Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थोडं मितवा सुन मितवा सारखं
थोडं मितवा सुन मितवा सारखं वाटतं मर्द मराठा साँग.
<<गोवारीकरने तीन चतुर्थांश सिनेमा जरी युद्ध आणि त्याच्या परिस्थितीला डिवोट केला तर मला वाटते हा एक 'मस्ट बट हार्ड टू वॉच' सिनेमा होऊ शकेल. >>
मुळात मुव्ही खूप दीर्घ आहे त्यात युध्द एके युध्द बोअर नाही का होणार? खरोखर हार्ड टू वॉच होईल कारण युध्दाचा शेवट भयानक झाला आणि बरेचसे मेन कॅरेक्टर तर मारले जाणार. त्याऐवजी थोडा बॅलन्स ठेवता येईल - मराठा एम्पायर कसं वाढत गेलं (आज हम हिंदुस्थान के शासक बन गए है)..थोडा फोकस त्या यशाच्या फेजवर ठेवता येईल. माफक रोमान्स- सदाशिव-पार्वती, विश्वास-राधिका. युध्द संपल्यावर epilogue टाईप काहीतरी दाखवाव. १० वर्षांनी महादजी शिंदेंनी पुन्हा उत्तर भारतावर कबजा मिळवला होता वगैरे पार्ट.
Submitted by हायझेनबर्ग - एक.
Submitted by हायझेनबर्ग - एक... on 20 November, 2019 - 09:37 >>

करमणुकीचं लंगड समर्थन करण्याचा प्रश्नच नाही, चित्रपट पूर्ण बघण्याआधीच जी उतावळी विरोधी मतं
मांडतात ना त्याबद्दल मी मत मांडलं , आणि मी असही म्हणालो होतो ...
" चित्रपट हि फक्त कुणाची तरी कलाकृती आहे खरा इतिहास नाही "
प्रेक्षक एवढी पण बाळबोध नसतात हो कि चित्रपटात दाखवलेला इतिहासच खरा आहे अस मानतील
आणि चित्रपट करतात म्हणजे ते रिसर्च पण करतात ना स्टोरी साठी ? का आलं मनात म्हणून ऐतिहासिक चित्रपट बनवतात ते पण एव्हडी रिस्क घेऊन... असो मी तर सामान्य रसिक प्रेक्षक म्हणून चित्रपट बघणार इतिहासाचा अभ्यासक म्हणून नाही
हे बघाhttps://www.youtube.com
हे बघा
https://www.youtube.com/watch?v=r9VJpqoAr84
मला आवडला गुड न्युजचा ट्रेलर!
मला आवडला गुड न्युजचा ट्रेलर!
'एमसी थेटर' मधे आले तर पहाणार
'एमसी थेटर' मधे आले तर पहाणार पानिपत आणि तानाजी , देवगण असो नाहीतर अर्जुन. पण काये असल्या सिनेमात स्वराज्य, स्वाभिमान वगैरे पाहुन बरं वाटतं. व 'ए एम सी' मेम्बरशीप आहे त्याचा फायदा घेण्याची संधी नाय सोडणार
...
गुडन्युज ट्रेलरतरी वेगळा आहे. आशा आहे सिनेमा पण करमणुकप्रधान असेल. त्या हाऊसफुल४ मधे ('ए एम सी' च्या कृपेने तो ही पाहिला ) अक्षयकुमार जीव तोडुन प्रामाणिकपणे काम करतो पण आडातच नाहीतर पोहर्यात कुठुन येणार?
मला आवडला गुड न्युजचा ट्रेलर!
मला आवडला गुड न्युजचा ट्रेलर! >>> +१
करीना अक्षय च्या जोडीला कियारा दिलजीत टफ देत आहे.
करीना अक्षय च्या जोडीला
करीना अक्षय च्या जोडीला कियारा दिलजीत टफ देत आहे.
>>
हो
पण अक्षय कुमार असे होऊ नको याची काळजी घेतो.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=PImdhZWfUMc
काय ढिन्च्यॅक ढिन्च्यॅक नाचलेत पेशवा-पेशवीणबाई !

गाणं चांगलंय खर तर. पण बघायला
गाणं चांगलंय खर तर. पण बघायला काही च्या काही. पेशवीण बाई इतक्या थयथय नाचतायत तेही भरदरबारात
दोघांच्या वाटचं नाचतायत त्या.
दोघांच्या वाटचं नाचतायत त्या.
https://youtu.be/Ff5tOd2WHB0
https://youtu.be/Ff5tOd2WHB0
अबब.. ही बाई लई मोठ्ठी सुपरस्टार होणार.
