पानिपत... एक सल...

Submitted by सेनापती... on 10 February, 2012 - 00:38

बुधवार, १४ जानेवारी १७६१. पौष शु. अष्टमी.

गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

"कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"

त्या भयंकर रणसंग्रामाला अडीचशेहून अधिक वर्षे होऊन गेली तरी पानिपतची जखम आजही मराठी मनावर कायम आहे. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक आणि अटकेपार फडकवलेले भगवे झेंडे हा मराठी इतिहासाचा मानबिंदू असेल तर पानिपत हा एक सल आहे. तो कधीच पुसला जाणार नाही. आजही कुठल्याही गोष्टीत आपला पराजय झाला की त्याला पानिपतची उपमा दिली जाते तर विजयाला अटकेपार झेंडे रोवणे असेच म्हटले जाते ह्यातच सर्व काही आले. पण मुळात ही परिस्थिती त्याकाळी मराठ्यांवर का आली हे देखील जाणून घेणे गरजेचे ठरेल. संपूर्ण भारतभर आपल्या घोड्यांच्या टापांनी आणि तलवारीच्या जोरानी मराठी साम्राज्याचा विस्तार(?) करता करता असे काय घडले की मराठ्यांचे अध:पतन झाले? मुळातच हे अचानक झाले नाही.

ह्यासाठी पानिपत समजून घेताना त्याआधीच्या काही वर्षांचा इतिहास समजून घेणे क्रमप्राप्त आहे. मराठी किंवा हिंदू साम्राज्य स्थापण्यामागची शिवछत्रपतींची इतिकर्तव्यता नेमकी काय होती? त्यांना नेमका कुठला महाराष्ट्र धर्म अभिप्रेत होता? त्यांच्या पाश्च्यात त्यांच्या नीतीमूल्यांची किती जपणूक मराठ्यांच्या राज्यकर्त्यांना करता आली? खरेतर कितपत झेपली किंवा पेलली असेच म्हणावे लागेल. एका १६ वर्षाच्या पोट-मोकासेदाराने मुघल आणि आदिलशाहीविरुद्ध उभा केलेला हा महाराष्ट्र धर्म होता. त्यांची इतिकर्तव्यता हीच होती की मुसलमानी साम्राज्य उखडून फेकायचे. हा देश, ही भूमी पारतंत्र्यातून मुक्त करायची. फक्त महाराष्ट्र नाही तर सिंधू नदी ते कावेरी पावेतो... त्यासाठी त्यांनी अखंड श्रम सोसले. संपूर्ण दक्षिण भारत जवळ-जवळ ताब्यात आणला. आदिलशाही जवळ जवळ नामशेष झालेलीच होती. उरली सुरली कुतुबशाही मराठ्यांच्या जीवावर जगत होती. पण मग पुढे असे काय झाले की दिल्लीपतीला दख्खनेत दफन करणारे मराठे खुद्द दिल्ली राखू लागले? पेशवे काळात नेमके असे काय बदलले की पातशाही नामशेष करायची सोडून मराठे स्वतः: चक्क तिचे रक्षणकर्ते बनले?

सदर धाग्यावर पानीपत संदर्भातून मराठी साम्राज्यावर चर्चा अपेक्षित आहे. इथल्या अनेक जाणकारांकडून मला त्यांची मते जाणून घ्यायला आवडतील. मी देखील माझी मते वेळोवेळी मांडीन.. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेन्या.... अपेक्षेने क्लिक केलं राव... या विषयावर तुझं नेहमीसारखं अभ्यासपूर्ण लिखाण वाचायला मिळेल म्हणून...

पेशवे काळात नेमके असे काय बदलले की पातशाही नामशेष करायची सोडून मराठे स्वतः: चक्क तिचे रक्षणकर्ते बनले?

>>>

माझ्या माहीती प्रमाणे ह्याला कारण बाळाजी विश्वनाथांनी केलेला अहमदीया करार ...ह्या करारा नुसार मराठ्यांनी दिल्लीच्या मोगलाईचे रक्षण करावे लागणार होते (अन त्या बदल्यात मराठ्यांना चौथाईचे अधिकार मिळाले म्हणे)

असेही ऐकुन आहे की थोरल्या शाहु महाराजांनी , औरंगजेब मेल्यावर त्याच्या पोराला , गाईची शेपुट हातात धरुन (प्रतिकात्मक =देवाला साक्षी मानुन)वचन दिले होते "की मोगलाई नष्ट करणार नाही "
(अर्थात ही ऐकीव माहीती ...मला वाट्त नाही की नातु इतक्या लवकर आपल्या आजोबांचे मिशन विसरेल :))

नक्कीच... Happy

पानिपतच्या संदर्भात आधी ३०-४० वर्षात झालेल्या चुका मराठ्यांना बऱ्याच महागात पडल्या. ह्या शेजवलकरांच्या मताशी मी सहमत झालोय. विश्वास पाटील यांची कादंबरी वाचताना आपल्याला मराठे किती प्रतिकूल परीस्थित्त लढले याचा अभिमान वाटतो पण ती परिस्थिती का ओढवली हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल...

मी थोडे सुरवातीपासून सुरू करतोय.

शिवछत्रपतींचा अकाली मृत्यू (१६८०), छत्रपती शंभूराजांची झालेली निघृण हत्या (१६८९) आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली मृत्यूनंतरही (१७००) मराठे लढत राहिले. शक्य तिथे नेतृत्वाखाली शक्य नसेल तेथे जसे जमेल तसे. हा लढा १-२ वर्षे सुरू नव्हता. तब्बल २७ वर्षे हा लढा महाराष्ट्राच्या भूमीत सुरू होता. अपरिमित हानी होऊन देखील औरंगजेब हरत नव्हता आणि मराठे त्याला अपुऱ्या साधन सामुग्रीमुळे हरवू शकत नव्हते. बादशाहा त्याची पहिली राजकीय खेळी खेळला. त्याने मात्तबर मराठा सरदारांना वतने आणि इतर लालूच देण्यास सुरवात केली होती. मुख्य सरदार-सुभेदार फुटून आपल्याकडे आले की संपली मराठेशाही असे त्याचे साधे गणित होते.

ह्याच दरम्यान राजाराम महाराजांनी देखील मराठा सरदारांना वतने देण्यास सुरवात केली. ज्या वतनदारी पद्धतीवर शिवाजी महाराजांनी अंकुश आणला होता ती पद्धत पुन्हा एकदा त्यांच्या मृत्युनंतर अवघ्या १५-१६ वर्षात त्यांच्या मुलाने सुरू केली होती. कदाचित हा परिस्थितीजन्य निर्णय असेल. नव्हे आहे. पण पुढे ह्याचेच परिणाम मराठेशाहीला भोगावे लागले. राजारामाच्या काळात सुरू केलेली ही पद्धत खरेतर १७०७ नंतर स्थिरता आल्यावर बंद करून शिवरायांच्या काळात असलेल्या केंद्रप्रणीत व्यवस्थेत सहज बदलता आली असती पण तेंव्हा मराठे कोणा शत्रूशी नव्हे तर आपापसात लढत बसले होते. सातारा आणि कोल्हापूर अश्या २ गाद्या निर्माण झाल्या होत्या.

जवळ-जवळ १८ वर्षे (1689 - 1707) शाहू औरंगजेबाच्या कैदेत होता. आता तो पूर्णपणे ऐशोआरामी झाला होता. औरंगजेबाने त्याची चांगली बडदास्त ठेवली होती. त्याची लग्नेही लावली होती. कुठल्याच गोष्टीची त्याला कमतरता भासू दिली नव्हती. स्वतःच्या मुलाप्रमाणे तो शाहुला जपत होता. कारण.... कारण एकच होते. शाहू त्याचा हुकमी एक्का होता. आपण मराठ्यांना कधीही हरवू शकणार नाही पण फुट नक्की पडू शकतो हे त्याला त्याच्या शेवटच्या दिवसात समजले होते. बादशाहा मरता-मरता आपली सर्वात महत्वाची राजकीय खेळी खेळून अखेर अल्लाला प्यारा झाला होता. कैदेत असलेल्या शंभूपुत्र शाहूला त्याने मराठ्यांचा छत्रपती म्हणून मोकळे सोडले होते. पण मरण्याआधी त्याने 'तू कधीही मुघलशाही नष्ट करू नकोस' असे वचनही घेतले होते आणि तसे वचन शाहूने देखील औरंगजेबाला दिले. अर्थात इथेच मराठ्यांची इति कर्तव्यता बदलली. खरेतर शाहूला त्याकाळी महत्व नसते आले तर ताराबाई आणि इतर प्रमुख मराठा सरदारांनी मुघलांविरुद्ध आपला लढा अधिक प्रखर केला असता. पण बाळाजी विश्वनाथ याने आधी धनाजी जाधव आणि मग कान्होजी आंग्रे यांस शाहुच्या बाजूने वळवून ताराबाईचे महत्व कमी करून टाकले. त्यात तिच्या हातून कोल्हापूरची सत्ता जाऊन संभाजी दुसरा (राजाराम-राजसबाईचा मुलगा) याच्या हातात आली. शाहूने बाळाजीस आपला पेशवा बनवले आणि पेशवेशाही सुरू झाली.

क्रमशः...

पण बाळाजी विश्वनाथ याने आधी धनाजी जाधव आणि मग कान्होजी आंग्रे यांस शाहुच्या बाजूने वळवून ताराबाईचे महत्व कमी करून टाकले >>>> हे खर आहे, छत्रपतींचे स्त्रियांबाबतचे धोरण - म्हणजे संभाजी महाराज असतानाही शिक्केकट्यार येसुबाई राणीसरकारांच्या ताब्यात देणे हे अतिशय पुढारलेले विचार आणि धोरण, शाहू महाराजांपर्यंत न पोहोचण्याची सुध्दा महत्वाची राजकीय खेळी खेळली गेली होती.

जिथे छत्रपतींनी स्त्री- पुरुष समान हक्क, कायदा आदी धोरणे ठेवली आणि काही प्रमाणात राबवली सुध्दा होती --- ही विचारधारा खंडीत होणे हे सुद्धा पानीपताच्या पतनाचे मुळ होते.

आया...

मला समजले नाही तू असे का म्हणतो आहेस.. मी लिहिणार आहेच.. पण लेखनाची पोस्ट काढण्याऐवजी मला इतरांची (त्यात तू ही येतीच) मते ही जाणून घ्यायची आहेत म्हणून मी असा मतांचा धागा काढला आहे... माझे विचार मी जे लेखनात लिहिले असते ते मी लिहिणार आहेच.. Happy

सेनापती....

मुजरा सरकार. काय विषय काढला आहे. मागच्याच आठवड्यात आय्.बी.एन लोकमत वर त्यांच्या प्रतिनीधी चा कार्येक्रम बघीतला. त्यांनी पानिपता च्या युध्धा वर अप्रतिम कार्येक्रम केला. तिकडे जावुन. तिथल्या लोकांच्या मुलाखती घेवुन. तिकडे भाऊंचं एक स्मारक आहे. आणि हो स्थानीक भाषेत त्यांच्या कर्तुत्वाचा पोवाडा पण आहे. तो पिढ्यान पिढ्या गायला जातो. तो पण एका स्थानीकाने म्हंटला. त्यांनी स्पेशल इफेक्ट ने सुरेख माहिती दिली.

आता वरील लेखा संबंधी.....

तुम्ही म्हणता त्या प्रमाणे पेशव्यांनी दिल्लिचं तख्त राखण्या साठी केलेली उठाठेव फार महागात पडली. ह्याला कारण सातारा नरेश!!! त्यांचं ईमान कुठेतरी दिल्लीत गुंतलं होत. किंवा लहान पणी त्यांना जे जीवदान मिळालं त्याची परतफेड असेल. ( औरंगझेब शाहु आणि येसुबाईं ना कधीच मारुन टाकु शकत होता. त्याने तसं केलं नाही कारण राजकारण!!!). दुसरी गोष्ट म्हणजे दिल्ली ताब्यात राहिली तर सगळा हिंदुस्तान वचकात रहातो हा अनुभव मराठ्यांना होताच.

