Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पानीपत, फत्तेशिकस्त पेक्षा
पानीपत, फत्तेशिकस्त पेक्षा तानाजीच आवडेल पहायला. अजय देवगण चपखल आहे. शिवाजी राजांच्या भूमिकेत तो आपला शरद केळकर पण व्यवस्थित आहे. सैफ अलीचा अंदाज नाही आला.
पानीपत वर बंदी येणार आहे असे ऐकले. एका दृश्यात अर्जुन कपूरने अभिनय केल्याचा आरोप आहे त्याच्या चाहत्यांचा.
शिवाजी राजांच्या भूमिकेत तो
शिवाजी राजांच्या भूमिकेत तो आपला शरद केळकर पण व्यवस्थित आहे. >> डोळ्यात टोटल बदाम .
चिमाच्या राजांपेक्शा नक्कीच आवडला ...." तयारी करा पंत " . त्याच्यासाठी तरी बघणार आणि सैफूबाबासाठी
रायबा फारच लहान दिसतो यात .
घोरपड दिसली नाही .
मला आवडला तान्हाजीचा ट्रेलर!
मला आवडला तान्हाजीचा ट्रेलर! एंटरटेनिंग वाटला. यशवंती ला मिस केले मी पण!!
सैफ मस्त दिसतोय, शरद केळकर पण शोभलाय शिवाजी महाराज म्हणून. परफेक्ट कास्टिंग! अजय देवगण तर मस्तच सूट होतोय त्या रोल मधे. त्याचे केस जरासे मॉडर्न वाटले मात्र. त्याला अर्थातच गाणे बिणे दिलेले दिसतेय. थोडा फिल्मीपणा चालतो मला. पण काजोल आहे म्हणून उगीच तिलाही एक्स्ट्रा फूटेज देऊ नयेत म्हणजे मिळवली! तिच्या पात्राचा काहीही इंपॉर्टन्स नसायला हवा या स्टोरीत खरं तर.
अजून एका ऐतिहासिक
अजून एका ऐतिहासिक व्यक्तिरेखेची मोडतोड करणारा चित्रपट
ट्रेलरच इतका भयानक आहे तर चित्रपट कसा असेल या विचाराने काटा येतो अंगावर
सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्याल याला काही मर्यादा च्यायला
तानाजी ला साखळदंड???? उदयभान एक साधा राजपूत किल्लेदार होता त्याला खिलजी सारखा विकृत का केलंय, तो कुठंही राठोड न वाटता खिलजी, अब्दालीसारखा दिसतो. त्याला इतके महत्व होते हे त्याचे त्यालाच माहीती नसेल.
हत्तीएवढ्या उंचीच्या तोफा घेऊन नदी का समुद्रातून दख्खनवर स्वारी. दिल्ली ते पुणे व्हाया श्रीलंका आला बहुदा.
मुळात इतक्या उंचीच्या तोफेला बत्ती द्यायला हत्तीवर चढून बत्ती द्यावी लागेल.
आणि दिल्लीत सिंहगड बद्दल इतकी चर्चा??
कोंढाणा ही दख्खनची दिल्ली आहे हे आता समजलं, म्हणजे पुणेकर दख्खनच्या दिल्ली शेजारी रहातात.
हॉटेल वाल्यांकडे कशी एक ग्रेव्ही तयार असते तीच ते कधी पनीर माखनवला, व्हेज मसाला, हैद्राबादी म्हणून खपवतात तोच प्रकार, एकदा हिट होतोय म्हणल्यावर सुटलेत सगळेच
एक कोणीही अचाट ताकदीचे प्रयोग करणारा, जोशात डायलॉग बोलणारा हिरो, एक नाजूक कमनीय बांध्याची हिरोईन जी राणी असो वा पेशवेबाई, तिला सगळ्यांच्या समोर पोट उघडे टाकून, कंबर हलवत नाच करता आला पाहिजे, एक विकृत दिसणारा आणि उगाचच विकृतपणा करणारा व्हिलन, तीन चार इकडून तिकडून ढापलेल्या गोष्टी, अतिभव्य महाल, रणांगण, हत्ती, घोडे, उंट तलवार, तोफा, बंदुका अजून काय हत्यारे सापडतील ती
मग एक प्रेमाचे गाणे, एक मर्दपणाचे गाणे, मग एक असेच खूप लोकांनी कारणाशिवाय दरबारात येऊन म्हणलेलं गाणं
एक अव्यक्त प्रेम, एक भाऊ किंवा बहीण, किंवा मानलेली आई-मावशी-काकू-आत्या, मग त्यांचे भावनिक अत्याचार, भरपूर कट कारस्थाने आणि मग शेवटची मारामारी आणि भरपूर व्हिएफक्स चा मारा
झाला ऐतिहासिक चित्रपट तयार
मग त्याला कुठल्या व्यक्तिरेखेच्या नावाखाली दडपायचा ते बघून थोडी अडजस्टमेंट
पैसे वसूल
सर्जिकल स्ट्राइक
सर्जिकल स्ट्राइक

