चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशी ही आशिकी चा डायरेक्टर सचिन आहे. चांगला असू शकतो चित्रपट. >>>>> अरे देवा. नशिब ट्रेलरवर निभवलं. वाचलो....

उरी चा ट्रेलर दिसला,
अतिशय वाचाळ , भावनात्मक आणि B ग्रेड चा चित्रपट वाटला.
Actual strike च्या आधी बराच इमोशनल मसाला असावा असा अंदाज आहे.

स्पायडरमॅन फार फ्रॉम होमचा ट्रेलर रिलीज झालाय!
भारी एकदम!
स्पायडरमॅनची आयकॉनिक थीम ऐकून तर एकदमच नॉस्टॅल्जिक वाटलं

@मध्यलोक>>>>
बघितला. अ आणि अ वाटला. काहीबाही डायलॉग भरलेत!

'मीपण सचिन'
चा ट्रेलर, यु ट्यूबवर आहे,
काय स्टोरी आहे ?

टोटल धमाल अगदी ९० च्या दशकातला वाटतो. भयाण कास्ट.
माधुरि, अनिल कपूर रोमान्स नो नो. म्हतारे..

म्हातार्‍या थोबाड सुजलेल्या खानांना बघायला जातातच ना लोक ? तसेच म्हातार्‍या माधुरिला बघायला ही जातील.
मी असं ऐकलंय की "एक लड्की को देखा तो ... " माधुरिला ऑफर झाला होता. आईची भूमिका नको म्हणून नाकारला म्हणे तिने.
थोड्क्यात म्हणजे आजपर्यंत केलेलीच गोष्ट रिपिट केलिये तिने. जास्तित जास्त बकवास सिनेमे करणे.

Pages