चुका कुठल्या झाल्या? माझ्या मते
१. भुगोलाचं आणि उत्तरेतल्या वेगळ्या निसर्गाचं ज्ञान कमी पडलं.
२. भाऊंचा अनुभव कमी पडला. तिकडे कोणी तरी सीनीयर हवा होता.
३. स्वतः नानासाहेब पेशव्यांना युध्ध तंत्राचा आणि प्रत्यक्ष युध्धाचा फार कमी अनुभव होता. त्यांच्या सुदैवाने ते फार सुब्बत्ते मध्ये जन्माला आले.
४. मराठ्यांनी बायका, अश्रीत, बाजरबुणगे, यात्रेला आलेले लोक, व्यापारी अशी अनेक लोकांची मोट एकत्र बांधली. त्या मुळे सेनेच्या रेशन पाण्यावर ताण आला.
५. अब्दाली ने २ वेळा माफिनामा पाठवला होता. तह करायच्या अर्ज्या पाठवल्या होत्या. पण त्यावर वकिलांचे एकमत झाले नाही.
६. उत्तरेतिल थंडी आणि पुर+पाणी ह्याची मुख्य लोकांना काहीच माहिती न्हवती. आपली येवढी फौज जाते आहे. त्या बरोबर भावी उत्तराधीकारी जात आहे ( विश्वासराव). पण त्याचे भान मोहीम आखणार्‍यांना दिसत नाही.
७. मराठे व्रुथा अभिमानाने लढायला गेले.
८. सरदारांचे नको तेवढे लाड नडले. ऐन वेळी होळकर शींदे नीट सहभागीच झाले नाहित. कारण त्यांना मुलुख तोडुन दिलेले होते. त्यामुळे त्यांना ह्या लढाईतुन काहिच कमीशन मिळणार न्हवते आणि वर श्रेय पण मिळणार न्हवते. जिंकले असते तर भाऊ सगळं क्रेडीट खावुन गेला असता. बरं मदत करण्याने त्यांची जहागीरी वाढली नसती आणि हरल्या मुळे ही त्यांच्या जहागीरीला काहीच फरक पडला नाही. लाख मेले तरी चालतिल, लाखांचा पोशींदा मरता कामा नये. ह्याचा सगळ्यांना विसर पडला. गादी पेक्षा सरदार मोठे झाले. कदाचीत त्यांना हा लढाच मान्य नसेल, कारण मग उत्तरेत त्यांच महत्व कमी झालं असतं.
९. महाराजांच्या वेळेला अनेक मंत्र्यांशी सल्ला मसलत करुन मोहीम आखली जायची. ईकडे सगळे निर्णय एककल्ली झाले.
१०. शेवटी... मराठ्यांचं भाग्य कमी पडलं. नशीब न्हवतं.

ह्या संदर्भात मागे वाचनात आलं होत.

प्रसिध्ध लेखक खुशवंत सींग ह्यांची खापर्-खापर आजी मराठी ब्राम्हण होती. पानिपताच्या संग्रामात आलेल्या यात्रेकरु कुटुंबातिल ती ७-८ वर्षांची छोटी मुलगी हरवली. ती एका शीख कुटुंबाला सापडली. त्यांनी तिचा सांभाळ स्वतःची मुलगी म्हणुनच केला. ती खुशवंत सींगांची आई कडुन खापर-खापर आजी.

ते गमती ने म्हणायचे की "ते मराठी जीन्स अजुनही माझ्यात असतिल कदाचीत, म्हणुन मला मोदक, पुरण्पोळी फार आवडतात."

त्यांच्याच एका लेखात हे संदर्भ सापडतात.

(संपादित)
मोहन की मीरा , बरेच मुद्दे चुकीचे आहेत

२. भाऊंचा अनुभव कमी पडला. तिकडे कोणी तरी सीनीयर हवा होता.
>>> पानिपताला निघायच्या जस्ट आधी भाउंनी सिंदखेडराजा येथे निजामाला चारीमुंड्याचीत केले होते ! तत्कालेन परिस्थीतीत एक नानासाहेब सोडले तर भाउंना कोणीच सीनीयर नव्हता .

३. स्वतः नानासाहेब पेशव्यांना युध्ध तंत्राचा आणि प्रत्यक्ष युध्धाचा फार कमी अनुभव होता. त्यांच्या सुदैवाने ते फार सुब्बत्ते मध्ये जन्माला आले.
>>> पटले नाही .
५. अब्दाली ने २ वेळा माफिनामा पाठवला होता. तह करायच्या अर्ज्या पाठवल्या होत्या. पण त्यावर वकिलांचे एकमत झाले नाही.
>>>> अब्दाली ...माफी ......तो लुटारुच होता माफी मागुन गप्प राहिला असता का ?

७. मराठे व्रुथा अभिमानाने लढायला गेले.
>>> हे पटले नाही ... ह जर वृथा अभिमान असेल तर तुम्ही " थोरले बाजीराव छत्रसाल राजाच्या मदतीला धावुन गेले " ह्याला ही वृथा अभिमान म्हणणार काय ?

८. सरदारांचे नको तेवढे लाड नडले. ऐन वेळी होळकर शींदे नीट सहभागीच झाले नाहित.
>>>> होळकर ऐनयुधातुन पळुन गेले मान्य ! पण शिंदेंना का बोल लावता ? शिंदे पहिल्यापासुन ( म्हणजे राणोजींपासुन ) शेवटपर्यंत ( म्हणजे महादजीं पर्यंत) छत्रपतिंना / पेशव्यांन्ना एकनिष्ठ राहिले .

१०. शेवटी... मराठ्यांचं भाग्य कमी पडलं. नशीब न्हवतं.
भाग्य नाही , व्हिजन कमी पडली ....नॉलेज कमी पडले .... दिल्ली काबिज केल्या केल्या यमुना नंतर गंगा ओलांडुन युपीत घुसुन रोहिल्यांन्ना ठोकायला हवे होते ...पण आमच्या कडे मोठ्ठया नद्या ओलांडायच्या कशा हे ज्ञानच नाही ... मग काय करणार ???

प्रसादजी...

प्रथमतः जेंव्हा एखादा माणुस आपले मत देतो तेंव्हा एक तर ते मत पटते किंवा नाही पटत. तेंव्हा तुम्हाला मत पटत नसेल तर तुमची मर्जी. पण माझ्या मतांना "जोक" म्हणु नये. मतांमध्ये अंतर असणारच. रीस्पेक्ट द थॉट्स ऑफ अदर पर्सन.

आता माझे मत तुमच्या प्रतिक्रियेवर
२. भाऊंचा अनुभव कमी पडला. तिकडे कोणी तरी सीनीयर हवा होता.
>>> हा जोक वगैरे आहे की काय ? पानिपताला निघायच्या जस्ट आधी भाउंनी सिंदखेडराजा येथे निजामाला चारीमुंड्याचीत केले होते ! तत्कालेन परिस्थीतीत एक नानासाहेब सोडले तर भाउंना कोणीच सीनीयर नव्हता .>>>>>>>>

का राघोभरारी म्हणुन नाव धारण केलेला माणुस होता ना तिथे? त्याला तर उत्तरे मधला चांगला अटके पर्यंतचा अनुभव होता. तो नाराज असला, तरी छत्रपतींना मध्यस्थी घालुन तो नक्की तयार झाला असता. त्याला का नाही पाठवला? राज्य राखण्या साठी येवढे राजकारण काही कठीण न्हवते. तो नक्कीच युध्द तंत्रात सीनीयर होता. उत्तरेच्या राज्कारणाची त्याची चांगली समज होती.

३. स्वतः नानासाहेब पेशव्यांना युध्ध तंत्राचा आणि प्रत्यक्ष युध्धाचा फार कमी अनुभव होता. त्यांच्या सुदैवाने ते फार सुब्बत्ते मध्ये जन्माला आले.
>>> हाही जोक .

सांगा बघु त्यांनी केवळ एकट्याने किंवा स्वतः पुढाकाराने केलेल्या लढाया? त्याच्या काळात म्हणजे त्याच्या पेशवाईच्या काळात फारच सुब्बत्ता होती. श्रीमंत हे नाव धारण करण्या येवढे वैभव जेवढे नानाने भोगले तेवढे कोणीच नाही.

५. अब्दाली ने २ वेळा माफिनामा पाठवला होता. तह करायच्या अर्ज्या पाठवल्या होत्या. पण त्यावर वकिलांचे एकमत झाले नाही.
>>>> अब्दाली ...माफी ...कैच्याकै ...तो लुटारुच होता माफी मागुन गप्प राहिला असता का ?

मी वरचा जो व्रुत्त वाहिनी वरचा कार्येक्रम म्हणते आहे, त्यातही ह्या तहाचा संदर्भ सांगीतला आहे. तो लुटारु होता. अगदी खरं म्हणुनच तो तह करायला पुढे येत होता. त्याचा कोअर बिजनेस काही वेगळा असल्याने, त्याला इकडची सत्ता, राजकारण इ.इ. मध्ये काहीच गम्य न्हवते. त्याने एक खडा टाकुन पाहिला. पण त्याला काही करुन नेस्तनाबुत करण्याच्या विचाराने मराठ्यांनी तो विचार धुडकावुन लावला.

७. मराठे व्रुथा अभिमानाने लढायला गेले.
>>> हे पटले नाही ... ह जर वृथा अभिमान असेल तर तुम्ही " थोरले बाजीराव छत्रसाल राजाच्या मदतीला धावुन गेले " ह्याला ही वृथा अभिमान म्हणणार काय ? >>>


हेच मी म्हणते तो पुर्व ग्रह. थोरल्या बाजीरावाच्या वेळेस, पेशवाई नुकतीच बहरु लागली होती. बाजीरावाचे पाणी काही निराळेच होते. बाजीरावानंतर पेशवाईला खरोखरच सोन्याचे दिवस आले. सगळे जरा सुस्तावले. तिकडेच एक प्रकारचा " आम्हाला सगळं येतं" हा भाव तयार झाला. त्यालाच मी व्रुथा अभिमान म्हंटले.

१०. शेवटी... मराठ्यांचं भाग्य कमी पडलं. नशीब न्हवतं.
भाग्य नाही , व्हिजन कमी पडली ....नॉलेज कमी पडले .... दिल्ली काबिज केल्या केल्या यमुना नंतर गंगा ओलांडुन युपीत घुसुन रोहिल्यांन्ना ठोकायला हवे होते ...पण आमच्या कडे मोठ्ठया नद्या ओलांडायच्या कशा हे ज्ञानच नाही ... मग काय करणार ???>>>>

ते तर मी म्हणालेच आहे. भौगोलीक ज्ञान फार कमी पडले. हेच मला सांगायचे आहे.. अनुभव कमी पडला. नशीब अशा साठी की दुपार पर्यंत सरशीत असणारे मराठे अचानक नेते पडले म्हंटल्यावर मॉरल कमी पडुन पळायला लागले. तिकडे जर कोणा सीनीयर ने सुत्र हातात घेतली असती जसे होळकर, वा शिंदे( त्यांनी घेतली ही असती. पण ते जायबंदी झाले), तर चित्र वेगळे झाले असते ( जसा तानाजी पडला तरी सुर्याजी आणि शेलारमामाने सुत्र हाती घेतली, आणि एक सुवर्ण पान लिहिलं गेलं).

दुपार पर्यंत आपल्या बाजुला असलेला कौल उलटा पडला. हे नशीब नाही तर काय!!! परत असं ही म्हंटलं जात की सदाशीवराव भाऊ जिवंत होते. पानिपताच्या आजुबाजुच्या गावात हा समज पुर्ण पणे प्रचलित आहे. की भाऊ नंतर जिवंत होते. एखाद्या साधु सारखे ते रहात. आर्थात हे काही मला पटलेले नाही. पण असो.

थोरले बाजीराव यांच्या काळात काही चुका झाल्या ज्यामुळे उत्तरेत मराठ्यांविरुद्ध एक मत बनत गेले होते. त्याचे भोग भाऊला भोगावे लागले. पुढे लिहिणार आहेच पण जरा कामात आहे. वरच्या मुद्द्यांवर येतो.. Happy

संपूर्ण पोवाडा इथे देईन मी. सध्या माझ्याकडे आहे.. अर्थासकट. यमुनेच्या काठी आजही सदाशिवगड म्हणून एक जागा आहे.

१. भुगोलाचं आणि उत्तरेतल्या वेगळ्या निसर्गाचं ज्ञान कमी पडलं.
>>> १७४० पासून मराठा मामलेदार दिल्ली आणि इतरस्त्र वास्तव्य करून होते. मला नाही वाटत उत्तरेतल्या वेगळ्या निसर्गाचं ज्ञान आपल्याकडे नव्हते असे. मुख्य चूक झाली ती योग्य वेळी नद्या ओलांडण्यात. आपण कशाला आलोय ह्याचे भान खुद्द भाऊला नव्हते असे दिसून येते. श्रावण महिना काय, अधिक महिना काय ह्यात धार्मिक विधी सुरू होते.