एक मराठा लाख मराठा
आशुचॅम्प
आशुचॅम्प

आशुचँप अनुमोदन. मार्मिक
आशुचँप अनुमोदन. मार्मिक स्टाईल स्ट्राईक.
आशुचॅम्प+111111
आशुचॅम्प+111111
Submitted by आशुचँप on 19
Submitted by आशुचँप on 19 November, 2019 - 20:35
>>>>> संपुर्ण पोस्टशी सहमत !!!
काहीतरी तारतम्य बाळगा राव ऐतिहासिक चित्रपट बनवताना.
आशुचॅम्प परफेक्ट!
आशुचॅम्प परफेक्ट!
दगडापेक्षा विट मऊ या न्यायाने
दगडापेक्षा विट मऊ या न्यायाने पानिपत पेक्षा तान्हाजी(?)चा ट्रेलर सुसह्य वाटतोय
जो बिकता है, वोइच बनता है.
जो बिकता है, वोइच बनता है. कँट कंप्लेन...
शरद केळकर मस्त शोभलाय महाराजांच्या गेटप मधे. चिमां अगदिच वरणभात, आणि कोल्हे ओवरअॅक्टिंग. वी नीडेड ए न्यु फेस...
आशुचॅम्प
आशुचॅम्प
तान्हाजी ट्रेलर आवडला, आता हे वाचल्यावर परत नीट बघेन पण मी अजय आणि शरद यांच्याकडे बघत राहिले, मला दोघे आवडतात प्लस काजोल पण खूप आवडते. त्यामुळे इतर ठिकाणी दुर्लक्ष झालं बहुतेक.
शरद केळकर मस्त शोभलाय
शरद केळकर मस्त शोभलाय महाराजांच्या गेटप मधे. चिमां अगदिच वरणभात, आणि कोल्हे ओवरअॅक्टिंग. वी नीडेड ए न्यु फेस.. >>>
हे थ्री-वे स्प्लिट फ्रेम मधे डोळ्यासमोर आले 
तान्हाजी ट्रेलर बोअर वाटला.
तान्हाजी ट्रेलर बोअर वाटला. व्हीएफएक्स पानिपतच्या तुलनेत बालिश वाटले आणि ओव्हरऑल मुव्ही गरीब बजेटचा वाटला.
फक्त शरद केळकर आवडला (डोळ्यात बदाम!). खूपच शोभलाय तो महाराजांच्या भूमिकेत. त्यालाच त्या फत्तेशिकस्तमध्ये का नाही घेतलं?
चँप
चँप

व्हीएफक्सच्या आयजीवर दिग्दर्शकाची बायजी ऊदार.
ऐतिहासिक सिनेमांमध्ये व्हीएफक्स बंदी कायदा हवाच!
सिनेमाचे रिअॅलिस्टिक बजेट त्या रिजनच्या आजवरच्या सर्वात महागड्या रिजनल मुवीपेक्षा जास्त असू नये
आणि ईतिहास व पुरातत्व खात्याच्या तज्ञांकडून सिनेमाचे प्री-रिलिज ऑडिटिंग मस्ट असाही कायदा आणला पाहिजे.
प्रत्येक दिग्दर्शकाने पहिल्या पाच वेंचर मध्ये किमान एक आणि कमाल एकच ऐतिहासिक सिनेमा बनवलाच पाहिजे.
ही अट कलाकारांनाही लागू.
गाई आणि जानव्यांचे रक्षक होते
गाई आणि जानव्यांचे रक्षक होते म्हणे,
मग अर्धी तिकिटे गाईंना अन अर्धी जानव्याना का ?
तानाजीचा आधीच ठळकपणे ‘बेस्ड
तानाजीचा आधीच ठळकपणे ‘बेस्ड ऑन ट्रु स्टोरी‘ उल्लेख केलाय म्हणजे ऑथेंटीसिटीची अपेक्षा करु नये असाच संदेश दिलाय
सिंघम इन टाइम मशिन मोड गोज बॅक टु हिस्टरी असा लुक आहे सिनेमाचा पण आवडला मला, देवगणच्या केसांचा लुक नाही जमला बाकी तानाजी म्हणून एकदमच शोभतोय रांगडा गडी !
सैफ आवडला पण तो पक्का मुघल दिसतोय, शरद केळकर मस्तं !
काजोल लुक कितीही बदलो, जोवर तिचा तो कर्कस्श चाइल्डिश उथळ के३जी आवाज आहे तोवर कुठल्याही पिरियड फिल्ममधे ती नाही शोभणार !
सैफ मुघल दिसतोय ?
सैफ मुघल दिसतोय ?
तो राजपूत होता ना ? उदेभान की उदयभान
अरे खरंच की. जानव्याचा डायलॉग
अरे खरंच की. जानव्याचा डायलॉग आत्ताच पाहिला. सकाळी हपिसात लंच टाइमात पाहिला तेव्हा ऐकूच आला नव्हता! ते ढालीवर ओम वगैरे पण आत्ता कुणीतरी सांगितलं तेव्हा दिसलं. च्च मग प्रॉब्लेम आहे खरा.
ह्म्म. अजय देवगण पण मख्खपणात
ह्म्म. अजय देवगण पण मख्खपणात कमी नाही. (मला तो कधीच आवडला नाही म्हणा) ... देवगण काय, केळकर काय, अर्जुन काय... त्यांच्या आवाजात दम नसल्याने व चेहर्यावर भावना दाखवायला त्यांना जमत नसल्याने असे चित्रपट परिणामकारक होणे अवघड. केळकरचा पोषाख जमलाय मात्र.
अरे जाऊ द्या.. निदान
अरे जाऊ द्या.. निदान मराठ्यांचा इतिहास भारताला समजतो तरी आहे चित्रपटांमुळे ...
पेशवा बाजीरावांची बायको काशी आणि मस्तानी हे मला माहित नव्हते.. चित्रपटामुळे बऱ्याच गोष्टी कळतात.
आता तानाजी मुळे उदयभान माहित झाला.
पानिपत पण बघणार.
आशुचँप अनुमोदन.
आशुचँप अनुमोदन.