मर्द मराठा गाण ऐकताना लगान
मर्द मराठा गाण ऐकताना लगान मधल्या एका गाण्याची आठवण झाली . >>> टोटली! नक्की लिन्क काय आहे माहीत नाही पण बार बार हां सारखे माझ्याही डोक्यात येत आहे
Submitted by फारएण्ड on 21 November, 2019 - 01:42
--- त्याचं काय आहे, की त्या घनन घनन गाण्यात कलाकारांचे, पक्षी नर्तकांचे, अनेक समूह लांब लांब उभे असतात आणि कॅमेरा एकेक समूहाकडे वळेल तसे तसे तो तो समूह आपापल्या वाटची ओळ गात कॅमेऱ्याकडे चालत येतो. हा प्रकार लगानमध्ये बघायला छान वाटला होता, पण इथे नाही.
गाणं चांगलंय खर तर. पण बघायला
गाणं चांगलंय खर तर. पण बघायला काही च्या काही. >>> मी म्युट करुन बघितलं, जाम कॉमेडी वाटलं. सिनेमॅटीक लिबर्टीखाली काहीही दाखवतात.
त्या गाण्यात अनेक गाण्यांच्या
त्या गाण्यात अनेक गाण्यांच्या चाली मिक्स आहेत , बोल हलके , यारा ( देखा नहि है तुझको कल से ) , सून मितवा- लगान वगैरे
काल पानिपतची टिम आली होती
काल पानिपतची टिम आली होती चहयेद्यामध्ये. आजसुद्दा असणार आहे.
>>> काय ढिन्च्यॅक ढिन्च्यॅक
>>> काय ढिन्च्यॅक ढिन्च्यॅक नाचलेत पेशवा-पेशवीणबाई ! Lol <<<
अरे देवा, थयथयाट आहे नुसता. क्रिती का कृती अजिबात सूट होत नाही असा वाटतो...
https://youtu.be/D7SzUEkXknU
त्या लग्नाच्या गाण्यात तर, पडदा बाजूला सरल्यावर एक मिनटं मला वाटलं की, आता बाजूचे मावळे वर उचलणार सदाशिवभाउला( अर्जुन कपूरला) आणि मग गळ्यात हार घालायची झटापट होइल क्रिती सनोनची.. इतक्या वेळ थोबाड पहात होते की, काहीतरी चावट इशारे करतील असंसुद्धा वाटले.
माझी आजी सांगत होती की, माझ्या आजोबांचाच चेहरा तिने लग्नात सुद्धा बघितला नाही नीट( काळः १९३५) आणि इथे काय अतरंगी होतं...
तान्हाजी का तानाजी पण आचरट
तान्हाजी का तानाजी पण आचरट दिसतोय.
काजोल तर भयाण अभिनय करणार असे दिसतेय.
सैफ अली खानने रणवीरचा पद्मावत बर्याच वेळा पाहून शिकून घेतलय आसं दिसतय. उदयभान एक रजपुत होता पण मुस्लिम गेटाप का दिलाय?
असे वांग्याचं पीक अंमळ ज्यास्त येते तसे प्रत्येक जण एतिहासिक चित्रपट काढून झोळी भरतोय... कै च्या कै
तान्हाजी काय बोलूच नका. त्या
तान्हाजी काय बोलूच नका. त्या शंकरा रे शंकरा गाण्यात "मर्द मावळा, मर्द मावळा" असला कोरस आहे पण स्टेप्स 'थ्रिलर' च्या करत आहेत हे मावळे....
बाकी बोडक्या डोक्याचा तानाजी - त्या काळात घरातून बाहेर पडताना जर टोपी, पगडी, फेटा असलं काही डोक्यावर नसेल तर मसणात चालला का विचारतील.
त्या लग्नाच्या गाण्यात तर,
त्या लग्नाच्या गाण्यात तर, पडदा बाजूला सरल्यावर एक मिनटं मला वाटलं की, आता बाजूचे मावळे वर उचलणार >>>>>>> ते लग्नाच गाण ऐकल. छान आहे पण ' धडक' च्या शीर्षक गीताचा भास होतो ते ऐकताना.
बाकी बोडक्या डोक्याचा तानाजी - त्या काळात घरातून बाहेर पडताना जर टोपी, पगडी, फेटा असलं काही डोक्यावर नसेल तर मसणात चालला का विचारतील. >>>>>>>> बाजीप्रभू देशपाण्डे बोडक्या डोक्याचे होते की.