२. भाऊंचा अनुभव कमी पडला. तिकडे कोणी तरी सीनीयर हवा होता.
>>> प्रसाद... मला हा मुद्दा मान्य आहे. एक उदगीर सोडली तर भाऊकडे काय अनुभव होता? इतक्या जोरावर त्याला उत्तरेतली मोहीम सोपावी? पण त्याच्यापेक्षा सिनियर देखील कोणी नव्हता. नानासाहेब जाणे शक्य नव्हते आणि राघोबा 'अटक' फत्ते करून आल्यावर ८० लाखाचे कर्ज करून आला होता. त्याला परत पाठवण्यात काय हशील होता?

४. मराठ्यांनी बायका, अश्रीत, बाजरबुणगे, यात्रेला आलेले लोक, व्यापारी अशी अनेक लोकांची मोट एकत्र बांधली. त्या मुळे सेनेच्या रेशन पाण्यावर ताण आला.
हा तद्दन मूर्खपणा होता. ह्यावर शेजवलकरांनी एकच वाक्यात मराठ्यांची मराठ्यांची विभत्सना केली आहे... ते असे...
ज्यावेळी अबदालीसारखा नादिरशहाबरोबर हजार मैलांचा टापू तुडवलेला अफगाण शिवाजी, शिवाजीच्या पद्धतीने स्वाऱ्या चालवत होता, त्यावेळी शिवाजीचे मराठे मोगली पद्धतीने मोहिमा चालवू लागले होते.
--- त्र्यं. शं. शेजवलकर...

५. अब्दाली ने २ वेळा माफिनामा पाठवला होता. तह करायच्या अर्ज्या पाठवल्या होत्या. पण त्यावर वकिलांचे एकमत झाले नाही.
>>> माफीनामा की काय माहीत नाही पण तो लढाई न करता परत जायला तयार होता. त्यात काही अटी होत्या त्या दोन्ही पक्षांना मान्य नसल्याने अखेर लढाई झालीच. त्या अटी देखील लिहेन.

७. मराठे व्रुथा अभिमानाने लढायला गेले.
>>> थोडेफार तथ्य आहे. दिल्लीची पातशाही 'राखण्याचे' जे कार्य त्यांनी अंगावर घेतले होते ते पार पडण्यासाठी.. (ह्यातल्या 'राखण्याची' वर लक्ष्य केंद्रित करा.. पुढे त्याबाद्दल बोलूच.)

तर अब्दाली लढला ते कर्तव्य म्हणजे हिंदुस्तानातील इस्लामचे रक्षण करण्यासाठी. (गंमत म्हणजे मराठे त्याच इस्लामी पातशाहीचे रक्षण करत होते.)

८. सरदारांचे नको तेवढे लाड नडले. ऐन वेळी होळकर शींदे नीट सहभागीच झाले नाहित. कारण त्यांना मुलुख तोडुन दिलेले होते. त्यामुळे त्यांना ह्या लढाईतुन काहिच कमीशन मिळणार न्हवते आणि वर श्रेय पण मिळणार न्हवते. जिंकले असते तर भाऊ सगळं क्रेडीट खावुन गेला असता. बरं मदत करण्याने त्यांची जहागीरी वाढली नसती आणि हरल्या मुळे ही त्यांच्या जहागीरीला काहीच फरक पडला नाही. लाख मेले तरी चालतिल, लाखांचा पोशींदा मरता कामा नये. ह्याचा सगळ्यांना विसर पडला. गादी पेक्षा सरदार मोठे झाले. कदाचीत त्यांना हा लढाच मान्य नसेल, कारण मग उत्तरेत त्यांच महत्व कमी झालं असतं.

>>>> शिंदे - होळकर आणि गायकवाड - पवार यांच्याबद्दल थोडक्यात लिहिणे अशक्य आहे. नीट लिहेन नंतर. एकच सांगीन आत्ता मला होळकर यांच्याबद्दल बऱ्याच शंका आहेत. शिंदे मात्र आर्थिक आणि राजकीय या दोन्ही बाबतीत पेशव्यांबरोबर प्रामाणिक होते.

.. अजुन लिहेनच... Happy

सेनापती...

http://lokprabha.loksatta.com/23961/Lokprabha/10-02-2012?show=old#p=page...

परवाच हा लेख वाचला. वाचा गंमत येईल. ह्या वरुन एकच कळते...लिहु तसा इतिहास..... अनेक बखरी ह्या जेत्यांनी लिहिलेल्या आहेत. "आहे मनोहर तरी..." ह्या पुस्तकात सुनीता बाइ टोलस्टॉय ह्या लेखकाचा उल्लेख करतात. त्याने " वॉर अ‍ॅन्ड पीस" ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केलेली इतिहासाची व्याख्या वाचण्यासारखी आहे. तो म्हणतो
' इतिहास हा नेहेमी आणि बहुदा जेत्यांनी लिहिलेला असतो. लिहिणारे पगारी नोकर असत. त्यामुळे मालकाची वाहवा ओघाने आलीच. हरणारे काय एकदम कंडम असतात का? तर नाही. एखादे विघ्न येते, एखादा प्रसंग घडतो, एखादा रोग, एखादी घटना त्यांच्या परभवाला कारणीभुत ठरतात. त्याचा अर्थ असा न्हवे की जिंकणारा तो श्रेश्ठ आणि हरणारा अगदी कुचकामी. इथेच जिंकणार्‍याचं नशीब कामाला येत. कधी कधी हरणारा जिंकतो तर जिंकणारा एखाद्या शुल्लक चुकी मुळे हरुन जातो. खरा इतिहास कोणालाच कळत नाही. इतिहास हा नेहेमी "सांगीतला" जातो. तो कधीच अनुभवता येत नाही."

( अशा वेळी वाटतं ना की दगड बोलत असते तर? तुम्हाला तर गडांवर फिरताना अगदी जाणवत असेल ना!!!)

मी कालच वाचला तो लेख..:) तद्दन टुकार माहिती आहे त्यात.. Happy काहीपण लिहिले आहे.

खरय... भवतालचा भूगोल हाही इतिहास सांगत असतो.. Happy

बाजीरावाने शिंदे , होळकर, पवार, गायकवाड असे सरदार नव्याने तयार केले असतील पण त्यांना मुलुख तोडून देऊन स्वतंत्र बनवायला नको होते. बाजीरावाची ही खूप मोठी चूक होती. ज्याचे परिणाम पुढे १७५६ पासून भोगावे लागले. उत्तरेतल्या अफगाण, रोहिलेच नव्हे तर मारवाड आणि जोधपुर इथल्या राजांनी अब्दालीला पुन्हा दिल्लीवर चालून येण्यास सांगितले होते. कारण त्यांना मराठे म्हणजे उत्तरेत ब्याद हेच वाटत होते. जर मराठ्यांना दिल्लीचे तख सांभाळायची इतकीच गरज वाटत होती तर तिच्या रक्षणार्थ कायम स्वरूपी कधी फौज उभी करता आली असती. कोणी एक सेनानी तिथे नेमता आला असता. तसही बादशाह आणि वजीर मराठ्यांच्या हातचे खेळणे होता.

उत्तरेत शिंदे आणि होळकर या अराजकारणी लोकांनी स्वतःच्या जहांगिरीसाठी नको तिथे हल्ले करून हिंदू राजांचे शत्रुत्व ओढवून घेतले.

( अशा वेळी वाटतं ना की दगड बोलत असते तर? तुम्हाला तर गडांवर फिरताना अगदी जाणवत असेल ना!!!)

>>> अगदी अगदी !!

दिल्लीत लाल किल्ल्यात गेलो होतो तेव्हा अक्षरशः असच वाटलं होतं ...की ह्या दगडांन्ना बोलता येत असतं तर ....भाउंच्या समक्ष आपले लोक असे दिल्लीचे तख्त फोडत आहेत (दिल्लीतख्ताचा रुप्याचा पत्रा काढताहेत) ..अहाहा

.. भवतालचा भूगोल हाही इतिहास सांगत असतो.

>>> सेनापती, ह्यावरुन आठवले ...हे लोक नर्मदा कसे ओलांडुन गेले ...म्हणजे रस्ता ? अमरकंटक हुन Uhoh ...नर्मदाही बर्‍यापकी भव्य नदी आहे .

ज्यावेळी अबदालीसारखा नादिरशहाबरोबर हजार मैलांचा टापू तुडवलेला अफगाण शिवाजी, शिवाजीच्या पद्धतीने स्वाऱ्या चालवत होता, त्यावेळी शिवाजीचे मराठे मोगली पद्धतीने मोहिमा चालवू लागले होते.
--- त्र्यं. शं. शेजवलकर...>>>>

किती छान शालजोडीतला हाणला आहे. उगाचच लटांबरं घेवुन गेले. त्या मुळे जेंव्हा पळापळ झाली तेंव्हा अनेक वाटांनी लोक पळत सुटली. अनेक लोक उत्तरेत आणि आजुबाजुच्या प्रदेशांत कायमची राहिली. त्या काळी प्रवास सुलभ न्हवते. लुटमारीचे भय असे. त्या मुळे लोकांनी तिकडेच वास्तव्य केले.

अनेक मराठी नावे आपल्याला उत्तरेत सापडतात. मी विचार करत होते लिहु का नको. पण विषय निघाला आहे तर लिहीते.
माझ्या नवर्‍याचे घराणे पण त्या पैकीच. खरे आडनाव 'दिक्षीत" पण उत्तरेत राहिले. तिकडचे आडनाव धारण केले. हरिद्वारला आमचे घाट आहेत( ब्रीटीश राज होत तो पर्यंत त्याच भाडं मिळत असे). नंतर पोटापाण्या साठी कुटुंब दक्षिणेत गेलं. हैद्राबाद ला स्थायिक झालं. निजामा कडुन जहागीरी मिळाली. किताबत मिळाली. तरीही. मुळचे रुट्स काही सुटेनात. एक विचारी पुरुष होवुन गेले त्यांनी संस्क्रुतात खुप मोठी कामगीरी केली. अगदी देवत्वाला पोहोचले. ( त्यांच्या नावाचा पंथ आज कर्नाटकात अस्तित्वात आहे.) तरीही मराठी राजाने, आपले म्हणावे ही आस होती. पुण्याला येवुन पेशवे दरबारी सनद आणि जहागीरी रुजु केल्या. नाना फडणवीसाने मोठ्या मानाने कर्नाटक व कोकण येथे जहागीरी दिल्या. त्यातली कोकण एका भावाने घेतली आणि कर्नाटक दुसर्‍या भावाने. कोकणातल्यांचा माझा नवरा वंशज. बाकी सगळे नातेवाईक कर्नाटक नाहीतर हैद्राबाद येथे आहेत.

हे येवढं सांगायचा उद्देश म्हणजे त्या २५० वर्षां पुर्वीच्या घटने मुळे कळत नकळत आमच्या कुटुंबाच्या इतिहासावर, राहाणीमानावर, मालमत्तेवर परिणाम झाला आहे. त्या वेळची काही कागद पत्रे असावीत. कल्पना नाही.

मराठ्यांनी बायका, अश्रीत, बाजरबुणगे, यात्रेला आलेले लोक, व्यापारी अशी अनेक लोकांची मोट एकत्र बांधली. त्या मुळे सेनेच्या रेशन पाण्यावर ताण आला. >>>>>>> तसेच, ह्या काफिल्यातील स्त्रियांच्या रक्षणासाठी काही सैनीक तैनात ठेवावे लागत असतील.

ज्यावेळी अबदालीसारखा नादिरशहाबरोबर हजार मैलांचा टापू तुडवलेला अफगाण शिवाजी, शिवाजीच्या पद्धतीने स्वाऱ्या चालवत होता, त्यावेळी शिवाजीचे मराठे मोगली पद्धतीने मोहिमा चालवू लागले होते.
--- त्र्यं. शं. शेजवलकर...>>>>

अगदी, समर्पक शब्दात मराठ्यांच्या वर्तणूकीवर बोट ठेवले आहे.

प्रीती झिंटा हिचे 'रूट्स' सुद्धा मराठी आहेत असं तिनंच एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांचं मूळ आडनाव त्यावेळी झिंट्ये. पराभवानंतर उत्तरेच स्थायिक झालेल्या अनेक लोकांचे हे वंशज.

