Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बदला :https://youtu.be
बदला :
https://youtu.be/mSlgu8AQAd4
साधारण असाच एक इंग्रजी ट्रेलर पाहिल्यासारखे वाटतयं , नाव जाम आठवेना
@स्वस्ति
@स्वस्ति
https://youtu.be/epCg2RbyF80
केसरी
केसरी
धन्यवाद जावेद खान .
धन्यवाद जावेद खान .
मागे कधीतरी "बदला" स्पॅनिश थ्रिलर चा रिमेक आहे असं वाचलं होतं . तेन्व्हा शोधून पाहिला होता .
फायरब्रॅन्ड:
फायरब्रॅन्ड:
https://www.youtube.com/watch?v=vMvg6LtskNc
रोमियो अकबर वॉल्टरः
https://www.youtube.com/watch?v=HSHjC8VdzCM
फायरब्रॅन्ड पाहिला. त्यातली
फायरब्रॅन्ड पाहिला. त्यातली नायिका जी वकील आहे ती असं पाठ केल्यासारखं घडाघडा बोलते , ती नाही आवडली . बाकी मूवी ठीक . नाही बघितला तरी काही मिसनार नाही .
फायरब्रॅन्ड पाहिला. त्यातली
फायरब्रॅन्ड पाहिला. त्यातली नायिका जी वकील आहे ती असं पाठ केल्यासारखं घडाघडा बोलते , ती नाही आवडली >>>> मला पण तिची डायलॉग डिलिव्हरी नाही आवडली. बाकी तिचा अभिनय आणि त्या भूमिकेसाठीचं दिसणं चांगलं होतं. नाही तर रोल काहीही असो, उगीच उठून सगळ्या नायिका फॅशनेबल कपडे आणि ग्लॅमरस दिसणं यातच अडकून पडतात.
कलंक
कलंक
मस्त... अरिजित सिंग..
मस्त... अरिजित सिंग..
फायरब्रॅन्ड पहायला सुरुवात
फायरब्रॅन्ड पहायला सुरुवात केली होती पण तिची पुस्तक घडघडा वाचल्यासारखी संवादफेक बघुन बंद केला.
अल्लादीन,https://m.youtube
अल्लादीन,
https://m.youtube.com/watch?v=foyufD52aog
कलंक - ट्रेलरवरून सिनेमा
कलंक - ट्रेलरवरून सिनेमा फ्लॉप असणार असं वाटतंय.
कलंक ट्रेलर पहिला. अबब सेट्स
कलंक ट्रेलर पहिला. अबब सेट्स आहेत, त्यांचं सगळंच कसं लार्जर दॅन लाईफ असतं. भन्साळी इन्स्पायर्ड वाटलं थोडा.
वरच्या लिंकमधून अल्लादिन पण बघितला. विल स्मिथ जीनी ..मस्त. मला ऍनिमेशन मधल्या जास्मिनचे केस फार आवडतात . प्रत्यक्षात तशी हेअर स्टाईल करता येईल का बघू चित्रपटात.
कलंक>>>>>>>>> नाही आवडला..
कलंक>>>>>>>>> नाही आवडला.. तेच तेच भव्य सेट, मशाली, सगळीकडे दिवाळी असल्यासारखे दिवे, पाणी, महाल, अनारकली टाईप ड्रेसेस, बोजड चेहेर्याची माधुरी (फॅन्सनी प्लीज दिवे घ्या) ...
एक सीन तर भल्लालदेव (बाहुबली ) कॉपी केल्यासारखा वाटला.
बोजड चेहेर्याची माधुरी
बोजड चेहेर्याची माधुरी (फॅन्सनी प्लीज दिवे घ्या) ...>> माधुरी फॅन असुनही सहमत , माधुरी खुप निस्तेज वाटत होती, एरवी फोटोत मस्त दिसते पण टिझर मधे आलिया भाव खावुन गेली. टिझर वरुन काहीही अन्द्दज येत नाही
एरवी फोटोत मस्त दिसते>>> काही
एरवी फोटोत मस्त दिसते>>> काही डान्स शो मधे जज म्हणून आलेली असताना पण बघितलेय, या पिक्चर पेक्षा नक्कीच चांगली दिसत होती.
