु अस ठरवले असेल तर
तर काय बोलणार.
ट्रेलर मध्ये पण औरंगजेबाचा
ट्रेलर मध्ये पण औरंगजेबाचा उल्लेख आहे ,निदर्शने पण झाली होती नाव बदला म्ह्णून >>>>>>> हो का? हे मला माहित नव्हत.
क्रीती सुं द र दिसतीये. खरंच सुंदर. रेशमी लाल साडी आणि नाजुक बांध्याची क्रीती >>>>>>> ++++++११११११११ ट्रेलरमध्ये सुद्दा ती सुन्दर दिसलीये.
सगळ्या बायका नाचताना आत अपद्मिनी कोल्हापुरे पण नाचेल की काय असं वाटलं. >>>>>>>> अपद्मिनी कोल्हापुरे ?
ती गोपिकाबाई झालीये ना म्हणून. आता त्या कशाला नाचतील?
तान्हाजी अनसंग वॉरिअर ट्रेलर
तान्हाजी अनसंग वॉरिअर ट्रेलर रिलीज झाला. अजयची वेशभूषा जास्तच झगमग वाटते.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=cffAGIYTEHU
तान्हाजी
यशवंती नाही दिसली.
यशवंती नाही दिसली.
तानाजी चा ट्रेलर पानिपत
तानाजी चा ट्रेलर पानिपत पेक्षा कितीतरी बरा आहे. ट्रेलर शेवटाला अजय देवगण ची नजर क्लोजअप खासच. काजोल गोड दिसली आहे मराठी गेटअप मधे. सौफ - अजय ओमकारा नंतर बहुधा आता एकत्र आले असावेत.
तान्हाजी? तान्हा?
तान्हाजी? तान्हा?
पहिला पोस्टर रिलीज झाला
पहिला पोस्टर रिलीज झाला तेव्हा बहुतेक तानाजी होतं, नन्तर तान्हाजी केलं.
मला आवडलं तान्हाजीचं ट्रेलर.
मला आवडलं तान्हाजीचं ट्रेलर. अजय देवगण मला ह दि दे चु स पासून आवडतो. सिंघम, दृश्यम तर लाजवाब. तसा तो विजयपथ मध्ये ही आवडलेला तब्बूबरोबर पण एरवी तो आधी चम्या वाटायचा. आता नाही वाटत
तान्हाजी चा अपभंश होऊन तानाजी
तान्हाजी चा अपभंश होऊन तानाजी झाले होते का ?
Pages