माझ्या ऑफिसमधे सुद्धा एक व्यक्ती आहे उत्तर प्रदेश चा, 'खरे' आडनावाचा.
आम्ही (मी आणि काही महाराष्टियन लोक) कधीतरी त्याला गमतिने म्हणत अस्तो 'अरे तु आमच्यातलाच आहेस, पानिपत च्या वेळी चुकुन तिकडे राहिलेला'.
पण खरच अस असेल अस वाटल नव्हत.

१. भुगोलाचं आणि उत्तरेतल्या वेगळ्या निसर्गाचं ज्ञान कमी पडलं.
>>> १७४० पासून मराठा मामलेदार दिल्ली आणि इतरस्त्र वास्तव्य करून होते. मला नाही वाटत उत्तरेतल्या वेगळ्या निसर्गाचं ज्ञान आपल्याकडे नव्हते असे. मुख्य चूक झाली ती योग्य वेळी नद्या ओलांडण्यात. आपण कशाला आलोय ह्याचे भान खुद्द भाऊला नव्हते असे दिसून येते. श्रावण महिना काय, अधिक महिना काय ह्यात धार्मिक विधी सुरू होते.

>>> २. भाऊंचा अनुभव कमी पडला. तिकडे कोणी तरी सीनीयर हवा होता.
>>> प्रसाद... मला हा मुद्दा मान्य आहे. एक उदगीर सोडली तर भाऊकडे काय अनुभव होता? इतक्या जोरावर त्याला उत्तरेतली मोहीम सोपावी? पण त्याच्यापेक्षा सिनियर देखील कोणी नव्हता. नानासाहेब जाणे शक्य नव्हते आणि राघोबा 'अटक' फत्ते करून आल्यावर ८० लाखाचे कर्ज करून आला होता. त्याला परत पाठवण्यात काय हशील होता?

४. मराठ्यांनी बायका, अश्रीत, बाजरबुणगे, यात्रेला आलेले लोक, व्यापारी अशी अनेक लोकांची मोट एकत्र बांधली. त्या मुळे सेनेच्या रेशन पाण्यावर ताण आला.
हा तद्दन मूर्खपणा होता. ह्यावर शेजवलकरांनी एकच वाक्यात मराठ्यांची मराठ्यांची विभत्सना केली आहे... ते असे...
ज्यावेळी अबदालीसारखा नादिरशहाबरोबर हजार मैलांचा टापू तुडवलेला अफगाण शिवाजी, शिवाजीच्या पद्धतीने स्वाऱ्या चालवत होता, त्यावेळी शिवाजीचे मराठे मोगली पद्धतीने मोहिमा चालवू लागले होते.
--- त्र्यं. शं. शेजवलकर...

सेनापती मला हे मान्य नाही. मी विश्वास पाटलांचे "पानीपत" हे बारकाईने २/३ वेळा वाचले आहे. भाऊंचे व दादासाहेबांचे परतूडला भांडण झाले. भाऊ फडावर काम करत असल्याने ते सर्व पैशा-पैशांचा हिशेब मागत असत, तसेच मोहिमेसाठी लागणारा खर्च परस्पर तिकडेच भागवावा असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्याऊलट राघोबा प्रत्येक मोहिमेनंतर पेशवाईवरील कर्जाचे ओझे वाढवीत असत. त्यामुळे सुरवातीच्या काही दिवसांतच भाऊंना समजले की मोहिम अजिबात सोपी नाही. त्यामुळे निघायच्या आधीपासून ते ऊत्तरेतल्या मामलातदारांना पैशांच्या तजवीजीसाठी सतत पत्रे पाठवीत. पण दुर्दैवाने गोविंदपंत बुंदेले सोडले तर बाकी मामलातदारांनी (बर्वे - जे पेशव्यांचे नातेवाइक होते, अंताजी माण्केश्वर वगैरेंनी) मदत केली नाही (पैसा, सैन्य, रसद ई.) भाऊंची स्वतःची बायका, अश्रीत, बाजरबुणगे, यात्रेला आलेले लोक, व्यापारी यांना बरोबर घेऊन जाण्याची अजीबात ईच्छा नव्हती. पण लोकरेट्यामूळे (त्यावेळी असलेल्या मराठी सैन्याच्या दबदब्यामूळे त्यांच्या छत्र-छायेखाली आपली काशी, कुरुक्शेत्र वगैरेंची यात्रा अनायसे होईल असे बर्‍याच मातबर सरदार स्त्रीयांचे आग्रहाचे मत होते व नानासाहेबसुध्धा धार्मिक असल्यामूळे ते लटांबर भाऊंवर लादले गेले.) फौजेबरोबर बरेच ज्योतीषी, शास्त्रीबुवा वगैरे मंडळी होती ते व मातबर स्त्रिया शुभ्-अशुभाचे स्तोम सर्व सैन्यात माजवून भाऊंच्या डिसीजन मेकींगवर लिमीटेशन आणायचे. तसेच लढणार्‍या सैनीकांपेक्षा खाणारी तोंडे जास्ती असा सर्व मामला होता.

५. अब्दाली ने २ वेळा माफिनामा पाठवला होता. तह करायच्या अर्ज्या पाठवल्या होत्या. पण त्यावर वकिलांचे एकमत झाले नाही.
>>> माफीनामा की काय माहीत नाही पण तो लढाई न करता परत जायला तयार होता. त्यात काही अटी होत्या त्या दोन्ही पक्षांना मान्य नसल्याने अखेर लढाई झालीच. त्या अटी देखील लिहेन.

७. मराठे व्रुथा अभिमानाने लढायला गेले.
>>> थोडेफार तथ्य आहे. दिल्लीची पातशाही 'राखण्याचे' जे कार्य त्यांनी अंगावर घेतले होते ते पार पडण्यासाठी.. (ह्यातल्या 'राखण्याची' वर लक्ष्य केंद्रित करा.. पुढे त्याबाद्दल बोलूच.)

तर अब्दाली लढला ते कर्तव्य म्हणजे हिंदुस्तानातील इस्लामचे रक्षण करण्यासाठी. (गंमत म्हणजे मराठे त्याच इस्लामी पातशाहीचे रक्षण करत होते.)

८. सरदारांचे नको तेवढे लाड नडले. ऐन वेळी होळकर शींदे नीट सहभागीच झाले नाहित. कारण त्यांना मुलुख तोडुन दिलेले होते. त्यामुळे त्यांना ह्या लढाईतुन काहिच कमीशन मिळणार न्हवते आणि वर श्रेय पण मिळणार न्हवते. जिंकले असते तर भाऊ सगळं क्रेडीट खावुन गेला असता. बरं मदत करण्याने त्यांची जहागीरी वाढली नसती आणि हरल्या मुळे ही त्यांच्या जहागीरीला काहीच फरक पडला नाही. लाख मेले तरी चालतिल, लाखांचा पोशींदा मरता कामा नये. ह्याचा सगळ्यांना विसर पडला. गादी पेक्षा सरदार मोठे झाले. कदाचीत त्यांना हा लढाच मान्य नसेल, कारण मग उत्तरेत त्यांच महत्व कमी झालं असतं.

>>>> शिंदे - होळकर आणि गायकवाड - पवार यांच्याबद्दल थोडक्यात लिहिणे अशक्य आहे. नीट लिहेन नंतर. एकच सांगीन आत्ता मला होळकर यांच्याबद्दल बऱ्याच शंका आहेत. शिंदे मात्र आर्थिक आणि राजकीय या दोन्ही बाबतीत पेशव्यांबरोबर प्रामाणिक होते.

प्रत्यक्ष युध्धाचे आधी कुठल्या पध्धतीने लढाई करायची याबद्द्ल म्हातारे, बुजुर्ग (मल्हारबाबा, विठ्ठलराव विंचुरकर, दमाजी गायकवाड वगैरे) व तरुण रक्ताची मंडळी (स्वतः भाऊ, विश्वासराव, जनकोजी शिंदे, ईब्राहिम गारदी इ.) यांमध्ये एकमत नव्हते. जुनी माणसांचे मत "थोरल्या महाराजांच्या (शिवाजी महाराज) वेळेपासून आमच्या बापजाद्यांनी गनीमी काव्यानी लढाया केल्या त्यामूळे आम्हीपण त्याच मार्गावरुन चालू" असे होते, तर यंग ब्रिगेडचे मत "गनीमी कावा सह्यादीच्या डोंगर्-रांगांमध्ये ठीक आहे, पण ऊत्तरेतल्या मोकळ्या मैदानांवर मुघल पध्धतीची गोलाची लढाईच योग्य" असे होते (व ते लॉजीकली बरोबर्ही होते कारण काळाच्या ओघात लढाई, शस्त्रे वगैरेंमध्ये बरेच बदल झाले होते. जसे तोफा, लांब पल्ल्याच्या बंदूका, जंबुरे, सुतरनाळा वगैरे. पारंपारिक तलवारीच्या लढाया मागे पडल्या होत्या.) खरे पहायला गेले तर साधारणपणे दुपारी ११:३०, १२:०० वाजेपर्यंत ईब्राहिमखानाच्या तोफखान्याने बरेच यश संपादन केले होते. १८००० रोहील्यांपैकी १२००० रोहीले खलास झाले होते. अब्दाली जवळजवळ पळून जायच्या तयारीत होता. पण गारदी-पारधी जर एवढे शौर्य गाजवतात तर आपणही काही मेल्या आईचे दूध प्यायलो नाही असा विचार करुन (कुठ्ल्याही परीस्थीतीत गोल मोडायचा नाही असे ठरलेले असतानासुध्धा) विठ्ठलराव विंचुरकर व दमाजी गायकवाड यांनी गोल मोडून आपले सैन्य लढाइमध्ये घुसवले. ईब्राहिमखान व त्याचा भाऊ गोल मोडू नका अशी कळकळीची विनंती करत असतानासुध्धा मराठे तोफखाना व गिलचे यामध्ये घुसले, त्यामूळे आपल्याच लोकांवर तोफा डागायला नको या विचाराने तोफखाना थंडावला. त्यामूळे पळणारे रोहिले ऊलट फिरुन आक्रमण करु लागले. तसेच साधारण त्याचवेळी विश्वासराव तोफगोळा लागून जागीच गतप्राण झाले. या दोन घटनांमूळे लढाईचे पारडेच पालटून गेले. तसेच खोटी आवई ऊठल्याने (भाऊ व विश्वासराव दोघेही ठार झाले अशी) ऊजवीकडून शिंदे व होळकरांच्या फौजा दिल्लीच्या दिशेने पळत सुटल्या व आयत्या नजीबाच्या तावडीत सापडल्या.

प्रसाद...
.हे लोक नर्मदा कसे ओलांडुन गेले ...म्हणजे रस्ता ? अमरकंटक हुन
>>> मला विशिष्ट जागा माहीत नाही पण जिथे नदीला पाणी कमी असेल किंवा उतार असेल तिथून गेले असतील. रस्त्याची गरज नसते. होड्यांचे पूल बांधले जायचे तेंव्हा आणि मग नदी पार झाली की काढून घेतले जायचे. अगदी हत्ती, बैल आणि घोडे सुद्धा त्यावरून नेता येतील असे मजबूत पूल बनवले जायचे.. Happy

अतुलनीय.. तुम्हाला नेमके काय मान्य नाही? कारण माझे मुद्दे १,२,४ याला 'मान्य नाही' असे म्हणून त्याला पूरक अशी प्रतिक्रिया तुम्ही दिली आहे.. Happy

आणि लढाईमध्ये नेमके काय झाले, काय चुकले ते मला ठावूक आहे. खरेतर तो ह्या धाग्याचा उद्देश नाही. पानीपत का घडले ह्यावर काही मते दिल्यास अधिक छान वाटेल. कारण तो या धाग्याचा मुख्य भाग आहे..

फौजेबरोबर बरेच ज्योतीषी, शास्त्रीबुवा वगैरे मंडळी होती ते व मातबर स्त्रिया शुभ्-अशुभाचे स्तोम सर्व सैन्यात माजवून भाऊंच्या डिसीजन मेकींगवर लिमीटेशन आणायचे.

मला पण ह्यातून एक मुद्दा मांडायचं तो म्हणजे - भाऊ एक हाती कधीही निर्णय घेऊ शकत नव्हतातो कुठल्याही बाबतीत पुण्याला नाना नाहीतर उत्तरेत गोविंद पंत यांच्याकडे विचारपूस करायचा.