त्या लग्नाच्या गाण्यात तर,
त्या लग्नाच्या गाण्यात तर, पडदा बाजूला सरल्यावर एक मिनटं मला वाटलं की, आता बाजूचे मावळे वर उचलणार सदाशिवभाउला( अर्जुन कपूरला) आणि मग गळ्यात हार घालायची झटापट होइल क्रिती सनोनची.. इतक्या वेळ थोबाड पहात होते की, काहीतरी चावट इशारे करतील असंसुद्धा वाटले. >>>
पण त्या काळात लग्नं लहान वयात होत ना? भाऊसाहेबांची प्रथम पत्नी वारली होती, पार्वतीबाई त्यांच्या द्वितीय पत्नी होत्या त्यामुळे या लग्नात ते मोठे असणे समजू शकतो पण पार्वतीबाई तर लहान ९-१० वर्षांची हवी ना? त्या विश्वासरावाची बायको राधिकाही लहानच मुलगी दाखवली आहे. पार्वतीबाई अगदी १५-१६ ची होती असं धरलं तरी लग्नाला ते वय खूपच जास्त आहे. इतकी मोठी मुलगी अजून अविवाहित राहिली असेल हे अनाकलनीय आहे.
सगळ्या तारखा पाहिल्या (विकी
सगळ्या तारखा पाहिल्या (विकी च्या कृपेने) तर लग्नाच्या वेळी पार्वतीबाईंचे वय १५ -१६च असायला हवे.
(No subject)
तान्हाजीत, शंकरा शंकरा
तान्हाजीत, शंकरा शंकरा गाण्यात, नौटंकी वगैरे शब्द वापरलेत...
हे भगवान..
ते शंकरा शंकरा गाणं अजिबात
ते शंकरा शंकरा गाणं अजिबात आवडलं नाही, बघवलं नाही.
सनव यु मेड माय डे
सनव

यु मेड माय डे
शंकरा शंकरा ब क वा स!
शंकरा शंकरा ब क वा स!
पानिपत, तान्हाजी दोन्ही
पानिपत, तान्हाजी दोन्ही चित्रपटात इतिहासाचा विपर्यास केलेला असणार हे त्या त्या चित्रपटाच्या ट्रेलर वरून कळतंय.
काय बाई ते मठ्ठ डोळ्याचे सदाशिवराव, क्रिती पण नाही आवडली.
गोपिकाबाई म्हणून पद्मिनी कोल्हापुरे पण नाही सूट होतय.
गोपिकाबाई ह्या करारी, काहीश्या रागिष्ट होत्या आणि अश्या बायकांचे नाक धारदार असते. पद्मिनी कोल्हापुरे नाही वाटतायेत गोपिकाबाई.
तान्हाजी मध्ये शरद केळकर शिवाजी म्हणून सूट होतोय.
सैफ नाही आवडला. अजय देवगन पण नाही.
मला दोन्हीही मूव्हिस नाही बघायच्यात पण मुलाने आत्तापासून पानिपत बघायचाय असा तगादा लावलाय.
देवा, मला 2.50 तास हा सिनेमा बघण्याची शक्ती दे.
सनव
सनव
पण या भाऊ च्या चेहर्यावरचे भाव पाहिले तर हा फार फार तर सुजाता कोल्ड्रिंक मधली मस्तानी घेउन येइल असे वाटते
मी_ऋचा , मुलाला घेऊन जाणार
मी_ऋचा , मुलाला घेऊन जाणार असाल तर थोडी पार्श्वभूमी समजावून सांगा त्याला. मी माझया एका मित्राबरोबर रणांगण नाटक पाहायला गेलो होतो. त्याला सगळे समजावून सांगायला लागले.. नजीब कोण, दत्ताजी शिंदे कोण (त्याला फक्त ' बचेंगे तो और लडेंगे ' एवढेच माहीत होत ) , सदाशिवराव भाऊ कोण, चिमाजी अप्पा कोण.
नाव सांगताना त्या नाटकाची वेशभूषा ऑस्कर वीर भानू अथय्या यांची आहे असे कळले तर मला वाटले नाटकासाठी कशाला एवढ्या मोठ्या व्यक्तीला घेतले... म्हणजे स्कोप असेल का वगैरे वगैरे ..पण नाटक पहाताना कळले कि त्यांना का ते काम दिले ते. खूप मस्त वेशभूषा ...अविनाश नारकरांनी खूप भारी काम केलाय भाऊंचे .. आणि प्रसाद ओक ने नजीब खानाचे ...आणि अब्दाली अशोक समर्थने केलेला. तुनळीवर वर नाटक आहे..ते दाखवा एकदा ..होम वर्क म्हणून
https://www.youtube.com/watch?v=lY0N9jNVawU
बब्बन,
बब्बन,
त्याला इतिहासात इंटरेस्ट आहे म्हणूनच त्याला बघायला जायचे आहे.
तो 8 वर्षांचा आहे. त्याला पहिला बाजीराव माहिती आहे.
इतर पार्श्वभूमी सांगावी लागेल.
तुमच्या सजेशन बद्दल धन्यवाद.
Pages