मराठा इतिहासकी देखो कैसी वाट लावली अशा कॉम्पिटीशनमधे हे सिनेमे काढताहेत का काय नकळे.
तान्हाजी ट्रेलर लैच बोर आहे.
अजय देवगण पण अर्जुन कपूरपेक्शा काही कमी नाहीये. डोळे फारतर अर्जुन कपूरपएक्शा ०.०१ ने जास्त एक्सप्रेसिव असतील.
काजोल चा स्वतःबद्दलचा गैरसमज कधी जाणार. वर दिपांजलीने के३जी चा उल्लेख केलाय ते अगदी बरोबर आहे.
के३जी मधे तिने अतिशय डोक्यात जाणारी अॅक्टींग केलेय.
शरद केळकर आहे हीच ती काय एक जमेची बाजु
काजोलने ब्राह्मणचा उचलणार काय
काजोलने ब्राह्मणचा उचलणार काय केलाय?
अरे ह्या दोघांना आता बाहेर
अरे ह्या दोघांना आता बाहेर पिक्चर मिळेना झालेत स्वतःच प्रोड्युस करून कर तात झालं कायतरई. जितका चालेल तितका चालेल. रिटायरमेंटची तरतूद त्यांनाही करायचीच असेल. त्यात बे भरवशांचा व्यापार आहे हा. सध्याचे सेंटिमेंट बघून कायतरई बनवतात झालं अक्षय कुमार एका मुलाखतीत म्ह टलेला. पिक्चर बनवणे हा बिझनेस आहे. पैसा उधार घ्यायचा, वेळेत पिक्चर बनवायचा. म्हणजे इंट्रेस्ट कॉस्ट जास्त वाढत नाही. आटोक्यात निर्मिती खर्च ठेवला की मग लगेच रिलीज करायचा. लोकांना वीकेंड ला बघायला काहीतरी हवेच असते. मग खर्च वजा जाउन होईल तो नफाच. म्हणून आहे त्या लाटेवर ते काम करतात. हे पब्लिक जे बनवते तो सिनेमा नव्हे. ते करतात ती अॅक्टिंग नव्हे.
अजय काजोल ने पहिले राजू चाचा नावाचा पण एक सिने मा प्रोडुस केलेला भयानक खर्चिक व चाइल्डिंश वीएफेक्स. पडला तो . एक शिवाय काढलेला तो तर बघवत नाही. आता हे.
आशु चँप पोस्ट चपखल व मस्त आहे.
आशुचँप
आशुचँप

आशुचँप अनुमोदन.
आशुचँप अनुमोदन.
काजोलने ब्राह्मणो के जनुआ
काजोलने ब्राह्मणो के जनुआ असा उल्लेख केला आहे
गाई आणि जानव्यांचे रक्षक होते
गाई आणि जानव्यांचे रक्षक होते म्हणे>>>>बाईचा घुंगट आणि ब्राह्मणो के जनुआ असा उल्लेख आहे ना.गाईंचा कुठे उल्लेख आहे?
तानाजी चा ट्रेलर खरंच चांगला
तानाजी चा ट्रेलर खरंच चांगला आहे आणि कास्टिंग पण उत्तम,
आपल्याला फक्त चुका दिसतात पण ऐतिहासिक चित्रपट बनवणे
म्हणजे काही खायचं काम नाही.. त्यातही लोकांना आवडला पाहिजे
म्हणून मग काही अतार्किक गोष्टी येतातच. आफ्टर ऑल मनोरंजन इज मस्ट.
म्हणून लगेच चित्रपटाचा संबंध खऱ्या इतिहासाशी जोडून तुलना करणं मला तरी
बालिश वाटतं .. चित्रपट हि फक्त कुणाची तरी कलाकृती आहे खरा इतिहास नाही.
Pages