महिना-महिना फौज एका जागी बसून. शिपाईगडी १ तर त्याच्यामागे बुणगे ४ असा मामला होता. कर्ज काढून युद्धे केली जात नसतात हा साधा नियम आहे. तरीही जर पत्रे वाचली तर आपण काय थोर असाच रुबाब मराठ्यांचा... अवस्था अशी होती की दिल्लीला रुप्याचा पत्रा काढला नसता तर खुद्द मराठ्यांना उरली-सुरली दिल्ली लुटावी लागली असती.

वृथा अभिमान नक्कीच नडलाय मराठ्यांना इथे..

रच्याकने.. १७६० भानगडी किंवा १७६० उठाठेवी ही म्हण पानीपत संदर्भातून तयार झाली आहे का? Happy

मस्त धागा... चांगली माहिती आणि चर्चा...... +१

अशीच चर्चा चालू ठेवा.
केदार वगैरेंनीही इथे लिहावे. एकमत होणार नाही, पण विविध माहिती मिळेल.

मला इतिहासाची फारशी माहिती नाही पण मराठे पानिपतच्या भानगडीत पडलेच का? हा प्रश्न सतावतो.

पण मराठे पानिपतच्या भानगडीत पडलेच का?
माझ्या मते, शाहू महाराजांनी वचन दिले म्हणून दिल्लीचे रक्षण करणे हे मराठ्यांचे कर्तव्य बनले.
शाहू ने वचन दिले त्याला प्रासंगिक कारणे असतील, जसे पैशाची मदत, ताराबाई शी लढताना मोंगलांनी मधे मधे येऊ नये वगैरे.
अर्थात नंतर जेंव्हा बाजीराव महापराक्रमी झाले तेंव्हा हळू हळू शाहूच्या करारत काही 'सुधारणा' करता आल्या असत्या. पण 'प्रान जाउ पर वचन न जाउ' अश्या संस्कृतीतले लोक आपण.
बाकी बाजारबुणग्यांना घेऊन जायचे, धर्माचे स्तोम हा तद्दन मूर्खपणा! असे करून लढाया करता येत नाहीत.
खुद्द बाजीराव म्हणाले होते, कसली पवित्र गंगा नि यमुना, आमचे घोडे लीद टाकतात तिथे!!
धर्म नि लढाइ यातले कुठे काय ठेवायचे याचा पाचपोच राहिला नाही. या उलट अब्दाली सुन्नी पण अयोध्येचा निजाम शिया हे एकत्र झाले! त्यांना तिथे धर्म आडवा आला नाही!!

सेनापती - मला तुझे १ व २ क्र.चे मुद्दे पट्ले नाहीत.
>>>> १. आपण कशाला आलोय ह्याचे भान खुद्द भाऊला नव्हते असे दिसून येते. श्रावण महिना काय, अधिक महिना काय ह्यात धार्मिक विधी सुरू होते. >>>>>

>>> २. भाऊंचा अनुभव कमी पडला. तिकडे कोणी तरी सीनीयर हवा होता.
>>>

भाऊंचे व दादासाहेबांचे परतूडला भांडण झाले. भाऊ फडावर काम करत असल्याने ते सर्व पैशा-पैशांचा हिशेब मागत असत, तसेच मोहिमेसाठी लागणारा खर्च परस्पर तिकडेच भागवावा असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्याऊलट राघोबा प्रत्येक मोहिमेनंतर पेशवाईवरील कर्जाचे ओझे वाढवीत असत. त्यामुळे दादांनी भाऊंना ऊचकावले होते. त्यामूळे जाणून-बूजुन भाऊसाहेबांनी मी फक्त फडावरचा कारकुन नाही, मला लढाई सुध्धा करता येते कारण माझ्यात शुरवीर चिमाजीअप्पांचे रक्त आहे म्हणुन जायला तयारी दाखवली. एकतर दिल्लीवर दुष्ट नजिब्याची सत्ता होती तेथून त्याला हूसकवायचे होते व दत्ताजीसारख्या वीराच्या वीरमरणाचा बदला घ्यायचा होता. हे सर्व भाऊंना माहित होते. फक्त त्यांचे एक चुकले की त्यांना ऊत्तरेतील कमावीसदारांकडून हवी तशी रसद व पैसा याचा पुरवठा झाला नाही. तसेच ते पुण्यातूनही पैसा मागु शकत नव्हते, ते त्यांच्याच शब्दाच्या विरोधी झाले असते. उलट अब्दालीला नजीबाकडून रसदीचा ओघ सुरु होता (गंगा व यमुनेच्या मधील सुपीक अशा अंतर्वेदीमधुन). तसेच अयोध्येच्या नवाबाला (सुजाउद्दौला) आपल्या बाजुला वळ्वून घेण्यात अपयश आले.

>>>मला पण ह्यातून एक मुद्दा मांडायचं तो म्हणजे - भाऊ एक हाती कधीही निर्णय घेऊ शकत नव्हतातो कुठल्याही बाबतीत पुण्याला नाना नाहीतर उत्तरेत गोविंद पंत यांच्याकडे विचारपूस करायचा. >>>
नाना तेव्हा पुण्यात नव्हता. नाना फौजेबरोबरच होता व त्यावेळी तसा तो लिंबु-टिंबुच होता. भाउ गोविंद पंतांकडे फक्त रसद, पैसा, दारुगोळा, नावांचा पूल बांधणे वगैरेसाठी तगादा लावायचे. त्यांना विचारुन कुठलाही निर्णय घ्यायचे नाहीत. फारतर ते जेष्ठ म्हणुन मल्हारबांचा अथवा बळवंतराव मेहेंदळ्यांचा सल्ला घ्यायचे.

>>>> ज्यावेळी अबदालीसारखा नादिरशहाबरोबर हजार मैलांचा टापू तुडवलेला अफगाण शिवाजी, शिवाजीच्या पद्धतीने स्वाऱ्या चालवत होता, त्यावेळी शिवाजीचे मराठे मोगली पद्धतीने मोहिमा चालवू लागले होते.>>>>

प्रत्यक्ष युध्धाचे आधी कुठल्या पध्धतीने लढाई करायची याबद्द्ल म्हातारे, बुजुर्ग (मल्हारबाबा, विठ्ठलराव विंचुरकर, दमाजी गायकवाड वगैरे) व तरुण रक्ताची मंडळी (स्वतः भाऊ, विश्वासराव, जनकोजी शिंदे, ईब्राहिम गारदी इ.) यांमध्ये एकमत नव्हते. जुनी माणसांचे मत "थोरल्या महाराजांच्या (शिवाजी महाराज) वेळेपासून आमच्या बापजाद्यांनी गनीमी काव्यानी लढाया केल्या त्यामूळे आम्हीपण त्याच मार्गावरुन चालू" असे होते, तर यंग ब्रिगेडचे मत "गनीमी कावा सह्यादीच्या डोंगर्-रांगांमध्ये ठीक आहे, पण ऊत्तरेतल्या मोकळ्या मैदानांवर मुघल पध्धतीची गोलाची लढाईच योग्य" असे होते (व ते लॉजीकली बरोबर्ही होते कारण काळाच्या ओघात लढाई, शस्त्रे वगैरेंमध्ये बरेच बदल झाले होते. जसे तोफा, लांब पल्ल्याच्या बंदूका, जंबुरे, सुतरनाळा वगैरे. पारंपारिक तलवारीच्या लढाया मागे पडल्या होत्या.)

चर्चते सहभाग घेईनच. पण

थमतः जेंव्हा एखादा माणुस आपले मत देतो तेंव्हा एक तर ते मत पटते किंवा नाही पटत. तेंव्हा तुम्हाला मत पटत नसेल तर तुमची मर्जी. पण माझ्या मतांना "जोक" म्हणु नये. मतांमध्ये अंतर असणारच. रीस्पेक्ट द थॉट्स ऑफ अदर पर्स >>. +1

चर्चा इतिहासावर आहे त्यामुळे जर खरेच माहिती नसेल तर इतरांचे ऐकावे. तसेच मुद्दा मांडताना पानिपत पुस्तकात हे लिहिले असे उत्तर असू नये. मुद्दा जर असेल तर पुष्ट्यर्थ काही साधने देता यावीत. Happy

सेनापती तू जो आधीचा कालखंड घेतला आहेत ताराराणी, शाहू, चौथाई इ इ सर्व मी पाच लेखात इथेच मायबोलीवर डिटेल मध्ये लिहिले आहे की ते का करावे लागले. शिवाजी महाराजांनी जरी वतन काढून टाकली तरी राजारामला मराठा मंडळ स्थापन करावे लागले. अन त्यामुळेच मराठेशाही धग धरून राहिली. एकक्छत्री अंमल असला असता तर राजाराम संपला की सगळे संपले असते. पण ह्या पद्धतीचे फायदे जसे होते तसे तोटेही. ( http://www.maayboli.com/node/2379 माझे जुने लेख. (रिक्षा नाही पण जुना कालखंड विचारात घेतला म्हणून)

एकेक मुद्दा घेऊन माझे मत देतो. पण ह्या धाग्याचे रुपांतर प्रश्न मधून काढून टाकावे असे वाटते.

पानिपतावर मराठे का हरले ह्याचे core कारण आपापसातले सुप्त हेवे दावे नि Ego हे आहे. बाकीची कारणे परिस्थितीजन्य आहेत. कुठलेही कारण घ्या त्याचे मूळ शेवटी ह्या एका गोष्टिशी जाऊन पोहोचते.

सेनापती बाजीरावांनी वतन पद्धतीवर जोर का दिला ह्याचे कारण त्यांच्या स्वार्‍या ज्या प्रकारच्या असत त्यात आहे.

झक्की अनुमोदन. Happy

केदार.. तुमचे सर्व लिखाण मी वाचले आहे.. Happy आणि म्हणूनच तुम्हाला मी इथे मत व्यक्त करण्यासाठी सांगितले. मान्य.. की संदर्भ - साधने देता आली पाहिजेत.

अतुलनीय... तुमच्या दोन्ही प्रतिसादांना मी प्रतिक्रिया देणार आहे पण थोड्या वेळानी... Happy जरा घाईत आहे.. तासाभरानी येतो.. Happy

अतुलनीय...
भाऊ हे फडावरील उत्तम कारभारी होते. संपूर्ण देशात त्यांचे नाव त्याबद्दल प्रसिद्ध होते असे म्हणतात. पण तरीही मराठ्यांवर कर्ज का वाढत गेले? एक उदगीर सोडून भाऊंना लढाईचा कुठला अनुभव होता ते पण सांगा. उदगीर देखील तिथेच दख्खनेमध्ये. कोणीच नाही मग भाऊ तुम्ही तरी जा. अशी गत दिसते इथे. मुळात आधी हे प्रकरण शिंदे-होळकर बघून घेतील असेच पेशव्यांच्या मनात होते असे दिसते पण दत्ताजी पडल्यावर परिस्थितीचे गांभीर्य कळले असावे.

दिल्लीवर दुष्ट नजिब्याची सत्ता होती तेथून त्याला हूसकवायचे होते व दत्ताजीसारख्या वीराच्या वीरमरणाचा बदला घ्यायचा होता.
>>> एवढ्याछ कारणासाठी भाऊ जायची गरज नव्हती असे वाटते.

३ महिन्यात दिल्लीला पोचायचे ठरले होते. लागले किती तुम्हीच मोजा. का ते आधीच्या पोस्टमध्ये लिहिले आहेच. धार्मिक विधी वगैरे.. बाजीरावाच्या काळानंतर मराठ्यांनी एक नव्याने केलेला मूर्खपणाचा नियम म्हणजे कुटुंब सोबत घेऊन जाणे. मग बाजार-बुणगे हे ओघाने आलेच. त्यामुळे किती पैसा आणि वेळ खर्च झाला.

तसेच ते पुण्यातूनही पैसा मागु शकत नव्हते, ते त्यांच्याच शब्दाच्या विरोधी झाले असते.
>>> पुण्याहून पैसे पाठवा असे पत्र आहे भौंचे नानांना.. काहीच उपाय उरला नाही म्हणून ते ही करून बघितले त्यांनी. बर रसद आणि पैसा नजीबला व्यवस्थित मिळत होते आणि मराठे मात्र उपसमारीवर. असे का? उत्तरेच्या आर्थिक नाड्या ह्यांनी तपासल्या नव्हत्या का? शिंदे - होळकर यांच्याकडे पैसा नव्हता? गेल्या १५-२० वर्षात जो घोळ उत्तरेत सर्वांनी घातला होता त्याचे भोग आहेत हे असे दिसते.