अगदीच फ्लॉप आणि "ठग्ज.."
अगदीच फ्लॉप आणि "ठग्ज.." प्रमाणेच आउटडेटेड वाटत आहे ट्रेलर
Avengers Endgame final
Avengers Endgame new trailer..
https://www.youtube.com/watch?v=TcMBFSGVi1c
इंडगेम ट्रेलर अगदीच ओके आहे,
इंडगेम ट्रेलर अगदीच ओके आहे, पण पिक्चर बद्दल फारच उत्सुकता असल्यामुळे तो हिट होणार आहे.
बोजड चेहेर्याची माधुरी >>>
बोजड चेहेर्याची माधुरी >>>+१००
कलंक आउटडेटेड>>>>> +१००
बोजड माधुरी - +1
बोजड माधुरी - +1
पण आलिया आणि सोनाक्षी आहेत, त्यामुळे बघणार.
चुकून नजरेस पडलाhttps://m
चुकून नजरेस पडला
https://m.youtube.com/watch?v=-PB2_UaOWEM
अतिरंजीत , अ आणि अ वगैरे ...
स्वस्ति ..... मनोरंजक आहे हा.
स्वस्ति ..... मनोरंजक आहे हा..चला आता अश्या मरामारीसाठी तमिळ तेलुगु चित्रपट बघायची गरज नाही.
जन्गली:
जन्गली:
https://www.youtube.com/watch?v=tcsJ-3GLDE4
ऋन्मेऽऽष कुठे गायब झालेत..
ऋन्मेऽऽष कुठे गायब झालेत...मिस यु सर...
अल्लादिन चा ट्रेलर पाहीला...
अल्लादिन चा ट्रेलर पाहीला... बिग बिग नो...फाॅर मूव्ही..
मला टीपिकल बाॅलिवूड स्टाईलच वाटला..
आणि जिनच्या रोलमध्ये विल स्मिथ ...बापरे ...बघवत नाही..
असं वाटतयं गांजा पिऊन चित्रपट साईन केला वाटतं..
असहमत - विल स्मिथ परफेक्त
असहमत - विल स्मिथ परफेक्त कास्टिंग आहे जिनी साठी.
सुपरहिट चित्रपट असेल हा.
हत्तीवर एकदम दोन सिनेमे ,
हत्तीवर एकदम दोन सिनेमे , जँगली आणि डिस्ने डम्बो
मला टीपिकल बाॅलिवूड स्टाईलच
मला टीपिकल बाॅलिवूड स्टाईलच वाटला.. >>>> नाच गाणी .
आणि जफर(?)ची अजय देवगण style entry बघितली ????
मोदीन वरच्या मुव्हीचा ट्रेलर
मोदीन वरच्या मुव्हीचा ट्रेलर बघित्ला, प्रयत्न चान्गला आहे पण विवेक मोदिच्या जवळपासही पोहोचला नहिये एकतर तो बर्यापैकी बारी़क वाटतो आणी आवाजावर त्याने काहीही मेहनत घेतली नाहिये त्यमानाने अनुपम खेर खूप क्लोज वाटला होता मनमोहनसिन्गाच्या भुमिकेत... त्याने चालण्याची लकब, व्हॉइस मॉड्युलेशन यावर खुप मेहनत घेतली होती अर्थात अनुभवाचाही फरक आहे, विवेक अगदिच कमी पडलाय.
मोदीच्या प्रचन्ड पॉप्युलॅरिटीला एनकॅश करणे हा उद्देश असावा पण याने मोदिना मात्र निवडणुकित काही फायदा होइल अस वाटत नाही.
Pages