चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Saand Ki Aankh: ( सुपर्ब)

https://www.youtube.com/watch?v=-uA-ONin_5M&t=4s

हाउसफुल ४: ( अशी थीम पहिल्यान्दाच वाचली आहे. ब्लॉकबस्टर ठरेल.)

https://www.youtube.com/watch?v=gcHH34cEl3Y

मेड इन चायना ( हिन्दी): ( उत्कृष्ट)

https://www.youtube.com/watch?v=eA6PFnSHo-E

मरजावा: ( आउटडेटेड. रितेश देशमुखसाठी बघीन.)

https://www.youtube.com/watch?v=L7TbPUOn1hc

हो अंजली.
याच विषयावर उजडा चमन नावाचाही मूव्ही येतोय. तोही चांगला वाटतोय. कदाचित जास्तच. नवीन चेहेरे असल्यामुळे.
https://www.youtube.com/watch?v=ls7RHTnCuiY

प्र का टा आ.

आप्पा आणि बाप्पा मध्ये बाप्पा म्हणजे सुबोध भावे बालगंधर्व वाटतोय. ओ माय गॉड सारखी संकल्पना आहे पण गोष्ट पूर्ण वेगळी.

उजाडा चमन ही कन्नड movie vandu motte kathe chi
Copy aahe. >>>>>> मग ' बाला' ही उजडा चमनची कॉपी आहे का? Uhoh दोन्हीन्चे पोस्टर्स सेम आहेत.

Commando 3 चा ट्रेलर पाहिला. मला व मुलांना आवडला.
ज्यांना अॅक्शन सिनेमा आवडतो त्यांना आवडेल.

फक्त अब्दाली बरा जमलेला दिसतो. क्रिती सनॉन अति च मॉडर्न वाटतेय. अर्जुन कपूर काही केल्या "पेशवाई" नाही वाटत. ती पार्वतीबाई पण लढताना दाखवलीय. इतिहासात असे काही होते का?!

अर्जुन कपूर नाही तर दुसरा कोण सुटेबल होता हाही प्रश्न पडतो.

बाकी भन्साली फॅन्सना हा ट्रेलर अज्जिबात आवडलेला नाहीये हे सोशल मिडियावर कमेंट वाचून दिसतंय Biggrin त्यांच्या अभिरुचीला हा ट्रेलर बघून त्रासच होणार. हा अ‍ॅकच्युअल वॉर मुव्ही आहे. माझ्या नवर्‍याची बायको/बायकोचा नवरा टाईप भन्साली ब्रँडचा ऐतिहासिक बेडरुम ड्रामा+ आयटेम नंबर्स नाही.

Pages