नाना पुण्यात नव्हते तर कुठे होते? बर असतील आजूबाजूला कुठेतरी. ते नेमके कुठे बसून पत्र वाचत होते त्याला महत्व नाही ते फौजेला काय मदत करीत होते ते महत्वाचे.

गनिमी कावा की गोलाची लढाई.. सुलतान ढवा की बेरीरगिरी.. एका लढाई मध्ये पण हे सर्व वापरून लढाया करता येतात. इथेही हेच दिसते की एकमत नव्हते आणि ऐकावे जनाचे करावे मनाचे असे निर्णय घेणे भाऊला शक्य नव्हते. ज्यावेळी नेता असे वागतो तिथे सरदार-सुभेदाराकडून काय अपेक्षा ठेवायची आणि का?

मराठ्यांनी हे युद्ध का

मराठ्यांनी हे युद्ध का लढले?

शाहू सुटून आला तेंव्हा युद्ध न करायचे ठरले. त्याबदल्यात मुगल बादशहाने चौथाईचे हक्क मराठ्यांना दिले. हक्क जरी दिले तरी चौथाई मराठ्यांना कधीच मिळाली नाही. हक्क दिल्यावर लगेच निजाम चालून आला व त्याचे पारिपत्य पहिल्या बाजीरावानं केले व परत हक्क आहेत असे बजावले. वसुली होत नसे हे जाहीरच. पण त्यामुळे जर हक्क असतील तर जबाबदारी पण येणार. म्हणून दिल्लीवर परकीय आक्रमण आले तर मराठे दिल्ली ताब्यात न घेता दिल्लीच्या मदतीला धावून येतील असे ठरले. तसेच काही कायमस्वरूपी सैन्य ही दिल्लीत होते. मी सरदाराचे नाव विसरलो. (र पासून चालू होते) तो कायम दिल्लीत असायचा.
नजीबाने वजीरीच्या खुन्नशीत जाऊन सगळ्यांची जिरवायला (मराठ्यांसह) अब्दालीस आमंत्रण दिले. अब्दालीने ते झिडकारून लावले. नजीब परत त्याच्याकडे गेला व त्याने दिल्ली ताब्यात देण्याचे मान्य केले व भारतावर आक्रमन करण्यास राजी केले. झाल्या तहा प्रमाणे मराठ्यांना हे युद्ध करणे भाग पडले.

पेशवाई व कलह.

पेशवे जरी अजूनही मोठे सरदार वा भारतावर (मराठे जिथे जिथे होते तिथे) हुकूमत गाजवणारे असले तरी घरात कलह होता. आणि पेढीत पैसा नव्हता. नाना लहान तर राघो भरारी त्याच्या मनाला येईल ते करत होता त्यामुळे त्याचा मोहिमात कर्ज जास्त होत असे. त्याच्या मोहिमा म्हणजे सेहवागच बॅटिंग होती. यॉर्करला सिक्स अन फुलटॉसला आउट! असाच एक फुलटॉस नजीबचा पडला. त्याला राघोबाने घेरले अन मारणार तितत्क्यात होळकरांना पुळका आला व त्यांनी राघोबाला नजीबला सोडावयास उद्युक्त केले. राघोबा जिथे जाईल तिथे नाटकशाळा / भडभुंजे इ इ सोबत असे. युद्ध करता करता मराठे देवदर्शन करत. मुहूर्तावरच युद्ध करू अशा अंधश्रद्धांना बळी पडत. पर्यायाने तो कट झाला.
सदाशिव, चिमाजीचा मुलगा फडावर पराक्रमी होता. त्याने मोहिमा तर केल्या पण तलवारबाजीच तो ना राघोबा होता ना चिमाजी आपा! पण तो एक अत्यंत हुशार, धुर्त, सक्षम नेतृत्व गुण असलेला नेता होता. त्यामुळे त्यालाच जाणे प्राप्त झाले. सोबत पेशवाईचा वंशज म्हणून विश्वास अन सेनानी म्हणून बाजीरावाचा पुत्र समशेर बहाद्दर.

उत्तरेतील पार्श्वभूमी, राजकारण :

उत्तरेत अनेक युद्ध सारखी होत असतं. त्यामुळे जनता त्रासली होती. जनतेला ना भाऊ कडून उभे राहायचे होते ना अब्दाली कडून. जो सारा वा चौथाई येई ती होळकर, शिंदे, गायकवाड हे पेशव्यांचे सरदार (शाहूचे नाही) आपसात वाटून घेत. ह्या सरदारांमध्ये एकवाक्यता आधी होती. पण ती एका घटने मुळे तुटली. उत्तरेच्या एका युद्धात राणोजी शिंदे एका युद्धात थोडा उशीरा आला, होळकरांचा मोठा मुलगा मात्र ह्यात मारला गेला. तेंव्हापासून राणोजी व मल्हारराव ह्यात वितूष्ट आले. मल्हाररावांना वाटले की राणोजीने मुद्दाम उशीर केला कारण मग होळकराचा वंश कमी होईल व राणोजीचा तसाच राहिल. इथे इगो क्लॅशची सुरूवात झाली.
पुढे मग काय झाले की राजपुतान्याच्या एका राजघराण्यात आपसात भेद निर्मान झाले. पैसे घेऊन राणोजीने पहिल्याची बाजू घेतली, तर आणखी पैसे दिल्यामुळे परत दुसर्‍याची बाजू घेतली. असे पैसे घेणे व बाजू पलटने सुरू झाले.
दुसरी गोष्ट अशी की शिंदे / होळकरांमध्ये आपसात स्पर्धा लागल्या कारणाने उत्तरेत ते धुमाकूळ घालू लागले. हिंदवी स्वराज्य वगैरे बाजूला पडले अन हे सरदार मोगलांपेक्षा भारी पडू लागले. एकवेळ मोगल परवडले पण मराठे नको असे उत्तरेतील जनतेला वाटू लागले कारण हे लोक घोड्यावर येत, पैसा दिला नाही की उभे पीक कापून खात. कारन शाहू / पेशव्याने असा नियम केला की स्वारीने पैसा स्वारीतूनच उभा करावा व आपली गरज भागवावी. पर्यायाने मग ही लुटालुट सुरू झाली. ह्यामुळे झाले काय की मराठ्यांबद्दलचा विश्वास राजपुतांमधून कमी झाला. त्यांना ते लुटारू संबोधू लागले. वर दिलेल्या राजपुताना युद्धासारखे तीन चार युद्धा झाले ज्यात मराठे जिकडे पैसा तिकडे जात. म्हणून जेंव्हा अब्दाली आला तेंव्हा ही ब्याद परस्पर कटली तर बरी असा विचार उत्तरेत सुरू झाला.

भाऊची स्वारी :
भाऊने मारे एका चांगल्या प्रोजेक्ट मॅनेजर प्रमाणे आधी पत्र वगैरे पाठवून पैशांची मागणी केली. पण भाऊला जुमानतो कोण? हुजूरातीची स्वारी त्यामुळे शिंदे होळकरांनी जेवढी मदत करायची तेवढी केली नाही. एक बुंदेले सोडले तर त्यांना कोणी जुमानेना. राजपुत तर आधीच होरपळले होते. मराठ्यांपासून त्यांना चार हात दुर राहायचे होते. तिथून शून्य मदत. मग राहिले दिल्लीकर. तर दिल्लीकर स्वतःच भिकारी होते. पण हुजूरात चालायची कशी? इब्राहिम खानाचा पगार द्यायचा कसा? अन हे बाजारबुनगे पोसायचे कसे? तर कापला मग चांदीचा पत्रा.
शिवाय स्वारीचा खर्च चालवायला बंदी खुद्द भाऊने राघोबाच्या काळात हुकूम काढला होता की स्वारीचा बोज खजिन्यावर नको, परस्पर करा. आपलाच हुकूम त्याला पाळवा लागला. तो नानाकडे कटकट तरी किती करणार?

भाऊचे युद्धतंत्रः
दिल्लीत युद्ध न करता भाऊने बागपत / पानिपत निवडले. तो पानिपताला येऊन नदीच्या योग्य बाजूला येऊन राहिला ह्यामुळे तो दुरदर्शी होता हे मानता येते. पण भाऊने पुण्यापासून दिल्लीस येण्यास मध्ये जो कालावधी घातला तो अक्षम्य आहे. स्वारी निघाली तर चारधाम करता येतील ही विचारसरणीच अयोग्य होती. बर काठावर येऊन बसल्यावर भाऊन जेंव्हा अब्दालीला पाण्याचा त्रास होत होता तेंव्हा स्वारी करायला पाहिजे, तर तो बसल जप करत की कधी एकदा पुण्यातून खजिना येतो. ही मोठी घोडचुक. सैन्य भावनेवर नाही तर पोटावर चालते हे भाऊ विसरला. सैन्याचे तेंव्हाचे खाण्यापिण्याच्या सामानाचे भाव बघितले तर आजही डोळे फिरतील. मग सैन्य कसे लढणार. भाऊची ही सर्वात मोठी हार होती.
गोलाची लढाई निवडली तरी गोलाची सवय मराठा लोकांना नव्हती. आपण सर्व भाले-बरची बहादुर. दुपारपर्यंत सरशी होती हे खरे असले तरी मराठा लोकांना धिर नव्हता. संयम सोडल्यामुळे आपली धूळधाण उडाली. विंचुरकरांचे उदाहरण वर अतुलनिय ह्यांनी दिलेच आहे.
मल्हाररावाने दुपारनंतर पळ काढला. त्यामुळे त्याची स्वतःची पिढी जरी वाचली तरी मराठा पिढी बर्बाद झाली. इतर सरदार पळत निघाले बाजारबुणग्यांनी घोळ घातला.

आपण हारलो.

माझ्या मते आपली हार भाऊ निघाला तेंव्हाच निश्चित होती.

वरचाच गोषवारा

१. आपण उत्तरेत धरसोडवृत्तीचे राजकारण खेळलो. त्यामुळे कोणीही मदत केली नाही.
२. मराठा म्हणून एकत्र येण्यापेक्षा होळकर / शिंदे / गायकवाड असे एकत्र आलो. हुजुरातीच्या फौजेची वाताहत झाली. होळकर पळून गेला. शिंद्यांनी लढत लढत माघार घेतली. इतर सरदार पळून गेले. हे सर्व पानिपतच्या आधी १० वर्षे सुरू झालेल्या इगो क्लॅश मुळे झाले.
३. पैश्याची नियोजन झाले नाही.
४. आपल्या सरदारांवर पेशव्यांचे नियंत्रण नव्हते.
५. कुशल युद्धतंत्रात आपण निपून नसलो तरी आपल्याकडे विजीगिषू वृत्ती नव्हती.
६. भाऊचे डिसिजन मेकींग. दोन तीनदा अप्रत्यक्ष युद्धात व एकदा प्रत्यक्ष युद्धात बाजी फिरल्यावरही भाऊला मराठ्यांना सावरता आले नाही.
७. युद्ध न करणार्‍यांची संख्याही युद्ध करणार्‍यांपेक्षा जास्त होती!

आपण हे युद्ध जिंकलो असतो का?

१. जर भाऊ पुण्याहून थेट दिल्लीस पोचता
२. भाऊ कडे स्वारी चालू ठेवण्यास पैसा असता
३. बाजारबुणगे कमी असते

तर आपण हे युद्ध जिंकलो असतो. विचित्र परिस्थितीतही भाऊने हे युद्ध दुपारपर्यंत जिंकले होते. जर वरील तिन्ही गोष्टी एकत्र त्याकडे असत्या तर तो नक्कीच जिंकला असता. त्यामुळे मला वाटते की तो व्हिजनरी, डिसिप्लिन्ड नेता होता पण कधी कधी डिसीजन मेकींग मध्ये गडबड होती.

अवातंर :
१. भाऊ नंतरही जिंवत होता ही अफवा होती. पेशवाईत अनेकदा असे बनावट भाऊ आले होते पण निदानानंतर ते खोटे ठरले.
२. समशेरबहादरही निसटला पण पुण्याकडे यायच्या वाटेत तो मरण पावला.
३. पुढे नाना फडणविस व महादजी शिंद्यात वितुष्ट आले. महादजीला वाटे की नाना तो पुण्यात आल्यावर अटक करेन. १२ वर्षानंतर तो पुण्यात आला. व आल्यावर काही महिन्यात मेला. नानाने अटक वगैरे केली नव्हती पण राजकारणामुळे शिंद्यास तसे वाटे.
४.पानिपतामुळे उत्तर गडबडली / उत्तरेतील राजकारण गडबडले. पळून आलेल्या उरल्या सुरल्या मराठा सैनिकांना जनतेने त्रास दिला. ह्यावरून मराठ्यांची पत दिसून येते. राजकारण संपले. ते पार पुढचे १०-१२ वर्षे. तो पर्यंत शिंदे / होळकरच राजे झाले.
५. पेशवाई खचली असे वाटतानाच केवळ दोन वर्षात १७६२ माधवरावाने कर्नाटक स्वारी काढली अन निझामाला हारवून परत तह केला. राघोबा व माधवरावात ह्या स्वारीत वितूष्ट आले अन पेशवाईत भगदाड पडण्यास प्रारंभ झाला. १७६४ मध्ये तो कुख्यात कर्नाटक २ तह झाला अन हैदर अली सुटला. ही अजून एक घोडचूक. पुढे हैदरचा मुलगा टिपू हा एक पाशवी राजा निर्माण झाला.

केदार स्टार केलेली पोस्ट आवडली .

अवांतर : रीस्पेक्ट द थॉट्स ऑफ अदर पर्सन. >>> +१
ओके.
वरील प्रतिसाद एडिट केला आहे .

( अतिअवांतर : यमुनेच्या काठी नजीब्या गोवध करतो ...वारंवार ताकीद देवुनही ऐकत नाही असे दिसल्यावर दस्तुरखुद्द पेशवे त्याचे पारिपत्य करयला निघाले होते...त्यांना होळकरांन्नी अडवले...( का तर म्हणे नजीब धर्मपुत्र ) तेव्हा पेशव्यांनी विचार केला असावा लेट्स रीस्पेक्ट द थॉट्स ऑफ अदर पर्सन. Biggrin नंतर मग हे पानिपत घडले .
जेव्हा इतिहासावर चर्चा होते तेव्हा फक्त आपलीच इन्टर्प्रिटेशन्स योग्य आहेत असे मानु नये अन दुसर्‍यंच्या इन्टरप्रिटेशन्सना पानिपत ह्या पुस्तका व्यतिरिक्त इतरही आधार असु शकतो ही शक्यता लक्षात घावी Happy
)

तरीही मराठ्यांवर कर्ज का वाढत गेले?
अहो कुठे खुट्ट वाजले की ब्राह्मणांना सहस्रभोजन नि वर दक्षिणा!! शिवाय राघोबदादांची अटकेपार स्वारी!!
अहो २००८ साली अमेरिकेत जे झाले तेच त्याच काळात पेशव्यांनी करून दाखवले - कर्जच कर्ज करून चैन करायची!!
बाजीरावाच्या काळानंतर मराठ्यांनी एक नव्याने केलेला मूर्खपणाचा नियम म्हणजे कुटुंब सोबत घेऊन जाणे.
प्रश्नच नाही, अहो पुनः मस्तानी आली तर?? म्हणजे हिंदू असलेल्या दहा बायका केल्या तरी चालेल पण एक मस्तानी नको!!
होळकर पळून गेला.
मी वाचले की, भाऊंनी होळकरांना सांगितले की बाजारबुणगे, स्त्रिया व भट भिक्षुक यांना घेऊन तुम्ही दिल्लीला न्या!!

नाना पुण्यात नव्हते तर कुठे होते? बर असतील आजूबाजूला कुठेतरी. ते नेमके कुठे बसून पत्र वाचत होते त्याला महत्व नाही ते फौजेला काय मदत करीत होते ते महत्वाचे.
>>> सेनापती अहो नाना पानिपतामध्येच होते. नाना म्हणजे बळवंतरावांच्या बहिणीचे सुपुत्र, तसेच तेव्हा छोटे अप्पा बळवंतही बरोबर होते. पुण्यात फडावर सखाराम बापु होते. ते भाऊंची बरिचशी पत्रे परस्पर राघोबा किंवा गोपिकाबाईंकडे द्यायचे. भाऊंवर नानासाहेबांचे पुत्रवत प्रेम होते तर गोपिकाबाईं त्यांचा कायम दु:स्वास करायच्या.

@केदार - जरतर पैकी अजून एक - जर भाऊंची पत्रे वेळेवर नानासाहेबांपर्यंत पोहोचली असती किंवा भोळ्या दादांना जर सखाराम बापुंनी व्यवस्थीत सल्ला दिला असता, तर स्वतः नानासाहेब किंवा राघोबा पुण्यातुन अधीक सैन्य व पैसा घेऊन भाऊंच्या मदतीस गेले असते व भारताचा इतिहास वेगळाच झाला असता. असो ते घडले नाही.

बरोबर आहे अतुलनिय. पत्र वेळेवर पोचले नाहीत हे बरोबर पण पत्र पोचल्यावर राघोबा निघायची तयारी करत होता व अब्दलीला मराठ्यांना आणखी कुमक मिळणार अशी हवा लागली ह्याची नोंद आहे. पण तसे झाले नाही.

गोडबोले अहो ते तुमच्यासाठी नाही लिहिले, इथे (म्हणजे मायबोलीवर) अनेक लोक आपली मते मांडतात व त्याला खोडल्यास बुद्धिच्या त्रिज्या, व्यास, काटक्या हे सर्व निघते आणि तुम्हास " मुर्ख" असा पदवीदान समारंभही होतो. त्यामुळे जर खरचे माहिती असले तर वाद घालावा, अन्यथा आपल्याला जे माहित नाही ते अ‍ॅक्सेप्ट करावे असे सुचवले.

होळकर पळून गेला.
मी वाचले की, भाऊंनी होळकरांना सांगितले की बाजारबुणगे, स्त्रिया व भट भिक्षुक यांना घेऊन तुम्ही दिल्लीला न्या! >>

होळकरांची बाजू गोलात मध्यभागी असणार्‍या बाजारबुणग्यांचे रक्षण करण्याची होती हे बरोबर असले तरी गोल मोडल्याबरोबर होळकरांनी आपल्या सरदारांसह गोल सोडून पळ काढला हे ही तेवढेच खरे आहे. गंगोबातात्या चंद्रचुड हा होळकरांचा कारभारी होता. त्याने पानपताबद्द्ल होळकरांना सहभागी झाले तरी दुरूनच असे आधीच भरविले होते कारण होळकर-शिंद्यांनी मिळून अब्दाली परत भारतात येण्या आधी एक करार केला होता. तसाच एक करार भाऊ पण करणार होता. भाऊला मात्र अब्दाली ठेचायचा होता तर अंतर्वेदीतील राजकारणासाठी होळकर- शिंद्यांना भाऊला जड होऊ द्यायचे नव्हते, अब्दाली ठेचला गेला असता तर मात्र पेशवा ह्या दोन्ही सरदारांना जड होणार होता आणि हे गंगोबने ओळखले होते आणि त्यामुळेच होळकर जरा उदासिनच होते असे मानण्यास वाव आहे. अर्थात होळकरांचे सैन्य आधीपासूनच अंतर्वेदीत होते. सारख्या सारख्या युद्ध चढाया ह्यामुळे थकलेले होते हे मान्य करावेच लागेल. होळकर असो वा शिंदे त्यांना उत्तरेतून सत्ता सोडायची नव्हती हे तितकेच खरे.

खरे तर मराठ्यांनी पातशाही रक्षणाचा अहदनामा २३ एप्रिल १७५२ रोजीच केला होता. त्यानंतरही १७५६ मद्धे अब्दाली चवथ्यांदा चालुन आला होता, मराठे दिल्लीच्या रक्षणासाठी तिकडे फिरकलेही नाहीत. एका अर्थाने तो करारभंग होता. पाचव्यांदा अब्दाली चालुन आल्यानंतर मात्र स्वत: भाउसाहेब पेशवा आणि स्वत: विश्वासरावांनी उत्तरेकडे मोहीम काढावी यामागे नेमके काय कारण होते? रघुनाथरावांना, ज्यांना अटकेच्या मोहिमेमुळे उत्तरेची व तिकडील राजकारणाची जाण होती त्यांना का पाठवले नाही? अटक मोहिमेत रघुनाथराव कोटभरचे कर्ज करुन आले म्हणुन त्यांना उत्तरेकडे पाठवायला नानासाहेब पेशवे तयार नव्हते असा निर्वाळा शेजवलकर देतात. पण ते खरे आहे काय?
आणि कोणाला उत्तरेच्या मोहिमेवर पाठवायचे याचा खल करुन भाउसाहेबांची नियुक्ती करत भाउ उत्तरेत पोहोचेपर्यंत तिकडे शिंदे-होळकर काय करत होते?
हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत आणि येथे या प्रश्नांची थोडक्यात उपलब्ध पुराव्यांनुसार उत्तरे तपासायची आहेत.
बुराडी घाटावर युद्धात दत्ताजी शिंदेंचा झालेला अपघाती म्रुत्यु हा एकार्थाने मराठेशाहीवर मोठा आघात होता. उत्तरेत जरी शिंदे-होळकरांमुळेच मराठी सत्ता फोफावली असली तरी कोनत्याही सरदाराला डोइजड होवु देवु नये म्हणुन त्यांना आपापसात भांडत ठेवण्याचे तंत्र पेशव्यांनी याही बाबतीत वापरले होते. प्रत्यक्षात शिंदे आणि होळकर यांच्यात वैमनस्य निर्माण होईल अशा घटना घडुनही (उदा. कुंभेरीचा वेढा आणि त्यात झालेला खंडेराव होळकरांचा म्रुत्यु अणि तरीही शिंदेंनी केलेला तह.) होळकर आणि शिंदे उत्तरेतील पेशव्यांचे राजकारण सांभाळण्यासाठी कसे का होईना एक राहिलेले दिसतात. खरे तर दत्ताजीच्या म्रुत्युमुळे शिंदेंची बाजु कमजोर झाली होती. जनकोजी तरुण आणि अनुनभवी व त्यात जखमी होता. तरीही मल्हारराव होळकरांनी सुरजमल जाटाचीही मदत घेत शिंद्यांसह १४ जानेवारी १७६० ते २८ फ़ेब्रुवारी १७६० या काळात गनीमी काव्याने वेगवेगळ्या पद्धतीने चढाया करत पार सिकंदराबाद ताब्यात घेत अब्दालीच्या नाकावर टिच्चुन चौथाई वसुल केली.
अब्दाली दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्यात उत्सुक नव्हता हे सर्वच इतिहासकारांनी नोंदवले आहेच. त्याला परत जायची घाई होती. त्याने शेवटी मल्हाररावांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. अनेक चर्चा होत तहही झाला. त्याचा इतिहास उपलब्ध आहे तो असा..."अब्दालीचा नजीबला असलेला पाठिंबा लक्षात घेऊन शिंदे - होळकरांनी हाफिज रहमतखानाच्या मार्फत तोड ठरवली कि, नजीबचा प्रदेश त्याच्याकडे कायम ठेऊन अब्दालीला अब्दालीस मार्गस्थ करावे. या बोलण्यात गंगोबातात्या ( होळकरांचा कारभारी ) व हिंगणे ( पेशव्यांचा दिल्लीतील वकील ) यांचा सहभाग होता. तहाच्या वाटाघाटी चालू होत्या तेव्हा शिंदे - होळकर भरतपूर येथे होते. सुरजमल्ल जाट देखील मध्यस्थी करू लागला होता. नजीबकडे असलेला प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायच्या अटीवर १३ मार्च सुमारास अब्दाली - मराठे यांच्यात तह घडून आला. पण उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर भाऊची नेमणूक झाल्याची बातमी येतांच नजीब घाबरला. अब्दाली छावणी उठवून निघालेला असताना, नजीबने त्यास येथेच रहाण्याची गळ घातली. परिणामी वरील करार फिसकटला. असे असले तरी मराठी सरदारांनी तहाची बोलणी सुरुचं ठेवली होती. १२ जून रोजी होळकर लिहितो, " गिलच्यांच्या फौजेतून हाफिज रहमतखान भरतपुरास आला. गंगाधरपंतांशी ( बहुतेक गंगोबा तात्या ) बोलत आहे. नजीबखानाने सलुखाचा संदर्भ चालविला आहे, पण आमचे विचारानुरूप बनत नाही. श्रीमंतही संनिध आले." ( मराठी रियासत - खंड ४ )"
पानिपत युद्धाचे नवीन भाष्यकार संजय क्षिरसागर यांनी जे वरील भाष्य केले आहे ते मननीय आहे. प्रा. मधुकर सलगरे यांनीही पानिपत युद्धाबाबतची जी साधने वापरली आहेत त्यातुनही वरील विचारांना व माहितीला प्रुष्टी मिळते.
आता १३ मार्च रोजी अब्दालीशी तह झाला आहे. या तहानुसार नजीबाला त्याचा प्रदेश तसाच मिळनार असुन दिल्लीची पातशाही व्यवस्था सुरजमल जाटाच्या इच्छेनुसार (म्हनजे अलीगौहर ऐवजी शहाआलमला पातशहा बनवणे) होणार आहे हे पक्के झाल्यानंतर अब्दालीला भारतात राहण्याचे कारण उरले नव्हते तसेच भाउलाही उत्तरेत मोहीम करण्याचे कारण उरले नव्हते. आणि अब्दाली परत जायला निघालाही होता.
पण कदाचित भाउला ही माहिती उशीरा मिळाली असावी कारण तो १४ मार्च १७६० लाच उत्तरेकडे निघालाही होता. स्वत: पेशवा एवढे मोठे सैन्य घेवुन उत्तरेकडे निघाला आहे हे समजताच नजीबाची भंबेरी उडने स्वाभाविक होते. रघुनाथराव पेशवा हा होळकरांच्या ऐकण्यातील होता, नजिबाचे प्राण त्यामुळेच वाचलेही होते. पण भाउ हा होळकरांचा द्वेष्टा असल्याने अब्दाली निघुन गेला तर आपली खैर नाही हे माहित असल्याने नजिबाने इस्लामची वाह-उलि-उल्लाहप्रणित दुहाई देत अब्दालीला थांबवुन ठेवले.
अनुभवी होळकरांना या स्थितीचा अंदाज आला होता हे पुढील घटनाक्रमावरुन स्पष्ट होते. होळकरांनी तरीही फिसकटलेला तह कायम करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भाउंना चंबळेपार येवू नका अशी गळ घातली. भाऊसाहेब चंबळेकाठीच थांबते तर कदाचित नजिबाला हायसे वाटुन अब्दालीला त्याने परत जायची संधी दिली असती.
पण पेशवाईतले राजकारण येथे लक्षात घ्यायला हवे. रघुनाथराव पेशवा आणि होळकर यांच्यात सख्य आहे आणि रघुनाथरावांची राज्यत्रुष्णा पहाता होळकरांच्या मदतीने ते उत्तरेत स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण करतील अशी भिती नानासाहेबांना सतत वाटत होती. भाउची उत्तरेसाठीची नियुक्ती त्याचाच परिपाक. त्यामुळे होळकरांचा कोनताही सल्ला भाउ ऐकणे शक्यच नव्हते आणि झालेही तसेच. पुर्ण पानिपत प्रकरणात भाउने होळकरांचा एकही सल्ला न ऐकता नव्यानेच सेवेत रुजु झालेल्या इब्राहिमखान गारद्याचाच भरवसा धरला. तरुण जनकोजीलाही विचारात घेतले नाही. इब्राहिमखान प्रस्तुत गोलाची लढाई एक प्रकारे हाराकिरी ठरली. कारण गोलाच्या मागील बाजुचे सैन्य युद्धात कामी आलेच नाही. ते यावे यासाठी जी युद्धाचा दुपारनंतरचा रांगरंग पाहुन योजना करायला हवी होती ती भाऊने केलीच नाही. त्यामुळे युद्ध झाले ते फक्त इब्राहिमखान गार्दी, हुजुरात, शिंदे-होळकर आणि सरदार विंचुरकरादी गोलाच्या पुर्व, दक्षीण आणि पस्चिम बाजुवर. उत्तर सुरक्षीत राहीली...आणि उत्तरेच्या बाजुचे नियुक्त सरदारच आणि सैन्य आधीच पळाले.
या युद्धाच्या तीन दिवस आधीपर्यंण्त (११ जानेवारी 1761) भाऊसाहेब पेशवा अब्दालीशी तहाच्या वाटाघाटी करत होता. सरहिंदेची सीमा आणि दिल्लीच्या पातशहाची नियुक्ती या मुद्द्यांबद्दल तह अडकुन बसला होता. युद्धखर्च हाही एक मुद्दा होताच. महत्वाची बाब अशी आहे कि मुळात होळकरांनी व शिंद्यांनी १३ मार्च १७६० रोजी अब्दालीशी जो तह आधीच केलेला होता त्यातील अटी जवळपास अशाच होत्या. त्या आधीच मान्य करत भाउने संशयी स्वभाव बाजुला ठेवला असता तर त्याला सुखनैव सर्व तीर्थयात्राही करता आल्या असत्या आणि हवे तर बंगालवरही स्वारी करता आली असती. पानिपत घडलेच नसते!
पण या १३ मार्च १७६० च्या आधीच झालेल्या तहाबाबत इतिहासकार मौन बाळगत असतात हेही खरे!

बकासुर आपले मत गुगली दिसते. ( http://sanjaysonawani.blogspot.in/2012/01/blog-post_24.html ) अगदी तीच भाषा व तोच प्रतिसाद. एकतर आपण कॉपी करता आहात किंवा आपण सोनवणी आहात. सोनवणी असाल तर आनंदच पण मत कॉपी पेस्ट नका करू.

त्या आधीच मान्य करत भाउने संशयी स्वभाव बाजुला ठेवला असता तर त्याला सुखनैव सर्व तीर्थयात्राही करता आल्या असत्या आणि हवे तर बंगालवरही स्वारी करता आली असती. पानिपत घडलेच नसते! >>>

सोनवणी जे संदर्भ घेऊन लिहितात ते अपूरे आहेत. भाऊ अन होळकर दुष्मणी / रधुनाथरावांची राज्य लालसा (१७६० आधी) हे तीर आहेत. लागले तर लागले वाले फक्त कयास. त्यात कुठेही पुरावा नाही! एकतर राघोबा १९६२ च्या निजाम युद्धा पर्यंत म्हणजे माधवराव-निजाम पेशव्यांशी एकनिष्ट होता. त्यामुळेच तो पानपतावर परत जायला निघाला हे कसे नाकारता येते.

मराठी रियासतीचे जे मत आहे त्यात पुढे असे कुठेही कयास नाही की राघोबा उत्तरेला शिंदे होळकरांसोबत राज्य स्थापन करू पाहत होता. हे काही नवीन इतिहास मांडतात. ते का ह्याचे कारण स्पष्ट आहे.

भाऊला तो तह नकोच होता हे तुमचे मत पटण्यासारखे नाही. होळकराचा माणूस जसा अब्दालीकडे जात होता तसेच अब्दालीचा माणूस होळकर अन भाऊ कडे येत होताच की. होळकर-नजीब सख्यामुळे बोलनीचा एक पदर भाऊने होळकरांमार्फत चालवला हे कसे नाकारता येईल. हवा तो पुरावा केवळ आपल्या हवा तसे वाकवता येत नाही. बोलणी खंडणीवरून फिस्कटली. बोलनी फिस्कटण्यात भाऊने जे पैसे मागतीले त्याचा दोष जसा भाऊला देता, तर नजीब ज्याला हे बोलणीच नको होती अन काही करून दिल्ली हाती घेऊन मराठा राजकारण मोडीत काडायचे होते हे आपण (अन सोनवणी) दुर्लक्ष करत आहात. उलट एकवेळ अशी होती की सुजा भाऊच्या राजकारणामुळे आपल्याला मिळणार होता. पानपत होण्यात जेवढा भाऊंचा हात आहे त्यापेक्षा जास्त नजीबचा आहे. हे एकतर नाकारायचे आहे वा होळकर / शिंदेंना परास्त करण्याची पेशव्यांची लालसा म्हणायचे अन लगेच राघोबाला तिकडे राज्यही स्थापन करता येईल का ते बघायचे हे पटत नाही.
राघोबा १७६० मध्ये मेला नाही. त्यानंतरही तो य वर्षे जिंवत होता. त्याचात धमक होतीच तो पानपतानंतर मोडलेल्या उत्तरेत जाऊन (पेशव्यांशी भांडून) सहज राज्य स्थापन करू शकला असता. त्यामुळे तो दावा फोल आहे.

तसेच तुम्ही जर योग्य ती कागदपत्र (कयास नाही, त्या लेखात कयास ९५ टक्के आहे.) दाखविले तर मी मत बदलेन. कारण ते माझ्यासाठीही शिक्षणच ठरेल.

अहो २००८ साली अमेरिकेत जे झाले तेच त्याच काळात पेशव्यांनी करून दाखवले - कर्जच कर्ज करून चैन करायची!!

अगदी अगदी झक्की.. Happy

अतुलनीय...
सेनापती अहो नाना पानिपतामध्येच होते. नाना म्हणजे बळवंतरावांच्या बहिणीचे सुपुत्र,
>>>> मी नानासाहेब ह्यांच्याबद्दल बोलत होतो. जरा गफलत झाली.

होळकर याने पळ काढला याबद्दल अनेकांना खेद वाटत असेल तरी स्वतः होळकर याला त्याबद्दल काहीच वाटले नाही हे नक्की.
याचे कारण त्याची लढाईची एक मानसिकता होती. आवश्यक तेंव्हा माघार घेण्यात त्याला कधीच कमीपणा वाटत नव्हता.

मला तरी अंततः: असाच निष्कर्ष काढावा लागलो की अंतर्गत हेवे डावे आणि दुही हेच आपल्या पराभवाचे खरे कारण होते. मराठ्यांकडे शौर्य कमी नव्हते पण उत्तरेतले राजकारण पेशव्यांना जमवता आले नाही. शिंदे-होळकर डोईजड झाले.

लढाई आणि चढाई करताना काही नियम नंतरच्या मराठा फौजांनी कधीही पळाले नाहीत जे शिवाजी राजांनी घालून दिले होते. ज्या फौजेला शिस्त नसते ते फारकाळ टिकाव धरू शकत नाही हे शाश्वत आहे...

राघोबा उत्तरेला शिंदे होळकरांसोबत राज्य स्थापन करू पाहत होता.
>>हे सपशेल चूक आहे. नानासाहेब गेल्यानंतर आपल्याला पेशवेपद मिळेल ही लालसा त्याला आली.

आणि तह झालाच असता तर भाउला तह हवाच होता.. राज्याची पश्चिम सरहिंद सिमा आणि दिल्लीवर ताबा हेच काय ते वादाचे मुद्दे होते.

राघोबा १७६० मध्ये मेला नाही. त्यानंतरही तो य वर्षे जिंवत होता. त्याचात धमक होतीच तो पानपतानंतर मोडलेल्या उत्तरेत जाऊन (पेशव्यांशी भांडून) सहज राज्य स्थापन करू शकला असता.

>>>> मला हा मुद्दा खूपच महत्वाचा वाटला पण तो पानीपत पश्चात लक्ष्यात घेण्याजोगा आहे.. Happy

अवांतरः उत्तरेतलं राजकारण अजुनही मराठ्यांना जमवतां आलेलं नाही! Proud

विषयांतराबद्दल क्षमस्व. सुंदर माहीती. आणि खुप छान चर्चा. टचवूड, दृष्ट लागायची माझीच!

होळकर याने पळ काढला याबद्दल अनेकांना खेद वाटत असेल तरी स्वतः होळकर याला त्याबद्दल काहीच वाटले नाही हे नक्की.

>>> ह्म्म ! विंचुरकरांन्ना मात्र " युध्दातुन का पळुन आलो तिथेच पावन का झालो नाही? " ही खंत आयुष्य भर होती ...असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते ....
( अवांतरः विश्रामबाग वाड्यातला प्रदर्शनात एका लेखावर असे वाचल्याचे स्मरते की हरुन परत येणार्‍या शिपायांन्ना कुंभार वेशीतुन खाली मान घालुन येवु लागु नये म्हणुन नानासहेब पेशव्यांनी लकडी पुल बांधला ( ३ दिवसात !!) ...हे खरे असावे का Uhoh ही कुंभारवेस कुठे होती आजच्या पुण्यात ? )

राघोबादादा , हे एक विचित्र क्यॅरॅक्टर आहे पेशवाईतले ( असे मला वाटते)... (पण असे घरी म्हणले की म्हणातात " He (Raghoba ) is classic case of great person who doesn't have his own vision and NANA fadanavis is classic case of not so great person having his own vision !! )

( अवांतर : नाना फडणवीस हे ही युध्दातुन पळुन आले होते ना Uhoh )

Pages